शुक्रवार, ८ मे, २०२०

बीड रिपोटर



शासकीय हरभरा खरेदी केंद्र, धर्माबाद गोदाम अभावी पुन्हा बंद होण्याची शक्यता


धर्माबाद (भगवान कांबळे ):- कृषी उत्पन्न बाजार समिती धर्माबाद चे गोदाम महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने किरणे घेऊन गोदामाची अडचण दूर करावी ह्यासाठी मा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.हंगाम 2019-2020 मधील शेतकऱ्यांच्या हरभरा शेतमालाची शासकीय दराने नाफेड मार्फत खरेदी सुरू आहे. धर्माबाद तालुक्यातून जवळपास 3400 शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. नाफेड मार्फत खरेदी झालेला माल गोदामात डिपॉझिट करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ धर्माबाद येथे जागा उपलब्ध नसल्याने मध्यंतरी खरेदी बंद ठेवण्यात आली. खरेदी केंद्र गोदामा अभावी पुन्हा बंद होण्याची शक्यता आहे. धर्माबाद वर्ष 2016 मध्ये हे महाराष्ट्र कृषी स्पर्धाक्षम प्रकल्प अंतर्गत 2000 मेट्रिक चे गोदाम उभारले असून सदर गोदाम विनावापर पडून आहे. तेव्हा सदर गोदाम महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने प्रचलित दरानुसार बाजार समिती धर्माबाद जी करारनामा करून किरायाने घेतल्यास धर्माबाद तालुक्‍यातील शेतकऱ्यांची समस्या सुटण्यास मदत होईल. सदर गोदामात जवळपास 20 हजार क्विंटल माल ठेवण्याची क्षमता आहे .तरी या पर्यायाचा संबंधित विभागाने लवकरात लवकर विचार करून गोदामा अभावी खरेदी केंद्र बंद पडणार नाही या दृष्टीने प्रयत्न करावेत. हे निवेदन मा मुख्यमंत्री मा विरोधी पक्षनेता मा ना पालकमंत्री , नांदेड ,मा खा प्रतापराव पाटील चिखलीकर,मा जिल्हाधिकारी  मा आ राजेशजी पवार ,मा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नांदेड, वरीष्ठ व्यवस्थापक,वखार महामंडळ, लातूर ,जिल्हा मार्केटिंग अधिकारी ,नांदेड ह्यांना मेल द्वारे पाठविण्यात आले. सोबत मी स्वतः रविंद्र पोतगंटीवार, साईनाथ शिरपूरे, अविनाश जैरमोड व मुरली गौड होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...