रविवार, ३१ मे, २०२०

                             काही तासातच बाळासाहेबांचे शब्द खरे ठरले, ३० जून पर्यंत लॉकडाऊन.
              


मुंबई,ब्युरोचीफ दि.३०:- इंटरनॅशनल मॉनिटर फंडमुळे देशातील लॉक डाऊन वाढवण्यात येत असेल तर त्याचा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावा. ३० जून पर्यंत लॉकडाऊन नाही वाढविला तर भारताला आय. एम. एफ. कडून फंड मिळणार नसल्याचे सांगण्यात आले होते, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली होती. काही तासातच त्यांचे शब्द खरे ठरले.
आय. एम. एफ. अर्थात इंटरनॅशनल मॉनिटर फंडमुळे देशातील लॉकडाऊन वाढवण्यात येत असेल तर याचा खुलासा पंतप्रधानांनी करावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. शिवाय ३० जून पर्यंत लॉकडाऊन नाही वाढवले तर आय. एम. एफ.फंड भारताला मिळणार नाही. त्यामुळे ३० जून पर्यंत लॉक डाऊन वाढवला जाईल, असे संकेत प्रकाश आंबेडकर यांनी दिले होते. त्यांचे हे शब्द खरे ठरले. पाचवा लॉकडाऊन काही अटीवर ३० जून पर्यंत वाढविण्यात आला आहे. 
                                               दोन रुग्णांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज,
                                                  तीन व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह
                                                    जिल्हा शल्य‍ चिकित्सकांची माहिती.




जालना दि.31 प्रतिनिधी:- नवीन जालना परिसरातील एका खासगी रुग्णालयातील एक कर्मचारी व नुतनवाडी ता. जालना येथील एक अशा एकुण दोन रुग्णांवर यशस्वी उपचारानंतर त्यांच्या स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे तर मठ पिंपळगाव ता. अंबड येथील 40 वर्षीय महिला, गोलावाडी-गणेशनगर ता. जालना येथील 40 वर्षीय महिला व मापेगाव ता. परतुर येथील 42 वर्षीय पुरुष अशा एकुण तीन व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल दि. 31 मे, 2020 रोजी पॉझिटीव्ह आला आहे.  तसेच मापेगाव येथील पुरुष अत्यावस्थ परिस्थितीमध्ये जिल्हा रुगणालयात दि. 29 मे रोजी दाखल झाला होता.  त्या व्यक्तीचा दि. 29 मे रोजी मृत्यू झाला असुन मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या स्वॅबचा अहवाल दि. 31 मे रोजी पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.सध्या रुग्णालयात 68 व्यक्ती भरती आहेत, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 81 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या 2711 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने - 03 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -126 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 2495, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या -347, एकुण प्रलंबित नमुने -86, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-02, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-46, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-79, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 4382 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या 01 एवढी आहे. 
प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी गोलावाडी-गणेशनगर  ता. जालना येथे प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.  यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शाम गावंडे हेही उपस्थित होते.  गोलावाडी-गणेशनगर ता जालना येथील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याच्या सुचना करत 176 घरामधील जवळपास 900 व्यक्तीचे सर्वेक्षण तीन टीमच्या सहाय्याने सुरु करण्यात आले आहे.
            कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 361 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास होस्टेल जालना-36, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-3,  मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह -21, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-24, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -110 मॉडेल स्कुल, अंबारोड, परतुर-06, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-00, जिजाऊ इंग्लिश स्कुल, जाफ्राबाद-14 राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी, जाफ्राबाद -12 डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -20, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-28, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे –13 अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी -32, मॉडेल स्कुल मंठा-32, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -10, सेठ ई.बी.के. विद्यालय टेंभुर्णी -00 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.
            लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 709 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 136 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 626 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 3 लाख 1 हजार 330 असा एकुण   3 लाख 28  हजार 138 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.कोव्हीड केअर सेंटरमध्ये विविध उपक्रम

            जालना शहरातील दोन कोव्हीड सेंटरमध्ये प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असुन जालना शहरातील संत रामदास मुलांचे वसतीगृह व शासकीय मुलींचे निवासी वसतीगृह या कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींचे शारीरिक व मानसिक आरोग्य सदृढ रहावे यादृष्टीकोनातुन योगासने घेण्यात आली.  यापुढेही या कोव्हीड केअर सेंटरमध्ये या पद्धतीच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार श्रीकांत भुजबळ यांनी दिली.
                               राज्यातील तंबाखु मुक्ती केंद्रातून साडेपाच लाख रुग्णांवर उपचार
                                    जागतिक तंबाखु विरोधी दिनी’ आरोग्यमंत्र्यांनी घेतली
                                                
                                                महाराष्ट्र तंबाखु मुक्त करण्याची शपथ



मुंबई,ब्युरोचीफ दि.३१:- जागतिक तंबाखु विरोधी दिनानिमित्त आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला तंबाखु मुक्तीची शपथ देतानाच महाराष्ट्र तंबाखु मुक्त करण्याची शपथही घेतली. राज्यात असलेल्या २२४ तंबाखु मुक्ती केंद्रांच्या माध्यमातून सुमारे साडेपाच लाख रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि जागतिक तंबाखु विरोधी दिनाच्या दोन दिवस आधी राज्य शासनाने सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान प्रतिबंध आणि थुंकण्यास बंदी आदेश लागू केल्याचेही त्यांनी सांगितले.
दरवर्षी ३१ मे रोजी जागतिक तंबाखु विरोधी दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त जागतिक आरोग्य संघटनेमार्फत घोषवाक्यही दिले जाते. ‘तरुणांना तंबाखु उद्योगांच्या तावडीतून वाचवा आणि त्यांना तंबाखु व निकोटीनच्या वापरापासून दूर ठेवा’ असे घोषवाक्य यावर्षासाठी देण्यात आले आहे.यासंदर्भात अधिक माहिती देतांना आरोग्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात २६ हजार ४१८ शाळा आणि २४४२ आरोग्य संस्था तंबाखु मुक्त करण्यात आल्या आहेत. तंबाखु नियंत्रण कायद्यांतर्गत सुमारे ६ कोटी ५४ लाख २४ हजार ४३० इतका दंड वसुल करण्यात आला आहे. २२४ तंबाखु मुक्ती केंद्राच्या माध्यमातून ५ लाख ४१ हजार ४१५ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून २५ हजार २७५ जण तंबाखु मुक्त करण्यात आले आहेत. जुलै २०१८ पासून राज्यात हुक्का बंदी देखील करण्यात आली आहे. गेली चार वर्ष राज्यामध्ये मौखिक कर्करोग तपासणी शिबीरे देखील घेण्यात आली आहेत.

आज येथील शासकीय निवासस्थानी आरोग्यमंत्र्यांनी तंबाखु विरोधी शपथ देताना...मी, माझे कार्यालय, माझे घर, माझे गाव, माझी शाळा, माझी संस्था आणि माझे महाराष्ट्र राज्य तंबाखु मुक्त करण्याचा प्रयत्न करेन अशी शपथही घेतली.

शनिवार, ३० मे, २०२०


     परतुर-मंठा तालुक्यातील बागेश्वरी साखर कारखान्याचे थकीत उसाचे बिल १० जुन पर्यंत देन्यात यावे.मनसे जिल्हा अध्यक्ष प्रकाश सोळंके यांच्यी मा.मुख्यमंत्री महोदय यांना निवेदनद्वारे मागणी.

जालना, प्रतिनिधी :- जालना जिल्ह्यातील परतूर-मंठा तालुक्यातील प्रायव्हेट लिमिटेड बागेश्वरी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे थकित बिल देण्या बाबत दि.४.४.२०२० रोजी मुख्यमंत्री कार्यालयास निवेदनाद्वारे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकित बिल देण्या बाबत विनंती केली होती. परंतु दि.२९.५.२०२०. आज पर्यंत कारखान्याच्या मालकाने जाहीर केल्या प्रमाणे भाव दिला असुन,मात्र जाहीर केल्याप्रमाणे पूर्ण उसाचे बिल शेतकऱ्यांना मिळाले नाहीत.हा ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.त्यात कोरोना सारख्या साथीच्या रोगांमुळे व मागच्या ७७ दिवसात सतत चार  वेळा वादळी वाऱ्यासह           
गारपिटीचा पाऊस झाल्यामुळे शेतकरी खूपच अडचणीत आला आहे. म्हणून परतुर-मंठा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्यामुळे शेतकऱ्यांची सध्या गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याली आहे.जालना जिल्ह्यातील. परतुर-मंठा तालुक्यातील येथील प्रावेट लिमीटेड बागेश्वरी साखर कारखाना मालकाने जाहीर केल्याप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २६०० प्रति टन भाव जाहीर केला होता.परंतु प्रत्यक्षात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फक्त २००० रुपये प्रमाणे बिल दिले आहे. बाकी थकित ६०० रु प्रत्यक्षात परतुर-मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांना बागेश्र्वरी कारखान्याच्या मालकांने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर २६०० रुपये जाहीर केल्या प्रमाणे उसाचे बिल द्यायला पाहिजे होते. परंतु दिले नाही.हा साखर कारखानदार ऊस उधारीवर का घेतो?कारण ऊस उत्पादक शेतकरी ज्या वेळेस उसाची लागवड करतो त्या वेळी त्याला नांगरणी.उसाचे बेणे लागवड.अंतर्गत मशागत.११ महिने पाणी देणे.वेळो वेळी रासायनिक खते द्यावी लागतात. प्रसंगी १/२ फवारण्या कराव्या लागतात. नियोजन करून नगदी खिसातुन खर्च करावा लागते.म्हणून २०२० ते २०२१ वार्षिक वर्षासाठी शेतकऱ्यांचा ऊस कारखानदारांनी उधारीवर घेऊ नये असा प्रकारे. परिपत्रक काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.तसेच अशा कठिण प्रसंगी जालना जिल्ह्यातील परतुर-मंठा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकित बिल ६०० रुपये देण्या बाबत.मा साखर आयुक्त यांना सूचना देऊ बागेश्र्वरी साखर कारखान्याच्या मलकावर कारवाई होईल हि अपेक्षा आहे.तरी मुख्यमंत्री साहेबांनी जालना जिल्ह्यातील परतुर-मंठा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची साखर कारखानदार अडवणुक करीत आहे.मागच्या ७७ दिवसात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस गारपीट झाल्या होती. या बागेश्र्वरी साखर कारखान्याच्या मलकावर शेतकऱ्यांचे थकित ६०० रुपये बिल दिले नाही. व ऊस उधार घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली.तसेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विनाकारण मुदाम ६०० रुपये अडकुन ठेवल्या प्रकरणी कारवाई करावी.व हे संकट लक्षात घेऊन शेतकऱ्यांचे थकित ६०० रुपये बिल १० जुन पर्यंत देण्यात यावे अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके जालना यांनी मा.मुख्यमंत्री महोदय यांना निवेदनद्वारे केली आहे.     

जिल्ह्यातील पहिलीच घटना;परतूर तालुक्यातील कोरोना संशयित रुग्ण दगावला
परतूर प्रतिनिधी/इम्रान कुरेशी

मुंबई येथून 19 मे रोजी तालुक्यातील मापेगाव येथे आलेल्या कोरोना संशयित रुग्णाचा जिल्हा सामान्य रुग्णालयात जालना येथे मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास मृत्यू झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सय्यद जाहेद यांनी दिली.याबाबत त्यांनी सांगितले की, सदरील मयत व्यक्ती दिनांक १९ मे रोजी तालुक्यातील मापेगाव बु येथे कुटुंबासोबत आले होते त्यांना स्थानिक ग्रामपंचायत मार्फत सरपंच व इतर स्वयंसेवक यांनी जिल्हा परिषद शाळेत विलगिकरण केले होते मात्र त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने दिनांक २९ मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्या रुग्णाचे लाळेचे नमुन घेऊन प्रयोगशाळेला पाठवण्यात आले होते मात्र अहवाल येण्या अगोदरच मध्यरात्री ०२ वाजेच्या सुमारास उपचार सुरू असताना निधन झाले असल्याची माहिती ही डॉ. सय्यद यांनी दिली.जिल्ह्यातील कोरोना संशयिताच्या मृत्युची ही पहिलीच घटना आहे. अहवाल काय येतो याकडे संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.
*लॉक डाऊन मुळे नोटरी काम ठप्प*
सध्याच्या कोरोना सदृश्य परिस्थितीमुळे मागील दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधीकरिता नोटरी चे काम थांबलेले आहे अनेक नोटरी वकील बंधू-भगिनी यांची उपजीविका नोटरी  कामावर अवलंबून आहे त्यामुळे ते आर्थिक संकटात आलेले आहेत. स्वाभिमान मुळे त्यांना कुठे मदत मागणे ही अवघड झालेले आहे व त्यांच्या समोरील आर्थिक संकटही संपत नाही अशी अवस्था नोटरी बांधवांची झालेली आहे. नव्याने नवनियुक्त झालेल्या नोटरी बांधवांची परिस्थितीही  अशीच आहे काम बंद असल्याने त्यांची आर्थिक अडचण झालेली आहे .
विविध शासकीय कार्यालय वित्तीय संस्था ,बँका, शैक्षणिक संस्था पासपोर्ट ऑफिस परदेशात सादर करावयाची कागदपत्रे यावर नोटरी चे मोहर असणे आवश्यक व अनिवार्य असते. विधानसभा लोकसभा राज्यसभा स्थानिक स्वराज्य संस्था यांचे निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करत असताना आणि अनेक शपथपत्र हमीपत्र त्याचप्रमाणे काही कागदपत्रे जोडावी लागतात त्यावर नोटरी यांनी  ती कागदपत्रे तपासले आहेत व बरोबर आहेत म्हणून त्यावर  नोटरी  चा सही शिक्का आवश्यक मानला जातो . नोटरीच्या  कामास अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे विचार महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनचे सचिव ॲडव्होकेट प्रविण नलवडे यांनी व्यक्त केले.
 नोटरी त्यांचे कर्तव्य म्हणून जनतेच्या सेवेसाठी अनेक प्रशासकीय इमारतीमध्ये तहसील कचेरी सरकारी कार्यालयांमध्ये त्यांचे नोटरियल काम करत असतात मात्र सदर ठिकाणी काम करीत असताना नोटरी ला बसण्यासाठी कुठलीही सुविधा शासनामार्फत अथवा संबंधित कार्यालयामार्फत केली जात नाही उलट काही ठिकाणी काही अधिकारी नोटरींना काम करण्यास  मज्जाव करतात  त्यांचे टेबल-खुर्च्या  जप्त
केल्या जातात.  पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून   त्यांच्यावर कारवाई केली जाते हे योग्य नाही.नोटरी हे शासनास नोटरियल  कामामधून सहकार्य करत असतात याची जाणीव ठेवून सर्व प्रशासकीय व शासकीय इमारतीमध्ये त्याचप्रमाणे नव्याने बांधण्यात येणार्‍या शासकीय कार्यालयांच्या इमारतीमध्ये नोटरी ना नोटरी रियल काम करण्यासाठी सोयीस्कर स्वतंत्र जागा देणे आवश्यक आहे त्यांना सन्मानाची वागणूक मिळणे आवश्यक आहे.
   ज्याप्रमाणे शासकीय  कार्यालयात काही ठराविक दाखले मिळण्यासाठी द्यावे लागणारे प्रतिज्ञा पत्रास शंभर रुपयांचा मुद्रांक माफ केलेला आहे साध्या कागदावर केलेले प्रतिज्ञापत्र मान्य केले जाते . त्याप्रमाणे सध्याच्या करोना सदृश्य परिस्थितीमुळे व  ओढवलेल्या  आर्थिक संकटामध्ये नोटरी डॉक्युमेंट करता पंचवीस रुपये नोटरियल स्टॅम्प लावावा लागतो  त्यामध्ये माफी मिळणे आवश्यक आहे  अथवा तो पाच रुपये पर्यंत करता येईल का याचा विचार शासनाने
करणे आवश्यक आहे .तसेच सध्याच्या बदललेल्या काळामध्ये नोटरी यांचे फी मध्ये ही  वाढ करणेआवश्यक आहे. शासन दरबारी महाराष्ट्र आणि गोवा नोटरीअसोसिएशनच्या माध्यमातून नोटरी बंधूभगिनींच्या हक्कासाठी व त्यांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी योग्य तो पत्रव्यवहार व पाठपुरावा शासनाकडे करण्यात येत आहे. असे संघटनेचे सचिव ॲड. प्रविण नलवडे यांनी सांगितले.

शुक्रवार, २९ मे, २०२०

ग्रामसेवक,सरपंचाच्या पुढाकाराने सोशल डिस्टनसिंगचे पालन करून रोहयोच्या कामाला सुरुवात..... मजुरांना काम मिळाल्याने समाधान....



परतूर /प्रतिनीधी:-प्रशांत वाकळे
तालुक्यातील अनेक गावातील मजूर शहराच्या ठिकाणी कामे करण्यासाठी जातात तर काही मजूर हे गावातच ग्रामपंचायतच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मग्रारोहयोची कामे करतात.एप्रिल,मे महिन्यात गावात अनेक मजूरांना कामे मिळायला पाहिजे होती परंतु कोरोनाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला.देशासह महाराष्ट्रात मागील दीड महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने गावातील सर्वच कामे बंद होती.मजूरांच्या हाताला कामे नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.ही बाब लक्षात घेऊन तालुक्यातील वरफळ येथील ग्रामसेवक एकनाथ मुरदकर,सरपंच श्रीमती मसरत बेगम शेख नदीम यांनी पुढाकार घेऊन गावातील अडचणीत आलेल्या मजुरांना मग्रारोहयो मधून कामे उपलब्ध करून दिल्याने मजूर वर्गातून समाधान व्यक्त केलं जातं आहे.कोरोनाच्या संकटकाळात मजूरांच्या हाताला उशिरा का होईना कामे मिळाल्याने दिलासा मिळाला आहे.सरपंच मसरत बेगम यांनी तसेच ग्रामसेवक श्री. मुरदकर यांनी गावातील शेकडो मजूरांना मग्रारोहयो अंतर्गत नाला खोलीकरण तसेच गाव तलावातील गाळ व इत्यादी कामे मिळवून दिल्यामुळे मजुरांना उपासमारीची वेळ टळली तर जमिनी मधील भूजल पातळी सुद्धा येणाऱ्या काळात वाढणार आहे.
याकामी ग्रामपंचायत मार्फत मजुरांना काम उपलब्ध व्हावे यासाठी सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह,रोजगार सेवक ए.ए.शेख यांनी पुढाकार घेतला होता.
या कठीण परिस्थिती मध्ये हाताला काम मिळाल्यामुळे मजूरांनी ग्रामपंचायत मार्फत सुरू झालेल्या कामाबाबत आभार मानून समाधान व्यक्त केले.



प्रशासकीय सूचनांचे पालन करून काम सुरू
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील मजूर आर्थिक संकटात सापडला होता ही गरज लक्षात घेता त्या मजुरांना ग्रामपंचायत मार्फत कामे उपलब्ध करून देण्यासाठी गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच, उपसरपंच,सदस्य यांना सोबत घेऊन तसेच मजुरांना प्रसासकीय सूचना देऊन काम सुरू करण्यात आले असल्याची प्रतिक्रिया ग्रामविकास अधिकारी एकनाथ मुरदकर यांनी दिली.
जालना जिल्ह्यात संचारबंदी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे सुधारित आदेश जारी.






जालना दि. 29 (ब्युरोचीफ) :- कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. सद्यस्थितीत जालना जिल्ह्यात 100 पेक्षा अधिक कोरोना विषाणुमुळे व्यक्ती पॉझिटीव्ह आढळुन आल्याने याचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच या विषाणुची साखळी खंडीत करण्याच्यादृष्टीने जिल्हादंडाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दि. 28 मे, 2020 रोजी जालना जिल्ह्यातील संपुर्ण ग्रामीण,नागरी क्षेत्रात फौजदारी प्रक्रिया सहिंता 1973 चे कलम 144 (1)(3) अन्वये संचारबंदीचे आदेश जारी केले होते.  परंतु नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीचा विचार करुन आज दि. 29मे, 2020 रोजी सुधारित आदेश निर्गमित करण्यात आले असुन या आदेशानुसार खालील बाबींना सुट देण्यात आली आहे.वैद्यकीय सेवा, सर्व शासकीय व खाजगी रुग्णालये, दवाखाने, रुग्णवाहिका सर्व औषधी दुकाने, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, खत, बी-बियाणे यांची दुकाने, खत वाहतुक व त्यांचे गोदाम, तसेच कापुस, गहु, हरभरा खरेदी, अत्यावश्यक सेवांची शासकीय कार्यालये महसुल, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य, ग्रामविकास, अग्निशमन, कोविड- 19 कोरोना संबंधित कर्तव्यावर असणारे अधिकारी, कर्मचारी, औद्योगिक कारखाने, गॅस वितरक व गॅस सिलेंडर घरपोच देणारे वाहन व त्यावरील कर्मचारी, प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॅानिक मिडिया यांचे संपादक, वार्ताहार, प्रतिनिधी , वितरक इत्यादी, पेट्रोल पंप वितरक, कर्मचारी व त्यांची वाहने यांना या संचारबंदीधुन सुट देण्यात आली आहे. तसेच  दुध विक्रेते गल्ली, कॉलनी व सोसायट्यामध्ये घरोघरी जाऊन सकाळी 6 ते 9 या कालावधीत विक्री करावी, एका ठिकाणी थांबुन विक्री करता येणार नाही. सर्व शासकीय रास्त भाव दुकान व राष्ट्रीयकृत बँका केवळ रास्त भाव दुकानदार यांचेकडुन चलनाद्वारे पैसे भरणा करुन घेण्यासाठी, पाणी जार,
पाणीटँकर सप्लाय, परवानाधारक भाजी व फळ विक्रेते(गल्ली, कॉलनी व सोसायट्यामध्ये घरोघरी जाऊन सकाळी 6ते 9 या कालावधीत विक्री करावी, एका ठिकाणी थांबुन विक्री करता येणार नाही),  सर्व राष्ट्रीयकृत बँक – सर्व प्रकारच्या शासकीय चलान भरण्याकरिता, ऑनलाईन किराणा (फक्त घरपोहोच),  सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये त्यांचे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने.आदेशाचे पालन न करणा-या व्यक्ती, अधिकारी,कर्मचारी, संस्था अथवा समुह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 आणि भा.द.वि. 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे समजण्यात येईल आणि पुढील दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी.या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही पोलीस अधिक्षक, जालना व उपविभागीय दंडाधिकारी, सर्व उपविभाग जिल्हा जालना, सर्व तालुका दंडाधिकारी जिल्हा जालना, मुख्याधिकारी सर्व नगर परिषद व नगर पंचायती जिल्हा जालना यांच्यावर राहील, असेही जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केलेल्या आदेशामध्ये नमूद केले आहे.  हे आदेश दि. 31 मे रोजीच्या रात्री 12.00 वाजेपर्यंत लागू राहतील.

            वृत्तपत्रांना तात्काळ जाहिरातीच्या माध्यमातून पॅकेज जाहीर करा प्रेस ऑफ कॉन्सिलच्या
                                     मागणीला प्रेस क्लब जालन्याचा जाहिर पाठींबा.



जालना (प्रतिनिधी) :- कोरोना व्हायरसच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी भारत सरकारने महाराष्ट्रासह संपुर्ण भारतात लॉकडाऊन लागू केले आहे. यामुळे वृत्तपत्र मालक/प्रकाशक/संपादक यांना मोठे आर्थीक नुकसान सहन करावा लागत आहे. ज्याचा विपरीत परिणाम पुढच्या दोन वर्षापर्यंत होण्याची शक्यता आहे. प्रत्येक वृत्तपत्राला शासनाने 30 हजार चौरस सें. मी. जाहिरातीच्या स्वरूपात आर्थीक पॅकेज प्रदान करावे अशी मागणी प्रेस ऑफ कॉन्सिल महाराष्ट्र मुंबई यांनी शासन दरबारी केल्याने ही मागणी योग्य असून या मागणीला जालना प्रेस क्लबच्या वतीने जाहिर पाठींबा देण्यात आला. सध्या जिल्हा बंदीमुळे पेपर रोल, रिम, प्लेट, शाही रसायन उपलब्ध होत नसल्यामुळे सर्व वृत्तपत्र बंद पडल्याचे दिसून येत आहे. यामुळे आर्थीक नुकसान झाले आहे. तसेच मुद्रण बंद झाल्यामुळे ग्राहक, वाचक, वार्षीक वर्गणीदारापर्यंत वर्तमानपत्र पोहचले जात नाही. वृत्तपत्राचा मोठा महसुल बुडला आहे. तरी तात्काळ मा. मुख्यमंत्री यांनी संबंधीत मागणी  मंजुर करावी कारण ते पण एक संपादक आहे. या पाठींब्याला प्रेस क्लब जालनाचे अध्यक्ष भरत मानकर, कार्याध्यक्षा आयशा खान, सचिव विष्णू कदम, जेष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख, मकरंद जहागीरदार, अविनाश कव्हळे, पारसनंद यादव, लहु गाढे, महेश बुलगे, दिपक शेळके, भगवान साबळे, संतोष भुतेकर, बद्रीनारायण उपरे, बालाजी अढीयाल, अविनाश मगरे, दशरथ कांबळे, अर्पण गोयल, इलियास भाई, लियाकत भाई, मनोज पटवारी, किशोर शर्मा, विजय खताडे, अंकुश गायकवाड, सुहास कुलकर्णी, संजय भरतीया, सिताराम तुपे, प्रशांत कसबे, सुभाष भालेराव व इतर सर्व पत्रकारांनी या मागणीला पाठींबा जाहिर केला आहे. 


                     अंबड पंचायत समिती कार्यालयातील कृषी विस्तार अधिकारी राजेंद्र देशमुख 
                                          यांना पाच हजाराची लाच घेताना गजाआड.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या विहिरीच्या कामाचा धनादेश काढण्यासाठी तक्रार कडून 5 हजार रुपयांची लाच



अंबड़/अरविंद शिरगोळे :- अंबड पंचायत समिती कार्यालयातील कृषी अधिकारी राजेंद्र देशमुख (वय 57 वर्षे) यांना आज गुरुवारी ता.28 डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या विहिरीच्या कामाचा धनादेश काढण्यासाठी तक्रार कडून 5 हजार रुपयांची लाच घेताना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने देशमुख यांच्या अंबड शहरातील चांगले नगर येथील राहत्या घरी त्यांना रंगेहाथ पकडल्याने अंबड शहरात धडधडी उडाली आहे. या कारवाईमुळे पंचायत समितीचे कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ चालू आहे. लॉक डाऊन मध्ये सर्व काही थांबलेले असताना लाचखोर अधिकाऱ्यांची दुकानदारी सुरूच असल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की यातील अंबड तालुक्यातील खडकेश्वर येथील तक्रारदार यांनी तक्रार दिली की त्यांच्या वडिलांचे नाव असलेल्या शेतात डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेमध्ये विहीर खोदण्यासाठी दोन लाख 50 हजार रुपये मंजूर झाले. असून दोन लाखाचे बिल काढण्यासाठी अंबड पंचायत समितीचे कृषी विभागाचे विस्तार अधिकारी राजेंद्र विठ्ठलराव देशमुख यांनी यापूर्वी 10 हजार रुपये घेतले व उर्वरित राहिलेले 50हजार रुपयांचे बिल काढण्यासाठी आलोसेश्री देशमुख यांनी पुन्हा तक्रारदार यांच्याकडून 1 हजार रुपये लाचेची मागणी केली. सदर कामासाठी तक्रारदार लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना येथे संपर्क साधून तक्रार दिली सदर तक्रारीवरून आज गुरुवारी (ता.28) रोजी पडताळणी केली असता राजेंद्र देशमुख देशमुख यांनी तक्रारदार यांच्याकडे  पाच हजार रुपयाची लाचेची मागणी निष्पन्न झाली. शहरातील चांगले नगर येथे राहत्या घरी देशमुख यांनी तक्रारी कडून पाच हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद वारिया, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अनिता जमादार, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबादचे पोलीस उपअधीक्षक रविंद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस.एस.शेख व कर्मचारी मनोहर खंडागळे, गणेश चेके, शिवाजी जमदाडे, ज्ञानदेव झुंबड, अनिल सानप, सचिन राऊत, ज्ञानेश्वर म्हस्के, चालक प्रवीण खंदारे, आरेफ़ शेख, यांच्या पथकाने ही कामगिरी पार पडली आहे अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती


                                        बुलडाणा जिल्ह्यातील तीन रुग्णांची कोरोनावर मात..!





बुलडाणा,ब्युरोचीफ दि २९:- सामान्य रुग्णालय खामगाव येथे दाखल करण्यात आलेल्या कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये आलमपुर ता नांदुरा , जळका भडंग ता खामगाव व गोपाळ नगर खामगाव येथील रुग्णांचा समावेश आहे.  त्यापैकी आज सायंकाळी तीन रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये आलमपुर ता नांदुरा येथील २० वर्षीय युवक, जळका भडंग  येथील २५ वर्षीय पुरुष व गोपाळ नगर, खामगाव येथील ६० वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. कोरोनावर मात देत बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या जिल्ह्यात 32 झाली आहे. मागील दहा दिवसांपासून कुठलेही लक्षण नसल्यामुळे शासनाच्या नवीन निकषानुसार या रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे.सामान्य रुग्णालय खामगाव येथे रुग्णांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांच्या हस्ते डिस्चार्ज पेपर देण्यात आला. याप्रसंगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अधीक्षक डॉ. टापरे उपस्थित होते.  रुग्णालयातून बाहेर पडताच रुग्णांचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले.  कोरोना वर मात केल्यामुळे आनंदित भावमुद्रेत रुग्ण घरी परतले. शासनाने रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णांना घरपोच सोडले.




‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️

*💥यावर्षी ‘वारी’ हेलिकॉप्टर, विमानातून; पायी पालखी सोहळा रद्द!*
-------------
पुणे: कोरोना संकटामुळे यंदाचा पायी पालखी वारीचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. दिंड्यांना ही परवानगी नाकारली आहे. वारकरी आणि प्रशासनाचे एकमत झालं असून आळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानाने पंढरपूरला देवभेटीस जाणार आहेत.

आज उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात होते. दरम्यान त्यांच्या उपस्थितीमध्ये वारीबाबत बैठक झाली. या बैठकीत पायी वारी सोहळ्याबाबत आळंदी देवस्थानचे चोपदार, आळंदी, देहू आणि सोपानकाका संस्थानच्या विश्वस्तांनी त्यांच्या भूमिका मांडल्या.  त्यानंतर आळंदी आणि देहूवरुन निघणाऱ्या पादुका हेलिकॉप्टर, एसटी किंवा विमानाने पंढरपूरला नेण्यात याव्यात, असा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. याबाबत दशमीला निर्णय स्पष्ट होईल.
पतीनेच केला डोक्यात दगड घालून पत्नीचा खुन ; गेवराई शहरातील घटनेने उडाली खळबळ
"""""""""""""""""""""""""""""""""""
इम्रान सौदागर | गेवराई - शहरातील जायकवाडी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्याच पत्नीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली असुन परिसरात खळबळ उडाली आहे.

 गंधराबाई बप्पासाहेब घुले (वय अंदाजे 65 वर्ष) या आपल्या पत्नीला  त्याने आधी काठीने मारहाण करत डोक्यात दगड घालून हत्या करण्यात केली. सदरील ईसम हा मनोरूग्ण असल्याचे समजते घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड, पोलीस निरीक्षक चोबे सह अनेक कर्मचारी दाखल झाले असून आरोपी बप्पासाहेब  याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
*सरकारने परिस्थितीचे भान ठेवून "महाबीज"चे भांडार शेतकऱ्यांना मोफत खुले करावे-पूजा मोरे*


मागील वर्षी परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले.यामुळे सोयाबीन बियाण्याचीही प्रत खालावली होती.याची झळ आता आगामी खरिपाच्या हंगामात शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे.सोयाबीनचे बियाणे क्विंटल मागे 1 हजार रुपयांपेक्षा अधिक महागले आहे.प्रामुख्याने महाबीजच्या बियाण्याचा दर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
सोयाबीन बियाण्याची 30 किलो ची बॅग मागील हंगामात 1890 रुपयांपर्यंत विकली जात होती.यंदा ही किंमत 360 रुपयांनी वाढवण्यात आली आहे.ही दरवाढ शेतकऱ्यांना परवडणारी नसून म्हणून सरकारने महाबीजचे भांडार शेतकऱ्यांसाठी मोफत खुले करावे किंवा तात्काळ पॅकेजचे बियाणे उपलब्ध करून घ्यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीच्या प्रदेशअध्यक्ष पूजाताई मोरे यांनी केले आहे.

राज्यात सोयाबीन हे प्रमुख पीक झालेले आहे.राज्यात जवळपास 39 लाख हेक्टरपेक्षा अधिक सोयाबीन क्षेत्र आहे.यासाठी सोयाबीन उत्पादकांना लाखो क्विंटल बियाण्यांची गरज भासते.सोयाबीन हे स्वपरागसिंचित असल्याने दरवर्षी नवीन बियाणे विकत घेणे गरजेचे नसले तरी महाराष्ट्रात सोयाबीनचे 30 ते 40 टक्के दरम्यान नव्याने खरेदी होते.या बियाणे विक्रीत प्रामुख्याने महाबीजच्या वाटा असतो.हंगामात सोयाबीनच्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठी झळ सहन करावी लागली.असाच फटका बीजोत्पादनालाही बसला आहे.बियाणे कंपन्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.यामुळे सहाजिकच बियाणे उत्पादनात वाढ झाली.यामुळे बियाणे उत्पादक कंपन्यांनी आता दरवाढ केलीय आहे.महाबीज बियाण्याच्या 30 किलो वजनाची बॅग मागील वर्षी पेक्षा 360 रुपयांनी यंदा महागली आहे.मागील वर्षात 1,890 ला मिळणारी बॅग 2250 रुपयांपर्यंत पोहचली आहे.म्हणून किलोलो 75 रुपयांना दर चुकवावा लागणार आहे.तर काही खासगी बियाणे कंपनीचे दर प्रति बॅग 2,400 किंवा त्यापेक्षा अधिक झाले आहेत.ही शेतकऱ्यांची लूट आहे.या कोरोनाच्या अडचणीच्या काळात सरकारने महाबीजचे भांडार शेतकऱ्यांसाठी मोफत खुले करणे अपेक्षित होते मात्र त्या उलट त्यांनी दरवाढ केली आहे.म्हणून सरकारने महाबीजचे भांडार शेतकऱ्यांसाठी मोफत खुले करावे किंवा शेतकऱ्यांना पॅकेजचे बियाणे उपलब्ध करून घ्यावे व खाजगी कंपन्यांच्या भाववाढीवर निर्बंध घालावे अशी मागणी पूजा मोरे यांनी केली आहे.

*सामाईक बांधावरील भोकरीच्या झाडाच्या कारणावरून हाणामारीत / मारहाणीत ५५ वर्षे व्यक्तीचा मृत्यू


                                         अंबड तालुक्यातील शहापूर येथील घटना,खुनाचा गुन्हा दाखल.



अंबड़ प्रतिनिधि :-  अंबड तालुक्यातील शहापूर येथील घटना शेतातील सामायिक बांधावरील भोकरीच्या झाडाच्या कारणावरून झालेल्या वादात पर्यावसान हाणामारी झाले. त्यामध्ये 4 जणांनी केलेल्या मारहाणीत एका 55 वर्षीय आदिवासी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना काल बुधवारी ता 24 सायंकाळी पाच वाजता शहापूर तालुका अंबड येथे घडली. या प्रकरणी आज 4 जणांविरुद्ध गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहापूर येथे गट नंबर 241 मध्ये शांताराम सुजनराव शिंदे यांनी बटाईने शेत केलेले असून या बटाईच्या  शेतात सामाईक बांधावर भोकरीचे झाड होते. या  झाडावरूनच शांताराम शिंदे व सोमनाथ भीमराव काळे, सोनू सोमनाथ काळे, कृष्णा सोमनाथ काळे, नवनाथ भिमराव काळे यांच्यात वाद झाला. आणि या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले यावेळी सोमनाथ काळे याने शांताराम शिंदे यांना कुऱ्हाडी च्या दांड्याने मारहाण केल्याने शांताराम शिंदे हे बेशुद्ध पडले ते बेशुद्ध पडताच सोनू काळे कृष्णा काळे व नवनाथ काळे या तिघांनी त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्यांना जागेवर टाकून पळ काढला सदर प्रकार दत्ता शिंदे यांना माहिती होताच त्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन शांताराम शिंदे यांना उपचारासाठी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह ताब्यात न घेण्याच्या पैत्रावर आणि आंबेडकरी चळवळीतील नेते चंद्रकांत कारके हे स्वत: पोलिस अधिक्षक साहेबांच्या निदर्शनास आणुन दिल्यानंतर गुन्हे दाखल करण्याचा विचार केला, वाढत्या अन्याय आत्याचाराला न्याय हा चळवळीच्या रेट्यामुळे मिळने हि बाब दुर्देवीच आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो हे फुले-शाहु-आंबेडकर-आण्णाभाऊंच्या पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी बाब आहे. समाजीक न्याय मंत्र्यांनी अशा घटनेकडे लक्ष देण्याची मागणिही प्रसिद्धी माध्यमाव्दारे आंबेडकरी चळवळीतील नेते चंद्रकांत कारके यांनी केली आहे. व कारके यांच्या मार्गदर्शनाखाली खुनाचा गुन्हा दाखल झाला आणि दाखल झाल्यानंतर प्रेत त्यांच्या ताब्यात देण्यात आले यावेळी उपस्थित सुरेश
 खरात, कचरू साळवे, तरंग कांबळे (बीड हॅलो रिपोर्टर महाराष्ट्र ब्युरो चिप), नीलेश जाधाव, अभिजीत शिरगोळे, राहुल कारके, अरविंद शीरगोळे (बीड हॅलो रिपोर्ट ता. प्रतिनिधि), कार्यकर्ते, पत्रकार टीम इत्यादि आदि उपस्थित होते. आदिवासी (मयत शांताराम शिंदे) यांच्या मुलाच्या म्हणजेच  दिगंबर शांताराम शिंदे यांच्या फिर्यादीवरून आखेर गोंदी पोलीस ठाण्यात खुनचा गुन्हा नोंद झाला. जातीवाचक शिवीगाळ,  भां.द.वी कलम 302, 323,504, 506, 34 ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय अधिकारी सी.डी.शेवगन हे करत आहे.
लाॅकडाऊन मुळे या वर्षी  माणगांव तालुक्यातील कृषी सेवा केंद्रात भात बियाणे उपलब्ध नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत

शेतकर्यांना तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाची गरज

       बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवरील शासनाने लावलेल्या लाॅकडाऊन संचारबंदी मुळे या वर्षी रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रावर महाबीज निर्मित जया भाताचे बियाणे पेरणी साठी कोणाकडेच उपलब्ध नसल्याने या वर्षी आपल्या शेतात नेमके कोणते भाताचे बियाणे पेरावे या विचाराने माणगांव तालुक्यातील सर्व शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत.

    रायगड जिल्हाला भाताचे कोठार असे संबोधले जाते. कारण रायगड जिल्ह्यातील पनवेल, पेण, उरण, कर्जत, खालापूर, सुधागड, रोहा, अलिबाग मुरुड, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, पोलादपूर, महाड आणि माणगांव इत्यादी तालुक्यातील शेतकरी आपापल्या शेतात मोठ्या प्रमाणात जया भाताचे पीक घेतात. कारण रायगड जिल्ह्याच्या भौगोलिक संरचनेनुसार या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे या जिल्ह्यातील उपरोक्त सर्व तालुक्यातील सर्व ठिकाणच्या शेतकर्यांच्या शेतात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचते. आणि ते पुढील तीन ते चार महिने शेतात तसेच साचून राहते त्यामुळे रायगड जिल्ह्यातील बहुतेक शेतकरी आपापल्या शेतात लवकर तयार होणारे म्हणजे हळवे भाताचे बियाणे न पेरता जरा उशिरा तयार होणारे म्हणजे गरवे भाताचे बियाणे अर्थात जया या वाणाची निवड करून ते पेरतात.
     कारण जया या भाताला बाजारात विक्रीसाठी चांगला दर मिळतो. जया वगळता बाकी कोलम,रतना, आयरट,टायचण, सोना, कर्जत, इंद्रायणी इत्यादी सर्व प्रकारच्या भाताला बाजारात विक्री करताना अत्यल्प दर मिळतो. या शिवाय वरिल भाताचे पीक लवकर तयार होत असल्याने रायगड जिल्ह्यातील शेतकर्यांना पावसामुळे वरील सर्व प्रकारची पीके कापण्यास विलंब होतो. आणि परिणामी लवकर तयार झालेले भात पावसामुळे वेळेवर कापायला न मिळाल्याने या भाताचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील सर्व शेतकरी पावसाळ्या पुर्वी आपापल्या शेतात पेरणीसाठी जया या भाताची निवड करतात. परंतू सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवरील लाॅकडाऊन संचारबंदी मुळे रायगड जिल्ह्यातील ट्रान्सपोर्ट सेवेवर या चा मोठा परिणाम झाला. त्यामुळे तमाम रायगड जिल्ह्यात या वर्षी  सर्व कृषी सेवा केंद्रावर जयाचे भात बियाणे उपलब्ध नसल्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यासह माणगांव तालुक्यातील सर्व शेतकरी वर्ग आपल्या शेतात या वर्षी नेमके कोणते बियाणे पेरावे या विवंचनेने चिंताग्रस्त झाले आहेत. या संदर्भात रायगड जिल्ह्यातील त्या त्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी यांनी सर्व शेतकर्यांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. अशी माणगांव तालुक्यातील सर्व शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.



                      ठाणे जिल्ह्यात मागेल त्याला मदत, वंचितचा अभिनव उपक्रम





ठाणे,ब्युरोचीफ दि.२९ :- कोरोना काळात लॉकडाऊन मुळे अनेक गरीब, गरजू तसेच हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे हाल होत आहेत, अश्या लोकांना मदत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने तालुका, जिल्हा आणि शहरी भागात वार्डनुसार अन्नधान्याचे वाटप केले. ठाणे विभागात विठ्ठलवाडी, उल्हासनगर टिटवाळा,अंबरनाथ, कल्याण,आंबिवली , डोंबिवली या सारख्या अनेक भागात अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. राज्यात लॉकडाऊन चालू झाल्यानंतर अनेकांचे काम बंद झाल्याने लोकांची उपासमार होऊ लागली. यावर उपाय म्हणून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की गरीब, गरजू लोकांना मदत करा. त्यानुसार कार्यकर्त्यांनी मदतीला सुरुवात केली. अगदी ग्रामीण भागापासून ते शहरी भागात मदत करण्यास सुरवात झाली. त्यात अन्नधान्यांचे किट, मास्क,पाण्याच्या बाटल्या तसेच  तयार केलेले जेवण इत्यादीचा समावेश होता. शिवाय मागेल त्याला ही मदत देण्यात येत होती. ठाणे जिल्ह्यात ही मोठ्या प्रमाणावर वंचित बहुजन आघाडी तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली. ज्या लोकांनी फोन करून मदत मागितली होती. अश्या लोकांना घरपोच मदत करण्यात आली. त्यापैकी टिटवाळा येथील इंदिरानगर भागातून मदतीचा फोन आला होता, त्यानुसार वंचितच्या ठाणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा माया कांबळे, वंचितचे कार्यकर्ते संतोष गायकवाड व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष रुपेश हूंबरे  यांनी टिटवाळा येथे जाऊन अनेक कुटुंबियांना अन्नधान्याचे वाटप केले. तसेच विठ्ठलवाडी येथील श्रीराम कॉलनी, चिंचपाडा येथे सम्यक चे कार्यकर्ते गोपाळ गव्हाळे आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मनोहर जगताप  यांनी माया कांबळे यांना अन्नधान्याचे वाटप करण्यासाठी सहकार्य केले. या कार्यकर्त्यांनी ठाणे विभागात हजारो लोकांना सर्व प्रकारची मदत दिली असून अद्यापही ते काम चालू असल्याचे ठाणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा माया कांबळे यांनी सांगितले. सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी ही मोठ्या प्रमाणावर या सामाजिक कार्यात सहभाग घेतला होता. विना बुंदिले, सुरेंद्र ठोके, ज्ञानदेव सुरवाडे, व्ही.डी. सपकाळे, उत्तम गवळी, प्रवीण गोसावी , रघुनाथ जाधव,सविता निकम,तायडे सर ,मेघराज येवले आणि विश्वविकास गायकवाड यांनी मदतीसाठी हातभार लावला. अशी माहिती राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.


पत्रकाराला मारहाण करणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल करा - राजेंद्र पातोडे


अकोला,ब्युरोचीफ दि. २८ :- मास्कची विक्री करतो म्हणून लातूर येथील पत्रकार किशोर सोनकांबळे यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक संजय हिबारे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी केली आहे. लातूर येथील पत्रकार किशोर सोनकांबळे यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने ते उदरनिर्वाहासाठी  मिळेल तो व्यवसाय करतात. सध्या कोरोनाच्या काळात मास्कची विक्री करून घरी जात असताना गांधी चौकात  सोनकांबळे यांना पोलीस निरीक्षक संजय हिबारे यांनी  अडवून मास्क विक्री करण्यास विरोध केला. त्यावर सोनकांबळे यांनी आपण चुकीचे करत नसल्याचे सांगितले. यावर संतापलेल्या हिबारेंनी सोनकांबळे यांना शिवीगाळ करून मारहाण केली, तसेच तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक हिबारे यांच्यावर गुन्हा दाखल करून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी केली आहे. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.


ज्यांच्याकडे राशन कार्ड नसेल यांना सरकार मोफत राशन देणार आहे. शिवसेना उपविभाग प्रमुख विकी लोखंडे यांच्या वतीने मिसारवाडी मधील रहिवाशांना आव्हान.



राशन दुकान वर जास्तित जास्त फॉर्म भरून मिसारवाडी मधील रहिवाशांनी भरून दयावे.





औरंगाबाद,प्रतिनिधी :- औरंगाबाद मधील मिसारवाडी येथील शिवसेना उपविभाग प्रमुख विकी लोखंडे यांनी मिसारवाडी  वासियाना शिवसेना पक्षा तर्फे सूचित केली आहे की, ज्यांच्याकडे राशन कार्ड नसेल यांना सरकार मोफत राशन देणार,आप आपल्या भागातील राशन दुकानावर एक फॉर्म भरून देयचा आहे, आणि तो फॉर्म राशन दुकानावर भेटलं.त्यानंतर त्यांना मोफत राशन भेटणार आहे. जे गरजू असतील त्यांनी फॉर्म भरून द्यायचा आहे.
ज्यांच्याकडे  शिधापत्रिका (राशनकार्ड) नाही. त्यांनाही राशन दुकानातून मिळणार धान्य.त्यांच्याकरिता येणाऱ्या दोन दिवसात 31मे पर्यंत आपल्या जवळच्या राशन दुकानांमध्ये फॉर्म भरून दिल्यानंतर तो फॉर्म  पुरवठा अधिकाऱ्याकडून मंजूर झाल्यानंतर येणाऱ्या दहा तारखेपर्यंत त्यांना त्याच राशन दुकानातून धान्य उपलब्ध होणार आहे.व तसेच फॉर्म भरून राशन दुकानदाराकडे दिल्यानंतर त्याची पोहोच घेणे अत्यंत आवश्यक आहे. तरी सर्वांनी याचा पुरेपूर फायदा घ्यावा.ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही असे आपले शेजारी नातेवाईक मित्र परिवारातील व्यक्ती किंवा कुटुंब त्यांना माहिती करून द्यावी .काही अडचण आल्यास मला संपर्क करावा.विक्क़ी लोखंडे शिवसेना उपविभाग प्रमुख मिसरवाडी  9764197829 यांनी सांगितले आहे.

गुरुवार, २८ मे, २०२०


                                         "वंचीत"च्‍या वतीने शेकडो  गरजुंना धान्‍य वाटप.
   


कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्‍या स्‍मृती दिना निमित्‍त वंचीत बहुजन आघाडीच्‍या वतीने शहरातील अंबड चौफुली , इंदिरा नगर ,संजय नगर ,चंदनझिरा आदि भागातील शेकडो गरंजुना धान्‍य वाटप करण्‍यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी दिपक डोके ,नाभिक समाज विकास फाउंडेशनचे राजु वैदय ,गौरव संत ,विनोद मगरे ,भैय्‍यासाहेब पाखरे ,रूपेश अवसारे आदिंची उपस्‍थिती होती.
कोरोना महामारीतही आमच्या दलित आदिवासी बांधवांवर अत्याचार सुरूच - चंद्रकांत कारके

अंबड /अरविंद शिरगोळे :- केज तालुक्यातील मांगवडगाव येथील घटनेनंतर आज पुन्हा आमच्या आदिवासी महादेव कोळी जातीचे बांधव शांताराम शिंदे यांस शेतिच्या वादातून जातिय व्देषातून दगडाने व कुराडीच्या मागील बाजूने जबर मारहाण करून खून करण्याची अंबड तालुक्यातील शहापूर शेती शिवारात दुर्देवी घटना घडली आहे. या प्रकरणी मृतदेह ताब्यात न घेण्याच्या पैत्रावर आणि आंबेडकरी चळवळीतील नेते चंद्रकांत कारके हे स्वत: पोलिस अधिक्षक साहेबांच्या निदर्शनास आणुन दिल्यानंतर गुन्हे दाखल करण्याचा विचार केला, वाढत्या अन्याय आत्याचाराला न्याय हा चळवळीच्या रेट्यामुळे मिळने हि बाब दुर्देवीच आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो हे फुले-शाहु-आंबेडकर-आण्णाभाऊंच्या पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी बाब आहे. समाजीक न्याय मंत्र्यांनी अशा घटनेकडे लक्ष देण्याची मागणिही प्रसिद्धी माध्यमाव्दारे आंबेडकरी चळवळीतील नेते चंद्रकांत कारके यांनी केली आहे.

बुधवार, २७ मे, २०२०

*पोलिस कर्मचाऱ्याने बेदमपणे बदडले मादळमोही येथील प्रकार* *बीड पोलीस*
 """"""""""""""""''''""""""""""""""""""
फिर्याद देण्यास गेलेल्या इसमास गेवराई पोलिस कर्मचाऱ्याने बेदमपणे बदडले
गेवराई तालुक्यातील मादळमोही पोलिस चौकीतील प्रकार ; गंभीर जखमी इसमाची पोलिस अधिक्षकांकडे तक्रार
गेवराई , :- भांडणानंतर पोलिस ठाण्यात फिर्याद घेतली जाते,मात्र फिर्याद देण्यासाठी गेलेल्या एका इसमाची कर्तव्यावरील पोलिस कर्मचाऱ्याने तक्रार तर घेतली नाही,उलट त्यालाच चांगलेच बदडून काढल्याचा प्रकार गेवराई तालुक्यातील मादळमोही चौकीत घडला आहे.यामध्ये सदरील इसम गंभीर जखमी झाला असून कानाला दुखापत झाल्याने ऐकूच येत नसल्याने बीड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.याप्रकरणी गंभीर जखमी इसमाने पोलिस अधिक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.दरम्यान या प्रकरणाची दखल घेत पोलिस अधीक्षक यांनी हे प्रकरण गेवराई पोलिस निरीक्षक यांच्याकडे वर्ग केले आहे.    संदिपान रामभाऊ सानप (वय ४० वर्षे) रा.सावरगाव असे पोलिस कर्मचाऱ्याच्या मारहाणीत जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे.संदिपान सानप यांची चिखली शिवारात जमीन असून ते दि.२५ रोजी ट्रँक्टरच्या सहाय्याने मोघडणी करत होते.यावेळी चिखली येथील संतोष वारे हा त्याच्या पत्नी व मुलासह शेतात येऊन सानप यांना शेत मोघडण्यास मज्जाव केला.यानंतर सानप यांनी वाद नको म्हणून जवळच असलेल्या मादळमोही चौकीत जाऊन घडलेला प्रकार सांगितला. यावेळी चौकीत कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी गुरखुदे यांनी तक्रार घेण्यास नकार दिला.दरम्यान तक्रार का घेत नाही ? म्हणून सानप यांनी जाब विचारल्याचा गुरखुदे यांना राग आला.यानंतर गुरखुदे यांनी संदिपान सानप यांना चौकीतील एका खोलीत नेऊन बेल्ट,काठी व बँटने जबर मारहाण करत शिव्या घालत चौकीबाहेर हाकलून दिले.दरम्यान मारहाणीत जखमी झालेल्या सानप यांच्या कानाला गंभीर दुखापत झाल्याने ऐकण्यास येत नाही.तसेच हात,पायाला देखील गंभीर मार लागला असून सानप यांचँयावर बीड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.याबाबत सानप यांनी पोलिस अधिक्षक यांच्याकडे लेखी तक्रार करुन पोलिस कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.दरम्यान पोलिस अधिक्षकांनी हे प्रकरण चौकशीसाठी गेवराई पोलिस निरीक्षक यांच्याकडे वर्ग केले आहे.
                 
*चौकशी करून कारवाई करणार   याप्रकरणी गेवराईचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे यांना विचारले असता ते म्हणाले की,सदरील प्रकार गंभीर आहे.या प्रकरणी चौकशी करण्यात येईल,यामध्ये जर सदरील पोलिस कर्मचारी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल*
                

                          अडचणीत असलेल्या नाट्य, चित्रपट कलाकारांना आर्थिक मदत




मुंबई,ब्युरोचीफ :- कोरोनामुळे देशात लॉकडाऊन सुरू असून सर्व व्यवहार ठप्प झालेआहेत. चित्रपट, नाट्य व्यवसायावर ही त्याचा मोठा परिणाम झाला असून कलाकार आणि  रंगमंच कर्मांचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा दोनशेहून अधिक कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी श्री अरविंदो मीरा ही संस्था पुढे आली आहे.* लॉकडाऊन काळात चित्रपट आणि नाट्यगृह बंद करण्यात आली आहे. त्यामुळे हातावर पोट असणारे अनेक कलाकार,रंगमंच कामगार बेरोजगार झाले आहेत. तंत्रज्ञान,  रंगभूषा, वेशभूषा करणारे तसेच नेपथ्यकार, तिकीट तपासनीस, बॅनर लावणाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अशा लोकांना मदतीचा हात देण्यासाठी श्री.अरविंदो मीरा ही संस्था पुढे आली आहे. या संस्थेने नाट्य,चित्रपट क्षेत्रातील दोनशे कलाकार आणि कर्मचाऱ्यांची यादी तयार केली असून त्यापैकी काही जणांना आर्थिक मदत केली आहे तर इतर कलाकार, कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यात मदत करण्यात येणार असल्याचे श्री अरविंदो मीरा संस्थेच्या अध्यक्षा तसेच चित्रपट नाट्य, अभिनेत्री नयन पवार यांनी सांगितले. ही संस्था दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवत असते. आतापर्यंत अनेक गरीब, गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक, वैद्यकीय, मोफत शिक्षणाचा लाभ देण्यात आला आहे. नवी मुंबईत संस्थेमार्फत अनेक मुलांना मोफत नृत्य शिक्षणही दिले जाते. संस्थेने आतापर्यंत अनेक मराठी नाटकांची निर्मिती केली असून त्यात मार्ग युद्धाचा कि बुद्धाचा, पहिली भेट, आई ग कुछ कुछ होता है तर चिंगीचे प्रश्न, अंधारातून प्रकाशाकडे या लघुपटाची निर्मिती केली आहे. नयन पवार यांची कन्या लावण्या पवार हिने वयाच्या सोळाव्या वर्षी नाटकाचे दिग्दर्शन केले आहे.ती एक चांगली नृत्यदिग्दर्शिका असून तिने भरतनाट्यम मध्ये विशारद घेतली आहे. सामाजिक उपक्रमात तिचाही सहभाग असतो.

आय.जे.ए. च्या परतूर तालुका महासचिवपदी जनार्दन जाधव
"""""""""""""""""""""""""''''"""""""
*परतुर*
परतूर प्रतिनिधी/इम्रान कुरेशी
इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या परतूर तालुका महासचिवपदी मराठवा डा साथी व झी 24 न्यूज लाईव्हचे आष्टीचे प्रतिनिधी जनार्दन जाधव यांची नियुक्ती जिल्हाअध्यक्ष असलम कुरेशी यांनी केली आहे.
इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सिराज अहमद कुरेशी व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सतीश मधुकरराव महामुनी यांच्या सहमतीने जिल्हा अध्यक्ष असलम कुरेशी यांनी ही नियुक्ती केली.

जनार्दन जाधव यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनमध्ये ग्रामीण व लेकर शहराच्या पत्रकारांना संघटनेशी जोड़ून संघटना मजबूत करण्याचे कार्य करावे. तसेच पत्रकारावर होणा-या अन्याया विरोधात आवाज उठवण्यासाठी. सदैव तत्पर रहावे. जनार्दन जाधव यांच्या नियुक्तीबद्दल मोहन सोळंके (सकाळ) आनंद आढे (बंजारा लाईव्ह रिपोर्टर), गणेश आगलावे (देशोन्नती), राहुल आवटे (सी.एन.आय. महाराष्ट्र रिपोर्टर), सतिश पवार (लोकप्रश्न), पांडुरंग शेजुळ (गाव माझा रिपोर्टर), अंगद मुंढे (आताच एक्सप्रेस), इमरान कुरेशी (मराठवाडा केसरी), मुनीर खान पठाण (पोलिस नवरंग), सैय्यद अकबर ( दिव्य मराठी), सैय्यद वाजिद ( राज्यवार्ता), नजीर कुरेशी (लोकमत), तरंग कांबळे (हैलो रिपोर्टर), ऊद्धव डोळस (आनंद नगरी) आदींनी त्यांचे अभिनंदन केले.


परदेशी शिष्यवृत्तीला मुदतवाढ देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी.

मुंबई,ब्युरोचीफ :- अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना मास्टर्स व पीएचडी करीता राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्तीच्या आवेदन प्रक्रिया पूर्ण करण्याची आज शेवटची तारीख आहे. मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्याने विद्यार्थ्यांना जात पडताळणी, उत्पन्नाचा दाखला व पुर्व अटींचे ऑफर लेटर (प्रस्ताव पत्र) यांची पूर्तता करता आलेली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना ३० जून पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केंद्रीय सचिव योगेश धिंग्रा यांच्याकडे केली आहे.अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना मास्टर्स व पीएचडी करीता राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्तीसाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याची आज शेवटची तारीख आहे. मात्र कोरोनामुळे सर्व जिल्ह्यात लॉकडाऊन आणि संचारबंदी आहे. त्यामुळे  शासकीय कार्यालये ओस पडली असून सेतू केंद्र, महा ई सेवा केंद्र, तसेच जात पडताळणी कार्यालये देखील बंद आहेत. परिणामी अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्याची जात पडताळणी, उत्पन्नाचा दाखला व इतर कागदपत्रांची पूर्तता करणे शक्य नाही. त्यामुळे अनेक होतकरू व गरजू विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.भारतात जे विद्यार्थी पदव्युत्तर किंवा डॉक्टरेटचे शिक्षण घेत आहेत किंवा घेणार आहेत.त्यांना पुन्हा शिष्यवृत्तीसाठी फॉर्म भरण्यास मनाई करण्यात आली आहे, शासनाची ही अट म्हणजे विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक उच्च शिक्षणा पासन दूर ठेवण्यासारखी असून हा त्यांच्यावर अन्याय आहे. ही अट त्वरित रद्द करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. या आधी ही सहा लाख रुपयांची उत्पन्न मर्यादा घालण्यात आली होती.परंतु मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने राज्य सरकारने याअटीला तात्पुरती स्थगित दिली आहे.असे असली तरी नव्याने वेगवेगळ्या अटी  घालण्यात आल्या असून त्यामुळे अनुसूचित जाती जमातीवर जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे.अनेकदा परदेशी विद्यापीठे ही कुठल्याही अटी शिवाय ऑफर लेटर देत असले तरी आता सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे परदेशी शिक्षण घेण्याच्या मार्गात हा देखील एक मोठा खोडा आहे. सबब ही अट रद्द करून विद्यार्थ्यांना कुठल्याही अटी शिवाय पुर्व अटींचे ऑफर लेटर स्वीकारून त्यांना देखील या शिष्यृत्तीसाठी पात्र ठरवण्यात यावे,  जागतिक पातळीवर कोरोनाची परिस्थिती पाहता सर्व कुलूपबंद असल्याने परीक्षा व प्रवेश प्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत किंवा त्यात सवलती देऊन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देखील ३० जून पर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. शेकडो विद्यार्थ्यांनी देखील ई मेल आणि व्यक्तिगत पद्धतीने सामाजिक न्याय मंत्री, त्यांचे स्वीय सहाय्य्क यांना दूरध्वनीवरून संपर्क करून ही मुदतवाढ देण्याची व अटी शिथिल करण्याची मागणी करण्यात आली आहे. अशी माहिती राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली आहे.

,परतूर तालुक्यातील कापूस विक्रीसाठी चार हजार शेतकरी वेटींगवर,

परतूर प्रतिनिधी/इम्रान कुरेशी
परतूर तालुक्यातील कापूस विक्री करिता जवळपास पाच हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे या ठिकाणी रोज फक्त 40 ते 50 शेतकऱ्यांचा कापूस मोजला जातो. पाऊस काही दिवसावर येऊन ठेपला आहे परतूर तालुक्यात कापूस उत्पादकांची जवळपास सीसीआय कडे ऑनलाइन पाच हजारपेक्षा जास्त नोंदणी आहे आतापर्यंत अकराशे बाराशे लोकांचाच कापूस खरेदी केलेला आहे. दररोज केवळ चाळीस-पन्नास शेतकऱ्यांचा कापूस घेतल्या जात आहे.

सीसीआय व त्याचे अधिकारी पाऊस पडण्याची वाट पाहत आहेत की काय ? असा शेतकऱ्यांना प्रश्नः पडत आहे. पाऊस पडला म्हणजे कापूस घ्यायचा प्रश्नच उरत नाही आणि मग परतूर तालुक्यातील तीन हजारपेक्षा जास्त शेतकऱ्याची नोंद तशीच बाकी राहील असे चिन्ह सध्याची परिस्थितीवरून पाहायला मिळते तरीही कोणतेही अधिकारी याबाबत गंभीर दखल घेतील असे वाटत नाही ? तरी संबंधित प्रशासनाने नोंदणीकृत शेतकऱ्यांचा कापूस हा 7 जून अगोदर घेतला पाहिजे. आजच्या घडीला कोरोनापेक्षा शेतकऱ्यांना कापूस घरात राहतो की काय याची भीती आहे आणि पावसाळा तोंडावर येऊन ठेपलेला आहे ,तरी संबंधितांनी जास्तीचे खरेदी केंद्र तात्काळ सुरु करावेत आशी शेतकऱ्याकडून मागणी जोर धरत आहे.

प्रतिक्रिया भाऊसाहेब देविदासराव मुके पाटील रा. परतूर ( शेतकरी )
लॉकडाऊनच्या काळात खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे कापूस घरात राहिल्यामुळे त्यात किडे झाल्याने घरात राहणे मुश्किल झाले आहे. कित्येक शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या अंगावर बारीक बारीक लाल पुरळ ( गुथी ) आल्या सारखे दिसते व काहीच्या कानात रात्री झोपेतअसताना गेलेले आहेत हे असा मानसिक व आर्थिक त्रास अजुन काही दिवस असाच राहिला तर कोरोना राहील बाजूला अन् त्या किड्यांमुळे वेगळीच रोगराई पसरेल.व शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडेल आणि मग शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारेल की काय यांची भीती वाटते.

रविवार, २४ मे, २०२०

[24/05, 4:55 PM] Chandrakant Hakkdar: https://helloreporter108.blogspot.com/2020/05/blog-post_328.html
[24/05, 6:56 PM] Gaikawd Mangaw. (Raigad): गेली अनेक वर्षांपासून तुटलेल्या  पुलामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष : नागरिक नवीन पुलाच्या प्रतिक्षेत

     बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्यातील  माणगांव तालुक्याच्या खरवली ते बोरघर पंचक्रोशीतील शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि या विभागाती सर्व सामान्य नागरिकांना नदीच्या पलीकडे असलेल्या आपापल्या शेतावर आणि नाईटणे, बोर्ले, सुर्ले आणि मोर्बा इत्यादी ठिकाणी आपल्या कामासाठी उन्हाळ्यात आणि   पावसाळ्यात जाण्यासाठी महत्त्वाचा दुवा असणाऱ्या चेरवली आणि नाईटणे दरम्यान च्या नदी वरील पुल जीर्ण झाल्यामुळे गेली अनेक वर्षांपासून नदी पात्रात तुटून पडला आहे. त्यामुळे या पुलावरून नदीच्या अलिकडे आणि पलिकडे दोन्ही बाजूला आपापल्या कामानिमित्त येजा करणार्या शेतकरी कामगार, शेतमजूर आणि सर्व सामान्य  नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे या विभागातील सर्व नागरिक या ठिकाणी नवीन पुलाच्या प्रतिक्षेत आहेत. 
      सदर पुल सुमारे साठ ते सत्तरच्या दशकात काळ प्रकल्प सिंचन विभाग तथा कालवा विभागाच्या माध्यमातून बांधण्यात आला होता. कारण काल प्रकल्प विभागाने माणगांव तालुक्यातील खरवली विभागातील खरवली, चेरवली, पेण तर्फे तळे, नाईटणे, सुरव, बोर्ले, सुर्ले, मोर्बा, देगाव, महादपोली, दहिवली, गोरेगांव इत्यादी ठिकाणच्या शेतकर्यांची एक पिकी जमीन ओलीताखाली आणून ती दोन पिकी तथा दुबार पिकी करून या विभागातील शेतकर्यांना समृद्ध करण्यासाठी या विभागातून सुमारे साठ ते सत्तरच्या दशकात कालवा खोदून सदर कालव्याच्या माध्यमातून या विभागातील शेतीला पाणी सोडण्यात आले. 
      सदर कालवा माणगांव तालुक्यातील खरवली विभागातून पुढे मोर्बा विभागातील गावांकडे नेण्यासाठी चेरवली आणि नाईटणे दरम्यान असलेल्या नदीचा या काल प्रकल्पात अडसर ठरत होता. यावर मात करण्यासाठी या प्रकल्पातील तत्कालीन अभियंत्यांनी सदर नदीच्या खालून भूयारी पद्धतीने पुढे कालव्याचे पाणी नेण्याची व्यवस्था केली. व या कालव्याची पुढे देखभाल करण्यासाठी सदर कालव्याला सर्वत्र समांतर रस्त्याची निर्मिती केली. व सदर नदीवर पूल बांधला. या पुलाच्या माध्यमातून या विभागातील नागरिक नदीच्या दोन्ही बाजूला आपापल्या शेतावर कामासाठी आणि मोर्बा बाजारपेठेत जाण्यासाठी व या विभागातील गावांमध्ये दळणवळणासाठी येजा करत होते. मात्र गेली दहा ते पंधरा वर्षांपूर्वी सदर पुल जीर्ण झाल्यामुळे नदीच्या पात्रात मध्यभागी कोसळून पडला आहे. तेव्हा पासून आज पर्यंत या तुटलेल्या पुलावरून जीवघेणी कसरत करून येजा करत आहेत. या मधून संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो. आणि जीवीत हानी सुद्धा नाकारता येत नाही. या तुटलेल्या पुलाकडे
 संबंधित विभागाने आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी गेली अनेक वर्षे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या विभागातील सर्व शेतकरी आणि सर्व सामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या विभागातील सर्व नागरिक या पुलाच्या प्रतिक्षेत आहेत.
*अनैतिक संबधातून पत्नीसह दोन मुलांची हत्या*

बीड : शहरातील शुक्रवार पेठ परिसरामध्ये आईसह दोन लहान मुलांची रविवारी (दि.24) दुपारी हत्या करण्यात आली. सदरील घटनाही पत्नीच्या अनैतिक संबधातून घडली असून या घटनेने जिल्हाभरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पेठ बीड पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत सशंयित म्हणून एकास ताब्यात घेतले आहे.
     पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता संतोष कोकणे (वय 35), सिद्धेश्वर संतोष कोकणे (वय 9) व मयुर संतोष कोकणे (वय 6) अशी मयतांची नाव आहेत. संगीता व सिद्धेश्वर यांचा मृतदेह घरामध्ये आढळून आली तर मुयरचा मृतदेह पाण्याच्या बॅरेलमध्ये आढळून आला. यांना दगडाने किंवा बॅटने मारहाण केली असाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सदरील प्रकार हा अनैतिक संबधांतून घडला असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात बायको बेपत्ता असल्याची तक्रार देण्यास गेलेल्या संतोष कोकणे यास पोलीसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोनि.विश्वास पाटील व पोलीस दाखल झाले असून प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
*उर्वरित शेतकऱ्यांच्या शासकीय कापूस खरेदीची ऑनलाईन नोंदणी तात्काळ सुरू करा-पूजा मोरे*

*कारणे दाखवुन शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला कापूस खरेदी केंद्रावरून परत पाठवू नका*

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या कापूसाची खरेदी उद्यापासून सुरू होणार असली तरी अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या कापसाची ऑनलाईन नोंद झालेली नाही.त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांचलच्या कापसाची सुद्धा तात्काळ ऑनलाईन नोंदी घेऊन तो कापूस  शासकीय हमीभावाने खरेदी करण्यात यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पूजाताई मोरे व मराठवाडा अध्यक्ष गजानन बंगाळे यांनी केली आहे.

बीड जिल्ह्यातील एकुण १६ कापुस खरेदी केंद्रांवर प्रशिक्षित कर्मचारी अधिकारी ग्रेडर म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांनी विभागीय व्यवस्थापक,महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघ मर्या.विभागीय कार्यालय, परळी वै.जि.बीड यांचे नियंत्रणात व सुचनेनुसार ग्रेडींगचे कामकाज दि.२६मे २०२० पासुन करावे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. त्यानुसार 13 मार्च पर्यन्त प्राथमिक कापूस नोंदणी केलेल्या  24,921 शेतकऱ्यांपैकी उर्वरित 21,000 शेतकऱ्यांची कापूस खरेदी 26 मे पासून सुरू होत आहे परंतु अजूनही हजारो शेतकऱ्यांच्या कापसाची प्राथमिक नोंदणी झालेली नाही.त्या शेतकऱ्यांचा कापूस सरकार घेणार की नाही ? असा संभ्रम शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे.त्यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ खुलासा करणे गरजेचे आहे.व नोंदणी न झालेल्या उर्वरित शेतकऱ्यांची तात्काळ ऑनलाईन कापूस नोंदणी सुरू करून 13 मार्च पूर्वी नोंदी केलेल्या शेतकऱ्याच्या पाठोपाठ लगेच कापूस खरेदी करणे गरजेचे आहे.

तसेच 13 मार्च पूर्वी केलेल्या नोंदणी नुसार शेतकरी कापूस विक्रीसाठी केंद्रावर जात आहेत परंतु त्यांचा कापूस काही तरी कारण दाखवून खरेदी केंद्रावर गेल्यावर ग्रेडर अपात्र ठरवत आहे अश्या घटना यापूर्वी जिल्ह्यात घडल्या आहेत.त्यामुळे आता या कापसाचे करायचे काय?कापूसच खरेदी झाला नाही तर वाहतुकीचा खर्च द्यायच्या कुठून?वाहनात कापूस भरणाऱ्या मजुरांचा खर्च करायचा कुठून? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.तरी ग्रेडरने त्या कापसाच्या ग्रेड नुसार भाव ठरवून तो खरेदी केंद्रावरच खरेदी करून घ्यावा.कोणत्याही शेतकऱ्याला कापूस खरेदी न करता परत पाठवु नये.अन्यथा शेतकरी पुन्हा दलालांच्या तावडीत सापडतील व पांढरे सोने मातीमोल भावात विकण्याशिवाय त्यांच्या समोर पर्याय रहाणार नाही व या अडचणीच्या काळात बी- बियाणे कसे खरेदी करायचे हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावेल व त्यातून शेतकरी आत्महत्याना प्रोत्साहन भेटू नये व  "सरकारचे धोरण हे शेतकऱ्याचं मरण"ठरू नये म्हणून तात्काळ ग्रेडनुसार सरसकट शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करावा.व नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांच्या तात्काळ नोंदी करून घ्याव्यात व जिल्ह्याधिकारी यांच्या मार्फत तसा खुलासा लवकरात लवकर करण्यात यावा.अशी मागणी स्वाभिमानीच्या पूजा मोरे व गजानन बंगाळे यांनी केली आहे.

शुक्रवार, २२ मे, २०२०

विद्यार्थ्यांच्या विविध शिष्यवृत्ती योजनेसंदर्भात महाविद्यालयांना सुचना


जालना,प्रतिनिधी:- सर्व महाविद्यालय प्राचार्य, महाविद्यालये, विद्यार्थ्यांना संस्था प्रमुखांनी आपल्या महाविद्यालय, संस्थेत सन 2019-20 शैक्षणिक वर्षात प्रवेशित अनु- जाती, विजाभज, इमाव तसेच विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थी ज्या शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र आहेत. अशा सर्व विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच विद्यावेतन योजनेचे अर्ज ऑनलाईन प्रणालीhttp://mahadbtmahait.gov.in यावर भरण्यात आलेल्या अर्जापैकी मोठ्या प्रमाणात अर्ज महाविद्यालयाचे लॉगिनवर प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे.**
            सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, संस्था प्रमुखांनी सन 2019-20 शैक्षणिक वर्षाची ऑनलाईन नोंदविलेल्या अर्जापैकी परिपुर्ण स्वरुपात पात्र अर्ज मंजुर करुन सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांच्या लॉगिनवर पाठविण्यासाठी दि. 26 मे, 2020 ही अंतीम तारीख असल्याचे ऑनलाईन प्रणालीवर कळविले आहे. सदरील अर्जापैकी त्रुटीचे अपात्र मंजुर केल्यास संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांचेवर नियमानुसार कारवाई प्रस्तावित केल्या जाईल. तसेच अनुसुचित जाती, इमाव, विजाभज, विमाप्र प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज विहित मुदतीत मंजुर झाले नसल्याने शिष्यवृत्ती पासुन वंचित राहिल्यास महाविद्यालयाचे प्राचार्य पुर्णत: जबाबदार राहतील, याची गांभिर्याने नोंद घ्यावी. तसेच महाविद्यालय स्तरावर प्रलंबित व्दितीय टप्प्याची उपस्थिती नोंदवुन मंजुरी बाबत ऑनलाईन प्रणालीवर तात्काळ कार्यवाही करुन अर्ज या कार्यालयाच्या लॉगिनवर पाठविण्यात यावेत, असे आवाहन कार्यलय अधीक्षक, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी केले आहे.

लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या 860 नागरिकांना घेऊन विशेष रेल्वे बिहारकडे रवाना



जालना,प्रतिनिधी:- लॉकडाऊनमुळे जालना जिल्ह्यात अडकुन पडलेल्या परराज्यातील नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सोय करण्यात येत असुन यापूर्वी दोन विशेष श्रमिक रेल्वेच्या माध्यमातुन  उत्तरप्रदेशमधील उन्नाव येथील नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात आले आहे.  आज दि. 22 मे रोजी 1400 नागरिकांना घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या सुरु झाल्याने बऱ्याचशा बिहारी नागरिकांनी या कंपनीमध्ये स्वत:हुन थांबणे पसंत केल्याने प्रवासासाठी आलेल्या 860 एवढ्या नागरिकांना घेऊन विशेष रेल्वे बिहारकडे रवाना झाली आहे. लॉकडाऊनमुळे अडकलेल्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत अत्यंत शिस्तबद्धरितीने नियोजन करण्यात येत असुन या कामामध्ये जिल्ह्यातील अनेक स्वयंसेवी संस्था प्रशासनाला मदत करत असुन दि. 22 मे रोजीच्या विशेष रेल्‍वेसाठीही जिल्‍हा प्रशासनाने अत्यंत चोख असे नियोजन केले होते.  बिहार राज्यामध्ये येण्यासाठी बिहार सरकारकडून लेखी  परवानगी प्राप्‍त करुन घेत कामगारांच्या प्रवासाची तिकिटे आरक्षित करण्यात आली.  शासनाच्या निर्णयानुसार या सर्व नागरिकांच्या प्रवासासाठी लागणाऱ्या तिकीटाचे पैसे प्रशासनामार्फत अदा करण्यात आले. जालना शहरामधून जाणाऱ्या नागरिकांना व जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये अडकुन पडलेल्या या मजुरांना  जालना रेल्वेस्टेशनपर्यंत आणण्यासाठी प्रशासनामार्फत विशेष बसची सोयही करण्यात आली होती. प्रवास करणा-या मजुरांची सुरक्षितेतेच्या दृष्टीकोनातुन रेल्वे स्थानकावर आरोग्य तपासणीही करण्यात आली. प्रवाशांसाठी चालविण्यात येणा-या  या रेल्वेचे  पुर्णपणे ‍निर्जंतुकीकरण करण्यात येवून प्रवास करणा-या प्रत्येकाने चेह-यावर मास्क किंवा रुमाल घातला असल्याची खात्री करुन घेण्यात आली. रेल्वेमधुन पाठविण्यात येणा-या प्रवाशांना सोशल डिस्टसिंग बंधनकारक करण्यात आले होते. तसेच विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने प्रवाशांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय करुन  त्यांच्यासोबत खाद्य पदार्थही देण्यात आले.यावेळी नायब तहसिलदार श्री सोनवणे, बालकामगार प्रकल्प अधिकारी मनोज देशमुख, पोलीस निरीक्षक श्री महाजन यांच्यासह महसुल,  रेल्वे, पोलीस, आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

कोरोना पार्श्वभूमीसह सर्वच पातळीवर राज्य सरकार अपयशी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या विरोधात भाजपचे महाराष्ट्र बचाव आंदोलन



परतूर प्रतिनिधी/इम्रान कुरेशी

शेताच्या बांधावर जाऊन सातबारा कोरा करू म्हणणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून मागील सहा महिन्यापासून सरकार अस्तित्वात आल्यानंतर देखील फक्त विकास कामांना स्थगिती देण्याचे काम राज्य सरकारकडून करण्यात आले आहे अद्याप पर्यंत एक रुपयाचेही काम संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही झालेलं दिसून येत नाही कोरोना पार्श्वभूमीसह सर्वच पातळीवर राज्य सरकार अपयशी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या विरोधात भाजपने महाराष्ट्र बचाव आंदोलन केले असून सोशल डिस्टन्सचे तंतोतंत पालन करत अनेक कुटुंबांनी जाब विचारला आहे, परतूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात महाराष्ट्र बचाव आंदोलनाला उदंड प्रतिसाद मिळाला अशी माहिती माजी मंत्री आमदार बबबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

आज राज्य सरकार कडून शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी केली जात नाही, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सातबारा कोरा करू म्हणत शेतकऱ्यांचा विश्वासघात या सरकारने केला आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मानधनाचे वाटप नाही, रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना काम उपलब्ध नाही, केंद्र सरकार ने शेतकऱ्यांसाठी कापूस खरेदी केंद्र (सीसीआय) सुरू आहे परंतु नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणे शक्य नसल्याने राज्यसरकार ने कापूस खरेदी केंद्र सुरु करणे आवश्यक आहे असे असताना राज्य सरकार त्याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नाही लोणीकर यांनी यावेळी सांगितले

फळबाग आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचा हात नाही, बांधकाम कामगारांना हक्काचे अनुदान नाही, नाभिक बांधव किंवा गटई कामगार यांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे, हातावर पोट असणाऱ्या लहान व्यवसायिकांना हमाल मापाडी प्रवर्गात काम करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत सरकारकडून झालेली नाही. कोरोना प्रादुर्भाव काळात कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर नर्स पोलीस स्वच्छता कर्मचारी यांना आरोग्य विभागाकडून किंवा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची सुविधा पुरवली गेलेली नाही उलट त्यांचा पगार किंवा मानधन कपात करण्याचे पाप या सरकारने केले आहे असे लोणीकर यांनी स्पष्ट केले

अनेक स्थलांतरित लोक जे बाहेरगावी कार्यरत होते ते लोक लॉकडाउनच्या काळात गावाकडे परत आले असून त्यांना आज शासनाकडून शिधा पत्रिका देऊन धान्य वाटप करणे गरजेचे आहे परंतु अनेक लोकांकडे रेशन कार्ड नाही विलगीकरण कक्षामध्ये स्थलांतरितांना कोणत्याही प्रकारची सुविधा दिली जात नाही. नोंदणीकृत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा कापूस खरेदी केला जात नाही ज्या लोकांनी नोंदणी केलेली आहे त्या लोकांना कापूस खरेदी केला नसेल तर अनुदान देणे आवश्यक आहे त्या लोकांना कोणत्याही प्रकारचे अनुदान दिलेले नाही यापूर्वी भाजपा सरकारने तुरीची नोंदणीकृत शेतकऱ्यांना १००० रुपये मदत केल्याची आठवण करून दिली. सरकार स्थापन झाल्यापासून अनेक विकासकामांना केवळ स्थगिती आणि स्थगिती दिली जात आहे त्यामुळे जनतेचा शासनावरील विश्वास उडाला आहे. महाराष्ट्र हा साधुसंतांचा महाराष्ट्र असून याच महाराष्ट्रात साधुसंतांची निर्घुन हत्या या सरकारच्या काळात घडते आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे सरकार संपूर्णपणे असमर्थ ठरले आहे असेही लोणीकर यांनी यावेळी म्हटले आहे

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत कोणत्याही प्रकारचा लक्षात करून ठेवता अनेक योजना राबवल्या गेल्या होत्या परंतु सरकार स्थापन होतात या सरकारने या योजनेत खोडा घालत लक्ष घातले आहे खरे पाहता या योजनेसाठी प्रचंड पैसा उपलब्ध आहे तरीदेखील लक्षांक फक्त शासनाची नेमकी भूमिका काय हे स्पष्ट होत नाही शेतकऱ्यांच्या बाबतीत शासन मुळावर आला आहे काय असा सवाल यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी केला. मराठवाड्यासाठी वरदान ठरणाऱ्या मराठवाडा वॉटर ग्रीडला स्थगिती देण्याचा महापाप या सरकारने केला असून मराठवाड्याची जनता या तीघाडी सरकारला कधीही माफ करणार नाही असेही यावेळी लोणीकर यांनी स्पष्ट केले.

स्थलांतरित लोकांना गावी परत येण्यासाठी आपण स्वतः पत्रव्यवहार केला असून राज्यपाल महोदय मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांनी 9 मे रोजी मोफत बसची व्यवस्था केली होती परंतु सरकारमध्ये समन्वय नसल्यामुळे की काय मोफत बसची व्यवस्था 11 मे रोजी पुन्हा एकदा परिवहन मंत्र्याला कोणत्याही प्रकारची माहिती न देता रद्द करण्यात आली ही अत्यंत खेदाची बाब असून त्यामुळे अनेक लोकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे ही बाब सर्वसामान्य जनता विसरणार नाही असेही लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले. लॉकडाऊन काळात लहान-मोठ्या व्यवसायिक दुकानदारांची दुकाने पूर्णतः बंद असताना देखील महावितरण कंपनीकडून या दुकानदारांना सरासरी स्वरूपात वीज दिले जात आहे ते वीजबिल माफ करण्यात यावे अशा प्रकारची मागणी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे परंतु सरकार कोणत्याही मागणीकडे लक्ष देत नाही अशी खंत यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केली.

पेरणीचे दिवस जवळ आलेल्या असताना शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणे अत्यंत आवश्यक आहे कर्ज पुरवठा झाला नाही तर या सर्व शेतकऱ्यांना पेरणी साठी लागणारा पैसा उपलब्ध करण्यासाठी सावकाराच्या दारात जाणे भाग पडणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा शेतकर्‍यांवर आत्महत्येची वेळ येऊ शकते ही बाब अत्यंत चिंताजनक असून सरकारला मात्र याबाबत अजिबात गांभीर्य नाही असेही यावेळी लोणीकर यांनी स्पष्ट केले. लॉकडाउनच्या काळामध्ये महिला बचत गटांना दिलेले कर्ज माफ करण्यात यावे अशा प्रकारची मागणी देखील आपण महाराष्ट्र सरकारकडे केले आहे लोकांच्या काळात सर्व व्यवसाय बंद असताना बचत गटांना देखील कोणत्याही प्रकारचे काम उरले नाही त्यामुळे सर्व महिला बचत गटांचे कर्ज भरण्याची परिस्थिती आज रोजी तरी नाही म्हणून महिला बचत गटांचा कर्ज माफ करण्यात यावे अशी मागणी सरकारकडे केली होती परंतु अद्याप पर्यंत त्याबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतलेली नाही म्हणून अशा निर्लज्ज आणि दळभद्री महाआघाडी सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र बचाव आंदोलन केले आहे या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जाब विचारण्यासाठी अनेक कुटुंब आपल्या अंगणात समोर उभे राहून सरकारचा निषेध नोंदवताण दिसून आले त्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार सोशल डिस्टन्सचे तंतोतंत पालन केले गेले असल्याची माहिती देखील यावेळी बबनराव लोणीकर यांनी दिली

एवढे करुन देखील सरकारला जाग येणार नसेल व सरकार लोकहित उपयोगी काम करणार नसेल आणि आपल्या कुंभकर्ण झोपेतून सरकार जागे होणार नसेल तर याहीपेक्षा अधिक आक्रमकपणे आंदोलन करून सरकारला जाब विचारला जाईल असेदेखील आमदार लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
*बीडमध्ये तलवारी जप्त*
  बीड : शहरातील पालवन चौक परिसरामध्ये एका घरातून तलवारीसह इतर शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई शुक्रवारी (दि.22) दुपारच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार पालवन चौक येथील मस्के वस्तीवर करण भिमसिंग टाक याने तो राहत असलेल्या राजु महासिंग टाक यांच्या घरी अवैध शस्त्रसाठा केला असल्याची पोलीसांना माहिती मिळाली. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेने घराची झडती घेतली यावेळी करण भिमसिंग टाक याने त्याचा चुलता करण भिमिंसंग टाक यांच्याघरामध्ये  चार तलवारी, दोन धारदार सुरे, एक रामपुरी चाकू, एक छर्‍याची गण असा 14 हजार 200 अवैध शस्त्रसाठा पोलीसांनी जप्त केला. आरोपींवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 4/25 भारतीय हत्यार कायदासह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. यातील राजु टाक यावर विविध प्रकारचे 16 गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक भास्कर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.भरत राऊत, पोउपनि.गोविंद एकिलवादे, पोह.तुळशीराम जगताप, भास्कर केंद्रे, मुजंबा कुवारे, विकास वाघमारे, नरेंद्र बांगर, महिला कर्मचारी जयश्री नरवडे, चालक संजय जायभाये यांनी केली.

जिल्ह्यात होणार क्लोरीन वॉश व अनुजैविक तपासणी अभियान.


मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांची माहिती.

जालना,प्रतिनिधी :- पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जातात. पावसाळ्याच्या कालावधीत विविध प्रकारच्या जलजन्य आजाराचा प्रादुर्भाव होत असतो. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक आहेत. या कारणाने जिल्हा परिषद जालना तर्फे पावसाळ्याच्या पार्स्व्भूमीवर जलजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अभियान स्वरूपात दिनांक २६ मे ते ३० जुन २०२० या कालावधीत जिल्ह्यात खालीलप्रमाणे उपक्रम राबविण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. सदर अभियानामध्ये जे ग्रामसेवक, अधिकारी कर्मचारी सक्रीय सहभाग नोंदविणार नाही, पाणी नमुना प्रयोगशाळेस सादर करणार नाही व ज्या गावातील पाणी पाणी नमुना दुषित येईल त्या संबंधित कर्मचा-यावर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी दिली आहे.

क्लोरीन वॉश अभियान. (ग्रामसेवक / जलसुरक्षक) कालावधी - २६ ते ३१ मे २०२०*
जिल्ह्यातील सर्व गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची/जलकुंभाची आतून व परिसर साफ सफाई करणे, सार्वजनिक विहीर व पाणी पुरवठ्याची विहिरीमध्ये पडलेला कचरा काढणे, सविस्तर सुचना देण्यात आलेल्या आहेत.  सदर अभियान मुदत दिनांक २६ मे ते ३१ मे २०२० राहील. पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक स्रोतांची नियमित पाणी शुद्धीकरण करणे पाणी नमुने दुषित आढळून आल्यास गंभीर दखल घेण्यात येणार असल्याबाबत कळविण्यात आले आहे.

अनुजैविक पाणी नमुने तपासणी अभियान ) ग्रामसेवक / जलसुरक्षक) कालावधी - ०१ जुन ते ३० जुन २०२० जिह्यातील सर्व गावातील पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक स्रोतांची व काही नळ कनेक्शन च्या पाण्याची अनुजैविक तपासणी ग्रामसेवक यांनी आपल्या तालुक्याला नेमून दिलेल्या प्रयोगशाळेकडूनच  करण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर सुचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत. अनुजैविक तपासणी अभियान मध्ये एकही गाव वाडी वस्तीचा पाणी नमुना तपासणी पासूनराहू नये याबाबत सक्त सुचना देण्यात आलेल्या आहेत.  तपासणी अंती प्राप्त अहवालानुसार पाणी नमुना दुषित आढळून आल्यास गंभीर दखल घेण्यात येणार आहे.
उपरोक्त दोन्ही अभियान दिनांक २६ मे ते ३० जुन २०२० या कालावधीत यशस्वीरीत्या पूर्ण करण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत.अभियानाअंती सर्व गटविकास अधिकारी यांचा अभियान विषयक आढावा नियोजित आहे. सदरील अभियान यशस्वी करण्याची जबाबदारी गटविकास अधिकारी ग्रामसेवक जलसुरक्षक यांना देण्यात आली आहे.या अभियान यशस्वी करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम.अनुपमा नंदनवनकर, श्रीम.नम्रता गोस्वामी, श्री.भगवान तायड, श्री संजय डोंगरदिवे, श्री ऋषिकेश जोशी, श्री हिमांशू कुलकर्णी, श्री जय राठोड, श्री. श्रीकांत चित्राल श्री.शुभम गोरे हे परिश्रम घेत आहेत.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...