सोमवार, ६ एप्रिल, २०२०

राज्य उत्पादन शुल्क च्या अधिकाऱ्यांच्या वरद हस्तामुळे बंद बारीत दारू ची विक्री
दारुबंदी आदेशाचे होत आहे उल्लघंन, देशी -विदेशी  दारुची चढ्या भावात  विक्री
धर्माबाद (भगवान कांबळे) :- कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचावासाठी २१ दिवसांचा देशव्यापी बंद घोषीत करण्यात आलेला आहे. नांदेड  जिल्ह्यासह राज्यस्तरीय
सिमाही सिल करण्यात आलेल्या आहेत. त्यात दारु ही जीवनावश्यक बाबीत मोडत नसल्याने त्यावरील बंदी ही मद्यपींची चांगलीच तारांबळ उडविणारी ठरली आहे.
या काळात जीवनाश्यक वस्तूची दुकानें दिवसातून काही काळासाठी चालू राहतील याची खबरदारी सरकार घेत आहे. पण काही संधीसाधू लोक हल्ली या गोष्टीचा फायदा घेण्याचा कल वाढला असून धर्माबाद मध्ये याचा प्रत्यय येत असून दारू ची दुकानें जीवनाश्यक मध्ये येत नसल्यामुळे बंद आहेत.  देशी-विदेशी बंदमुळे याचा फटका तळीरामांना बसला असून गळा ओला केल्याशिवाय जमतच नाही, हे सगळे तळीराम वाटेल ते भाव देऊन दारू विकत घेत असून 60 ची देशी दारू हल्ली बंद बारी असल्यामुळे 300 रुपये ला भेटत असून अस्सल देशी वर प्रेम असणारे तळीराम कसेबसे विकत घेऊन कसाबसा आपला गळा ओला करत आहेत. दुसरीकडे आय बी 350 रुपये , आर एस 400 रुपये प्रमाणे मिळत असून, सध्या ह्या दारूचे भाव  दुप्पटच्या वर गेले असून पिणा-याना अव्वाच्या सव्वा पैसे देऊन विकत घ्यावयास लागत आहे. शहरात अनेक ठिकाणी हेच दृश्य दिसत आहे. सध्या पोलीस प्रशासन लॉक डाउन च्या कामात व्यस्त आहेत तरी सुद्धा अवैध दारू विकणारे पोलिसाना चकवा देऊन सर्रासपणे धंदा करत असून हा धंदा करणा-यांना राज्य उत्पादन शुल्क च्या कर्मचाऱ्यांचे वरद हस्त लाभल्यामुळे सध्या शहरांत दारू बेकायदेगीरपणे विक्री चालू आहे आणि शहरातूनच परमिट बार मधून यांना दारू चा पुरवठा होत असल्याची शंका जनतेतून व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात मोहफुलाच्या दारूचे अड्डे सर्रास सुरु आहेत. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असतांना नेमक्या कुणाच्या आशिवार्दाने दारुची गळती व विक्री होत आहे, हा नेमका प्रश्न आहे. येथे ग्रामीण भागात बाहेरील जिल्ह्यातून आलेल्यांच्या वाढत्या संख्येमुळे धास्तावलेल्या ग्रामस्थांना आता मद्यपीमुळे व अवैध दारु अड्ड्यांमुळे संताप आल्याचे चित्र आहे.  येथे कोरोनाच्या प्रादूर्भावाने देश हतबल होत असतांना अवैध दारुचे ठेके चालु असणे एका विशिष्ठ विभागाच्या कार्यप्रणालीवर सशंय व्यक्त करणारे ठरत आहे. याकडे आता लक्ष देण्याची गरज आहे.
धर्माबाद उपविभागास नियुक्ती असलेले राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी जे वसुली अधिकारी म्हणून तालुक्यात दारू विक्री करणा-याचे परिचित असून अवैध मद्यविक्री करणाऱ्या च्या मिठाशी इमान राखत केवळ आपले उकळ पांढरे करून घेत आहेत म्हणूनच त्यांच्या धाडीत महिनेवारी देणारे देशी व विदेशी विक्रेते कधी  सापडतच नाहीत. केवळ औपचारिकता म्हणून परवा याच लॉक डाउन च्या काळात हातभट्टी वर कार्यवाही करून स्वतःची पाठ  थापटवून घेतली.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १३ मार्चपासून लागू केला आहे. या कायद्यांतर्गत राज्यसह सर्व  जिल्ह्यातील  सर्व बिअरशॉपी, वाईन शॉप, परमीट रुमबार, रेस्टारेंट, सर्व देशी दारुचे दुकाने १९ मार्चच्या सायंकाळी ५ वाजतापासून बंद केल्याने दारुसाठी मद्यपींची धडपड सुरु आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...