रविवार, २८ जून, २०२०

बदनापुर व अंबड तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्याकडून पहाणी नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश.


जालना,ब्युरोचीफ :- बदनापुर व अंबड तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पहाणी राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी आज दि. 27 जुन रोजी प्रत्यक्ष गावांना भेट देऊन केली.  झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी जिल्हा प्रशासनाला दिले. या पाहणी दौऱ्यात मंत्री महोदयांसमवेत आमदार नारायण कुचे, माजी आमदार अर्जुनराव खोतकर, माजी आमदार संतोष सांबरे, भास्कर आंबेकर, ए. जे. बोराडे,भाऊसाहेब पाऊल बुद्धे, अशोक बर्डे, दिनेश काकडे, सिद्धेश्वर उबाळे, उप विभागीय अधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, कृषी उपसंचालक माईनकर, तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी आदींची उपस्थिती होती.
यावेळी रोहयोमंत्री श्री भुमरे म्हणाले, मुख्यमंत्री महोदयांच्या सुचनेनुसार बदनापुर व अंबड तालुक्यातील गावांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यात आली असल्याचे सांगत पावसाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असुन या नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन अहवाल सादर करण्याच्या प्रशासनास सुचना देण्यात आल्या आहेत. अहवाल प्राप्त होताच मुख्यमंत्री महोदयांना सादर करण्यात येणार असुन शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचेही मंत्री श्री भुमरे यांनी यावेळी सांगितले.यावेळी मंत्री महोदयांनी अंबड तालुक्यातील हरतखेडा, बठाण खुर्द, बदनापुर तालुक्यातील नानेगाव, बाजार वाहेगाव वाकुळणी, धोपटेश्वर व रोशनगाव या गावांना भेटी देऊन पहाणी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...