शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

बदनापूर मतदानसंघात कोरोना रोगाच्याच्या पार्श्वभूमीवर ५५०० हजार गोरगरिबांना कुटुंबाला- आमदार नारायण कुचे मोफत अन्नधान्य वाटप करणार.
 जालना/प्रतिनिधी : बदनापूर मतदारसंघाचे
आमदार नारायण कुचे यांच्यावतीने मतदारसंघात भोकरदन-बदनापूर- अंबड या ठिकाणी ५५००  गोरगरीब कुटुंबाला अन्नधान्याचा वाटप करण्यात येणार आहे. ५ किलो गहु,५ किलो तांदूळ, ५ किलो गव्हाचे पिठ, अशी मोफत वाटप करण्यात येणार आहे असे आमदार नारायण कुचे यांनी बोलतानी माहिती दैनंदिन मराठवाडा साथीला दिली असून या जगभरात कोरोणा रोगाने धुमाकूळ घातलेला असून या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारत 14 एप्रिलपर्यंत लॉक डाऊन असणार आहे त्यामुळे संचारबंदी आणि जमावबंदी असल्यामुळे गोरगरीब कुटुंबातील  लोकांवर उपासमारीची वेळ येत आहे.आशा परिस्थिती कोठेच हाताला काम नाही 
 त्यामुळे घरीच बसाव लागत आहे यामुळे हात मजुरीवर पोट भरणारे लोकांना तसेच  झोपडीत राहणारे लोक त्याचप्रमाणे भटकंती करणारे आदिवासी जमातीतील व मध्यमवर्गी लोकांना मोफत अन्नधान्याचं वाटप आमदार नारायण कुचे करणार आहे.
१)भोकरदन ता.मधील- हसनाबाद - ३५२ -कुटुंबाला
तळेगाव-    ३००- कुटुंबाला
राजूर -      ३५० - कुटुंबाला
----------------------------------
२)बदनापूर तालुक्यात- २००० - कुटुंबाला
----------------------------------
३) अंबड तालुक्यात- २५०० - कुटुंबाला 
----------------------------------
आमदार फंडाचे 50 लक्ष रूपये वैद्यकीय सेवेसाठी
----------------------------------
आपल्याला मिळालेल्या आपत्कालीन परीस्थीतीच्या अनुशघांने आपल्या आमदार फंडातील 50 लाख रूपयाच्या निधीचा उपयोग वैद्यकीय यंत्रसामुग्री साठी होणार आसून, या मध्ये इनफ्रारेड थर्मामीटर,पर्सनल प्रोटेक्शन इक्वीपमेंस कीटस्, कोरोणा टेस्टीगं किटस्, आय. सी. यु. व्हेटेंलेटर व आयसोलेशन वार्ड/ क्वारंटारईनी वार्ड व्यवस्था, वैद्यकीय कर्मचा-यांकरीता फेस मास्क,ग्लोव्हज व सॅनेटाईझर खरेदी व इतर सामुग्री खरेदीसाठी वापरण्यात येणार आसल्याचे आ. नारायण कुचे म्हणाले.
 प्रतिक्रिया :-
आ. नारायण कुचे - --
एक महिन्याचे मानधन मतदारसंघातील
जनतेच्या आरोग्य सेवे साठी मोठया मनाने देणार..माझ्या मतदारसंघातील जनतेच्या आरोग्य सेवा साठी जे काही करता येईल ते प्रामाणिकपणाने काम करून सेवा देण्याचे काम मी करणार आहोत त्याच अनुषंगाने प्रशासन चांगल्या पद्धतीने काम करत आहे.जनतेनेही कुणीही कायद्याचे उल्लंघन न करता संचारबंदी आणि जमाबंदी असताना कायद्याचे पालन करावे कुणीही घराच्या बाहेर पडू नव्हे या संसर्ग विषाणू कोरोना रोगाला आपल्याला हद्दपार करायचा आहे म्हणून 14 एप्रिल पर्यंत तुमच्या सहकार्याची गरज आहे प्रशासन आणि शासन तुम्हाला सर्वकाही सुख सुविधा देतील त्यांना सहकार्य करण्याची अपेक्षा मी तुमच्याकडून करतो असे आमदार नारायण कुचे बोलताना म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...