बुधवार, १३ मे, २०२०

महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत कापूस खरेदी केंद्र सुरू करा - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर


परतुर /प्रतिनिधी:- प्रशांत वाकळे

येत्या पंधरा दिवसानंतर शेतकरी पेरणी साठी सज्ज झालेला असेल अशावेळी कापूस विक्री झालेली नसेल तर शेतकऱ्यावर बी बियाणे खते कीटकनाशके इत्यादी खरेदी करण्यासाठी सावकाराकडे जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही त्यामुळे महाराष्ट्र सरकारने कापूस खरेदी करण्यासाठी सरकारच्या अखत्यारीत असणारी सर्व कापूस खरेदी केंद्र सुरू करा अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे कें

केंद्र सरकारने पणन महासंघाच्या वतीने सीसीआय मार्फत शेतकऱ्यांची कापूस खरेदी सुरू केली असली तरीदेखील सीसीआय अंतर्गत कापुस खरेदी केंद्र हे तालुक्याला एका ठिकाणी आहे. तालुक्‍यात साधारणता शंभरपेक्षा अधिक गावे आहेत त्यामुळे सीसीआयचा कापूस खरेदी करण्यासाठी प्रचंड वेळ लागतो आहे सी सी आय अंतर्गत खरेदी केंद्रावर एका दिवसात केवळ 35 ते 40 शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जात आहे आणि नोंदणी मात्र सरासरी 2500 ते 3000 शेतकऱ्यांनी केलेली आहे जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात 5473 शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी केली आहे हा आकडा लक्षात घेता सद्यस्थितीतील गतीने कापूस खरेदी सुरू राहिली तर आणखी दोन ते तीन महिने सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी लागू शकतात असेही लोणीकर यांनी  मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस  कृषि मंत्री, सहकार व पणनमंत्री यांना दिलेल्या पात्रात म्हटले आहे 

दिवसभरात कमीत कमी दीडशे ते दोनशे शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करता येईल अशी व्यवस्था करावी. कापूस खरेदी करत असताना एफएक्यू किंवा नॉन एफएक्यू अशी विभागणी न करता सरसकट कापूस खरेदी करण्यात यावा त्यासाठी आवश्यक असणारे ग्रेडर किंवा लागणारे मनुष्यबळ तात्काळ उपलब्ध करून द्यावे जेणेकरून पेरणीपूर्वी शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करता येईल अशी व्यवस्था करण्यात यावी. लवकरात लवकर कापूस खरेदी करण्यासाठी कापूस खरेदी केंद्र वाढवणे हा एकमेव पर्याय असून शासन लवकरात लवकर याबाबत निर्णय घेईल अशी अपेक्षा करतो असेही लोणीकर यांनी पत्रात म्हटले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...