गुरुवार, २१ मे, २०२०

बीड जिल्ह्यात उद्यापासून लालपरी जिल्हांतर्गत धावणार




बीड,प्रतिनिधी:- बीड जिल्ह्यामध्ये उद्या दि.22 मे पासून राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा 50 टक्के आसन क्षमतेनुसार म्हणजेच 22 प्रवाशी याप्रमाणे जिल्हांतर्गत सुरू करण्यात येत असल्याची माहिती विभाग नियंत्रक बीड कालिदास लांडगे यांनी दिली आहे. यासंदर्भात जिल्हा माहिती अधिकारी यांनाही अधिकृत पत्र देण्यात आले आहे.**
बीड जिल्ह्यामध्ये गेला सात दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची चाके थांबली आहेत.मात्र उद्या दिनांक 22 मे पासून जिल्हांतर्गत बस सेवा सुरू करण्यात येत असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हा माहिती अधिकारी यांना दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र शासन अधिसूचना मधील मुद्दा क्र.14 ( ड) नुसार नॉन रेड झोन मध्ये सार्वजनिक प्रवासी वाहतूक जिल्हाअंतर्गत बसच्या प्रवासी आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू करण्याबाबत सूचना प्राप्त झाले आहेत. त्या अनुषंगाने बीड विभागांमध्ये उद्यापासून जिल्हांतर्गत बस सेवा सुरू करण्यात येत आहे.
             याप्रमाणे सुरू होईल बसेवा
बीड ते परळी,  बीड ते अंबाजोगाई , बीड ते माजलगाव, बीड ते धारूर, बीड ते गेवराई, बीड ते पाटोदा, बीड ते आष्टी ,परळी ते अंबाजोगाई ,धारूर ते अंबाजोगाई,  केज ते माजलगाव, माजलगाव ते गेवराई गढी याप्रमाणे या बसच्या 12 फेऱ्या होणार आहेत.सदरील बसेस सकाळी 7 ते सायंकाळी 6 यावेळेत प्रति 1 तासाने सोडण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक कालिदास लांडगे यांनी  प्रसिद्धी पत्राद्वारे दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...