बुधवार, २० मे, २०२०

बिलोली येथील कापूस खरेदी केंद्र धर्माबाद येथील केंद्रास जोडले.


दररोज बाराशे क्विंटल कापूस खरेदी करा:-  डॉ.विपीन ईटनकर


धर्माबाद(भगवान कांबळे) :- धर्माबाद येथील कापूस केंद्रावर कापूस खरेदी कमी होत असल्याचे लक्षात येताच जिल्हा अधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी एल.बी. पाण्डे कापूस खरेदी  खरेदी केंद्रास भेट देऊन दररोज बाराशे क्विंटल कापूस खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी बाजार समितीचे सभापती गणेशराव पाटील करखेलीकर,  उपसभापती रामचंद्र पाटील बनाळी कर, उपनगराध्यक्ष विनायक राव कुलकर्णी, जिल्हा निबंधक फडणवीस प्रविण, सहाय्यक निबंधक रमेश कांबळे उपस्थित होते.

शासकीय कापूस केंद्र खरेदी केंद्रावर येथील ग्रेडर अमर खटीक राजस्थानचे असून  नियमा प्रमाणे कापूस खरेदी करीत असता काही शेतकऱ्यांनी दमदाटी दिली होती. अशी माहिती जिल्हाधिकारी यांना कळल्याने त्वरित धर्माबाद येथील केंद्रांना भेट  देऊन शेतकऱ्यांची विचारपूस केली.
शेतकरी व ग्रेडर अमर यांची समस्या जाणून घेऊन कापूस खरेदी करण्याचा वेग वाढविण्याचे सांगण्यात आले आहे.
मा. जिल्हाधिकारी यांचे दि. 12 मे 2020 च्या  पत्रकानुसार बिलोली कापूस खरेदी केंद्र हे धर्माबाद   कापूस खरेदी केंद्राला जोडण्यात आले आहे. 25 एप्रिल पर्यंत ची नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांचा व त्यानंतर ही नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे. पत्रकारांनी हरभरा खरेदी संदर्भात प्रश्न विचारला असता, गोदामांची व्यवस्था करण्यात आली असून 31 मे पर्यंत खरेदी करण्याची सोय केली जाईल असे डॉ. विपीन इटणकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील जेवढ्या शेतकऱ्यांनी कापूस ऑनलाईन नोंदणी केली त्यांचा  सर्व कापूस खरेदी केला जाईल. प्रत्येकाला मेसेज येईल त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी कापूस केंद्रावर घेऊन यावा असे आव्हान केले आहे.
धर्माबाद तालुक्यातील कापूस मनजीत कॉटन केंद्राला खरेदी केला जाईल  तर बिलोली तालुक्यातील कापूस एल.बी.पांडे कापुस केंद्रावर खरेदी केला जाईल अशी माहिती सहाय्यक निबंधक रमेश कांबळे यांनी दिली आहे.
कोरोना महामारीच्या लाँकडाऊन मुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून खरिपाच्या पेरणी साठी रासायनिक खते व बी बियाणे,तसेच शेतीची कामे करण्यात गुंतला असताना कापूस खरेदी केंद्रावर त्याचा वेळ वाया जात आहे म्हणून लवकरात लवकर कापूस खरेदी करण्याची शेतकऱ्याने मागणी केली आहे.
यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पोतगंटीवार, सचिव चंद्रकांत पाटील.  सहसचिव वैभव कुलकर्णी, लिंबाजी गुरजलवार, श्याम आटकळे,  उपस्थित होते.
कापूस खरेदी केंद्राचे प्रमुख धर्मेंद्रजी पांडे,  महेंद्र पांडे, राजकुमार, अमन, सुरज, अनमोल, आकाश  पांडे बंधूची उपस्थिती होती,
  मी आज तोंडी आदेश देत असून नियमाचे पालन नाही केल्यास तोंडी आदेश देणार नाही तर मी लेखी  कारवाई करीन असे केंद्र प्रमुखास  जिल्हा अधिकारी डॉक्टर विपिन ईटणकर यांनी सांगितले. यामुळे शेतकर्‍यांचे समाधान झाले व धीर आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...