बुधवार, १३ मे, २०२०

जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासोबतच दिला जातोय पौष्टीक आहार.


जालना,प्रतिनिधी :- जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर योग्य ते औषधोपचार करण्याबरोबरच या रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती वाढून रुग्ण लवकर बरे व्हावेत यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या सुचनेनुसार या रुग्णांना पौष्टीक आहारसुद्धा देण्यात येत असल्याची माहिती आहारतज्ज्ञ श्रीमती व्ही.व्ही.पिंगळे यांनी दिली आहे.जालना येथील जिल्हा रुग्णालयामध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.  या रुग्णांना आवश्यक त्या औषधोपचाराबरोबरच त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढविणे आवश्यक असल्याने या रुग्णांसाठी संतुलित आहाराचा दिनक्रम ठरविण्यात आला आहे.  रुग्णांना दोन वेळेत वरण, भात, भाजी, पोळी याबरोबरच रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यामध्ये मदत करणारे उकडलेले अंडे, गुळ, शेंगदाणे, सोयाबीन वडी, दुध याबरोबरच प्रोटीनचा भरपुर समावेश असलेल्या थ्रेप्टीन बिस्कीटांचाही या रुग्णांच्या आहारामध्ये समावेश करण्यात आला आहे.तसेच ज्यांना कोरोना संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांनासुद्धा याच प्रकारचा संतुलित व पौष्टीक आहार देण्यात येत असल्याची माहिती श्रीमती पिंगळे यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...