बुधवार, २० मे, २०२०

नांदेड जिल्ह्यात भोकर मध्ये कोरोनाची एन्ट्री



नांदेड(भगवान कांबळे ) :- अखेर भोकर वासियांना  ज्या गोष्टीची भीती होती  ती भीती आज समोर आली आहे, भोकर शहरात  एक कोरोना  रुग्ण  आढळून आल्याने  भोकर मध्ये  हळहळ  व भीती  व्यक्त केल्या जात आहे .पवार कॉलनी येथील  एक सरकारी नोकरदार नागरिक  मागील चौदा दिवसापासून  आपल्या  घरातच  होमकोरण टाईन मध्ये होता, त्याचा 14 दिवसाचा कालावधी संपतात तो पुन्हा नोकरीवर जाण्यासाठी वरिष्ठाकडे अर्ज केला होता, वरिष्ठांनी त्यास मेडिकल फिटनेस आणण्याबाबत कळविल्या वरून तो स्वतःहून तपासणी करण्यासाठी सरकारी दवाखान्यात गेला होता, तीसऱ्या दिवशी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने भोकर शहरात हळहळ व भीती व्यक्त केली जात आहे.भोकर चे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री विकास पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी सदरील घटनेला दुजोरा दिला असून भोकरच्या नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे तसेच दोन दिवस स्वतःहून जनता कर्फ्यु बाळगावा असेही म्हटले आहे पवार कॉलनी हा संपूर्ण परिसर सध्या युद्धपातळीवर सील करण्याचे काम चालू असल्याचेही त्यांनी हॅलो रिपोर्टर शी बोलताना सांगितले आहे. तसेच कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक मित्र यांनी स्वतःहून आपल्या आरोग्याची तपासणी करून घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे असेही शेवटी त्यांनी म्हटले आहे.

       भोकर येथे मागील 60 दिवसापासून एकही कोरोना रुग्ण सापडला नव्हता चौथ्या लॉक डाऊन मध्ये अचानक पवार कॉलनी येथील एक कोरोना रुग्ण सापडला असल्याने भोकरच्या नागरिकांना आता मोठ्या प्रमाणात काळजी घ्यावी लागणार असल्याचे बोलल्या जात आहे.
       जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेन दिवस वाढत असल्याने नागरिकांनी आता जादा प्रमाणात जागरूकता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे आज चार रुग्णांची जिल्ह्यात वाढ झाली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...