शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२०

     लालदेव फाटा जि जालना येथे संत श्री सेवालाल महाराज
                 यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.   
जालना  (प्रतिनिधी) :- जालना जिल्ह्यातील लाल लाल देव फाटा पारेगाव तालुका जिल्हा जालना येथे संत श्री सेवालाल महाराज यांची  जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
त्या निमित्त जयंती मध्ये मोठ्या मान्यवरांची उपस्थिती होती. मा श्री रावसाहेब पाटील दानवे (केद्रीय मंत्री भारत सरकार) याच्या अर्तगत निधितुन सेवालाल महाराजांच्या मंदिरा साठी व सभामंडपा साठी 100000 लाख रुपये देण्यात आले आहे.मा.भास्कर (आबा) दानवे पाटील (भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व नगरसेवक मार्केट का सभापती) याच्या हस्ते निधी देण्यात आले.कार्यक्रमा उपस्थित सरपंच पारेगाव व मा.अविनाश चव्हाण मा. संजय डोगरे (सर्कल प्रमुख) मा.कोल्हे साहेब,मा.डॉ.कळकुंबे, मा. पांडुरंग पोहेकर,मा संजय आडुळे,मा. नारायण जाधव,मा.दत्ता जाधव, मा. शंकर काळे, मा.नारायण मोहीते, मा. अर्जुन मोहिते, मा.तुकाराम राठोड इत्यादी उपस्थित होते.
   कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.                                                                          डॉ.कासलीवाल

जालना (प्रतिनिधी) :- तंबाखू आणि तंबाखू जन्य पदार्थ च्या सेवनाने युवा पिढी कॅन्सर च्या आहारी जात आहे मौखिक कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे याला आळा घालण्यासाठी कोटपा कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन डॉ आकाश कासलीवाल यांनी केले आहे.
मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद क्रांतीसिंह बहुद्देशीय सेवाभावी संस्था,दरेगाव व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या तंबाखू नियंत्रण कक्षाच्या वतीने जालना पोलीस अधीक्षक कार्यालयात कोटपा कायद्याची अंमलबजावणी यावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यावेळी पावरपाईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून कोटपा कायद्याच्या विविध कलमाची माहिती देण्यात आली यावेळी जालना पोलीस अधीक्षक एस चैतन्य, पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर क्रांतिसिंह बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विष्णू पिवळ तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ संदीप गोरे कार्यक्रम अधिकारी रंगनाथ जोशी गजानन गाडे आदी उपस्थित होते.
संजय काळेना समाजभूषण पुरस्कार  
बजाजनगर /प्रतिनिधी   वाळूज महानगरातील पत्रकार, शिक्षक तथा मूप्टा शिक्षक संघटनेचे विभागीय प्रसिद्धीप्रमुख संजय रामचंद्र काळे यांना शब्दगंध समूह प्रकाशनच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय डाॕ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार १४ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथील मराठवाडा साहित्य परिषद सभागृहात  येथे झालेल्या कवि संमेलनात मराठी सहित्यीक डाॕ.महेश खरात यांच्या हस्ते  वितरीत करण्यात आला.यावेळी शब्दगंध प्रकाशन समूहाचे प्रमुख संदीप त्रिभूवन यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती . यापूर्वी  संजय काळे यांना  मराठवाडा भूषण, सावित्रीबाई फुले पुरस्कार , परिवर्तन रत्न, एकता गौरव , आदर्श पञकार, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार यासारखे ६२ पुरस्कार मिळाले आहेत .त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अनेकांनी भेटून त्यांचे अभिनंदन केले आहे.

शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेख करून अपमान करणाऱ्या ESIC कामगार राज्य विमा निगम च्या वरिष्ठ अधिकारी गुन्हा दाखल करा अखिल भारतीय क्रांती सेनेच्या वतीने मागणी.

औरंगाबाद (ब्युरो चीफ) :- अवघ्या राष्ट्राचे दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा सन 2020 च्या दिनदर्शिकेत एकेरी उल्लेख करून केंद्र
 सरकारच्या अखत्यारीत असलेल्या E S I C ने अकलेचे तारे तोडले आहेत,हाच का यांचा छत्रपतींचा आशीर्वाद ?महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधी  या कमेटीवर सदस्य असतांना ही जखमेवर मीठ चोळणारी चूक होतीच कशी, हे महाराष्ट्रातील लोक प्रतिनिधी काय मीटिंग ला फक्त चहा बिस्कीट खाण्या साठी जातात का ?असा सवाल आज क्रांतिसैनिकांनी ESIC च्या वरिष्ठ अधिकाऱ्याना विचारून चिकलठाणा व वाळूज कार्यालयात प्रदेश सरचिटणीस नितीन देशमुख यांच्या नेतृत्वखाली ठिय्या आंदोलन केले,यावेळी पोलीस आयुक्त श्री चिरंजीवी प्रसाद यांना भेटून गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली.दवाखान्यांमध्ये आमच्या कामगार बंधूंचे काय हाल होतात हे जगजाहीर आहे,दवाखान्याची काय दुरावस्था आहे हे कोणालाही वेगळे सांगायला नको,आणि हे सगळे असताना ,देशाच्या अस्मितेशी ही सरळ सरळ खेळत आहे,या दिनदर्शिकेचे वितरण त्वरित थांबावे ,महाराष्ट्रातील समस्त शिवप्रेमींची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लेखी माफी मागून ,नवीन दिनदर्शिका शिवजयंती पूर्वी छापाव्यात,प्रकाशक,वितरक,मुद्रक यांच्यावर गुन्हे दाखल करून निलंबनाची कार्यवाही करावी,अशी मागणी अखिल भारतीय क्रांतिसेनेच्या वतीने करण्यात आलीआजच्या आंदोलनामध्ये प्रदेश सरचिटणीस नितीन देशमुख, दिनेश दुधाट वाळूज महा अध्यक्ष,मनोहर निकम शहर जिल्हा अध्यक्ष,औदुंबर देवडकर वाळूज युवा अध्यक्ष,भारत फुलारे डावात मचाळा पार्टी, दीपक गायकवाड वाळूज उपाध्यक्ष,राजू शेरे जिल्हा संघटक,संजय कोकाटे मार्गदर्शक,विजय राजगुरू,शरद कदम,गणेश गवली, निलेश जाधव ,राहुल सुरडकर,राहुल अग्रवाल,इत्यादी पदाधिकारी सहभागी झाले होते.


जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल मातंग समाज क्रांती मोर्चा
     सकल मातंग क्रांती मोर्चा मध्ये उलटला अथांग जनसागर

औरंगाबाद (ब्युरो चीफ) :- औरंगाबाद येथे झालेल्या सकल मातंग क्रांती मोर्चा मध्ये उलटला अथांग जनसागर महाराष्ट्रात गेली दोन-ते तीन वर्षापासून सातत्याने मातंग समाजातील महिलांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी आणि मातंग समाजाच्या ज्या प्रमुख मागण्या गेली कित्येक वर्षापासून शासनदरबारी प्रलंबित आहेत त्या मागण्या मान्य करण्यासाठी काल दि १४ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयांवर मातंग समाजाचा सकल मातंग क्रांती मोर्चा धडकला
या मोर्चात संपूर्ण महाराष्ट्रातुन विविध संघटनांच्या प्रमुख नेत्यांसहित पदाधिकारी, कार्यकर्ते समाजबांधव आणि माता-भगिनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती जिकडे-तिकडे मोर्चेकरांच्या हातातील पिवळे झेंडे आणि महापुरुषांच्या घोषणांनी संपूर्ण शहर दणानून गेले होते उन्हाची परवा न करता तरुणांबरोबरच लहान लेकरांसहित वृद्ध लोकांनी या मोर्चा मध्ये मी आणि माझा समाज म्हणून सहभाग नोंदवला होता.
         क्रांती चौक येथून निघालेल्या या मोर्चाचा समारोप विभागीय आयुक्त कार्यालय याठिकाणी करण्यात आला येथे उपस्थित जनसमुदायाला प्रमुख नेत्यांनी संबोधित केले यांवेळी औरंगाबाद चे खासदार इम्तियाज जलील, लहुजी शक्ती सेनेचे विष्णुभाऊ कसबे, क्रांतीगुरु लहुजी साळवे विकास परिषदेचे उत्तमरावजी कांबळे, समाजाचे नेते संजय ठोकळ, ज्यांच्या पुढाकाराने हा मोर्चा यशस्वी रीतीने संपन्न झाला ते वीर योद्धा लाल्या मांग यांचे नातू प्रभुभाऊ बागुल, अजिंक्य चांदणे, शिर्डी येथील विराट प्रतिष्ठान चे प्रदीप सरोदे, लहुजी टायगर सेनेचे शरद त्रिभुवन, डॉ.शेषराव नाडे, विनोद साबळे, राजु आहिरे, कमलेश चांदणे, कबीरानंद बबनरावजी दाभाडे, राजु खाजेकर आदींनी भाषणे केली यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने मा.विभागीय आयुक्त यांना अन्याय-अत्याचाराला वाचा फोडण्याचे आणि मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले यांवेळी निवेदन देतांना संजय ठोकळ, प्रभुभाऊ बागुल, विनोद साबळे, अजिंक्य चांदणे, प्रदीप सरोदे, संदिप मानकर, डॉ.शेषराव नाडे, डॉ.सचिन साबळे, संदिप चांदणे, सुवर्णा साबळे, राजश्री साठे, ज्योती जाधव आदींची उपस्थिती होती....!!
            ------------------------------- ● ● ----------------------------

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२०

       रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाच्या वतीने अंबड येथे प्राथमिक नोंदणी अँड.ब्रह्मानंद चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न.
               
 अंबड़ (प्रतिनिधि) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पक्षाच्या वतीने  अंबड़ येथे प्रथमिक सदस्य नोंदणी अँड.ब्रम्हांनंदजी चव्हाण साहेब यांची आज दिनांक 13 फेब्रुवरी 2020 गरुवार रोजी सकाळी 10.30 ते 5.00 ठिकान डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांच्या पुतळया जवळ अंबड़  येथे संघर्षनायक केंद्रीय सामजिक न्याय मंत्री मा. रामदासजी आठवले साहेब  उपस्थिति संपन्न यांच्या आदेशाने व मा. ब्रम्हांनंद चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मधे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पक्षाच्या वतीने प्राथमिक सदस्य नोंदणी संपन्न झाली. यावेळी उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष मा. प्रकाश मामा रूपवते, मा. सुरेशभाऊ खरात (तालुका अद्यक्ष), मा. विष्णु खांडेभराड (तालुका सचिव), अँड.गणेश पटेकर (तालुका उपाध्यक्ष), राहुल खरात (यूवा तालुका अद्यक्ष), संतोष खरात (शहराद्यक्ष अंबड़), भीमराव खांडेभराड (सर्कल प्रमुख), लक्ष्मण धवळे, लक्ष्मण भालेराव, सिद्धार्थ उघड़े, भानुदास शिंदे,भीमराव मगरे,नितिन मगरे,शाहिर दिलीप खरात, पंडित येडे, आनंद म्हस्के,सिद्धार्थ कांबळे इत्यादि आदिउ उपस्थितहोते. व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पक्षाच्या वतीने प्रथमिक सदस्य नोंदणी संपन्न झाली.

मनसे ने जालना बस स्थानकात लावले संभाजीनगरचे फलक

जालना ( प्रतिनिधी) : - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने औरंगाबाद ऐवजी संभाजी नगर म्हणावे असे जनआंदोलन हाती घेतले असून या आंदोलनाचा एक भाग म्हणून मनसे पदाधिकारी व मनसे सैनिकांनी आज जालना बसस्थानकात  एस. टी. बसेसना संभाजी नगर चे फलक लावले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी ( ता. १४)पदाधिकारी व मनसे सैनिक एकञ आले.जालना मध्यवर्ती बसस्थानकात  मनसेचा झेंडा व फलके  हाती घेऊन छञपती शिवाजी महाराज की जय,छञपती संभाजी महाराज की जय,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो..औरंगाबाद नको संभाजी नगर म्हणा मराठी ह्रदयसम्राट राज ठाकरे आगे बढो,अशा गगनभेदी घोषणा देत संपूर्ण बसस्थानकाचा परिसर दणाणून सोडला.तसेच औरंगाबाद कडे जाणार्या एस टी बसेस च्या काचांवर जालना ते संभाजी नगर अशी फलके लावली.अचानक झालेल्या या आंदोलनामूळे प्रवाशांची एकच गर्दी झाली. या वेळी मनसे चे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे, शरद पाटील मांगधरे, महेश नागरे, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष संजय राजगूरे, प्रमोद म्हस्के, अजय मोरे, पंकज घोगरे, अमोल जाधव, गणेश धांडे, आकाश जाधव,मयूर बूजाडे,आकाश खरात यांच्या सह पदाधिकारी व मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान पक्षातील वरिष्ठांकडून आदेश येताच संभाजी नगर करण्यासाठी जनआंदोलन अधिक व्यापक करण्यात येईल असे मनसे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी सांगितले. 

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...