शनिवार, २८ मार्च, २०२०

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तलवाडयात नाली - रस्ते साफसफाई व औषध फवारणी मोहिमेचा शुभारंभ, ग्रामपंचायतीचे मात्र याकडे दुर्लक्ष.
========================================================={======={======
तलवाडा दि.२८ ( प्रतिनिधी )  कोरोना व्हायरस या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लोकांना घराबाहेर पडू नये असे आवाहन केले असून घरात राहणाऱ्या लोकांना डासाने हैराण केले आहे.नाली व रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.याकडे तलवाडा ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्यामुळे हमजा प्रतिष्ठाण व गावातील तरुणांनी एकत्र येऊन गाव स्वच्छता मोहीम हाती घेतली असून हे काम पंधरा दिवस दररोज केले जाणार आहे असे माजी सरपंच विष्णू हात्ते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी गाव स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला असून यामध्ये रस्ते साफसफाई,नाली काढणे, औषधी फवारणी करणे व नालीमधून काढलेली घाण ट्रॅक्टरमध्ये भरून ती इतरत्र नेऊन टाकणे अशी कामे हाती घेण्यात आली आहेत.यामध्ये हमजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोबीन खतीब,सुनिल तुरूकमारे, नय्युम बागवान,जालिंदर डोंगरे,भागवत कलाल तसेच माजी सरपंच विष्णू हात्ते,शहेंशाहभाई सौदागर,अज्जूशेठ सौदागर,पत्रकार अतिक शेख, प्रत्रकार ईम्रान सौदागर हभप गणेश महाराज कचरे, शेख आफसर शेख जाफर, लक्ष्मण राऊत,बाळू शिनगारे यांच्यासह गावातील तरुणांनी सहभाग घेतला आहे.जे काम ग्रामपंचायत करू शकली नाही ते काम या तरुणांनी व हमजा प्रतिष्ठानने हाती घेतल्यामुळे त्यांचे ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे.सफाई कामगार महिलांचे अठरा महिन्याचे मानधन ग्रामपंचायतीने न दिल्याने रस्त्यावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याची चर्चा लोकांकडून ऐकावयास मिळत आहे.सध्या गावात सगळीकडे घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने व ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याने हमजा प्रतिष्ठान व गावातील तरुणांनी गाव स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. 
==========================================================================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...