शुक्रवार, २९ मे, २०२०

ग्रामसेवक,सरपंचाच्या पुढाकाराने सोशल डिस्टनसिंगचे पालन करून रोहयोच्या कामाला सुरुवात..... मजुरांना काम मिळाल्याने समाधान....



परतूर /प्रतिनीधी:-प्रशांत वाकळे
तालुक्यातील अनेक गावातील मजूर शहराच्या ठिकाणी कामे करण्यासाठी जातात तर काही मजूर हे गावातच ग्रामपंचायतच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मग्रारोहयोची कामे करतात.एप्रिल,मे महिन्यात गावात अनेक मजूरांना कामे मिळायला पाहिजे होती परंतु कोरोनाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला.देशासह महाराष्ट्रात मागील दीड महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने गावातील सर्वच कामे बंद होती.मजूरांच्या हाताला कामे नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.ही बाब लक्षात घेऊन तालुक्यातील वरफळ येथील ग्रामसेवक एकनाथ मुरदकर,सरपंच श्रीमती मसरत बेगम शेख नदीम यांनी पुढाकार घेऊन गावातील अडचणीत आलेल्या मजुरांना मग्रारोहयो मधून कामे उपलब्ध करून दिल्याने मजूर वर्गातून समाधान व्यक्त केलं जातं आहे.कोरोनाच्या संकटकाळात मजूरांच्या हाताला उशिरा का होईना कामे मिळाल्याने दिलासा मिळाला आहे.सरपंच मसरत बेगम यांनी तसेच ग्रामसेवक श्री. मुरदकर यांनी गावातील शेकडो मजूरांना मग्रारोहयो अंतर्गत नाला खोलीकरण तसेच गाव तलावातील गाळ व इत्यादी कामे मिळवून दिल्यामुळे मजुरांना उपासमारीची वेळ टळली तर जमिनी मधील भूजल पातळी सुद्धा येणाऱ्या काळात वाढणार आहे.
याकामी ग्रामपंचायत मार्फत मजुरांना काम उपलब्ध व्हावे यासाठी सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह,रोजगार सेवक ए.ए.शेख यांनी पुढाकार घेतला होता.
या कठीण परिस्थिती मध्ये हाताला काम मिळाल्यामुळे मजूरांनी ग्रामपंचायत मार्फत सुरू झालेल्या कामाबाबत आभार मानून समाधान व्यक्त केले.



प्रशासकीय सूचनांचे पालन करून काम सुरू
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील मजूर आर्थिक संकटात सापडला होता ही गरज लक्षात घेता त्या मजुरांना ग्रामपंचायत मार्फत कामे उपलब्ध करून देण्यासाठी गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच, उपसरपंच,सदस्य यांना सोबत घेऊन तसेच मजुरांना प्रसासकीय सूचना देऊन काम सुरू करण्यात आले असल्याची प्रतिक्रिया ग्रामविकास अधिकारी एकनाथ मुरदकर यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...