शनिवार, ७ मार्च, २०२०

रोबोटिक तंत्रज्ञान रुग्णांसाठी वरदान - आरोग्यमंत्री राजेश टोपे
रोबोटिक शस्त्रक्रिया लाऊज व ऑपरेशन थिएटर चे उद्घाटन
जालना /प्रतिनिधी. :- रोबोटीक तंत्रज्ञानामुळे अत्यव्यस्थ रूग्णांवर सहज उपचार करणे शक्य होणार आहे. नाशिकमध्ये एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिल्याने नाशिकचे पर्यायाने
महाराष्ट्राचे नाव जागतिक स्तरावर पोहोचेल व रोबोटिक तंत्रज्ञान रूग्णांसाठी वरदान ठरेल, असे गौरवोद्गगार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये आयोजित केलेल्या पहिल्या रोबोटिक शस्त्रक्रिया लाउंज आणि रोबाटिक ऑपरेशन थिएटरच्या उदघाटन सोहळ्या प्रसंगी केले.
      यावेळी एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्येआयोजित केलेल्या पहिल्या रोबोटिक शस्त्रक्रिया लाउंज आणि रोबाटिक ऑपरेशन थिएटरच्या उदघाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आरोग्यमंत्री राजेश टोपे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून केंब्रिजचे मार्क स्लॅक, ऑस्ट्रेलियाचे मार्कस कॅरी, पद्मश्री डॉ. रमाकांत देशपांडे, सीएमआर सर्जिकलचे सीईओ वेगार्ड नेर्सेट, एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरचे एमटी आणि मुख्य सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. राज नगरकर उपस्थित होते. यावेळी रोबाटिक ऑपरेशन थिएटरचे उदघाटन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाली. पुढे बोलतांना आरोग्य मंत्री टोपे म्हणाले की, ‘कॅडेव्हर प्रशिक्षण व संशोधन केंद्र असणे, ही काळाची गरज आहे. भारतातील पहिली रोबोटिक कॅडेव्हर लॅब एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये उभारल्याने, त्याचा लाभ सर्वसामान्य रूग्णांना व्हावा यादृष्टीने राज्य सरकार पुढाकार घेणार आहे. या लॅबच्या परवानगी संबंधांची नियमावली भारत देशासाठी असेल. त्यात राज्य सरकार पुढाकार घेईल. त्याचबरोबर लॅबच्या सुविधा सर्वसामान्यांना मिळाव्यात याकरिता पीपीपी तत्वावर राज्य सरकारकडून प्रयत्न केले जातील तसेच राज्यात रोबोटीक शस्त्रक्रिया पीपीपी तत्वावर सुरु केल्यास चार विभागांना त्याचा फायदा होईल असे ही टोपे यांनी स्पष्ट केले.यावेळी डॉ. राज नगरकर म्हणाले की, एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर हे नेहमीच नावीन्याचा शोध घेत प्रगत तंत्रज्ञान रूग्णांच्या सेवेत घेऊन आलो आहोत. त्यामुळे नाशिकचे नाव जगाच्या नकाशावर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या तांत्रिक बदलामुळे आता रोबोटिक शस्त्रक्रियेचा सगळीकडे वापर केला जात आहे. नाशिकमध्ये देखील पहिल्या रोबोटिक शस्त्रक्रिया लाउंज आणि रोबोटिक ऑपरेशन थिएटरचा प्रारंभ झाल्याने रूग्णांना याचा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.याकार्यक्रमास नागरिकांची मोठया संख्येने उपस्थित होती.
                           8 मार्च महिला दिन विशेष
अशिक्षित सीताबाई ते उद्योजक सीताबाईचा थक्क करणारा प्रवास सिंधी काळेगाव येथे सुरू झालेली आवळा कॅन्डी ची हेच थायलंड पर्यंत विक्री.
सिंधी काळेगाव/(श्याम गिराम) प्रतिनिधी :-अंबड तालुक्यातील 
ताडहदगाव  येथे शेतकरी   कुटूंबीयात जन्मलेल्या  सिताबाई मोहिते . कुटूबातील परीस्थीती जेमतेम त्यामुळे सिताबाई कधीही शाळेत जाण्याचा विषय च नव्हता त्यामुळे घरची गरीबी असल्यामुळे सिताबाई  कधीही शाळेत चाऊ शकल्या नाही. त्यात ग्रामीन भागात लग्नही लवकरच व्हायचे . त्यामुळे त्याच लग्न ही लवकरच झाले. जालना तालुक्यातील घोडेगाव येथील रामभाऊ मोहीते यांच्या साबत त्याचा विवाह झाला . सासर ची थोडीफार शेती होती परंतु रामभाऊ सिंधी काळेगाव येथे सालगडी म्हणुन कामाला राहीले . त्यामुळे सिताबाई सुद्धा रामभाऊ सोबत काम करू लागल्या . परंतु स्वत:ला लिहीता वाचता येत नसल्याने त्यांना खुप राग येत होता. त्यामुळे त्याना काहीतरी नविन करण्याची उम्मीद निर्मान झाली. काहीतरी जोडधंदा करावा अस त्यांना मनोमन वाटत होते. त्यासाठी त्या धडपड करत होत्या .  परतु त्या निरक्षर असल्याने त्याना अनेक अडचनीचा सामना करावा लागत होतो.  एकदा त्याच्या मैत्रीनीजवळ  त्यानी आवळा कँन्डी बघीतली व घेतली ती चविस्ठ  लागली   त्यामुळे त्यानी ती आळला कँन्डी बनवली त्या व्यक्तीची भेट घेतली . योगायोगाने ती व्यक्ती ही ओळखीची निघाल्याने सिताबाई ला मनोमन आनंद झाला .  व त्याच्याकडून आवळा कँन्डी बनवण्याची प्पकीया जाणुन घेतली . परतु पहीलीच वेळे असल्याने सिताबाई कडून प्रमान चुकले  परंतु त्यामुळे त्या  नाराज झाल्या होता.  परंतु काही तर करायच्या उम्मेदीमुळे परत त्यांनी त्या व्यक्तीची भेट घेतली . नतंर त्या व्यक्तीने तूम्ही रितसर प्रशिक्षन घेण्यास सांगीतले. त्यामुळे मोहिते दापत्यांनी खरपूडी येथील विज्ञान केद्रात प्रशिक्षन घेतले . व त्या नतंर परभणी येथील कृषी विद्यापीठात ही प्रशिक्षन पुर्ऩ केले . विशेष म्हणजे रामभाऊ मोहिते हे शिक्षीत असल्याने ते सर्व सिताबाई ला समजावुन सांगत होते. परंतु निरक्षर असलेल्या सिताबाई यांच्याकडून अनेक वेळा चूका झाल्या . परंतु सिताबाई ने कधीही हार मानली नाही . नंतर च्या काळात आळला कँन्डी विक्री होऊ  लागल्याने  त्यातुन त्यानी दोनशे (२००) रुपए जमा केले त्यातून त्यांनी थोड्या प्रमानात साहीत्य घेऊन त्यानी भोलेश्वर फळ व भाजीपाला उद्योग सुरू केला . व सन १९९७ मध्ये स्वत: शेद्रीय खताचा वापर करून  रोपे तयार केले.व त्याची विक्री करू लागले . दोन तीन वर्षा नंतर त्यांचा आवळा कँन्डीचा व्यवसाय सुरळीत चालु लागला .   व त्याना चांगले उत्पन्व मिळु लागले . विशेष म्हणजे त्यांना आवळा कँन्डी ची विक्री ही शेजार्यापासुन सुरू केले ते थेट थायलंड पर्यत गेल्या . त्यानंतर त्यानी अनेक कृषी प्रदर्शनात  सहभाग घेतला . प्रदर्शनामुळे आवळा कँन्डीला प्रसिद्धी मिळु लागली . व आवळा कँन्डीची मागणी ही वाढू लागली त्यामुळे त्यांना आर्थिक उत्पन्न मिळू लागले . व आज ही त्याचा व्यवसाय जोमाने सुरू आहे. व महाराष्ट्र शासनाने त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानीत केले आहे.
२०० रुपऐपासून सूरूवात.
सिताबाई मोहिते यांनी अगदी  कमी  भांडवलावर स्वत:चा व्यवसाय सुरू केला होता. त्यांनी सुरूवातीला फक्त २०० रुपऐ चा आवळा खरेदी केला होता. सन २००३ मध्ये शेतकरी मेळाव्यात त्यांनी आवळा कँन्डी व सरबत चा स्टॉल लावला  होता . व पाच दिवस सुरू असलेल्या  मेळाव्यात त्यांनी १२०० चे विक्री केली . व आवळ्याने २००रुपऐ वजा करता  त्यांना निव्वळ नफा १०००रुपऐ राहीला होता . व त्या नफ्यातून त्यानी आवळा  उद्योक मोठ्सा जोमाने सुरू केला व त्यानतंर त्याच्या या उद्योगाला भरभराटी आली .

शुक्रवार, ६ मार्च, २०२०

गोपाल भैय्या चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने गैबीनगर तांङा येथे शालेय साहीत्यासह विविध सामाजीक उपक्रम संपन्न.
प्रतिनिधी | जातेगाव गेवराई राक्षसभुवन तलवाङा चिंचोली कुंभारपिंपळगाव गोळेगाव ढालेगाव काठोङ्यासह विविध ठिकाणी गोपाल भैय्या चव्हाण सन्मानीत .
  गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील भुमीपुञ राजमाता जिजाऊ फाऊंङेशनचे संस्थापक अध्यक्ष युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने दि 3 / 3/2020 रोजी रयत संघटनेचे बीङ जि अध्यक्ष सुनिल ठोसर यांच्याकङुन गेवराई तालुक्यातील राक्षसभुनजवळील गैबीनगर तांङा येथे शालेय साहीत्यासह विविध सामाजीक उपक्रम राबविण्यात आले नंतर राक्षसभुवन येथे  शनिदेव अभिषेक करण्यात आला  यावेळी युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण पञकार सखाराम शिंदे अशोक तौर रुद्र घोलप सरपंच  संजय चव्हाण मुख्याध्यापक शेख सर शालेय समिती अध्यक्ष  शामराव आङे  हरिश आरबङ  ङाॅ भिमराव आङे  गणेश करपे सह मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.

गेवराई घणसावंगी माजलगाव तालुक्यातील विविध ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला
 सोशल मिङया व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष एस एम एस आणी मोबाईल द्वारे शुभेच्छा कार्यसम्राट आमदार अॅङ लक्ष्मण अण्णा पवार, सभापती प्र बाळासाहेब मस्के,  माजी नगराध्यक्ष महेश आण्णा दाभाङे, मनसे जि अध्यक्ष राजेंद्र भैय्या मोटे, जि प सदस्य पांङुरंग थङके, प स स सदस्य शाम आबा कुंङ, सिद्धार्थ नरवङे, सरपंच रमेश कवङे ,उपसरपंच रामेश्वर पवार, मुख्याध्यापक पंङीत सर  ,ङाॅ आर आर दादा  राठोङ,  ङाॅ रत्नाकर चव्हाण, ङाॅ जिवन आण्णा राठोङ, ङाॅ रामेश्वर चव्हाण , मा उपसरपंच सय्याजी पवार ,मा सरपंच अशोक खरात सरपंच अरुन दादा तौर, मा उपसरपंच धिरज आर्दङ, सरपंच रोहिदास चव्हाण, मा सरपंच गणेश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते मिठ्ठु आंधळे आर आर आबा, दिलीप झेङे कलाकार अमोल धोगङे   सह पञकार शिक्षक सामाजिक कार्यकर्ते व्यापारी शेतकरी यानी युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण यांच्यावर  शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.
 होळी व धुलीवंदन सणानिमित्त 10 मार्च रोजी मद्य बंद राहील
                     जालना जिल्हाधिकारी यांचा आदेश.
  जालना (प्रतिनिधी) :-  शहरात व जिल्ह्यात दि.9 ते 10 मार्च 2020
रोजी होळी व धुलीवंदन सण साजरा होणार आहे. त्याअनुषंगाने जालना जिल्ह्यामध्ये दि.10 मार्च 2020 रोजी धुलीवंदनाच्या दिवशी संपूर्ण दिवस मद्य विक्री बंद राहणार असून जिल्ह्यामध्ये मुंबई दारुबंदी कायदा, 1949 च्या कलम (1) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार जिल्ह्यातील सर्व ठोक व किरकोळ देशी तसेच विदेशी मद्य अनुज्ञप्तांचे व्यवहार मद्य विक्री बंद राहील यांची नोंद घ्यावी  असे जिल्हाधिकारी जालना यांनी कळविले आहे.
औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव.
गणेश आठवले | औरंगाबाद आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील कित्येक वर्षांपासून औरंगाबादच नाव संभाजीनगर करण्याची मागणी होत आहे. शिवसेनेचे सरकार आल्यानंतर या मागणीने जोर धरला आहे. त्यापूर्वी औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.
औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी राजे महाराज करण्यात आले याची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली .
आज कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता औरंगाबाद विमानतळाचं नाव हे बदलून छत्रपती संभाजी राजे महाराज विमानतळ असे झाले.
जालना शहरातील औद्योगिक वसाहतीतील ओम साईराम स्टील कंपनीत अपघात 3 कामगार जाळून ठार अन्य नऊ कामगार गंभीर जखमी
जालना (प्रतिनिधी) :- जालना शहरातील चंदनझिरा एमआयडीसीतील ओम साईराम स्टील कंपनीत गुरुवारी दुपारी 04 वाजता 12 कामगार
भट्टीजवळ काम करत असताना हि घटना घडली.या घटना संदर्भात अधिक माहिती अशी की, एमआयडीसी मधील ओम साईराम स्टील कंपनीत दु.4 वाजेच्या दरम्यान भट्टीजवळ 12 कामगार काम करत असतांना गुरुवारी दुपारी भट्टीतील तप्त लोहरस एका बकीटि मधुन क्रेन द्वारे नेत आसताना भट्टीतील तप्त लोहरस कामगाराचा अगावर पडून त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात तानत्रिक बिघाडामुळे ती बकेट क्रेनमधुन खाली पडल्या ने खाली काम करणाऱ्या कामगारांच्या आगावर भट्टीतील तप्त लोहरस पडुन यात 3 कामगाराचा भाजुन जागीच मुत्यु झाला आहे.अन्य 9 जन गंभीर जखमी झाले असुन त्याना समान्य रुग्णालयात उपचारासाठी हालवित होते व त्या नतर येथुन काहीना औरंगाबाद येथे खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान ठार झालेल्यांची नावे मात्र अजुनपर्यंत समोर आली नसून ठार झालेल्यांमध्ये इतर राज्यातील कामगारांचा समावेश असल्याचे कळते. मृत मध्ये संख्या वाढण्याची शक्यता आहे.दरम्यान या दुर्देवी घटनेनंतर परिसरात तणाव वाढू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

बुधवार, ४ मार्च, २०२०

पाडळी च्या महिलांनी धुंंडाळली स्वयंरोजगाराची वाट, होळीसाठी इको फ्रेंडली रंगाची निर्मिती बाजारातील वाढती मागणी
बदनापूर प्रतिनिधी: - बदनापूर, ता.2 : बदनापूर तालुक्यातील अवघ्या 70 उंबरठ्याचे छोटेसे गाव असलेल्या पाडळी (ता बदनापूर) येथील
महिला स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करीत आहेत. या महिला मागील दोन वर्षांपासून नैसर्गिक साधनांचा (इकोफ्रेंडली) वापर करून होळीच्या रंगांची निर्मिती करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या गाठीशी दोन पैसे जमा होत असून छोट्या उद्योगापासून मोठा उद्योग सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.उपक्रमशील आणि जलसाक्षर पाडळी दुधना नदीच्या काठी असलेले पाडळी गाव उपक्रमशील आहे. गावाला संत गाडगेबाबा स्वच्छता  अभियानाचा पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते मिळाला आहे. शिवाय पानंदमुक्त गाव अशी पाडळीची ओळख आहे. गावनजीकच्या दुधना नदीचे लोकसहभाग आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून खोलीकरणाचे काम झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे. महिलांनी धरली स्वयंरोजगाराची वाट पाडळी येथील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्मितीवर भर देत आहेत.ग्रामविकास समिती ( रा. स्व. संघ) माध्यमातून नैसर्गिक कच्चा माल घेऊन होळीसाठी नैसर्गिक रंगांची निर्मिती केली जात आहे. यासाठी गटाच्या प्रमुख सुनीता दत्तात्रय सिरसाठ यांच्या पुढाकाराने महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे. मागच्या वर्षी या गटाने होळीच्या नैसर्गिक रंगाची निर्मिती केली होती त्यास बाजारात मोठी मागणी होती. शिवाय दिवाळीच्या वेळेस नैसर्गिक साधनांचा वापर करून सुगंधित उटनेही तयार केले होते. एकूणच महिलांना उद्योगातून उत्पन्न मिळत असल्याने गावातील इतर महिलाही स्वयंरोजगारासाठी पुढाकार घेत आहेत.अशी होते नैसर्गिक रंगाची निर्मिती पाडळी येथील सुनीता सिरसाट यांच्यासह कालींदा प्रल्हाद सिरसाठ, सीता राजेंद्र सिरसाठ, नंदाबाई विष्णू सिरसाठ, राधा रखमाजी मदन, अश्विनी दत्तात्रय सिरसाठ, मीना एकनाथ सिरसाठ, राधा कैलास सिरसाठ, जिजाबाई विष्णू अंभोरे, ध्रुपदाबाई बाळू शिनगारे या दहा महिलांनी ग्रामविकास समिती कडून उडीद डाळीचे पीठ, मक्याचे पीठ, बुंदीसाठी लागणारा खाता रंग असे कच्चा माल विकत घेतला. त्यानंतर 100 किलो कच्चा मालातून प्रमाणबद्ध मिश्रण केले. शिवाय त्याला उन्हात वाळू घातले. त्यानंतर त्याची आकर्षक पॅकिंग केली. आता हा माल बाजारात विक्रीसाठी तयार झाला आहे.प्रतिसाद पाहता दुपटीने रंगाची निर्मिती मागच्या वर्षी महिलांनी तयार केलेल्या नैसर्गिक रंगाला बाजारात व लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या नैसर्गिक रंगामुळे शरीराला व चेहऱ्याला कुठलाही अपाय होत नसल्यामुळे होळीसाठी रंग खरेदी करणाऱ्या लोकांचा ओढा या रंगाकडे वाढत चालला आहे. त्यामुळे त्यांनी यंदा दुपटीने रंगाची निर्मिती केली. तयार झालेला रंग महिला बाजारात जाऊन किरकोळ व ठोक पद्धतीने विक्री करतात.आम्ही तयार केलेला होळीचा रंग नैसर्गिक वस्तूंपासून तयार झालेला आहे. त्यामुळे त्वचेला त्याचा कुठलाही अपाय होत नाही. आम्ही दिवाळीला उटनेही तयार केले होते. पुढे नैसर्गिक साबण, शाम्पू व बिस्कीट, केक, पापड, कुरडाया तयार करणार आहोत. छोट्या उद्योगातून मोठ्या उद्योगाकडे वळण्याचा आमचा मानस आहे.पाडळी छोटे गाव असले तरी गावातील महिला स्वावलंबी होण्यावर भर देत आहेत. त्यामुळे आम्ही नैसर्गिक रंग निर्मितीपासून आमचा छोटा व्यवसाय सुरू केला आहे. भविष्यात गावातील इतर गरजू महिलांनाही सहभागी करून उद्योग वाढवणार आहोत.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...