शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

           कोरोनामुळे अंगुर उत्पादन शेतकरी हवालदिल
शाम गिराम (सिंधीकाळेगाव) : गेल्या तीन ते चार वर्षपासून ओला दुष्काळ कोरडा, दुष्काळ, गारपीट,
अवकाळी आदी संकटामुले सर्वच शेतकरी हे मेटाकुटीला आलेले आहेत त्याचबरोबर कडवंची परिसरात मुबलक पाणी असलेल्या शेतकऱ्यांनी गेल्या तीन वर्षपूरवी द्राक्ष बागेची लागवड केलीली आहे व रक्ताचे पाणी करून त्यांनी आपल्या द्राक्ष बागा जगवल्या आहेत.त्यांना वेळो वेळी फवारणी,छाटणी, डिपिंग, या सर्व गोष्टीवर लागवडीपासून तर अंगुर येईपर्यंत लाखो रुपयांचा खर्च कलेला आहे.शेतकरयांच्या द्राक्ष बागा या द्राक्षांने लोम्बकळून गेल्या आहेत कडवंची परिसरातील बहुतांश शेतकरीही हे आपले द्राक्ष व्यापाऱ्याला न देता स्वतःच आपले द्राक्ष परिसरात असलेल्या छोट्या मोठ्या बाजार पेठेत विक्रीसाठी नेतात परंतु कोरोनामुळे जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद करण्यात आले असून द्राक्ष विक्री करावी कोठे हा प्रश्न शेककर्यांना भेडसावत आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याच्या मार्गावर आहे कारण द्राक्ष तोडण्यास सुरवात नाही केली तर द्राक्ष ची गळ ही आपोआप सुरू होऊनरामनगी होनार आहे शेतकऱ्यांनी चार वर्षपासून केलेल्या मेहनतीवर पाणी फेरले जात आहे
यंदा कोरोनामुळे अत्यंत वाईट परिस्थिती उध्भवली आहे.   शिवाय मागील आठवड्यामध्ये झालेल्या गारपीटीमुळे द्राक्षांना मार लागला असुन द्राक्ष खराब होत आहे.

प्रतिक्रिया
गेल्या तीन वर्षपासून गारपीट
अवकाळी एवढ्या परिस्तिथीतीत बागेला वेळेवर औषध फवारणी,छाटणी, डिपिंग यावर लागवडीपासून ते आतापर्यंत लाखों रुपयांचा खर्च करण्यात आला आहे तरी द्राक्ष काढणीला आले असून विक्रीसाठी पर्याय उपलब्ध नसून तीन वरसपासून केलेल्या मेहनतीवर पाणी फेरले जाणार आहे.

सतीश जारे
द्राक्ष उत्पादक शेतकरी कडवंची

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...