शनिवार, २८ मार्च, २०२०

खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करावे
रुग्णालयात बाह्यरूग्ण व चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध करुन द्यावी
                                         - जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे
जालना,प्रतिनिधी:- जनतेस आरोग्यसेवा उपलब्ध 
होण्यासाठी सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांच्या रुग्णालयात आवश्यकतेनुसार बाह्यरूग्ण सेवा व 24 तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देण्याचे शासनाने आदेश दिले असुन या आदेशाचे खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी पालन करावे.  रुग्णांना आवश्यक ती सेवा न मिळाल्यास संबंधित खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांवर कायदेशिर करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले सध्या खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांनी आपल्या रुग्णालयातील बाह्यरूग्ण सेवा बंद असल्यामुळे जिल्हाभरातील रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.  या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक तसेच जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी, यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील खाजगी वैद्यकिय व्यवसायाबाबत तपासणी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत कोणत्याही स्वरूपाची तक्रार आल्यास व रुग्णांना जरुरी सेवा न मिळाल्यास संबंधित खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचे बॉम्बे नर्सिंग होम अंतर्गत करण्यात आलेली नोंदणी रद्द करण्यात येईल. तसेच उपरोक्त आदेशाची अवज्ञा करणाऱ्या व्यक्तीस भारतीय दंड संहिता १८६० चे कलम 188 नुसार दिवाणी व फौजदारी कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही श्री बिनवडे यांनी सांगितले.
लॉकऊन मुळे रोजगाराचे साधन नसलेले, गरीब, बेघर, भिकारी, जिह्याबाहेरील जी व्यक्ती बाहेर जाऊ शकत नाही अशा लोकांची जेवणाची भ्रांत आहे. या लोकांच्या जेवणाची व्यवस्था तसेच भटकी जनावरे, पक्षी, प्राणी यांना अन्न व चाऱ्यासाठी मदत करु इच्छिणाऱ्या सामाजिक संस्था, एन.जी.ओ., तसेच स्वयंसहाय्यता गट, दानशुर व्यक्ती यांनी जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे मनोज देशमुख, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प, मोबाईल नंबर ९४२२२१५०१५ यांच्याशी संपर्क साधावा.
            जालना जिल्ह्यामध्ये दिनांक २७ मार्च, २०२० रोजी ०७ रुग्ण नव्याने दाखल झाले आहे आतापर्यंत एकूण ७३ रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल होते. त्यापैकी ७१ रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी ५४ रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आले व त्या रुग्णांचे डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजरोजी १४ रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज झालेल्या तसेच परदेशी प्रवासाचे पुर्व इतिहास असणा-या सर्व व्यक्तींचे घरीच अलगीकरण करण्यात आलेले आहे. आजपर्यंत एकुण १०७ परदेश प्रवास केलेल्या व्यक्तीपैकी १०३ व्यक्तीचे घरीच अलगीकरण करण्यात आलेले आहे. तसेच इतर शहरे व राज्यातून आलेल्या ७४९ व्यक्तीचे तपासणीअंती घरीच अलगीकरण करण्यात आले आहे. या सोबतच जालना जिल्ह्यामध्ये एकुण १५ संस्था अलगीकरणासाठी निवडण्यात आल्या असून त्यामध्ये १५३९ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.
            मागील एक महिन्यात, आपण जर कोरोनाग्रस्त देशातून आलेला असाल किंवा इतर जिल्ह्यातून जालना जिल्ह्यात आला असला तर पुढील फॉर्मच्या लिंक मध्ये (http://ezee.app/covid19jalna) संपूर्णपणे खरी माहिती देऊन भरावा, जेणेकरून आम्ही आपल्याला योग्य ती मदत करु शकू, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी केले आहे.
***

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...