सोमवार, ६ एप्रिल, २०२०

          🙏🏻🔴नमस्कार🔴🙏
मी विनोद पाटोळे सर
आज मी एक हृदय हेलवणारी वास्तविक  प्रासंगिक कथा आपणास सादर करित आहे....

ती वेड्यातली शहाणी...

आज घरातून शाळेत जातानां नेहमी प्रमाणे  शिवाजी चौकतील पेट्रोल भरुन पुढे जात असतांना 100 मीटर अंतरावर एक दृश्य नजरेस पडले...एक म्हातारी प्रथमदर्शनी प्रत्येकाला वेडी वाटणारी एका कुत्र्याला शिळी भाकर खाऊ घालत होती..ती शिळी भाकरी बहुदा तिने कुनाकडून तरी मागून आणली असावी. हे सर्व पाहुन मी इतर लोकांप्रमाने पुढे निघुन गेलो पण तो प्रसंग काही माझ्या डोळ्यासमोरून जाईना...शेवटी मी पुन्हा त्या म्हातारिकडे आलो येताना मी हॉटेल मधून तिला खाण्यासाठी काही पदार्थ घेतले.पण तीच ते रूप बघुन माझी तिच्याजवळ जाण्याची हिम्मत होत नव्हती.पण मोठ धाडस करुन मी 10 फूटावर गाडी उभी केली आणि ते पदार्थ घेऊन तिच्याजवळ गेलो.
मी- खाते का ?? (पिशवीतिच्याकडे दाखवून)
ती- ईशाऱ्यानेच मान हालवून हो म्हटली.
मी-हे तुला आनल आहे तू खा..त्या कुत्र्याला नको खाऊ घालू.(तिलाच दोन वेळचे खायाचे वांधे आहेत म्हणून मी म्हटलो)
ती-काहीही न बोलता माझ्याकडे एकटक बघत होती बहुधा तिला माझा फुकटाचा सल्ला आवडला नसावा...
मी चुपचाप तिथून निघालो....पण शाळेतुन आल्यावर माझ मन घरि काहि  लागत नव्हतं.मनात ना ना प्रकारचे प्रश्न आणि त्याची विचित्र अशी उत्तरे.
मी दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी तिला घरुनच खाऊ ची पिशवी घेऊन गेलो.आज मात्र ती कालपेक्षा ज़रा सहानुभूतिपूर्वक माझ्याकडे पाहत होती.मी जवळ जाऊन तिला म्हटलो "घे तुला आणल आहे खाऊन घे कुत्र्याला नको देऊ." मानेने तिनेही यावेळी होकार दिला आणि हातानेच मला जाण्याचा इशारा केला.
(तिला बोलताच येत नाही असा माझा समज झाला होता.)
पण मी आज मात्र चोरून हे बघण्याच ठरवल की ती त्या कुत्र्याला खाऊ घालते की एकटीच खाते. मी तिच्यासमोरून गाडी काढण्याचे नाटक केले आणि दुसऱ्या गल्लीतून गाड़ी आइसक्रीम वाल्या दुकानाच्या मागे लावली व् तेथून मी तिची गम्मत पाहत बसलो.20 मिनिट तिने पिशवी उघडली नाही.आणि शेवटी जिथे ती बसते त्या भिंतीच्या मागून त्याच कुत्र्याचा कान धरून ती बाहेर आली.आता दोघे मात्र मी आणलेल्या पदार्थांवर तुटून पडले..एक आई आपल्या बाळाला जेवढ्या प्रेमाने खाऊ घालत तेवढ़याच् प्रेमाने ती त्या कुत्र्याल खाऊ घालत होती..मला खर तर म्हातारिचा राग आला पण मी चुपचाप तिथून पुन्हा निघुन गेलो.
आजही मी बेचैन होतो...राग शांत झाला होता आणि आतला आवाज सांगत होता की *आयुष्यभर पैशाच्या मागे धावणाऱ्या माणसांच्या तुम्हा आम्हा सारख्यांच्या गर्दीत एक म्हातारि जी भीक मागते ती स्वतासोबत एका कुत्र्याला जगवते, पोसते आहे.*
आता मात्र म्हातारीशी माझ एक भावनिक नातं तयार झाल होत..
माझं आता रोजच ठरल होत, सकाळी येताना आणि सायंकाळी घरी जाताना तिच्या जेवण्याच पार्सल तिला देण्याच.आता मात्र ती माझ्यासमोरच त्या कुत्र्याला खाऊ घालायची.आणि मिपण तिला अड़वले नाही.....
*दिवस 8वा* - सकाळी मी तिला पार्सल द्यायला आलो असता जाताना मी तिचा व माझा सेल्फ़ी काढू म्हणून मोबाइल बाहेर काढला..म्हातारीला क्षणात कळाले कि मी फ़ोटो काढत आहे अस..6-7 दिवस अगदी normal वागणारी म्हातारी आज अचानक उठून उभी राहिली आणि चक्क शुद्ध मराठीत बोलली ... *" ए फ़ोटो नाही काढायचा माझा, मोबाईल ठिव"*
(स्वताची फाटक़ी साड़ी नीट करत आणि ब्लाउज़ ठीक करत ती बोलली)
पहिली गोष्ट म्हणजे तिला बोलता येत हे मला शॉकिंग होत..आणि दूसरी गोष्ट तिला स्वताच्या स्री पणाची एवढी प्रखर जाणिव असण हे मला खुप अचंबित करणारं होत..मला माझ्या मुर्ख पणाची जाणिव झाली.(पण मला त्या आजीचा फ़ोटो मित्रांना आणि घरी दाखवायचा होता की या आजीला मदत करा ) मला तेंव्हा अस जाणवल की मी आपण शहाण्यातले वेडे आहोत  आणि ती वेड्यातली शहाणी.
मी प्रचंड अपराधिक भावनेने घरी पोहोचलो..त्या राञी मला झोपतांना, माझ्यातला आतला आवाज म्हणत होता..
*एका वेडसर आजीला तिच्या स्री पणाची एवढी प्रखर जाणिव आहे की तिच्या अर्ध नग्न शरीराचा कुणी फ़ोटो काढू नये आणि स्वताला बहुविद्याविभूषित व मॉडर्न म्हणवणाऱ्या काही तरुणी झींझाण्या (डोक्याचे केस)
मोकळे सोडून कस बस तोंड करुन,इतभर कपडे घालून,हातपाय वाकडे तिकडे करुन सेल्फ़ी घेतात आणि टाकतात social मेडियावर आणि बघतात वाट किती likes मिळतात याची.तर वेडे कोण आणि शहाणे कोण यात माझी आख्ही रात्र गेली.*
*दुसऱ्या  ( 9 व्या दिवशी )*
 मी पुन्हा जातांना खाऊ खाऊ घेऊन गेलो ..मला कळाले होते की आजी बोलू शकते ते ही अगदी स्पष्ट मराठीत..आज मात्र आमच संभाषण झाल.
मी- आजी तुला कालचा राग आला का???
ती- नाही रे.पण फ़ोटो नको चांगल नसत ते म्हणे.
मी- तुला मूल बाळ नाही का???
ती- आहेत रे पण कुणी कुणाच् नसतं .
मी-तुझ गाव कोणत???
ती-तुला नाही सांगणार.
मी- मी उद्या बाहेरगावी जाणार आहे आता नाही येणार.
(हे वाक्य ऐकून मात्र  म्हातारीच्या चेहऱ्यावर स्पष्ट असे भाव उमटले जे मी टिपले)
ती- तू काय करतो???
मी-शिक्षक आहे.लहान मुलानां शिकवतो.
ती- ठीक आहे जा तू.
मी- (खिशातून काही पैसे काढून तिच्याकडे देत म्हणालो)
घे रोज काहीतरी घेऊन खात जा.
ती- नको पैसे तुला राहु दे,
मला पैसे नको,आहेत माझ्याकडे.(साडीतून एक पिशवी काढत तिने मला पैसे दाखवले)
मी तिथुन निघालो...मला मात्र आता गहिवरून आले होते..
*शेवटचा दिवस*
ऊद्या मी बाहेरगावी जाणार होतो म्हणून आज मी 2 दिवस पुरेल एवढं खायला(अन्न) सोबत घेऊन शाळेच्या रस्त्याने  म्हातारिच्या दिशेने निघालो होतो.
म्हातरीही कदाचित माझीच वाट पहात होती की काय...आज गाडी तिच्यासमोर लावताच ते कुत्र ही जवळ आल..
म्हातारीला मी खायला दिले आणि काहि सुट्टे 260 रुपये दिले.घेत नव्हती पण मी बळजबरीने ते दिले.तिला म्हटलो मी जातोय आज...म्हातारि म्हणे जा....
मी गाड़ीवर बसलो आणि म्हातारीचा आवाज आला
*ए बाळा थांब फ़ोटो काढायचा होता ना तुला काढ़ एक फ़ोटो*
मी ज़रा बावरलो काय कराव सुचेना मी मोबाइल काढला आणि सेल्फ़ी काढण्यासाठी धरला म्हातारिने मान खाली घातली(स्वाभिमान जपायचा असेल कदाचित).  मी नाही काढून हो काढला म्हणून निघालो.
थोड़ पुढे जाऊन मागे वळून पाहिलं म्हातारि माझ्या पाठमोऱ्या आकृतिकडे हताशपणे पाहतअसल्याची मला दिसली.
मी पुढे गाडी चालू लागलो  तेवढयात तेच कुत्र माझ्या गाडीच्या मागे धावत होत...त्या कुत्र्याने माझा एस.पी.कार्यालयापर्यंत पाठलाग केला.
मी गाड़ी थांबवली व तिथल्या टपरिवरून एक बिस्किट चा पुडा घेतला आणि त्यातले भिस्किट काढून त्याच्यासमोर टाकले...पण काही केल्या कुत्रा भिस्किट खात नव्हता पण त्या खाली कागदाला चाटत होता..हे सगळ बघुन रसत्यावरचे एक महाशय बोलले  *"भलता मातेल कुत्रा दिसतय भाऊ"*
काय करावे मला काही सुचेना..शेवटी मी पुन्हा एक भिस्किट चा पुडा घेतला पण यावेळी मी तो फोडला नाही.तसाच त्याच्या तोंडाजवळ धरला आणि काय नवल कुत्र्याने तो पुडा तोंडात घेऊन परतीची वाट धरली..मला सगळा प्रकार लक्षात आला पण मला ते दृश्य प्रत्यक्ष डोळ्यांनी पहायचे होते.सकाळचे 8 वाजले होते खरतर मला शाळेत जायला उशिर व्हायला व्हता तरिपण मी कुत्र्याच्या मागे मागे गाडी घेतली..पुढे जे घडले त्याने माझे डोळे दिपले आणे चक्क संम्पूर्ण चेहऱ्यावर अश्रुंचा वर्षाव झाला ..
*कुत्रा आजीजवळ् आला होता आणि त्याने तिथे तो पुडा आजिकडे दिला आणि ते दोघेही  तो पुडा खात बसले,एका मुक्या जीवाला उपकरांची जाणिव असते याची ती प्रचिती आज प्रत्यक्ष पणे आज आली होती*
मला मी माणूस असल्याची लाज वाटली.कारण जिथे आईबाप मुलांना जड़ होतात...तिथे एक कुत्रा त्याच्या उपकरांची परतफेड करताना मी पाहत होतो...
इतरांनी आणि मी सुद्धा जिला वेडी समजत होतो ती खर तर वेड्यातली शहानी आणि आपण शहाणेतले वेडे आहोत हे दिसून आले होते.
काहि दिवसानंतर  मी परत आलो नेहमीप्रमाणे शाळेला जातांना खूप दिवसानंतर आज्जीची भेट होईल याआनंदाने आज्जीसाठीहि खायचे घेऊन निघालो होतो पेट्रोल भरुन झाल्यावर नेहमीच्या जागेवर जाऊन पाहिले माञ आज्जी दिसुन आली नाहि.बाजूच्या  पानटपरी वाल्याला  चौकशी केली तर तो म्हणला आजी 10-12 दिवस झाले ती गेल्याची  कुठे गेली माहित नाही हे ऐकून मन अगदी सुन्न झाले .
तो म्हणला - तुम्ही आजीचे कोन मि म्हणलो - मी ..मी..कोन मी....अस मणत  पुढे निघुन आलो त्या दिवशी माझे मलाच काहि सुचत नवते ,अति महतौवाचे काम आहे असे शाळेत सांगुन अर्ध्या दिवसाची रजा देऊन मिमी घरी निघुन आलो व सर्व हकिगत बायको ला सांगुन आम्ही दोघेही खूप रडलो त्या  दिवसानंतर आज्जी परत दिसलीच नाही.

*सारांश*
या आजी सारख्या अनेक आज्ज्या मी पाहिल्या आहेत..मला प्रचंड आनंद मिळतो अशा लोकांसाठी काहीतरी करण्यात...माणूस आयुष्यभर पैसा कमावतो आणि जाताना 1 रुपया कपाळाला लाउन जातो,
तो देखील खालीच राहून जातो..मग पैशांची एवढी हाव का????
फक्त एकदा एखाद्या गरीबाला किंवा , एखाद्या असहाय्य माणसाला मदत करुन बघा..
खुप खुप आनंद मिळतो..खर तर मी मनमुरादपणे असा आनंद लूटत असतो...मी काही उपकार नाही करत अशा लोकांवर.उलट मी स्वार्थी आहे पण कसा, मी असाच त्यांच्यावर निस्वार्थपणे प्रेम करुन कर्तव्यबजावत आनंद लुटून घेतो....कारण मी जरी शिक्षक असलो तरीही आजीच् मला बरच काही शिकवून गेली.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
  ---  विनोद बी.पाटोळे सर ---
 सरस्वती माध्य .विद्यामंदिर बीड.
          ( 8275004299 )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...