सोमवार, २२ जून, २०२०

रांजणी परिसरात समाधानकारक पाऊस, पाणीटंचाई होणार दूर


रांजणी प्रतिनिधी/असलम कुरेशी
घनसावंगी तालुक्यातील रांजणी व परिसरात 10 जून पासून दमदार पाऊस होत असल्याने पाणीटंचाई पासून नागरिकांची सुटका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रांजणी व परिसरात यावर्षी पावसाळ्यातच्या सुरुवातीलाच दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे परिसरात खरीप पिकांच्या पेरणीला गति आली असली तरी जास्त पावसामुळे सोयाबीनची पेरणी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रांजणी येथे या आठवड्यात दोन-तीन वेळेस मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे दुधना नदीला पूर आला होता. यामुळे परिसरातील विहिर व बोअरचे पाणी मोठ्या प्रमाणात वाढले असून नागरिकांची पाणीटंचाईच्या संकटातून सुटका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुधना नदीला दरवर्षी जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात पूर येतो. त्यामुळे नागरिकांना जून महिन्यातही पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर्षी जूनमध्येच समाधानकारक पाऊस पडल्यामुळे दुधना नदीला मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. त्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटला आहे. दुधना नदीचे पाणी वाढल्याने वझर, कवठा, करडगाव, चित्रवडगाव, ढोबळेवाडी, रांजणी, बाबई आदी गावांना पाणीटंचाईतून सुटकारा मिळतो. चांगल्या पावसामुळे कापूस व तुरीची 90 टक्के पेरणी झाली असली तरी अधिक पावसामुळे सोयाबीनची पेरणी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...