शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

प्रशासनाने जनतेला अत्यवश्यक सुविधा तात्काळ पुरवठा करावे-शिवसेनेची मागणी
धर्माबाद प्रतिनिधी (भगवान कांबळे):- सध्या लॉक डाऊन असल्याने धर्माबाद तालुक्यातील जनतेसाठी असलेल्या मूलभूत सुविधाचा  प्रशासनाने तात्काळ पुरवठा करावा अशी मागणी
शिवसेनेचे तालुका संघटक गणेश गिरी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.शहरातील शेतमजूर ,व गरजू लोकांकरिता शिवभोजण चालु करण्यात यावे,केंद्र सरकारच्या वतीने वाटप होणारे धान्य वाटपाला सुरुवात करण्यात यावी,शहरातील मेडिकल पूर्णवेळ चालू ठेवण्यात यावे,निराधारांचे अनुदान वाटप करण्यात यावे,सर्वसामान्य जनतेची कांही किराणा दुकान चालकांकडून लूट होत आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी इत्यादी मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत
 यावेळी शिवसेनेचे तालुका संघटक गणेश गिरी,विधानसभा संघटक शिवराज पाटील मोकळीकर,शहर प्रमुख आणील कमलाकर,राजू शिरामने,यांच्या सह सूर्यकांत पाटील जुनीकर उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...