रविवार, १७ मे, २०२०

 मांग वडगाव तिहेरी हत्याकांड तील आरोपींना कडक शासन करा -  प्रदेश प्रवक्ते धम्मपाल कांडेकर


गेवराई, महा.ब्युरो चीफ :- मांग वडगाव ता केज येथील गायरान जमीन करणाऱ्या पारधी समाजाच्या एकाच कुटुंबांतील तिघांची हात्या करण्यात आली या घटनेचा तिव्र निषेध पँथर्स रिपाइं (मा मंत्री गाडे गट) कडून प्रदेश प्रवक्ते धम्मपाल कांडेकर यांनी केला.आरोपींना कडक शासन करावे तसेच हत्याकांडातील कुटुंबियांचे पुनर्वसन करावे याचा विचार शासनाने करावा वंचित समाजातील गोरगरीब गेल्या ४० ४० वर्षापासून गायरान जमीन कसुन आपला उदरनिर्वाह करत आहे त्यात ली त्यात शासनाने गायरान जमीन कायदा करुनही ते गायरान जमीन धारकांच्या नावे होत नसल्याचा आरोप पँथर्स रिपाइं म प्रदेश प्रवक्ते धम्मपाल कांडेकर यांनी केला आहे.

बीड जिल्ह्यातील तसेच मराठवाड्यातील गायरान जमीन करणार्यांना न्याय कधी मिळणार प्रशासनाने यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावामांग वडगाव ची घटना दुदैवी आहे आरोपींना कडक शासन करावे अशी मागणी पँथर्स रिपाइं म प्रवक्ते धम्मपाल कांडेकर पँथर्स रिपाइं तालुकाध्यक्ष भास्कर उघडे युवा तालुकाध्यक्ष संकेत गांगुर्डे विद्यार्थी तालुकाध्यक्ष प्रकाश पवार युवा उपाध्यक्ष विकास वारे शहराध्यक्ष अविनाश आडागळे युवा सचिव कृष्णा हतागळे बाबासाहेब दाभाडे आकाश मोरे शेख नजीर आकाश लोखंडे इत्यादींनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...