बुधवार, १३ मे, २०२०

सोशल डिस्टन्स ठेवत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत नवदांपत्य विवाह बंधनात.


परतूर,प्रतिनिधी :- इम्रान कुरेशी

लॉकडाऊनच्या काळात गर्दी करण्यास मनाई असल्याने विवाह सोहळा करणाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली असून अडचन निर्माण झाली मात्र ठरलेले लग्न आणखी पुढे ढकलने शक्य नसल्याने परतुर तालुक्यातील वाटुर येथे आज मंगळवारी १२ ठरलेल्या दिवशी माक्सचा वापर करुन तसेच सोशल डिस्टन्स ठेवत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत शेतात विवाह संपन्न झाला परतुर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते माणिकराव आढे यांचे चिरंजीव शुभम व उखळी शिवनगर(ता.जालना)येथील रोहिदास राठोड यांची कन्या आश्विनी यांचा शुभ विवाह मोठ्या थाटात करण्याचे ठरले होते.परंतु, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे वधू व वरा कडील मंडळींनी आपसात चर्चा करून आज हा विवाह वर पिता माणिकराव आढे यांच्या शेतात लॉकडाऊनचे सर्व‌ नियमांचे शोशल डिस्टंन्सिंगचे पालन करून नवरदेव व नवरीसाठी माक्स चा वापर करुन संपन्न झाला

सोशल मीडिया वर नव दाम्पंत्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे

माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर व राहुल लोणीकर यांनी नव दाम्पंत्याना फोन करून शुभेच्छा दिल्या…

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...