गुरुवार, २१ मे, २०२०

बंगलेवाडी येथे दोन महिलांच्या ताब्यातून 12 हजाराची गावठी दारु जप्त




रांजणी प्रतिनिधी/असलम कुरेशी
घनसावंगी तालुक्यातील बंगलेवाडी तांडा येथे गावठी हातभट्टीच्या अड्डयावर धाड टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन महिलांच्या ताब्यातून 12 हजाराची गावठी दारु जप्त केली. याप्रकरणी घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलकरण्यात आला.
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला बंगलेवाडी तांडा येथे हातभट्टीची गावठी दारु विक्री होत असल्याची गुप्त माहिती खब-याकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बंगलेवाडी तांडा येथील या अड्डयावर छापा टाकून 12 हजार रुपयांची गावठी हातभट्टीची दारु जप्त केली. ही कार्यवाही गुरुवारी दुपारी 12:55 वाजता करण्यात आली. या संदर्भात पोलिस कर्मचारी किशोर जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिस उपनिरीक्षक संपत पवार यांनी ही दारु नष्ट केली. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक एस.चैतन्य, अप्पर पोलिस अधीक्षक समाधान पवार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारु विरोधी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक संपत पवार, आर.एस. पव्हरे, परमेश्वर धुमाळ, सुभाष पवार, सुरेश राठोड, धनाजी कावळे, रामेश्वर बघाटे, दिलीप कांबळे, राजेंद्र वेलदोडे, सुरेश नलावडे, यशवंत मुंढे, किशोर जाधव, महिला पोलिस अलका केंद्रे, रत्नमाला येडके व चालक धोंडीराम मोरे यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...