शनिवार, २८ मार्च, २०२०

कोरोना विरोधी लढ्यामध्ये जालना जिल्हा करू शकतो विश्वविक्रम
अ.भ.लोकहीत संघटनेचे शब्बीर पठाण यांच्यावतीने आव्हान.
जालना प्रतिनिधी :-जालना जिल्हा प्रशासन कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यंत नियोजनबध्द
कामगिरी बजावत आहे.
जालन्याचे जिल्हाधिकारी मा.श्री रवीन्द्र बिनवडे यांच्या निर्देशास आणि वेळोवेळी करण्यात येणाऱ्या आवाहनास जिल्ह्याभरातून जनतेचा ऊत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे.पोलीस प्रशासन आपल्या पुर्ण ताकदीनीशी कोरोनाच्या लढ्यात यशस्वी लढा देत आहे.जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा.श्री एस,चैतन्य साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी, कर्मचारी  यांनी संचारबंदी दरम्यान स्वताःला अक्षरशः कोरोना विरोधी लढ्यात झोकून देऊन 100% योगदान देत आहेत.आरोग्य विभागाचे आधिकारी, कर्मचारी यांच्या कार्याला तर जनता जनार्धन सलाम करीत आहे.जिवाची पर्वा न करता कोरोना चा लढा आरोग्य विभागाच्या ह्या देवमाणसांनी एकहाती सांभाळला आहे.जिल्ह्यातील व शहरातील खाजगी रूग्णालतील डाॕक्टर्स मंडळी सुध्दा ह्या संकट समयी आपली OPD चालू ठेवून ईतर सामान्य रूग्णांची औषधोपचार अभावी हेळसांड होऊ नये म्हणून आपआपल्या परीने सेवा पुरवीत आहेत.मा.पंतप्रधान नरेन्द्र मोदी,मा.मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे,मा.आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या वेळोवेळी अवाहनास जालना जिल्ह्यातील जनतेने प्रत्येक वेळेस प्रतिसाद देऊन या संकट समयी कोरोनाशी लढा देण्यासाठी आपण देशाच्या, महाराष्ट्र शासनाच्या सोबत असल्याचे सिध्द करुन दाखवले.देशभरात लाॕक डाऊन झाल्यापासून रोजंदारीवर काम करणारे मजूर,कामगार छोटे छोटे व्यापारी ज्यांच्या रोजी-रोटी चा प्रश्न असताना देशासाठी घरी राहून देशसेवेसाठी आम्ही सरकार सोबत असल्याचे सिध्द करून दाखवले.मागील 50 वर्षाचा ईतिहास पाहता जालना MIDC चे सर्व कारखाने पहिल्यांदाच एवढे दिवस बंद ठेवून मोठ मोठ्या कारखानदार मालकांनी कोरोनो च्या लढ्यात आपली भागीदारी दर्शवून दिली.40 वर्षामध्ये जालन्याची बेअरिंग ऊत्पादन करणारी नामांकीत NRB कंपनी पहिल्यांदा बंद आहे.जागतीक स्तरावर जालन्याचे नावलौकीक करणाऱ्या बियाणे (सिडस)कंपन्या बंद ठेवून कोरोना विरोधी लढ्यात सहकार्य करत आहेत.
आता गरज आहे ती फक्त आपल्या संयमाची.कोरोना विषाणूच्या बाबतीत सरकार च्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने जनजागृती भरपूर झालेली आहे.गरज आहे फक्त आपण त्यास सिरियसली घेण्याची.
प्रशासनान वेळोवेळी देत असलेल्या सुचनांचे जर आपण काटेकोरपणे पालन केले, तर आपण जालन्या जिल्ह्यामध्ये कोरोनास नक्कीच हरवू शकतो. कारण आजघडीला जिल्ह्यामध्ये कोरोना चा एक ही पेशंट पाॕझीटीव्ह आढळला नाही.जालना विश्व विक्रम करू शकतो बस गरज आहे ती की आपण घरा बाहेर पडणार नाही याची दक्षता घेण्याची.आणि प्रशासनाने सुचित केलेल्या सोशल डिस्टेन्सिग ठेवण्याची.
जालना जिल्ह्यातील सर्व नागरीकांना कळकळीची विनंती की,संचारबंदी चे  पालन करावे कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये.चला तर मग,जालना जिल्हा भारतातील सर्वोत्कृष्ट जिल्हा बनवू या.फक्त आपला सर्वांचा शिस्तीसह निर्धार हवा की मी च माझा रक्षक आहे, मी सुरक्षीत तर माझा परिवार सुरक्षीत, माझं शहर, जिल्हा,राज्य आणि देश सुरक्षीत. असे आव्हान शब्बीर पठाण. अ.भा.लोकहित संघटना
यांच्यावतीने करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...