रविवार, २८ जून, २०२०

7/12,8-अ किंवा फेरफार जोडलेला नाही या त्रुटीच्या। सबबीखाली शेतकऱ्यांचे पीककर्ज प्रस्ताव नाकारु नयेत- जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आदेश जारी.


जालना,ब्युरोचीफ :- जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून पीककर्ज मिळण्यासाठी बँकांकडे प्रस्ताव सादर करण्यात येत आहेत.  परंतू संबंधितास तहसिल कार्यालयाकडून 7/12,8-अ व फेरफार नक्कल सादर करण्यासाठी बँकांकडून कळविण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित शेतकरी तहसिल कार्यालयात नक्कल मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असुन सद्य:स्थितीत कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असुन अशा परिस्थितीत होणाऱ्या गर्दीमुळे रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आदेश निर्गमित करुन सर्व सर्व राष्ट्रीयकृत, ग्रामीण, व्यापारी व जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या शाखाधिकाऱ्यांनी पीककर्जासाठी बँकेत आलेल्या शेतकऱ्यांचे 7/12,8-अ किंवा फेरफार जोडलेला नाही या त्रुटीच्या सबबीखाली त्यांचे पीककर्ज प्रस्ताव नाकारु नयेत, तसेच अशा शेतकऱ्यांचे कागदपत्रे मिळण्यासाठी गावनिहाय यादी करुन संबंधित बँक शाखेने संबंधित तहसिल कार्यालयास खास दुतामार्फत किंवा शाखा समन्वयकामार्फत दररोज सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांनी तालुक्यातील सर्व राष्ट्रीयकृत, ग्रामीण, व्यापारी व जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत अथवा समन्वयकामार्फत 7/12,8-अ व फेरफार नक्कलसाठी प्राप्त यादीनुसार आवश्यक ती कागदपत्रे  संबंधित बँकांना संबंधित तलाठ्यामार्फत प्राप्त करुन घेऊन नि:शुल्क उपलब्ध करुन देण्याचेही निर्देश दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...