बुधवार, १३ मे, २०२०

तालुका स्तरावर विलगीकरण कक्ष उभारण्याची मागणी


परतुर,प्रतिनिधी /प्रशांत वाकळे :- कोरोना परिस्थिती मध्ये बाहे राज्यातुन,जिल्हातुन गावाकडे येणाऱ्या नागरीकांसाठी तालूकास्तरावर विलगीकरण कक्ष उभारण्यात यावा असी मागणी सरपंच संघटनेच्या वतीने उपविभागीय अधीकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली .बाहेर जिल्हातुन नागरिक आप आपल्या गावी येत आहे.तर कोनी हे   नाशिक मुबई ओरंगाबाद पुणे जिल्हातुन येत आहे हे जिल्हे रेड झोन मध्ये आहे त्यामुळे नागरिकांमध्थे भितीचे वातावरण निर्मान झाले आहे जे बाहेर जिल्हातुन किंवा राज्यातुन येत आहे ते ग्रामपंचायत ने तयार केलेल्या विलगीकरण कक्षात थांबत नाही शाशनाने दीलेल्या नियमांचे पालन करत नसल्यामुळे गावातील नागरीकांमध्ये एक घबराटीचे वातावर निर्माण झाले त्यामुळे प्रशाशनाने तालुकास्तरावर विलगीकरण कक्ष उभारून  बाहेरून आलेल्या नागरिकांना 14 दिवस विलगिकरण कक्षात ठेवुन मग त्याची तपासणी करून त्याना आपल्या गावी पाठवावे जेने करून गावातील नागरिकांच्या मनातील शंका ही दूर होईल ग्रामीण भागात प्रतिबंधक समिती स्थापण करण्यात आली आहे पण काम करण्यास कोणीही तयार नाही या सर्व परिस्तीतीचा भार सध्दा सरपंच यांच्या वर येवुन ठेपला आहे  स्थापन केलेल्या समितीमध्ये सरपंचाचे स्थान व नियत्रण ठेवण्याचे अधिकार नसल्याने ग्रामपंचायत पातळीवर सरपंच या नात्याने अनेक अडचणी निर्मान होत आहे म्हणुन संबधित स्थापण समिती व पोलीस प्रशाशन यांना आदेशीत करावे.परतुर तालुक्यातील सर्व सरपंच कोरोनाचा सामणा करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे सर्व परिस्थीती पाहता कोरोना विषानुचा प्रार्दुरभाव ग्रामीण भागात झाल्यास सरपंच किंवा ग्रामपंचायत जबाबदार राहणार नाही यांची नोंद संबंधीत अधीकाऱ्यानी घ्यावीकोरोनाचा शिरकाव जर ग्रामीण भागात झाला तर रोकने शक्य नाही अशा ईशारा शेवटी देण्यात आला यावेळीसरपंच संघटनेचे उपध्यक्ष शत्रुघ्न कनसे,ता सचीवगोपाल मटल,बाबासाहेब गाडगे,संपत टकले,ओम बोरकर,बापुराव दुगाणे हे उपस्तीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...