शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

  पुंडलिकनगर सील, नागरिकांनी स्वतःहून बंद केले अंतर्गत रस्ते
औरंगाबाद शहर प्रतिनिधी :-गणेश आठवले
औरंगाबाद शहरामध्ये कोरोनाचे दोन रुग्ण
आढळले आहेत. त्यानंतर दोन्ही भागांमध्ये आरोग्य विभागाची पथके तसेच जिल्हाधिकारी, महापालिकेचे संबंधित अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांनी त्या भागात धाव घेत उपाययोजनांना सुरुवात केली. तसेच आरोग्य विभागातर्फे या भागात शुक्रवारीही (ता. तीन ) सर्वेक्षणही करण्यात येत आहे.
सिडको N-4 भागात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर आता नागरिक अधिकच सजग झाले आहेत. गुरुवारी (ता. 2) सायंकाळपर्यंत सिडको एन -4 चा भाग सील करण्यात आला. त्यानंतर आता नागरिकांनी पुंडलिकनगर भागात रस्त्याच्या मुख्य आणि शेवटच्या प्रवेशमार्गावर बांबू आडवे बांधून नाकेबंदी केली आहे.
शहरामध्ये कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत.
 म्हणून पुंडलिकनगर भाग, तसेच सिडको एन -4 भागात पोलिसांनी विशेष खबरदारी घेत मेडिकल दुकाने वगळता इतर किराणा आणि दूध डेअरीही बंद केल्या आहेत. विशिष्ट वेळेत ही दुकाने उघडण्यात येत आहेत. पुंडलिकनगर भागातील नागरिकांनी आपली सजगता दाखवली आहे. ते पोलिसांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करीत आहेत.
या भागात रात्री सुमारे दहा गल्ल्यांमध्ये लाकडी बांबू लावून रस्ते अडविण्यात आले आहेत. बाहेरची कुणीही व्यक्ती विनाकारण येता कामा नये. तसेच भाजी विक्रेते आणि इतर आवश्यक साहित्य विक्रेत्यांचा सुळसुळाट वाढू नये, गर्दी होऊ नये यासाठीही उपाययोजना त्यांनी राबविली आहे. त्यांच्या कृतीचे पोलिसांकडून स्वागत करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...