सोमवार, ६ एप्रिल, २०२०

             पोस्टर च्या साहाय्याने कोरोनाबत जनजागृती.
सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी) :- जालना शहरातील उपक्रमशील शिक्षक मुक्ताराम खरात  चौधरी नगर
परिसरातील जनतेला कोरोनाबाबत जनजागृती होण्यासाठी पोस्टर च्या माध्यमातून गेट वर "हात धुवुनच घरात यावे" असा संदेश दिला आहे.सध्या कोरोना सारख्या आजाराची साथ मोठ्या झपाट्याने महाराष्ट्रात व देशात परत आहे.हा आजार संपर्कामुळे पसरत आहे.घरात पाच ते सहा व्यक्ती असतात.दैनंदिन गरजेच्या वस्तू जसे की किराणा,भाजीपाला,फळे,औषध घेत असताना नाणी व नोटांना स्पर्श हाताला होतो.आणि त्यामुळे कोरोना सारख्या विषाणू हातावर राहण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. बाहेरून आलेल्या व्यक्तीला गेटबाहेरच सेनिटायझर ने किंवा साबणाने हात धूवूनच घरात प्रवेश केल्यास कुटुंबातील सदस्यांना सुरक्षित ठेऊन कोरोनाचा प्रसार थांवबता येईल असे मत व्यक्त केले आहे.चौधरी नगर येथील जनतेने या उपक्रमाची सुरवात मोठ्या प्रमाणात केली असून कोरोना सारख्या साथीच्या आजाराला रोखण्यासाठी अशा विविध उपक्रमाचे स्वागत केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...