शनिवार, २८ मार्च, २०२०

डायलेसीस रूग्णाला लॉकडाऊनचा फटका; बैलगाडीतून ऐंशी किलोमिटरचा प्रवास करत गाठले रुग्णालय
रात्री दोन वाजता निघाले गावातून सकाळी 10 वाजता आले                                             रुग्णालयात
नांदेड (भगवान कांबळे) :- संचारबंदीच्या भितीने
कोणी वाहनधारक रूग्ण घेवून जाण्यास तयार नसल्याने एका डायलेसिसवरील रूग्णास चक्क एेंशी किलोमिटरहून बैलगाडीतून रूग्णालयात दाखल करण्यात आले़ हा धक्कादायक प्रकार केवळ अज्ञानातून घडला आहे.
नांदेड जिल्ह्यातील पळसगाव ता़ उमरी येथील रोहिदास भीमराव पवळे हे वयोवृद्ध सध्या डायलेसिसवर आहेत. त्यांना आठवड्यातून दोन वेळा, रक्त बदलावे लागते़ त्यांना गावाकडून रेल्वे अथवा खाजगी वाहनाने नांदेड शहरात आणले जात असे़ परंतु, २३ मार्चच्या मध्यरात्री संचारबंदी लागू करण्यातसआली आणि सदर रूग्णांच्या नातेवाईकांनी धास्ती घेतली़ लॉकडाऊनमुळे सर्वच वाहने बंद असल्याने रूग्णालयात पोहोचायचे कसे, असा प्रश्न त्यांना पडला़ कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून संचारबंदी लागू केल्याने नांदेडला येण्यास वाहनाची व्यवस्था होत नव्हती़ त्यामुळे भयभीत झालेल्या पवळे कुटुंबियांनी सदर रूग्णास बैलगाडीतून नांदेडात नेण्याचे ठरविले आणि रात्री दोन वाजता पळसगावातून बैलगाडी निघाली़ तब्बल ऐंशी किलोमिटरचा हा प्रवास करून पवळे हे दस-या दिवशी  सकाळी १० वाजता नांदेडात पोहोचले़
त्यांच्यावर उपचार करून रक्त चढविण्यात आले़ परंतु, त्यांच्यासारखी अवस्था इतर रूग्णाची होवू नये, याची काळजी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे़ दरम्यान, कोरोनाला फाईट देत  जुन्या रूग्णांना रूग्णसेवा, वेळेवर औषधी, रूग्णवाहिका, सरकारी १०८ गाडी वेळवर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी अतिरिक्त रूग्णवाहिका, १०८ गाड्यांची तयारी प्रशासनाने ठेवणे गरजेचे आहे़
   मराठवाड्यातील खासगी दवाखाने व हॉस्पिटल लॉक-डाऊन  करणाऱ्या खासगी डॉक्टरांचे परवाने रद्द करा-बाबासाहेब कोलते
जालना (प्रतिनिधी) : मराठवाड्यातील काही
खासगी डॉक्टरनी व हॉस्पिटलनी यांचे अस्थापना व दवाखाने बंद करून लॉक-डाऊन केले आहे अशा लॉक-डाऊन करणाऱ्या खासगी डॉक्टर व हॉस्पिटलचे परवाने शासनाने अधिकृत चौकशी करून नियमानुसार बंद करण्यात यावे अशी मागणी स्वातंत्र्य सैनिक पाल्य युवक समितीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील कोलते यांनी मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना दिलेल्या निवेदनात बाबासाहेब कोलते यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील काही खासगी दवाखाने (हॉस्पिटल) ला ताळेबंद दिसते त्यामुळे दवाखाना बंद ठेवणाऱ्या डॉक्टरवर महाराष्ट्र मेडिकल कोन्सल कडील त्यांची नोंदणी रद्द करावी, समाजासाठी जाणीव ठेवून अडचणीच्या वेळी लोकांच्या आरोग्य सेवेसाठी पुढाकार घेऊन कामे करणे डॉक्टरानी अपेक्षित आहे त्यामुळे डॉक्टर मंडळीने सामाजिकतेचे भान ठेवून दवाखान्यांना कुलूप न लावता ते जनतेच्या सेवेसाठी कायम चालू ठेवावेत जनतेला सर्दी खोकला पडशासह इतर रुग्णांना तपासण्याची व त्यांच्यावर उपचार करण्याची कर्तव्य डॉक्टर मंडळीची आहे परंतु संपूर्ण देश लॉक-डाऊन असताना जालना सह मराठवाड्यासह काही खासगी डॉक्टरनी दवाखाने लॉक-डाऊन केल्यामुळे सर्व सामान्य रुग्णांचे हाल होत आहे, मराठवाड्यातील जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणातील शहरात कोरोना आजाराचा पार्श्वभूमीवर अनेक खासगी डॉक्टरानी सर्दी, पडसे व खोकल्याचे रुग्ण तपासणी एकीकडे बंद केलेली असतानाच दुसरीकडे इतर आजाराच्या रुग्नानाही तपासण्यास डॉक्टर नकार देत असल्याचे चित्र आहे, नेत्र तज्ञा सह काही डॉक्टरानी ओपीडी बंद केल्यामुळे सामान्य आजाराच्या रुग्णांची अवस्था बिकट बनली आहे, जालना शहराच्या जवळपास १२५ च्या वर खासगी दवाखाने व रुग्णालये आहेत, दररोज अनेक पेशंट तपासणीसाठी येतात मात्र गेल्या काही दिवसापासून कोरोना आजारामुळे बोटावर मोजण्याएवडे हॉस्पिटल वगळता बहुसंख्य डॉक्टरांनी रुग्णालयात येणे बंद केले आहे अथवा रुग्णालयात आल्यास सर्दी पडसे व इतर आजाराच्या रुग्णांना तपासणी करणे बंद केले असल्याचे निदर्शनास येत आहे.
ग्रामीण भागात खासगी प्रसूती दवाखाने बंद असल्याने सर्व भार आता शासकीय रुग्णालयावर पडला आहे, तरी कोरोना सारख्या गंभीर आजाराची दखल घेऊन खासगी दवाखाने व हॉस्पिटलचे डॉक्टराणे दवाखाने बंद न करता पूर्ववत सुरु ठेवावे अशी मागणी बाबासाहेब कोलते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे
जगाच्या विनाशाला चीन जबाबदार आहे ? कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग चिंतेची बाब - चंद्रकांत कारके

      आणूबाम्ब हल्ल्याची भिती कमी होते न 
 होते तोच, किटाणू बाम्ब, बिषाणू, जैविक हल्ल्याची भिती जगासमोर आ करून उभी आहे. त्यातल्या त्यात आज कोरोना रोगा ची प्रचंड दहशत. जगात आज या कोरोना विषाणू मुळे 26 हजार निश्पाप मानसांचे बळी गेले आहेत. आणि दिवसेंदिवस यात वाढ होत  आहे. हा संसर्ग जन्य रोग असल्यामुळे रुग्नांची संख्या गुणाकाराप्रमाणे वाढत आहे. त्यातल्या त्यात कोरोना रोगांवर कोणतेही 
औषध/लस ही उपलब्ध नाही. दहशत निर्माण होऊन, जगात या भयंकर महामारीमुळे हाहाकार माजला आहे
       अशा संकट समयी मनात एक विचार आला, हा कोरोना रोग आला कोठून ? उत्तर शोधतांना पटकन तोंडावर नाव येते ते चीन या देशाचे. मागिल काही महिण्यात आपण म्हणायचो, हा रोग चीन या देशाचा आहे, तिथली मानस काहीपण खातात. साप,अजगर,इंचू, उंदीर, वटवाघूळ, वेगवेगळ्या प्रकारची किडे - मकोडे, यांच्यापुढे जाऊन डुक्कर, गाढव, कुत्री-मांजर, ज्यांचा आपण विचार देखील करून शकत नाही असे प्राणी ते खातात यामुळे त्यांना हा भयंकर रोग झाला असावा.
                 मात्र चित्र काही वेगळंच दिसायला लागलं, मागील नोव्हेंबर महिन्यचा काळ असेल, चीन मध्ये पहिला कोरोना विषाणूचा रुग्ण आढळला आणि इलाजादरम्यान तो मुत्यु हि पावला, दिवसेंदिवस हा संसर्ग एका व्यक्तीपासून दुस-या व्यक्तिला होत होता, आणि रूग्न वाढतच होते, ज्या डॉक्टराला या भयंकर रोगाची माहिती होती त्या डॉक्टराचे नाव लिव ओन लिबलान असे काही, या डॉक्टरालाही इलाजादरम्यान संसर्ग होऊन त्याचा यातच मृत्यू झाला असे सांगतात, त्या डॉक्टर ने काही सोसीयल मिडीयावर काही ट्विट केले होते, या नंतर एक दुसरी महिला डॉक्टर जिचे नाव आयफाईन हिला ही याची कल्पना आली होती, मात्र  तीलाही शांत बसवण्यात आले. कही आंतरराष्ट्रीय मीडिया व अमेरिकेच्या तर्कानुसर असा आरोप केला जात आहे की, या कोरोनांचा संसर्ग झालेल्या डॉक्टराला हे सर्व माहित होते, हे जगाला सांगण्या आधीच त्याची हत्या करण्यात आली, त्यानी केलेले ट्विट डिलीट करण्यात आले, हा भयंकर महामारीचा कोरोना विषाणू चा रोग माहित असतांना चीनने हे जगाला सांगितले नाही. हि माहिती लपवून ठेवली.चीन कडे दोन जागतीक आगळ्यावेगळ्या प्रयोग शाळा ल्याब आहेत. एक जमीनीच्या 2400 खोल आहे, जिथे सुर्यकिरणाचा आणि वातावरणाचा कोणताही परिणाम होत नाही. आणि दुसरी प्रयोगशाळा चीनच्या वुहान शहराच्या 20 ते 25 कि.मी. अंतरावर, याच प्रयोगशाळेतून हा कोरोना विषाणूचा संसर्ग लिकीज झाल्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहेत.
          लक्षात ठेवा, हा घटनाक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे,  जेव्हा नोव्हेंबरला चीनमध्ये कोरोना विषाणू रोग वाढत असतांना 30 डिसेंबर पर्यंत हे चीन ने कोरोनाची माहिती कुणालाच  सांगितले नाही. जेव्हा WHO या जगतीक आरोग्य संघटनेला याची माहिती मिळाली, तेव्हा चीनने उत्तर दिले, हा रोग बरा करण्यात आमचा देश सक्षम आहे, काळजी करण्याची गरज नाही. त्या नंतर पहिल्या डॉक्टराचा संशयास्पद मृत्यू. चीन मध्ये जवळपास 70 लाख विदेशी नागरीक कामानिमित्त रहात होते, नोव्हेंबर ते डिसेंबरच्या शेवट पर्यंत हा कोरोना संसर्ग जवळपास सर्व चिन मध्ये पसरला होता, यात त्या चीन मधील हे विदेशी 70 लाख नागरीकांचा समावेश होता.  ते विदेशी नागरीक मोठ्या प्रमाणात इटली, अमेरिका,स्पेन, टोकियो, बॅंकोक,भारत, पाकिस्तान, सह अनेक देशातले होते. हे सर्व नागरिक आप अपल्या देशात नविन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी जानेवारी महिन्यात पोहोचली होती. त्यानंतर चीन ने लॉकडावूनची घोषणा केली. व या कोरोना विषाणू बाबत WHO या जागतिक आरोग्य संघटनेला कळवले. हा विषय आरोग्य संघटनेने गंभीरतेने घेत, कोरोना रोग हा संसर्ग जन्य रोग असुन ही एक प्रकारे महामारीच आहे असे घोषित केले. या सर्व प्रक्रियेला खूप उशीर झाल्या होता. जर चीनने हि 70 लाख जनता चीनमध्ये असतांनाच लोकडाऊन केले असते, आणि हि  कोरोना विषाणू ची माहिती जागतीक आरोग्य संघटनेला कळवली असती तर हा कोरोनाचा जिवघेणा रोग जगात पसरला नसता त्यावर उपाय योजना करता आली असती. मात्र तसे झाले नाही.  70 लाख वेगवेगळ्या देशांतील नागरीकांच्या माध्यमातून हा जिवघेणा कोरोना विषाणू पसरला होता. चीन नंतर इटली, स्पेन,अमेरिका नंतर सर्व देशांत मृत्यू चा तांडव सुरू आहे. जगात आज पर्यंत 26 हजार नागरीकांचा बळी गेला   आहे व जात आहे. देश विदेशात लाखो लोकांना या कोरोना महाभयंकर संसर्ग रोगाचा आजार जडला आहे. हे या रोगामुळे त्रस्त आहेत. ते दवाखान्यात इलाज घेत आहेत, आज पावेतो या कोरोना रोगाची लस औषध निघाले नाही हि अत्यंत चिंताजनक बाब आहे.
या जगात दोनच महासत्ता देश म्हणून ओळखले जातात एक अमेरिका आणि दुसरा चीन. त्यात अमेरिका हा  चीनवर आरोप करत आहे की, चीननेच हे जैविक विषाणू हातीयार आपल्या प्रयोगशाळेत तयार करून सोडले तर दुसरीकडे चीन हा देश अमेरिकेवर प्रतिअरोप करतो की, अमेरिकन लष्कराच्या मदतीने चीन मध्ये अमेरिकेनेच हा कोरोना विषाणू सोडला आहे. आज आपल्या भारत देशाच्या प्रधानमंत्री मा.नरेंद्रजी मोदी म्हणाले की, WHO या आरोग्य संघटनेच्या पुनर्रचने बाबत फेर विचार करावा. म्हणजे नक्कीच दाल मे कुच काला है या उक्ती प्रमाणे. म्हणून 
      काय खरच जगाच्या विनाशाला चीन जबाबदार असेल ? या बाबत सत्य काय आहे ?  हे आज मात्र गुलदस्त्यात बंद आहे. हे आज ना उद्या सर्व जगासमोर येणार आहे.  म्हणतात ना, सत्य परेशान हो सकता है, पराजीत नही. सत्यमेव जयते.
                 म्हणून कोरोना विषाणू या  रोगाची कोणतेही औषधी उपलब्ध नसल्यामुळे या रोगा प्रती गंभिरतेने घ्या, घराबाहेर पडुच नका, पडले तर तोंडाला मास्क बांधा, उपाय योजना म्हणून हात स्वच्छ धुवा, सेनिटाईज करा,सोसीयल‌ टिस्टंसेस पाळा, सर्दी,खोकला,ताप, डोकेदुखी,गळा दुखने, हि लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क करा. आज आपल्या देशात ऐकून 20 जनांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 874 रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र 1 नंबर वर आहे. 160 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे, हि संख्या वाढण्यात जास्त वेळ लागणार नाही म्हणून वेळीच उपाययोजना करा.केंद्र व राज्य सरकारच्या सर्व सुचनांचे तंतोतंत पालन करा हि अपेक्षा व विनंती.


चंद्रकांत बापूराव कारके
सामाजिक कार्यकर्ता ( M.S.W ) तथा अध्यक्ष,
भारतीय सुशिक्षित बेरोजगार विकास व प्रशिक्षण संस्था जालना मो. 9921684586
Email :ckarke3@gmail.com

खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करावे
रुग्णालयात बाह्यरूग्ण व चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध करुन द्यावी
                                         - जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे
जालना,प्रतिनिधी:- जनतेस आरोग्यसेवा उपलब्ध 
होण्यासाठी सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांच्या रुग्णालयात आवश्यकतेनुसार बाह्यरूग्ण सेवा व 24 तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देण्याचे शासनाने आदेश दिले असुन या आदेशाचे खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी पालन करावे.  रुग्णांना आवश्यक ती सेवा न मिळाल्यास संबंधित खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांवर कायदेशिर करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले सध्या खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांनी आपल्या रुग्णालयातील बाह्यरूग्ण सेवा बंद असल्यामुळे जिल्हाभरातील रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.  या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक तसेच जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी, यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील खाजगी वैद्यकिय व्यवसायाबाबत तपासणी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत कोणत्याही स्वरूपाची तक्रार आल्यास व रुग्णांना जरुरी सेवा न मिळाल्यास संबंधित खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचे बॉम्बे नर्सिंग होम अंतर्गत करण्यात आलेली नोंदणी रद्द करण्यात येईल. तसेच उपरोक्त आदेशाची अवज्ञा करणाऱ्या व्यक्तीस भारतीय दंड संहिता १८६० चे कलम 188 नुसार दिवाणी व फौजदारी कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही श्री बिनवडे यांनी सांगितले.
लॉकऊन मुळे रोजगाराचे साधन नसलेले, गरीब, बेघर, भिकारी, जिह्याबाहेरील जी व्यक्ती बाहेर जाऊ शकत नाही अशा लोकांची जेवणाची भ्रांत आहे. या लोकांच्या जेवणाची व्यवस्था तसेच भटकी जनावरे, पक्षी, प्राणी यांना अन्न व चाऱ्यासाठी मदत करु इच्छिणाऱ्या सामाजिक संस्था, एन.जी.ओ., तसेच स्वयंसहाय्यता गट, दानशुर व्यक्ती यांनी जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे मनोज देशमुख, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प, मोबाईल नंबर ९४२२२१५०१५ यांच्याशी संपर्क साधावा.
            जालना जिल्ह्यामध्ये दिनांक २७ मार्च, २०२० रोजी ०७ रुग्ण नव्याने दाखल झाले आहे आतापर्यंत एकूण ७३ रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल होते. त्यापैकी ७१ रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी ५४ रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आले व त्या रुग्णांचे डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजरोजी १४ रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज झालेल्या तसेच परदेशी प्रवासाचे पुर्व इतिहास असणा-या सर्व व्यक्तींचे घरीच अलगीकरण करण्यात आलेले आहे. आजपर्यंत एकुण १०७ परदेश प्रवास केलेल्या व्यक्तीपैकी १०३ व्यक्तीचे घरीच अलगीकरण करण्यात आलेले आहे. तसेच इतर शहरे व राज्यातून आलेल्या ७४९ व्यक्तीचे तपासणीअंती घरीच अलगीकरण करण्यात आले आहे. या सोबतच जालना जिल्ह्यामध्ये एकुण १५ संस्था अलगीकरणासाठी निवडण्यात आल्या असून त्यामध्ये १५३९ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.
            मागील एक महिन्यात, आपण जर कोरोनाग्रस्त देशातून आलेला असाल किंवा इतर जिल्ह्यातून जालना जिल्ह्यात आला असला तर पुढील फॉर्मच्या लिंक मध्ये (http://ezee.app/covid19jalna) संपूर्णपणे खरी माहिती देऊन भरावा, जेणेकरून आम्ही आपल्याला योग्य ती मदत करु शकू, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी केले आहे.
***
                   गृह विलगीकरण म्हणजे काय ?
बुलडाणा, प्रतिनिधी - कोरोना विषाणू संदर्भात विलगीकरण (Quarantine )bहा शब्द सध्या वारंवार कानावर पडतो. गृह विलगिकरण म्हणजे कोरोना बाधित देशातून आलेले भारतीय प्रवासी , परदेशी नागरिक तसेच देशातील कोरोना बाधित भागातून आलेल्या सर्वांनाच  समाजापासून आणि कुटुंबियांपासून वेगळे ठेवणे होय.  यांनी किती दिवस वेगळे राहायचे असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारण्यात येतो. कोरोनाच्या विषाणूचा शरीरात प्रवेश झाल्यानंतर त्याची लक्षणे दिसण्याचा कालावधी हा 2 ते 14 दिवसांचा आहे. काहींमध्ये  ही लक्षणे लवकर दिसतात तर काहींमध्ये अगदी 14 व्या ,पंधराव्या दिवशी दिसायला लागतात. त्यामुळे अशा इतरांपासून  आणि कुटुंबीयांपासून 14 दिवस दूर ठेवणे आवश्यक असते . जेणे करून यांना लक्षण आढळलीच  तर ते इतरांच्या संपर्कात येऊन त्यांना  बाधित करणार नाहीत. त्यासाठी त्यांनी 14 दिवसांसाठी गृहविलगिकणात राहणे आवश्यक आहे.  त्यांचा संपर्क  कुंटूबियासोबतच इतरांशी होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने  गृहविलगीकरणातील व्यक्तीं, आणि कुटुबियांसाठी काही मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत.
गृह विलगीकरण कक्ष
गृहविलगीकरण  कक्ष म्हणजे   शौचालय व स्नानगृह जोडून असलेली  घरातील वेगळी  खोली.  ही खोली हवेशीर आणि सुर्यप्रकाश येणारी असावी.
गृह विलगीकरणातील व्यक्तींने काय करावे?
 गृहविलगीकरणातील  व्यक्तीने अल्कोहोलयुक्त  सॅनीटायझर किंवा साबण ‍ आणि पाण्याने हात वारंवार स्वच्छ धुवावे. स्वत:चे वापरलेले ताट, पाण्याचे ग्लास, कप, जेवणाची भांडी, टॉवेल, पांघरुन, गादी इत्यादी दैनंदिन वापरातील घरगुती वस्तू घरातील इतर व्यक्तींना वापरण्यास देऊ नये.
 पूर्णवेळ सर्जीकल मास्कचा वापर करावा. मास्क दर सहा ते आठ तासाने बदलावे.  वापरलेल्या मास्कची  योग्यप्रकारे विल्हेवाट लावावी, डिस्पोजेबल मास्कचा पुन्हा वापर करु नये.  अशा व्यक्तीने  आणि सुश्रृषा करणा-या व्यक्तीने वापरलेले मास्क 5 टक्के ब्लीच किंवा 1 टक्के सोडियम  हायपोक्लोराईट द्रावणामध्ये निर्जतुक करुन  त्याची जाळून विल्हेवाट लावावी. वापरलेला मास्क  हा जंतु संसर्गयुक्त असतो. अशा व्यक्तीनी खोकला, ताप, श्वसनाचा त्रास, अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत जवळच्या शासकीय आरोग्य केंद्राशी संपर्क करावा.
गृह विलगीकरणात असलेल्या  व्यक्तीने  14 दिवस खोलीच्या बाहेर पडू नये, घरातील वृदध, गर्भवती स्त्री, लहान मुले व प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये, सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ नये
घरातील सदस्यांनी घ्यावयाची काळजी
शक्यतो  घरातील एकाच व्यक्तीने गृहविलगीकरणातील व्यक्तीची सुश्रृषा करावी. अशा व्यक्तीच्या शरीराशी थेट संपर्क येणे टाळावे. विलगीकरण कक्षाची स्वच्छता करतांना किंवा अशा व्यक्तींचे वापरलेले कपडे हाताळतांना डिस्पोजेबल ग्लोव्ह्जचा वापर करावा. त्यांचे कपडे झटकू नये. डिस्पोजेबल ग्लोव्ह्ज काढल्यानंतर हात  हॅन्डवॉशने स्वच्छ धुवावे.  नातेवाईक आणि अभ्यागतांना  अशा व्यक्तींना  भेटू देऊ नये. विलगीकरणात ठेवलेल्या व्यक्तीला कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास किंवा त्यांची चाचणी पॉझिटीव्ह आल्यास घरातील त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी गृहविलगीकरणात  14 दिवस राहावे. 
विलगीकरण कक्षाची स्वच्छता
        विलगीकरण कक्षातील वारंवार हातळल्या जाणा-या वस्तूंचे,( फर्नीचर, बेड, टेबल, खुर्ची ईत्यादी ) निर्जंतुकीकरण करावे. शौचालयाची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण    फिनाईलने करावी. अशा व्यक्तीचे कपडे, आंथरुन, पांघरुन  डिर्टजंटमध्ये स्वच्छ धुऊन उन्हात वाळवावे.
     अशा पद्धतीने काळजी घेतल्यास गृह विलगिकरणातील व्यक्तीची चाचणी पॉझिटिव्ह आल्यावरही घरातील इतर कुणीही बाधित होणार नाही. त्यामुळे काळजी घेणे हाच संसर्ग टाळण्याचा उत्तम पर्याय आहे.       *दैनिक आम्ही चिखलीकर*
कोरोना विरोधी लढ्यामध्ये जालना जिल्हा करू शकतो विश्वविक्रम
अ.भ.लोकहीत संघटनेचे शब्बीर पठाण यांच्यावतीने आव्हान.
जालना प्रतिनिधी :-जालना जिल्हा प्रशासन कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यंत नियोजनबध्द
कामगिरी बजावत आहे.
जालन्याचे जिल्हाधिकारी मा.श्री रवीन्द्र बिनवडे यांच्या निर्देशास आणि वेळोवेळी करण्यात येणाऱ्या आवाहनास जिल्ह्याभरातून जनतेचा ऊत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे.पोलीस प्रशासन आपल्या पुर्ण ताकदीनीशी कोरोनाच्या लढ्यात यशस्वी लढा देत आहे.जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा.श्री एस,चैतन्य साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी, कर्मचारी  यांनी संचारबंदी दरम्यान स्वताःला अक्षरशः कोरोना विरोधी लढ्यात झोकून देऊन 100% योगदान देत आहेत.आरोग्य विभागाचे आधिकारी, कर्मचारी यांच्या कार्याला तर जनता जनार्धन सलाम करीत आहे.जिवाची पर्वा न करता कोरोना चा लढा आरोग्य विभागाच्या ह्या देवमाणसांनी एकहाती सांभाळला आहे.जिल्ह्यातील व शहरातील खाजगी रूग्णालतील डाॕक्टर्स मंडळी सुध्दा ह्या संकट समयी आपली OPD चालू ठेवून ईतर सामान्य रूग्णांची औषधोपचार अभावी हेळसांड होऊ नये म्हणून आपआपल्या परीने सेवा पुरवीत आहेत.मा.पंतप्रधान नरेन्द्र मोदी,मा.मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे,मा.आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या वेळोवेळी अवाहनास जालना जिल्ह्यातील जनतेने प्रत्येक वेळेस प्रतिसाद देऊन या संकट समयी कोरोनाशी लढा देण्यासाठी आपण देशाच्या, महाराष्ट्र शासनाच्या सोबत असल्याचे सिध्द करुन दाखवले.देशभरात लाॕक डाऊन झाल्यापासून रोजंदारीवर काम करणारे मजूर,कामगार छोटे छोटे व्यापारी ज्यांच्या रोजी-रोटी चा प्रश्न असताना देशासाठी घरी राहून देशसेवेसाठी आम्ही सरकार सोबत असल्याचे सिध्द करून दाखवले.मागील 50 वर्षाचा ईतिहास पाहता जालना MIDC चे सर्व कारखाने पहिल्यांदाच एवढे दिवस बंद ठेवून मोठ मोठ्या कारखानदार मालकांनी कोरोनो च्या लढ्यात आपली भागीदारी दर्शवून दिली.40 वर्षामध्ये जालन्याची बेअरिंग ऊत्पादन करणारी नामांकीत NRB कंपनी पहिल्यांदा बंद आहे.जागतीक स्तरावर जालन्याचे नावलौकीक करणाऱ्या बियाणे (सिडस)कंपन्या बंद ठेवून कोरोना विरोधी लढ्यात सहकार्य करत आहेत.
आता गरज आहे ती फक्त आपल्या संयमाची.कोरोना विषाणूच्या बाबतीत सरकार च्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने जनजागृती भरपूर झालेली आहे.गरज आहे फक्त आपण त्यास सिरियसली घेण्याची.
प्रशासनान वेळोवेळी देत असलेल्या सुचनांचे जर आपण काटेकोरपणे पालन केले, तर आपण जालन्या जिल्ह्यामध्ये कोरोनास नक्कीच हरवू शकतो. कारण आजघडीला जिल्ह्यामध्ये कोरोना चा एक ही पेशंट पाॕझीटीव्ह आढळला नाही.जालना विश्व विक्रम करू शकतो बस गरज आहे ती की आपण घरा बाहेर पडणार नाही याची दक्षता घेण्याची.आणि प्रशासनाने सुचित केलेल्या सोशल डिस्टेन्सिग ठेवण्याची.
जालना जिल्ह्यातील सर्व नागरीकांना कळकळीची विनंती की,संचारबंदी चे  पालन करावे कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये.चला तर मग,जालना जिल्हा भारतातील सर्वोत्कृष्ट जिल्हा बनवू या.फक्त आपला सर्वांचा शिस्तीसह निर्धार हवा की मी च माझा रक्षक आहे, मी सुरक्षीत तर माझा परिवार सुरक्षीत, माझं शहर, जिल्हा,राज्य आणि देश सुरक्षीत. असे आव्हान शब्बीर पठाण. अ.भा.लोकहित संघटना
यांच्यावतीने करण्यात आले.
                         शेतकर्यांचा उन्हाळी पिकांवर जोर
सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी) श्याम गिराम :-जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव परिसरात उन्हाळी
बाजरी बहरली. पाण्याअभावी शेतकर्यांना रब्बीसह उन्हाळी पिके घेणे शक्य नव्हते. परंतु परतीच्या पावसाने जलसाठे तुडुंब भरले असुन विहीरींना मुबलक पाणी आहे. त्यामुळे शेतकर्यांनी उन्हाळी पिकांवर जोर दिला आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...