बुधवार, २९ एप्रिल, २०२०


            दुर्दम्य इच्छाशक्ती व उपचाराच्या जोरावर
   कोरोनावर मात करत शिरोडा येथील महिला परतली स्वगृही

जालना,प्रतिनिधी:-संपुर्ण जगात कोरोना विषाणुने दहशत माजवत संपुर्ण जगाला आपल्या कवेत घेत आहे.  मृत्यूचे भय काय असते हे मी जवळुन अनुभवले. परंतु दुर्दम्य इच्छाशक्ती व वैद्यकीय उपचाराच्या जोरावर मी आज कोरोनामुक्त होऊन मी माझ्या स्वगृही परतत असल्याचा आनंद गगनात मावत नसल्याची प्रतिक्रिया परतुर तालुक्यातील शिरोडा या गावातील कोरोनामुक्त महिलेने व्यक्त केली आहे. मी कोरोना बाधित झाल्याचे आढळून आले तेव्हा माझ्यातील आत्मविश्वास कमी झाला होता. मला चार मुली आणि एक मुलगा असुन त्यांच्या भविष्याचे काय होईल, ही चिंता माझ्यासमोर उभी राहीली.  परंतु  येथील आरोग्य यंत्रणेने माझ्या आजारावर उपचार करण्याबरोबर मला मानसिकरित्या देखील सक्षम केले. त्यामुळेचं मी आज कोरोनासोबतचे युध्द जिंकू शकले आहे. त्यामुळे आजच्या माझ्या आनंदाचे श्रेय हे संपुर्ण आरोग्य यंत्रणेला असल्याची भावनाही महिलेने व्यक्त केली. परतुर तालुक्यातील मौजे शिरोडा येथील महिलेस दि. 13 एप्रिल,2020 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे खोकला व ताप या आजाराचा उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. महिलेला 6 एप्रिलपासुन ताप व खोकला होता. 6 एप्रिल रोजी महिलेने परतुर व 10 ते 13 एप्रिल दरम्यान जालना येथील खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते. 

 जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे दाखल झाल्यास दि. 13 एप्रिल रोजी महिलेच्या स्वॅबचा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात  आला होता.दि. 14 एप्रिल रोजी त्याचा अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाला मात्र महिलेच्या स्वॅबचा  दुसऱ्यांदा पाठविण्यात आलेल्या नमुन्याचा अहवाल दि.21 एप्रिल, 2020 रोजी रात्री 10.00 वाजता पॉझिटीव्ह प्राप्त झाला होता.  महिलेला तातडीने आयसोलेशन कक्षामध्ये दाखल करत उपचार सुरु करण्यात आले.राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी तातडीने पाऊले उचलत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांच्या नेतृत्वाखाली शिरोडा गावातील व्यक्तींच्या तपासणीसाठी आरोग्यपथके गठित करुन 80 कुटूंबातील 560 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड व त्यांच्या अधिपत्याखाली सर्व डॉक्टर्स, नर्स, ब्रदर्स यांच्या अथक परिश्रमातुन महिलेवर उपचार केल्यामुळे शिरोडा गावातील महिलेचा अहवाल सलग दोनवेळेस निगेटीव्ह आल्याने आज दि. 29 एप्रिल रोजी जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून बरे झालेल्या महिला रूग्णांस स्वगृही पाठवले.कोरोनाच्या या जीवघेण्या आजारातून वाचलेल्या कोरोना निगेटीव्ह रुग्ण महिलेचा चेहरा आनंदीत होता. आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्सेस यांचे आभारही महिलेले यावेळी मानले. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी अजूनही लॉकडाऊनचे पालन करावे, घरातून विनाकारण बाहेर पडू नये. सर्वांनी मास्क किंवा स्वच्छ हात रूमाल चेहऱ्यावर ठेवावा. अनावश्यक बाहेर न पडता घरातच रहावे, असे आवाहन कोरोनामुक्त महिलेने यावेळी केले.

मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

परतूर नगर परिषदेने शहरात गर्दीच्या ठिकाणी हात धुण्यासाठी नळ आणि सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध करावी-प्रकाश सोळंके

परतूर /प्रतिनिधी-सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचा फैलाव जोमाने होत आहे.नागरिकांनी घरात बसावे, घराबाहेर पडू नये असे आवाहन वेळोवेळी करण्यात येत आहे.तरी पण आवश्यक कामासाठी नागरिक घराबाहेर पडत असल्याने रस्त्यावर गर्दी दिसून येत आहे त्यामुळे नगर पालिका प्रशासनाने शहरात नागरिकांना हात धुण्यासाठी नळ आणि सॅनिटायझर ची 
 उपलब्ध करून द्यावी याकरिता मनसे चे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी आज दि.२८ रोजी नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे. मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील आष्टी रेल्वे गेट,साईबाबा मंदिर चौक, पारडगाव रोड,आंबा रोड या रस्त्याने बाहेर गावची वाहने आणि लोक शहरात प्रवेश करतात.या ठिकाणी हात धुण्यासाठी पाण्याचे नळ आणि सॅनिटायझर ची सोय करण्यात आली तर येणारे नागरिक हात धुवूनच शहरात प्रवेश करतील.त्यामुळे स्वच्छता राहून कोरोना विषाणूचा संसर्ग टाळता येण्यास मदत होईल.तसेच महादेव मंदिर चौक,बाजार समिती मैदान (मोंढा) आणि इतर गर्दीच्या ठिकाणी अशी हात धुण्यासाठी सोय करण्यात यावी जेणे करून कोरोनाचा फैलाव होणार नाही.तरी,नगर पालिका प्रशासनाने तात्काळ परतूर शहरात गर्दीच्या ठिकाणी हात धुण्यासाठी पाणी, सॅनिटायझर उपलब्ध करून या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेगवेगळ्या उपाय योजना कराव्यात.
धर्माबाद तालुक्यात ब-याच दिवसांपासून वडाफोन/ आयडिया  कंपनी ची सेवा विस्कळीत असल्याने  नागरिकांचा जीव मेटाकुटीस

र्माबाद (भगवान कांबळे ) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण नागरिकांची स्थिती बंदिस्तसारखी झाल्यामुळे आधीच नागरिकांचा जीव मेटाकुटीस आला आहे.अशा परिस्थितीत नागरिकांना घरात सवडीचा वेळ असल्याने फोनवरून मित्र-मैत्रिणी नातेवाईक इष्टमित्रांसह संपर्क साधून सर्वांचे कुशलता विचारणे कोणी आजारी असल्यास त्याची विचारपूस करणे आणि आपण जवळ नसलो तरी एकमेकांच्या सुख,दुःखात सहभागी आहोत याची जाणीव करून देण्यासाठी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून वार्तालाप करणे महत्त्वाचे असते.एवढेच  नाही तर आता 4 G इंटरनेट सेवेद्वारे घरातील सर्व सदस्यांना मनोरंजनासाठी स्मार्टफोन हाच महत्वाचा दुवा आहे. स्मार्टफोन द्वारेच मनोरंजन सोबतच विद्यार्थ्यांना अनेक शाळांमधील शिक्षकगण ऑनलाइन पद्धतीने इंटरनेट द्वारे शिक्षण देत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सिमेवर आसले पोलिस कर्मचारी तेथे काम करीत आहेत व त्यांच्या कडील माहिती व इतर वरिष्ठांनी 

पाठवली माहिती लवकर समजत नसल्याने धर्माबाद चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सन्नगले हे आयडीया व वडाफोन कंपनी वर नाराजगी व्यक्त करित केली आहे.  राज्य सिमेच्या परिसरात वडाफोन /आयडिया कंपनी ची सेवा कधी सुरू कधी बंद कधी नेटवर्क कमी  जास्त होत आहे . दोन मिनिटांसाठी जरी लाईन गेली तरी बरेच तास मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद राहणे,  कधी पावर प्लांट बंद पडणे, वरून डिझेल मिळत नसल्याची तक्रार, इत्यादी शेकडो कारणांमुळे वारंवार येथील दोन्ही कंपनीची सेवा बंदच राहत आहे .
कोरोनाच्या आपत्तीमध्ये लॉकडाऊनच्या काळातही  वडाफोन आयडिया कंपनी च्या टॉवर्सची मोबाईल आणि 4G इंटरनेट सेवा सतत बंद चालू होत असल्यामुळे  ग्राहकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. वरिष्ठ  अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन वारंवार बीएसएनएलची सेवा बंद पडण्याचे प्रकार थांबवावे अशी मागणी त्रस्त ग्राहक करीत आहेत.

         लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीनंतर निघाला तोडगा
पेट्रोल पंपावर पोलीस नियुक्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

जालना (प्रतिनिधी):- लाॅकडाऊन काळात प्रशासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या नियमावलीमुळे पेट्रोलपंप चालकांची मात्र इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली आहे. त्यातच प्रशासनाकडून वेगवेगळ्या ठिकाणी वाहनधारकांना पास दिल्या जात असल्याने तसेच प्रशासन व पोलीस यांच्यात
योग्य समन्वय नसल्याने अनेक पेट्रोलपंप चालकांचा गोंधळ उडाला होता. मात्र लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीनंतर अखेर जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी प्रत्येक पेट्रोल पंपावर एक पोलीस नियुक्त करण्याचे आश्वासन दिल्याने पंपचालकांना दिलासा मिळेला आहे.लाॅक डाऊन काळात प्रशासनाने पेट्रोलपंप चालकांसाठी वेळोवेळी नियमावली जाहीर केली आहे. यात अत्यावश्यक सेवेत येणारी वाहने, पास दिलेली वाहने व शेतकरी यांना वेळोवेळी इंधन पुरवठा करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यात पेट्रोल पंप सुरु ठेवण्याची वेळही प्रशासनाने ठरवून दिली आहे. परंतु अनेक ठिकाणी कमी कामगारावर पेट्रोल पंपाचे कामकाज सुरु असुन इंधन भरण्यासाठी येणाऱ्या वाहनाधारकांचे पास बघुन इंधन देणे शक्य नसल्याचे बोलले जात आहे. तर काही ठिकाणी पोलीसांकडून नाहक त्रास होत असल्याच्या तक्रारी देखील पेट्रोलपंप चालकांनी केल्या आहेत.हाच तक्रारींचा पाढा घेऊन पेट्रोल पंप असोसिएशनचे प्रतिनिधी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, आमदार कैलास गोरंट्याल व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे गेले होते. त्यांच्या सर्व समस्या त्यांनी या लोक प्रतिनिधींना सांगीतल्यानंतर अखेर पेट्रोल पंप चालक व प्रशासन यांच्यात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, आमदार कैलास गोरंट्याल व माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी मध्यस्ती करुन सुवर्ण मध्य काढण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांना दिल्या. यानंतर जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी सोमवारी (ता.27) पंपावर पास तपासणीसाठी पोलीस नियुक्त करण्याचे आश्वासन दिले अशी माहिती विरेन पटेल यांनी दिली. त्यामुळे सत्यनारायण तोतला, बंडुभाऊ मिश्रीकोटकर, इंद्रसेठ तवरावाला, विरेन पटेल, दिलीप मोरे या शिष्टमंडळाच्या मागणीला अखेर यश आले आहे.

रविवार, २६ एप्रिल, २०२०


घनसांवगी तालुक्यातील ढाकेफळ येथील भूमिहीन मजूर विधवा अपंग  70 गरजूंना राशन किट वाटप

सामाजिक कार्यकर्ते संदीप येडे व कपिल सरोदे यांचा पुढाकार

घनसांवगी,प्रतिनिधी :- जगामध्ये कोरोना ने थैमान माजल्यामुळे  सध्या जगात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण भारतात लॉक
डाऊन सुरू आहे .अशा परिस्थितीत संपूर्ण भारत बंद आहे.अशा परिस्थितीमध्ये हातावरील मजुरांना बाहेर निघणे शक्य नाही त्यांच्या हाताला काम नाही त्यांची उपासमार होत असल्यामुळे घनसां वगी तालुक्यातील ढाकेफळ येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप येडे व कपिल सरोदे या दानशूरांनी पुढाकार करून भूमिहीन मजूर विधवा अपंग अशा कुटुंबांना राशन किट वाटप केली.


    अन्नधान्याच्या तक्रारींच्या निरसनासाठी भरारी पथक गठित

जालना,प्रतिनिधी:- स्वस्तधान्य दुकानदारांबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. त्याअनुषंगाने अन्नधान्याबाबत होणाऱ्य गैरव्यवहाराबाबतच्या 
या पथकाचे प्रमुख म्हणुन संतोष बनकर, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी यांची नियुक्ती केली असुन त्यांचा भ्रमणध्वनी क्र. 9689001149, सदस्य म्हणून तपासणी अधिकारी  पी.सी. उघडे-9422226748, पुरवठा निरीक्षक जी.एस. मोरे-9763740430, पुरवठा निरीक्षक आर.एम. निहाळ-9422721526 यांचा समावेश असल्याचे आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहेत क्रारींचे निरसन करण्यासाठी जिल्हास्तरावर भरारी पथक गठित करण्यात आले असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसैय्ये यांनी एका आदेशान्वये कळविले आहे.


दु:खीनगर व शिरोडा येथील महिलांच्या स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह

  जालना,प्रतिनिधी:- जालना शहरातील दु:खी नगर येथील 65 वर्षीय महिला व शिरोडा ता. परतुर येथील 39 वर्षीय महिलांचे शेवटचे दोन स्वॅब (24 तास अंतराचे) निगेटीव्ह आले असुन दु:खीनगर येथील कोरोनाग्रस्त महिलेची 
प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहे.जिल्ह्यात एकुण 916  व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 93 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 595 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 25 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 793 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने -00 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 02 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 757, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 104, एकुण प्रलंबित नमुने-27 तर एकुण 502 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 02, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 317 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या 02, सध्या अलगीकरण  केलेल्या व्यक्ती -273, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-24, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या 93, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या 24, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 151 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 273 एवढी झाली असुन यामध्ये संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह, जालना – 48, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह-41, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-18, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-14, पोलीस प्रशिक्षण केंद्र-101, मंठा येथे 13 तर गुरुगणेश भवन, जालना येथे 38 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 386 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 62 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 461 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 59 हजार 400 असा एकुण 2 लाख 86 हजार 208 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे परजिल्ह्यात अडकुन पडलेल्या ऊसतोड कामगारांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात येत असुन दि. 25 एप्रिल, 2020 रोजी बदनापुर तालुक्यामध्ये बीड येथुन 11 व पुणे येथुन 28 एकुण 39 कामगार, परतुर तालुक्यात सांगली येथुन 51 व कोल्हापुर 37 एकुण 88 कामगार, मंठा तालुक्यात सांगली-72 कोल्हापुर 19, व सातारा येथुन 6 असे एकुण 97 कामगार, घनसावंगी तालुक्यात सांगली-63, कोल्हापुर-43 व सातारा-85 असे एकुण 191 कामगार, तर अंबड तालुक्यात बीड-25, पुणे-17,  सांगली 113, कोल्हापुर-83, सातारा-133, सोलापुर-49 व लातुर येथुन 02 असे एकुण 422 कामगार दाखल झाले आहेत.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...