बुधवार, १० जून, २०२०

शिक्षकांकरिता राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे उपक्रम

पुणे,ब्युरोचीफ :- महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, पश्चिम महाराष्ट्र विभागाचे वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील शासन मान्यताप्राप्त कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षकांसाठी लॉकडाऊन मध्ये भव्य राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धेचे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे नाव '  शोध उत्कृष्ट अध्यापकाचा ' असून स्पर्धेला कालावधी हा १० मे २०२० ते १९ जून २०२० पर्यंत आहे.स्पर्धेचे विषय हे वस्तुस्थितीवर आधारित आहेत.यामध्ये  १)कोव्हीड १९ विरुद्ध लढा - मा.मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे नेतृत्व, २)विद्यार्थी, शिक्षक व लॉकडाऊनचा मेळ व ३)कोरोना विरुद्ध दैवी शक्ती - डॉक्टर, पोलीस व अन्य शासकीय कर्मचारी,अधिकारी आदी विषय आहेत. या ऑनलाईन स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्राभरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक शिक्षकांस सहभागाबद्दल संघटनेकडून प्रमाणपत्र मिळणार आहे.व विजेत्या शिक्षकांना  आकर्षक बक्षिसे व उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक व स्पर्धेचे संयोजक सुनिलभाऊ जगताप आणि सोलापूर शिक्षक सेनेचे शहराध्यक्ष मुरलीधर कडलासकर यांनी सांगितले.जे शिक्षक स्पर्धेत अद्याप सहभागी झालेले नाहीत त्यांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. स्पर्धेबद्दल अधिक माहितीसाठी ९०११९०३१०१ या क्रमांकावर संपर्क साधावा.**
     सदर स्पर्धेकरिता आप्पासाहेब पाटील , वल्लभ चौगुले, अंबादास चव्हाण , विश्वनाथ बिराजदार, संतोष साठे , रविंद्र वाघ, एकनाथ आंबले, रणजित बोत्रे,संजय नायडू ,बाळासाहेब पवार, स्वाती वाळके,नीता गुंजिकर, शैला क्षीरसागर,मल्लिकार्जुन डीग्गे,अतुल शेलार, संजय अहिरे,सुखदेव आंबले,राजेंद्र खेडेकर,कल्पना पोतदार आदी  पदाधिकारी मेहनत घेत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...