शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

        बीड जिल्ह्यातील गायरान धारक शेतकर्यांना मदत करा
            पँथर्स रिपाइं म प्रदेश प्रवक्ते धम्मपाल कांडेकर
गेवराई प्रतिनीधी :- संपुर्ण जगामध्ये कोवीड १९ कँरोना या विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे सदरील
विषाणूमुळे हजारों नागरीकांना आपले जीव गमवावे लागले आहेत आपल्या भारतात सुद्धा केंद्र शासनाच्या आदेशानुसार २१ दिवसाचा लाँक डाऊन या पुर्वीच घोषित केलेला आहे परंतु बीड जिल्ह्यातील गोर गरीब भूमिहीन गायरान धारकांचे अतोनात हाल होत असल्याने त्यांना मदत करावी शासनाने महाराष्ट्रातील गोर गरीब व गरजू लोकांना त्या त्या भागातील स्वस्त धान्य दुकानातून ३ महीण्याचे राशन अन्न धान्य मोफत दिले जाईल याची घोषणा केली होती त्या नुसार बीड जिल्ह्यातील गेवराई बीड आष्टी पाटोदा शिरुरकासार माजलगाव वडवणी परळी केज अंबेजोगाई धारुर ईत्यादी तालुक्यात मोठ्या प्रमाणात गायरान धारका आहेत त्यांना मदत करावी अशी मागणी पँथर्स रिपाइं म प्रदेश प्रवक्ते धम्मपाल कांडेकर यांनी केली आहे
गायरान धारक शेतकर्यांना न्याय देण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व गायरान धारक शेतकऱ्यांना मदत मिळावी
बीड जिल्ह्यातील गायरान धारक शेतकऱ्यांना कसलीही अडचण आल्यास संपर्क साधावा असे आवाहन केले आहे
मो 9422856789  मो 9801080808 पँथर्स रिपाइं च्या वतीने करण्यात आले आहे या पत्रकावर पँथर्स रिपाइं तालुकाध्यक्ष भास्कर अण्णा उघडे युवक तालुकाध्यक्ष पँथर्स संकेत गांगुर्डे तालुका उपाध्यक्ष विकास वारे मिडिया प्रमुख आकाश लोखंडे पँथर्स रिपाइं गेवराई शहराध्यक्ष अविनाश आडागळे पँथर्स आकाश मोरे पँथर्स शेख नजीर भई इत्यादींच्या सह्या आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...