शुक्रवार, ८ मे, २०२०

लॉकडाऊनमध्ये कुंटनखान्यावर छापा.
अविनाश तांदळे | बीड महाराष्ट्र
  कोरोनामुळे देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र या लॉकडाऊनच्या काळातही अंबाजोगाई शहरामध्ये कुंटनखाना सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक कक्षास प्राप्त झाली. गुरुवारी रात्री केलेल्या कारवाईमध्ये एका आंटीवर गुन्हा दाखल करत दोन पीडिताची सुटका करण्यात आली.

     पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंबाजोगाई शहरातील महात्मा फुले नगर येथे कुंटनखाना सुरु होता. याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक कक्षास मिळाली. त्यांनी दोन पोलीस डमी ग्राहक पाठवून शहानिशा केली. फोनवरुनच संभाषण करुन आंटीने सर्व माहिती त्यांना दिली. त्या ठिकाणी गेल्यानंतर दोन मुली आंटीने समोर उभ्या केल्या. डमी ग्राहक असलेल्या पोलीसांनी बाजूलाच असलेल्या पोलीसांना इशारा करताच छापा टाकण्यात आला. यावेळी एका आंटीला ताब्यात घेत तिच्यावर अंबाजोगाई पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. तर दोन पीडिताची सुटका करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेेचे पोनि.भरत राऊत, भास्कर केंद्र, अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या प्रमुख पोउपनि.राणी सानप, शमीम पाशा, सिंधु उगले, सुरेखा उगले, मिना घोडके, शिवाजी भारती, प्रताप वाळके, विकास नेवडे, सतिष बहिरवाळ, चालक सुस्कर यांनी केली
========================================================================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...