गुरुवार, २१ मे, २०२०


पोलिसांकडून मजुरांची फसवणूक, अन्न पाण्याविना मजूर पोलीस ठाण्याबाहेर


मुंबई/ब्युरोचीफ,दि.२१ :- गेल्या २ महिन्यापासून गावी जाण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या परप्रांतीय कामगारांना त्यांच्या गावी रेल्वेने पाठविण्यात येईल असे सांगून सकाळ पासून विक्रोळी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. कामगार भाड्याची घरे खाली करून लेकराबाळांसह सकाळपासून विक्रोळी पोलीस ठाण्याबाहेर येऊन बसले होते. मात्र दुपारी त्यांना सांगण्यात आले की "गाडी नाहीये घरी जा, गाडी असेल तेव्हा फोन करून कळवण्यात येईल". भाड्याची खोली कायमची सोडून आलेल्या सकाळपासून उपाशी तापाशी बसलेल्या कामगारांना पोलिसांनी हाकलून दिले. आता गाडीची व्यवस्था होईपर्यंत राहायचे कुठे आणि खायचे काय असा प्रश्न या कामगारांना पडला आहे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रमेश मोहिते यांनी रस्त्यावर बसलेल्या कामगारांची विचारपूस करून पोलीस ठाण्यात जाऊन माहिती विचारली असता पोलिसांनी उडवा उडवीची उत्तरे देऊन बाहेर काढून दिले. अनेक कामगार संतापून आता पायी चालत गावी जाणार असे म्हणून निघून गेले. सरकारला स्थलांतरित मजुरांची मदत करायची आहे की त्यांच्या आणि त्यांच्या लेकराबाळांच्या जीवाशी खेळायचं आहे? मजुरांची हेळसांड तातडीने थांबवली पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकारने समन्वयाने मजुरांची काळजी घेणे अपेक्षित असताना इथे समन्वय आणि नियोजनाच्या नावाने बोंबाबोंब दिसत आहे. सगळाच भोंगळ कारभार. जर गाडीची व्यवस्था झालेली नव्हती तर पोलिसांना कोणी आदेश दिला कामगारांना बोलावण्याचा याची चौकशी झाली पाहिजे. आणि कामगारांचा छळ थांबला पाहिजे. ज्या मजुरांनी भाड्याचे घर सोडले आहे त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय तातडीने सरकारने करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...