मंगळवार, १७ मार्च, २०२०

दोन हजार रुपये ची लाच घेताना तलाठी अँन्टी करप्शनच्या        जाळ्यात
जालना/ प्रतिनीधी :-  दोन हजार रूपयाची लाच घेताना
तलाठी व एक खासगी ईसम लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात अडकले
याबाबतीत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांनी दिनांक 16.03.2020 रोजी तक्रार दिली की, माझे सासूचे वारसा हक्क नोंद करणेसाठी व 6 क देण्यासाठी कोसगाव सज्जा येथील तलाठी अतुल सर्जेराय बोर्डे यांनी 3,000/-रूपयांची लाचेची मागणी केली. सदर कामासाठी तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना येथे संपर्क साधून तक्रार दिली. सदर तक्रारीयरून आज दिनांक 16.03.2020 रोजी सापळा लावला असता, लोकसेवक यांनी तक्रारदार यांना 3,000/- रुपये लाचेची मागणी केली व तडजोडीअंती2,000/- रुपये स्वीकारण्यास तयार होवून लोकसेयक श्री अतुल सर्जेराय बोर्डे वय 42 वर्ष व्यवसाय नोकरी तलाठी, सज्जाको सगाय ता. भोकरदन रा. वरुड (बु.) ता जाफ्राबाद जि. जालना यांनी त्यांचे सोबतचे खाजगी इसम नामे श्री. विलास सांडुआगळे यांचे हस्ते पंचासमक्ष 2,000/- रुपये लाच स्वीकारली असतांना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालनाप थकाने भोकरदन - जाफ्राबाद रोडवरील तलाठी कार्यालयात माहोरा ता. जाफ्राबाद येथे रंगेहाथ पकडण्यात आले.लोकसेवक श्री अतुल सर्जेराव बोर्डे व संगणक आॕपरेटर श्री विलास सांडु आगळे दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्याबाबत पुढील कार्यवाही चालु आहे.सदरची सापळा कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. अरविंद चावरीया, अपर पोलीस अधिक्षक डॉ. अनिता जमादार,ला.प्र.विभाग औरंगाबाद, पोलीस उप अधिक्षक श्री.रविंद्र डी.निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.संग्राम शिवाजी ताटे, पोलीस निरीक्षक, एस.एस.शेख तसेच कर्मचारी श्री.मनोहर खंडागळे, श्री. अनिल सानप, श्री.आत्माराम डोईफोडे, श्री. ज्ञानेश्वर म्हस्के, श्री.सचिन राऊत, श्री. शिवाजी जमधडे, श्री. कृष्णा देठे, श्री गजानन कांबळे,श्री गणेश चेके, श्री गणेश बुजाडे, श्री जावेद शेख, श्री प्रवीण खंदारे, श्री आरिफ शेख यांनी पार पाडली.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील
              शासकीय शाळा व खाजगी शाळा बंद
जिल्हाधिकारी यांचा आदेश 31 मार्च 2020 पर्यंत असणार बंद
बुलडाणा, प्रतिनिधी : साथरोग अधिनियम 1897 मधील
तरतुदींनुसार कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व शासकीय, खाजगी शाळा व अंगणवाड्या तसेच महाविद्यालये यांचे आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था, खाजगी कोचिंग क्लासेस 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. तसेच ग्रामीण भागातील इयत्ता 10 वी, 12 वी च्या परीक्षा विहीत वेळापत्रकानुसार घेण्यात याव्यात. त्याचप्रमाणे आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाही, यासाठी आवश्यक ती दक्षता व खबरदारी घेण्याच्या सूचना आदेशात देण्यात आल्या आहेत. या आदेशाद्वारे विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा सदर आदेशाची अवज्ञा करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा संघटना ही भारतीय दंडसंहीता च्या कलम 188 नुसार दंडनीय कारवाईस पात्र असणार आहेत.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून राज्यातील सर्व ग्रामीण भागातील सर्व शासकीय व खाजगी शाळा, अंगणवाड्या तसेच महाविद्यालये यांचे आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था आदी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये निर्गमीत करण्यात आलेली अधिसुचना व नियमावली मधील तरतुदी नुसार सक्षम प्राधिकाऱ्यांचे मान्यतेने 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवणेबाबत सुचीत करण्यात आले आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशान्वये कळविले आहे.


                          

सोमवार, १६ मार्च, २०२०

त्या मयत व्यक्तीचे कोरोना चाचणी 'निगेटिव्ह'*नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी - पालकमंत्री डॉ. राजेन्द्र शिंगणे यांचे आवाहन            
बुलडाणा (ब्यूरो चीफ):  सौदी अरेबिया येथून परतलेल्या
७१ वर्षीय वृद्घाला काल बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना संशयीत म्हणून दखल करण्यात आले होते. दरम्यान काल त्यांचा मृत्यू झाला होता. या वृद्ध व्यक्तीचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तरी आज या नमुण्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पंडित यांनी दिली आहे. पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे या रुग्णाच्या बाबतीत सातत्याने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या संपर्कात होते. त्यांनी रुग्णाच्या परिस्थितीबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी चर्चाही केली होती. याबाबत पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे म्हणाले, मयत व्यक्तीचा कोरोना अहवाल नकारात्मक आला असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. कुणीही गर्दीच्या ठिकाणी जावू नये. गर्दीत न जाणे शक्य असल्यास टाळावे. नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छता पाळावी. हात स्वच्छ धुऊन रुमाल वापरावा. खोकताना व शिंकताना तोंडावर रुमाल धरावा.चिखली येथील रुग्ण असल्यामुळे चिखली शहरासह जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.
*

कोरोना मुळे शिरासमार्ग येथे शाळाबंद ,बाजार बंद रस्ते साम सुम
___________________________
कोरोणा विषाणू प्रसार नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज
शिरसमार्ग प्रतिनिधी :-  कोरोना व्हायरास मुळे सर्वत्र
नागरिक भयभीत झाले आहेत.जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देश आणि राज्य पातळीवर शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत तर स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
बीड जिल्ह्यातील शिरसमार्ग येथील ग्रामपचायत क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये,आठवडी बाजार, जनावराचा बाजार,31 मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.शिरसमार्ग येथील जिल्हा परिषद शाळा
 ना सुट्या देण्यात आले आहे. व तसेच आठवडी बाजार, जनावराचा बाजार, व्यवहार ठप्प झाली आहे.रस्ते साम सुम झाले आहे.
शिरसमार्ग ग्रामपचायतने आजचा आठवडी बाजार बंद केला आहे.हा बाजार स्थळ ह्या ठिकाणी भरतो.ह्या बाजारात विविध ठिकणांहून व्य पारी मोठ्या प्रमाणात येतात.हा बाजार बाजूला खेडे पाडे,वड्या अासल्यामुळे येथे नागरिकांची व व्यापाऱ्याची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. त्यांच्यप्रमाणे  आठवडी बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी व तसेच सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. व त्यामळे आठवडी बाजार शिरसमार्ग येथे भरला नाही.

रविवार, १५ मार्च, २०२०

बहुजन समाज पार्टी जालणाच्या वतीने मान्यवर कांशीराम साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
जालना प्रतिनिधी :- जालना शहरातील येथील बहुजन समाज
पक्षाच्या जालना जिल्हाच्या वतीने मान्यवर काशिराम साहेब यांची 86 वी जयंती फोटोला हार घातलून मस्तगड येथे साजरी करण्यात आली. या वेळी जिल्हा पदाधिकारी उपस्थित जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे,जिल्हासचिव ज्ञानेश्वर गरबडे, ओबीसी जिल्हाध्यक्ष विवेक दहीवाळ,
जिल्हाबिव्हीएफ,रंजीत हिवाळे,संजय खरात,पेंटर खरात साहेब,आढावे बाबा,जाधव साहेब, असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेच्याच्या अध्यक्षपदी महेंद्र बनकर तर सचिवपदी मनोहर उघडे यांची निवड.
जालना (प्रतिनिधी):- गेल्या 42 वर्षाची परंपरा असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला 2020 च्या  अध्यक्षपदी रेल्वे कर्मचारी तथा भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र बनकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध 
निवड करण्यात आली तर सचिव पदी मनोहर उघड यांची निवड करण्यात आली. शासकीय विश्राम गृह जालना येथे आयोजीत एका बैठकीत ही निवड कण्यात आली आहे.जालना शहरात गेल्या 42 वर्षापासून अखंडपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला सुरु आहे. या व्याख्यानमालेस नामवंत साहित्यिकांसह मान्यवरांच्या अनमोल अशा मार्गदर्शनाची मेजवाणी जालनेकर श्रोत्यांना व्याख्यान मालेच्यावतीने उपलब्ध करुन देण्यात येत असते.त्यानुशंगाने दि. 15 मार्च रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. बी.एम. साळवे हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये सुधाकर सेठ रत्नापारखे, अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण, एन.डी. गायकवाड, व्याख्यानमालेचे माजी अध्यक्ष अरुन मगरे, माजी सचिव सुहास साळवे यांची उपस्थिती होती. सदर बैठकीत माजी सचिव सुहास साळवे यांनी 2019 चा हिशोब सादर केला. मागील व्याख्यानमालेचा हिशोब सर्वानुमते मान्य करण्यात आला. यावेळी संजय हेरकर, अनुराधा हेरकर, फकीरा वाघ, महेंद्र रत्नपारखे,  विलास रत्नपारखे, कैलास बनसोडे, महेंद्र बनकर, सुनिलभाऊ साळवे, बबनराव रत्नपारखे, पप्पू चत्रे, सिध्दार्थ के. मोरे, रनजीत रत्नपारखे, सुनिल बनकर,  मनोहर उघडे, परमेश्वर उघडे, सुहास साळवे, जे.एस. कीर्तीशाही, विजय कांबळे, योगेश रत्नपारखे, सचिन कांबळे, अशोक रगडे,  शिवाजी सहारे, दिपक डोके, अ‍ॅड. कैलास रत्नपारखे, संदीप रत्नपारखे, कपील खरात, सतिष वाहुळे, संदीप साबळे,  मिलींद बोर्डे, किशोर जाधव, राहुल वाहुळे, प्रकाश हिवाळे, प्रकाश मोरे, विलास भिंगारे, तेजराव खरात, सुधाकर मोरे, सुनिल साळवे, अमित साळवे, करण सदावर्ते, राहुल रत्नपारखे, प्रमोद म्हस्के, प्रमे जाधव, एस.एस. कांबळे, माधवराव पात्रे, मंगलदास बागुल, डी.आर. धामने, जयसेन बनकर, राहुल धिवार, अर्जुन जाधव, आत्माराम यादव, बाळु बोर्डे, सर्जेराव खरात, गौतम वाघमारे, नितीन गोदाम, संघदीप कुलतर्खे, सिमोन सुतार,  तेजराव मोरे, सुनिल रत्नपारखे, राजेंद्र जाधव, अशोक लबडे, मधुकर बोबडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
         जगदंबा इंग्लिश स्कूलमध्ये कोरोणाविषयी जनजागृती प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांनी कोरोणापासून बचाव ची केली तयारी.
विहामांडवा (प्रतिनिधी) मोहम्मद शेख :-:पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र चौंढाळा येथील जगदंबा इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थी
व शिक्षकांनी कोरोना वायरस पासून बचावासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता मुलांनी कोरणा विषयी माहिती देऊन कोरोना आजार टाळण्यासाठी प्रत्यक्षात केले जाणाऱ्या उपयोग उपाय योजनेचे प्रात्यक्षित केले. यावेळी विद्यार्थ्यांनी कोरोना वायरस चे लक्षणे, डोकेदुखी, सर्दी व खोकला, श्वसनाचे त्रास, किडनी फेल, ताप व त्यापासून बचावासाठी साबण व पाण्याने स्वच्छ हात धुणे, शिंकताना रुमालाचा वापर करणे, सर्दी व खोकला झालेले व्यक्तीपासून दूर राहणे व तोंडाला मास्क किंवा रुमाल वापरणे, त्याच प्रमाणे हस्तांदोलन टाळणे, रुमाला पासुन मास्क तयार करणे, एकमेकात सुरक्षित अंतर ठेवणे व जमिनीवर मातीत खेळल्यानंतर  साबणाने स्वच्छ धुणे या कोरोना पासून बचावाच्या गोष्टी प्रत्यक्षात प्रात्यक्षिक करून दाखवले त्याचप्रमाणे शाळेतील तीनशे विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला व कोरोना नावाची मानवी साखळी तयार करत पुराणापासून बचाव करणे करण्यासाठी लागणाऱ्या उपायोजना व घोषना देत जनजागृती केली. यावेळी शाळेचे सचिव प्रशांत नरके हे उपस्थित होते उपक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापिका प्रियंका थोटे पर्यवेक्षिका मयुरी खोबरे,संतोष रखे,कल्याणी कुलकर्णी,संतोष बांगर, मोनिका बोडके,अविनाश बांगर,प्रगती पहाडे, संदीप बर्वे,वैष्णवी देशमाने, ऐश्वर्या जाधव,सुंदर थोरे,जयश्री डिक्कर हे प्रयत्न करत आहेत.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...