मंगळवार, ९ जून, २०२०
चिखली मातंग समाज बँड संघटना नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा चिखली मातंग समाजाच्यावतीने केला सत्कार..
अंबड मध्ये कोरणा बाधितांची रुग्ण संख्या आता 11 वर आंबेडकरांची धाकधूक वाढली असून मोठी खळबळ
65 वर्षीय व्यक्तीचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त त्याच्या संपर्कातील सात व्यक्ती क्वारंटाईन
अंबड/प्रतिनिधी : शहरातील नाईकवाडी मोहल्ला वंजार गल्ली परिसरातील पुन्हा एका 65 वर्षीय व्यक्तीचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्याने आंबेडकरांची धाकधूक वाढली असून मोठी खळबळ उडाली आहे संबंधित रुग्णांच्या संपर्कात असलेल्या सात व्यक्तींना तातडीने करून टाईप करण्यात आले असून शहरातील बाधितांची रुग्ण संख्या आता अकरा वर गेले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की अंबड शहरातील नाईकवाडी मोहल्ला वंजार गल्ली चा एकच परिसर असून या परिसरातील काही दिवसांपूर्वी पाच रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने सदर परिसर हा कंटेनमेंट झोनमध्ये प्रशासनाकडून घोषित करण्यात आल्याने आंबेडकरांच्या चिंतेची बाब होऊन मोठी खळबळ उडाली होती परंतु तीन दिवसापूर्वी निगेटिव प्राप्त झालेल्या चार रुग्णांना अंबड येथील कोरोना covid-19 सेंटर मधून उपविभागीय दंडाधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदार राजू शिंदे, अंबड नगर परिषदेचे मुख्याधिकारी सागर घोलप, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.तलवाडकर, समाज कल्याण विभागाचे सूननगत, डॉक्टर्स, नर्स व अन्य कर्मचारी यांच्या उपस्थित पूर्ण वर्षाव करून सुट्टी देण्यात आल्याने शहरातील नागरिक समाधान झाले होते. शहरातील नागरिकांची चिंता दूर होते ना होत तर दिनांक 6 जून रोजी अन्य बाहेरील जिल्ह्यातून ये जा करून आलेल्या अथवा कोरोना बाधितांच्या संपर्कातील कोणताही इतिहास नसलेल्या एका 65 वर्षीय व्यक्तीस खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने तो अंबड शहरातील एका मोठ्या नामांकित खाजगी दवाखान्यात दिनांक 1 जून रोजी उपचारासाठी दाखल होऊन घरी गेला. सदर खाजगी दवाखान्याचे नाव आणखी गुपित असून त्याबद्दल अधिक माहिती मिळू शकली नाही 2 दिवस घरीच उपचार घेतल्यानंतरही फरक न पडल्याने तो तक दवाखान्यात पुन्हा 3 जून रोजी गेला असता डॉक्टरांनी त्याचा एक्स-रे काढून उपचार करण्याचा प्रयत्न केला मात्र फरक न पडल्याने त्या जालना येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जालना जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या लाळेचे नमुने घेऊन तपासण्यासाठी लॅबला पाठवल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला सदर रुग्णाच्या संपर्कात आलेले सात व्यक्तींना तात्काळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुला-मुलींचे वस्तीग्रह अंबड येथे असलेल्या कोरोना covid-19 सेंटर येथे क्वारंटाईन करण्यात आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली असून आंबेडकरांच्या चिंतेत वाढ झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे. उपविभागीय दंडाधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदार राजू शिंदे, अंबड नगर परिषदेचे मुख्याधिकारी सागर घोलप,पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.तलवाडकर, डॉ.दयानंद पाठक, डॉ.मयूर साडेगावकर , नगरपरिषद कर्मचारी तसेच अंबड पोलीस स्टेशन कर्मचारी यांनी तात्काळ सदरील परिसरातील पाहणी करून भेट दिली.
चिंचाच्या झाडाकडे व्यापारांनीं फिरवली पाट सिरसदेवी परिसरातील चित्र
दर वाढ झालेल्या बी बियाणांच्या किमती शासनाने कमी कराव्यात-महात्मा ब्रिगेड सतीश राऊत याची मागणी.
परतूर /प्रतिनिधी:- मागील वर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. या मुळे सोयाबीन बियाणाची प्रत खालवली आहे. याची झळ आता आगामी खरीपाच्या हंगामात शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे. सोयाबीन चे बियाणे कि्वंटल मागे एक हजार रूपये पेक्षा अधिक महागले आहे. प्रामुख्याने महाबीजच्या बियाणाचे दर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे. सोयाबीन बियाणाची 30 किलोची बॕग मागील हंगामात 1890रुपये पर्यत विकली जात होती. परंतु यंदा तीच बॕग 360 रू. ने महाग झालेली आहे. ही दरवाढ शेतकऱ्यांना परवडणारी नाही.
अशा परिस्थितीमध्ये शासनाने ही दरवाढ कमी करावी किंवा बी बियाण्यांच्या बाबतीत शासनाने शेतकऱ्यांसाठी पॅकेजची घोषणा करावी कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॕकडाऊन मुळे शेतकऱ्यांचे सुध्दा नुकसान झालेले आहे.
सध्या मागील काही महिन्यांपासून लॉक डाऊन मुळे शेतकरीवर्ग सुद्धा हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमाला वर सुध्दा लॉकडाउनचा परिणाम झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना अधिक महाग किंवा अधिक चढ्या भावाने बी बियाणे विकत घेणे परवडण्यासारखे नाही. म्हणून शासनास निवेदन आहे की आपण याकडे लक्ष घालून शेतकऱ्यांसाठी उपाययोजना कराव्यात. अशी मागणी महात्मा ब्रिगेडचे परतुर तालुका अध्यक्ष सतिश राऊत यांनी केली आहे.
मोसंबी व लिंबाच्या झाडावर किड्यांचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
घनसावंगी प्रतिनिधी/असलम कुरेशी :- घनसावंगी तालुक्यातील रांजणी व परिसरात मोसंबी व लिंबाच्या झाडावर सोमवारच्या रात्री पासून विचित्र किडे दिसत असून हे किडे संपूर्ण झाडाचा पाला खात आहेत. त्यामुळे मोसंबी व लिंबाची झाडे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
यासंदर्भात अशोक ढोबळे यांनी सांगितले की त्यांचा शेतात मोसंबीची 500 झाडे आहेत. मोसंबीचे उत्पादन वाढावे म्हणून त्यांनी या पिकावर मोठ्या प्रमाणात खर्च केलेला आहे. सध्या या झाडांना मोसंबी लागत आहे. परंतु या झाडावर विचित्र प्रकारच्या किड्यांनी हल्ला केल्यामुळे ही झाडे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक अमोल देशमुख यांनी सांगितले की हे किडे रात्री अंधार पडल्यावर झाडावर हल्ला चढवतात आणि संपूर्ण झाडाचा पाला खात असल्याने अख्खे झाड नष्ट होत आहे. सोमवारच्या रात्री या किड्यांनी अशोक ढोबळे यांच्या 50 ते 60 झाडांचा पाला खाऊन नष्ट केले आहे. तसेच अमोल देशमुख यांच्या शेतातील जवळपास 200 झाडांचा पाला खाल्ला. आधीच शेतकरी लाॅकडाऊन, अवकाळी पाऊस व गारपिटीचा सामना करून हैरान झालेला असताना या किड्यांनी शेतक-यांची झोप उडवली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता असल्याने कृषि विभागाने शेतक-यांना मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे. मोसंबीच्या झाडांचे नुकसान होत असल्याने रांजणी परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अंबड शहरातील राशन दुकानदाराचा मनमानी कारभार ; गोरगरिबांचे होताहेत हाल
ज्यांच्याकडे राशन कार्ड त्यानांच स्वस्त धान्य !
अंबड शहरातील राशन दुकानदाराचा मनमानी कारभार ; गोरगरिबांचे होताहेत हाल
जालना,प्रतिनिधी :- ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही व राशन कार्ड आँनलाईन नाही त्यांना राशन दुकानदार राशन देत नसल्याने लॉक डाऊन मध्ये गोरगरीब कुटुंबांची उपासमार होत आहे. प्रशासनाकडून राशन दुकादारां च्या मनमानीला चाप लागेल का, असा सवाल उपस्थित होत आहे.संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले असून गरीबांना हाताला काम नाही.काम नाही तर पैसा नाही. यामुळे मोलमजुरी करणाऱ्या शेकडो गरीब लोकावर उपासमारीची वेळ आली आहे.या काळात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांना मोफत तांदूळ मिळाल्याने मोठा आधार मिळाला आहे. त्याचबरोबर मे महिन्यात डाळीचे वाटप करण्यात आले. मात्र असे असलेल तरी अंबड परिसरातील अनेक गावात राशन कार्ड नसल्याने धान्यापासून वंचित असलेले दिसून येत आहे. सध्या सर्वत्र कोरोनाने संकट ओढवले आहे. ज्यांचे राशन कार्डमध्ये नाव नाही त्यांना राशन दुकानदार राशन देत नाहीत.राशन दुकादारांचा मनमानी कारभार सुरू आहे.
रविवार, ७ जून, २०२०
राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर. महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...
-
मादळमोहीच्या अंखड हरीनामस सप्ताहाचीउत्साहत सांगता संपन्न. मादळमोही | प्रतीनिधी . दि.11..संत सम्राट जगतगुरू संत तुकाराम महाराज बीजेनिमित्या...
-
औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव. गणेश आठवले | औरंगाबाद आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने औरंगाबादच...
-
मादळमोहित सार्वजनिक रक्तदान शिबीरास उत्षपुर्त प्रतीसाद.45 युवकांचे दानत्व मादळमोहि (हँलो रिपोर्टर .न्युज )दि.24. :- महाराष्ट्रात ...








