बुधवार, १३ मे, २०२०

लॉकडाऊनमुळे गावातच अडकलेल्या मुंबईच्या लोकांना मास्क व सॅनेटायझर व जाण्याची परवानगी मिळवून देऊन मुंबईला रवाना केले

 

परतुर,प्रतिनिधी/प्रशांत वाकळे
तालुक्यातील दैठणा खु या गावी मुंबईवरून  काही कुटुंबे लग्नकार्यासाठी व इतर कामानिमित्त आले असता कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे त्याना मुंबई परत जाता आले नाही  त्यामुळे त्याना गावातच रहावे लागले  त्यातच मुस्लिम बांधवांचा रमजान हा पवित्र महिना होता त्याना आपल्या घरी जाण्याची ओढ लागली होती आणि लॉकडाऊन वाढत जात होता मात्र 45 दिवसानंतर आता सरकारने काही नियम तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या लोकांना आपल्या गावी परत जाण्यासाठी सरकारने काही अटी आणि शर्ती सोयी उपलब्ध केल्या मात्र याचा लाभ घेण्यासाठी गावात सोयी उपलब्ध नव्हत्या कुठे जाऊन परवाना काढावे ही एक चिंता पडली होती पण याच गावात राहणारा सामाजिक कार्यकर्ता कैलास भदर्गे या समाज कार्यकर्त्यांनी पुढे येऊन अडकलेल्या लोकांसाठी जाण्यासाठी पास काडून देण्याचे काम केले व मेडिकल प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मदत केली आणि हे काम त्यांनी विनामूल्य एक हात मदतीचा म्हणून हे काम करून दिले, शासनाच्या नियमाप्रमाणे व टप्याटप्याने ज्या ,ज्या लोकांचे प्रमाणपत्र व जाण्याची पास तयार झाली त्या त्या लोकांना गावातून मुंबईकडे पाठवण्यात येत आहे व मुंबई कडे जाणारे लोकांना मोफत मास्क व सॅनेटाईजर भेट म्हणून या कार्यकर्त्यांनी दिले आहे ज्या लोकांना मुंबई कडे जाण्याची कागदपत्रे व जाण्याचा परवाना काडून देऊन मदत केली त्या सर्व कुटुंबियांनी कैलास भदर्गे या समाज कार्यकर्त्याचे आभार मानले त्यावेळी बोलताना असे कार्य समाजात  सर्वत्र जणांनी केले पाहिजे एकमेकांना संकटकाळात गरजू लोकांना  मदत करून महामारीच्या या संकटातुन वाचवण्याचा प्रयत्न  केला पाहिजे म्हणून समाजात एक आदर्श निर्माण व्हावा यामुळेच हे पाउल उचलले असे समाजकार्यकर्ता  कैलास भदर्गे यांनी मत व्यक्त केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...