बुधवार, २० मे, २०२०

वृक्षतोड करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करा – प्रकाश सोळंके


परतूर प्रतिनिधी/इम्रान कुरेशी

जालना जिल्ह्यातील ८ ही तालुक्यातील वृक्ष तोड मशीन(कटर ) द्वारे करीत असून त्याची ३ वर्षा साठी परवाने रद्द करून जालना जिल्ह्यातील ८ ही तालुक्यातील अनधिकृत वृक्षतोड होत आहे, अशा वृक्ष तोड करणाऱ्या निर्दयी लोकांवर गुन्हे दाखल करण्या बाबतचा तक्रार अर्ज महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे जालना जिल्हा अध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कडे केला आहे. तक्रार अर्जात नमूद आहे की,जालना जिल्ह्यातील ८ ही तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अनेक वर्षापासून वृक्षतोड होत आहे, या अनधिकृत वृक्षतोडीला कोण कोण जबाबदार आहेत, या लोकांनवर कार्यवाही करून गुन्हे दाखल करणे काळाची गरज आहे, अनेक वर्षापासून वनीकरण खात्यामार्फत वृक्ष लागवड होते परंतु वनीकरण खात्यामार्फत लावलेली वृक्ष (झाडे) मोठी झालेली कधी दिसले नाहीत, अशा परिस्थितीमध्ये नैसर्गिक उगवलेले वृक्ष (झाडे) लहानाचे मोठे होऊन पर्यावरणाचे नियंत्रण ठेवून जीव जंतू साठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी या वृक्ष (झाडांचा) मोठा सिंहाचा वाटा असतो परंतु काही मंडळी टिचभर पोट भरण्यासाठी ते अनधिकृत मार्गाने वृक्षतोड करून येणार्‍या पिढ्यांसाठी धनसंपत्ती कमाई करून ठेवतात, याला जबाबदार एकटा अनधिकृत वृक्षतोड करणारा तस्कर नसून या मध्ये अधिकाऱी पदावर बसलेल्या लोकांचा सहभाग असल्याचा दिसून येतो, परंतु चिरीमिरी अधिकार पदावर अशा अनधिकृत वृक्षतोडी कडे दुर्लक्ष करतात असाही तक्रार अर्जात आरोप केला आहे . अनधिकृत वृक्षतोड करणे हा गंभीर गुन्हा आहे, या लोकांचे स्वार्थापोटी अनधिकृत वृक्षतोड चालू राहिली तर भविष्यात पाऊस पडणार नाही, या अनुषंगाने जालना जिल्ह्यातील परतूर-मंठा तालुक्यातील रोज होत असलेले वृक्ष तोड थांबविण्या बाबत उपविभागीय कार्यालय परतुर येथे दिनांक २४/२/२०२ रोजी निवेदन देऊन तक्रार करण्यात आली होती, या तक्रारीच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी यांनी जा.क्र.२०२०/जमाबंदी,दि ५/३/२०२० रोजी परतूर तहसीलदार व मंठा तहसीलदार यांना वृक्षतोड करणाऱ्या तस्करांवर विलंब न करता कार्यवाही करण्याबाबत आदेश देण्यात आले होते, परंतु परतूर तहसीलदार व मंठा तहसीलदार यांनी वृक्षतोड करणाऱ्या लोकांवर कार्यवाही केल्याचे कोठेही कधीही निदर्शनास आले नाही, म्हणून जालना जिल्ह्यातील ८ ही तालुक्यातील अनाधिकृत वृक्षतोड करणाऱ्या लोकांना वृक्ष (झाडे) तोडन्यासाठी अप्रत्यक्षापणे तहसीलदारांचे सहकार्य आहे असे दिसून येत आहे, या अनाधिकृत वृक्षतोड करणारे तस्कर दिवसभर वृक्षतोड करून संध्याकाळी ७ ते ११ व ११ ते पहाटे ४ दरम्यान ही वाहने वृक्षाची कत्तल करण्यासाठी शहराच्या मार्गाने रोज येत असतात ही वृक्ष घेऊन येणाऱ्या वाहनांना कोणीही हाटकत सुद्धा नाही, याचे काय कारण असू शकते, मग मनात शंका येते ही मंडळी काही घेऊन देऊन वृक्षतोड करणाऱ्या तस्करांना पाठीशी घालीतअसेल असेच दिसून येते,तरी मुख्यमंत्री साहेबांनी जालना जिल्ह्यातील पर्यावरणाचा विचार करून जालना जिल्ह्यातील ८ हि तालुक्यातील वृक्ष (कटाई मशीन) धारकांचे ३ वर्षा साठी परवानगीला स्थगिती देऊन अनाधिकृत वृक्षतोड करणाऱ्या लोकांवर कठोर कार्यवाही करुण गुन्हे दाखल करावेत व या अनाधिकृत वृक्षतोड करणाऱ्या तस्करांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करावी, कारण पर्यावरण समतोल राखायचा असेल, “आता दयामाया नकोच” यांच्यावर कठोर कार्यवाही करावीअसे प्रकाश सोळंके महाराष्ट्र नवं निर्माण सेना जालना जिल्हा अध्यक्ष यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...