शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या कामांना गती द्या
अबंड व घनसावंगी तालुक्यातील कृषि विभागातील रिक्त पदे तातडीने भरणार कृषि सेवकांच्या मानधनात वाढीसाठी प्रयत्न करणार - पालकमंत्री राजेश टोपे
जालना, दि. 29 – शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना अत्यंत उपयुक्त असुन या योजनेंतर्गत जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या कामांना गती द्यावी.
तसेच प्रत्येक कृषि सहाय्यकांनी एक गाव दत्तक घेऊन आपल्या ज्ञानाचा उपयोग या गावाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी करावा, अशा सुचना राज्याचे सार्वजनिक आरोग्य, कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.येथील अंकुशनगर सहकारी साखर कारखाना येथे नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजनेसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री टोपे बोलत होते.यावेळी  कृषि विभागाचे उपसंचालक विजय माईनकर, उप विभागीय कृषि अधिकारी श्री सोनकांबळे,श्री कोकाटे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मनोज मर्कड, तालुका कृषि अधिकारी एस.व्ही. गिरी, सखाराम मोहोळ, श्री काळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचा सर्वाधिक प्रमाणात संपर्क येणारा कृषी विभाग आहे.  या विभागामध्ये आपले काम घेऊन येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सन्मानाची वागणुक द्यावी. शासकीय कार्यालयात काम करत असताना आपले वर्तन हे लोकशाहीला पोषक असे असले पाहिजे.  वेतन घेऊन जनसामान्यांची सेवा करण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली असुन आपल्या ज्ञानाचा फायदा जनकल्याणासाठी करावा. त्याचबरोबर विकासाची कामे करत असताना नियमानुसार व वेगाने कामे करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. घनसावंगी व अंबड तालुक्यातील कृषि विभागामध्ये इतर तालुक्यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात विविध पदे रिक्त आहेत.  ही सर्व पदे तातडीने भरण्यासाठी आपण मंत्रालयीन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सांगत कृषि सेवकांना आजघडीला केवळ सहा हजार रुपये एवढे मानधन देण्यात येते. या मानधनातसुद्धा वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प हा  सुमारे चार हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असुन या प्रकल्पामध्ये वैयक्तिक विकासाबरोबरच सामुहिक विकासाच्या अनेकविध योजना राबविण्यात येत आहेत.  जालना जिल्ह्यात या योजनेंतर्गत 2 लाख 7 हजार 66 अर्जापैकी 1 लाख 31 हजार 193 अर्ज पात्र ठरली असुन विविध पातळयांवर पात्र अर्जामधील शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी काम करण्यात येत आहे.  या योजनेंतर्गत आजपर्यंत 4 हजार 942 शेतकऱ्यांना 36 कोटी 33 लक्ष रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.  या प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड, शेडनेट, ठिबक सिंचन यासारख्या बाबींसाठीची प्रकरणे  15 दिवसांच्या आत पुर्ण  करावीत, जिओ टॅगींगचे काम प्रत्येक कृषि सहाय्यकाने आठ दिवसात पुर्ण करावेत तर उप विभागीय स्तरावरील प्रकरणे चार दिवसात पुर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी उपस्थितांना दिले. बैठकीस तालुका कृषि अधिकारी, कृषि सहाय्यक, मंडळ कृषि अधिकारी, कृषि सेवक आदींची उपस्थिती होती.

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२०

जळगाव चे पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांना राष्ट्रपती पदक प्रदान झाल्याबद्दल जाहीर सत्कार.
जळगाव ( प्रतिनिधी ) :- गुणवत्तापूर्ण सेवेसाठी " डॉ .श्री.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक जळगावयांना राष्ट्रपती
पोलीस पदक ( PM )  प्रदान  प्राप्त झाल्याने जळगाव जिल्हयातील राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्ष - सामाजिक न्याय विभाग जळगाव व राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्ष यांचे कडुन  -  डॉ.श्री.पंजाबराव उगले यांचा सत्कार सोहळा संपन्न.याबाबत सविस्तर माहिती अशी पोलीस अधीक्षक श्री.डॉ . पंजाबराव उगले यांना १५ ऑगस्ट २०१८ या वर्षी शासनाकडुन गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक (PM) ( मा.राष्ट्रपती ,भारत सरकार यांचे कडुन जाहिर ) जाहिर करण्यात आले होते.माननिय राज्यपाल महोदयांच्या हस्ते  पदक प्रधान करण्याबाबतचा 'अलंकरण समारंभ ' सोहळा मंगळवार दिनांक :- १८ / ०२ / २०२० रोजी महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, कुलाबा, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमात पोलीस अधीक्षक श्री.डॉ.पंजाबराव उगले यांना सन्मानिय राज्यपाल श्री.भगतसिंह कोश्यारी , महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पोलीस पदक (PM) प्रधान करण्यात आले होते.
त्या अनुषंगाने आज मा .पोलीस अधीक्षक  जळगाव यांच्या दालनात जळगाव जिल्हयातील राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्ष - सामाजिक न्याय  विभाग जळगाव - कल्पना गरीबदास अहिरे , राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्ष - ममताताई सोनवणे , उपाध्यक्ष - सुवर्णा  हेमकांत पवार , सरचिटणीस  -शिल्पा बाविस्कर ,उपाध्यक्ष - सुमनताई बनसोडे , उपाध्यक्ष - मनीषा देशमुख , मिनाक्षी पाटील , सुवर्णा सोनवणे यांचे हस्ते डॉ.श्री.पंजाबराव उगले यांचा सत्कार करण्यात आला .
मराठी भाषा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे
            जालनादि. 27 - जागतिकीकरणाच्या आजच्या युगात इंग्रजी भाषेचा प्रभाव वाढत आहेअशामध्ये अनेक प्रादेशिक भाषा हरवत चालल्या आहेतमराठी भाषा बोली भाषेतलिखाणातश्राव्य साहित्याच्या स्वरुपात टिकवणे आवश्यक आहेमराठी भाषा टिकावी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहचावी यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी केले.
          
  जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन व विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री हजारे बोलत होते
यावेळी माहिती सहाय्यक अमोल महाजनतांत्रिक सहाय्यक ज्ञानेश्वर पैठणेशंकर पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            श्री हजारे म्हणालेदरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज  यांचा जन्मदिवस हा 'मराठी भाषा गौरव दिनम्हणून साजरा केला जातोया माध्यमातुन मराठी भाषा टिकावी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहचावी यासाठी प्रयत्न केले जातातशालेय स्तरापासून प्रशासकीय स्तरावर विविध स्पर्धाकार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतेबदलत्या काळानुसार भाषेवर भौगोलिक,राजकीयसंस्कृतिक बदलाचे परिणाम होतातमराठी भाषेवरही ते होत आहेतत्यामुळे ते स्वीकारत भाषा टिकवली तरच ती पुढच्या पिढीपर्यंत ती पोहचू शकते असे सांगत मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.  
            माहिती सहाय्यक श्री महाजन म्हणाले भारत देशातील प्रमुख भाषांपैकी मराठी एक भाषा आहेमहाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये मराठी ही अधिकृत राजभाषा म्हणून ओळखली जातेमहाराष्ट्र शासनासोबतच अनेक मराठी भाषा प्रेमींकडून 27 फेब्रुवारी दिवशी 'मराठी राजभाषा दिनाचंऔचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करत मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपायमोहिमा राबवल्या जात असल्याचे सांगत प्रत्येकांने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            सर्वप्रथम मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे फित कापुन उदघाटन करण्यात आलेतसेच विष्णू वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलीयावेळी उपस्थितांना मराठी भाषेची प्रतिज्ञा देण्यात आली.
        कार्यक्रमास नागरिक तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
           पालकमंत्री राजेश टोपे यांचा जालना जिल्हा दौरा

जालना, प्रतिनिधी :- राज्याचे  आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री राजेश टोपे  यांचा जालना जिल्हा दौरा
पुढीलप्रमाणे आहे.शनिवार दि. 29 फेब्रुवारी 2020 रोजी  सकाळी 5.30 वाजता देवगिरी एक्सप्रेसने जालना येथे आगमन व अंजिक्य बंगला येथे राखीव सकाळी 10.00 वाजता जालना येथुन अंकुशनगर ता.अंबडकडे प्रयाण, सकाळी 11.00 वाजता अंकुश नगर येथे आगमन व नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोखरा) बाबत बैठक ( स्थळ- कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना अंकुशनगर) दुपारी 1.00 वाजता कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना येथुन सोयीनुसार प्रयाण व मुक्काम. 

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०

वंचितांना न्याय देण्यासाठी पुन्हा रिपब्लिकन सेनेत सुधाकर निकाळजे मराठवाडा अध्यक्ष यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्याच्या रिपब्लिकन सेनेत प्रवेश.
  जालना (प्रतिनिधी) ः- सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा मंगळवार दि. 25 रोजी घेण्यात आला.
  यावेळी मराठवाडा अध्यक्ष सुधाकर निकाळजे, पश्‍चिम जालना जिल्हाध्यक्ष लिंबाजी वाहुळकर, पुर्व जालना जिल्हाध्यक्ष रोविदास गंगातिवरे, जालना स. प. प्रमुख दिनेश आदमाने, जालना जिल्हा महासचिव एक्स आर्मी मेजर चंद्रकांत खरात, पुर्व जालना जिल्हा महासचिव अ‍ॅड. कैलास रात्नपारखे, जिल्हा संघटक मच्छिंद्र खरात आदींची उपस्थिती होती.यावेळी कार्यकर्त्यांना संबोधीत करतांना मराठवाडा अध्यक्ष सुधाकर निकाळजे म्हणाले की, नव्या जोमाने काम करण्यासाठी आणि समाजातील वंचित घटकांना न्याय मिळून देण्यासाठी आपण पुन्हा रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश केला असून जालना जिल्ह्यामध्ये नव्या उमेदीने पक्ष वाढविण्यासाठी सर्व समाजघटकांना सोबत घेवून काम करण्यात आहे.या प्रसंगी श्री. निकाळजे यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये  उपाध्यक्ष अरुण म्हस्के, जिल्हा सचिव भानुदास साळवे, जिल्हा सहसचिव नवनाथ ठोके, पुर्व जालना जिल्हा उपाध्यक्ष सर्जेराव आंभोरे, जालना तालुकाध्यक्ष भिमराज खरात, तालुका उपाध्यक्ष बबन खरात, जालन शहर अध्यक्ष कैलास बनसोडे, जालना तालुका युवा महासचिव सुमेध हिवाळे, जालना शहर महासचिव महेश घोरपडे, वाघरुळ सर्कल अध्यक्ष कैलास लाहाने, युवा तालुकाध्यक्ष कृष्णा जाधव, जिल्हा युवा महासचिव राज रत्नपारखे, शहर युवाध्यक्ष संतोष ऊनाळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश केला.

बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२०

पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य करणार -शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
मुंबई, / प्रतिनिधी :- राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये पहिली ते दहावी इयत्तेत मराठी भाषा हा विषय शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून अनिवार्य करण्यात येणार आहे. यासंदर्भातील विधेयक विधानसभेत मंजूरीसाठी मराठी भाषा दिनानिमित्त मांडण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत दिली.
आज राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करण्याबाबत सदस्य मंगेश कुडाळकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न विचारला. त्यास उत्तर देताना मंत्री श्रीमती गायकवाड बोलत होत्या. यावेळी  सदस्य सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, सुनील प्रभु, आशिष शेलार, भास्कर जाधव यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता.मंत्री श्रीमती गायकवाड म्हणाल्या, सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्याबाबतचे विधेयक उच्च सभागृहात मांडले जाणार असून, मराठी भाषा दिनानिमित्त ते विधानसभेत उद्या मंजूरीसाठी मांडण्यात येणार आहे. राज्यातील शासकीय, निमशासकीय, खाजगी, केंद्रीय, आंतरराष्ट्रीय या सर्व शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला असून, ज्या शाळा या नियमाची अंमलबजावणी करणार नाही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, प्राथमिक आणि माध्यमिक अशा वर्गवारीत टप्प्याटप्प्याने या मराठी भाषा सक्तीची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री गायकवाड यांनी दिली.त्याचबरोबर, ज्या खाजगी शाळा शैक्षणिक शुल्काबाबत नियम पाळत नाहीत अथवा गरजेपेक्षा जास्त शुल्क वापरतात अशा शाळांबाबत तक्रारी आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी उपस्थित उपप्रश्नास दिली.
                 सावता परिषदेच्या मराठवाडा विभाग 
              उपाध्यक्षपदी विष्णूभाऊ पुंड यांची निवड.
जालना/प्रतिनिधी :- सावता परिषदेच्या मराठवाडा विभाग उपाध्यक्षपदी अंबड येथील विष्णुभाऊ पुंड यांची निवड करण्यात आली.
 सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या सुचनेनुसार प्रदेश महासचिव मयुर वैद्य यांनी ही निवड एका नियुक्तीपत्राव्दारे केली.  तसेच मराठवाडा विभाग संघटकपदी गणेश वाघमारे (जालना), महिला आघाडी जालना जिल्हाध्यक्षपदी सौ. सुषमा खरात, युवक आघाडी जालना जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

हरीनाम हे मानव जीवनाचे उध्दार करणारे नाम आहे- ह.भ.प
बद्रीनाथ महाराज यज्ञेकर जोशी
सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी):-भगवंताच्या नाम चिंतनाने मोह,मध,मत्सर, या सर्व गोष्टीचा नाश होतो तसेच मानव जीवनाचा उध्दार होतो असे प्रतिपादन रामनगर येथील बाल कीर्तनकार बद्रीनाथ महाराज यज्ञेकर-जोशी यांनी मौजपुरी येथे सुरू असलेल्या 
 अखंड हरिनाम सप्ताह प्रसंगी पहिल्या दिवशी कीर्तन रुपी सेवेत केले.किर्तनरुपी सेवेसाठी घेतलेल्या ज्ञानदेव राय यांचा अभंग रामकृष्ण नामे हे दोनी साजिरे हृदय मंदिरी स्मरा कारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा रुदय जिव्हाळा श्रीमूर्ती राया या अभनगवर पुढे निरुपम करताना ते म्हणाले की एकदा मनुष्य मोह पाश्यात अडकला गेला की त्याला काही कळत नाही त्याचप्रमाणे मद्यपान केलेला माणूस मद्यपान केल्यानंतर आपले श्रेष्ठत्व व स्थान विसरून जातो पण मद्याची नशा ही काही काळापुरती मर्यादित असते पण मोहाची नशा ही जन्मोजन्मी उतरत नाही त्याच बरोबर ज्ञानी मनुष्य मोहपाश्या अज्ञानी होतो सदाचारी हा दुराचारी होतो अशा मोहतून जर सुटका करायची असेल तर भगवंतांचे नामसमरण जीवनात केले पाहिजे त्याचबरोबर तारुण्य हे माणसाला नको त्या गोष्टीकडे घेऊन जात जाते तेव्हा तरुणपणात भगवंताचे नामचिंतन करणे आवश्यक आहे आपुलिया आपण करा सोडवणं या अभंगतील उकतीप्रमाणे आपली जर दुःखातून सोडवणं करावयाची असेल तर ते आपणच सोडवू शकतो कीर्तन श्रवणासाठी मौजपुरी सह पंचक्रोशीतील भाविक भक्ताची मोठ्या प्रमाणात उपस्तीती होती
                                          दुःखद वार्ता
अंबड (प्रतिंनीधी) :- अंबड येथील आंबेडकर नगर येथील रहिवासी
बबनराव खरात वय 67 वर्ष,रा.डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर
यांचे अल्पशा आजाराने आज दि.26/02/20  रोजी दुःखद निधन झाले आहे. आयु.सुनिल बबनराव खरात,अनिल बबनराव खरात,किशोर बबनराव खरात,राहुल बबनराव खरात,राजु बबनराव खरात यांचे ते वडील होते,व आयु.मती ज्योतीताई खरात यांचे ते सासरे  होते.

मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२०

             शहरी महानेट प्रकल्पाचा अप्पर जिल्हाधिकारी 
                  रवींद्र परळीकर यांच्या हस्ते शुभारंभ
जालना (प्रतिनिधी):- दि.24 -सध्या इंटरनेटचा वापर प्रत्येक कामकाजात आवश्यक झाला आहे .शासकीय कार्यालयासह सर्वानाच आता ऑनलाईन  कामकाजामुळे इंटरनेट शिवाय पान  हालत नाही. त्यामुळे इंटरनेट सुविधा असणे आणि ती विनाव्यत्यय  सुरु राहणे हे अत्यंत गरजेचे झाले आहे . त्यासाठी शासनाने  शहरी महानेट प्रकल्प  सुरु केला असून या शहरी महानेट  प्रकल्पचा शुभारंभ अप्पर
 जिल्हाधिकारी रविंद्र परळीकर यांच्या हस्ते नुकताच तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आला .यावेळी तहसिलदार श्रीकांत भुजबळ, नायब तहसिलदार श्री.राजमाने, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक आण्णासहेब वाघमारे,मंडळ अधिकारी श्री.भोरे, वरिष्ठ नेटवर्क अभियंता अंकुश तुपेकर, सागर खैरनार, रिलांस जिओचे देवेंद्र कुलकर्णी, रुपेश गुप्ता यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील महत्वाचे शासकिय विभाग त्यांच्या अखत्यारित असलेले 203 शासकिय कार्यालये,शाळा, शासकिय विभाग इ. ठिकाणी ऐकमेकांना जोडली जाणार आहेत.नव्याने निर्माण करण्यात आलेल्या फायबर ऑप्टिक इंटरनेट सुविधे अंतर्गत त्या त्या ठिकाणी  उच्च गतीने सेवा देण्यात येणार आहे.   यावेळी जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक अण्णासाहेब वाघमारे यांनी योजनेचे फायदे तसेच सामान्यांसाठी होणा-या लाभाची माहीती दिली. शासकीय कार्यालये,शाळा वस्तीगृहे यांना मोफत व अल्प दरात जोडणी देण्यात येणार आसल्याचेही त्यांना शेवटी सांगितले. दुर्गम भागातील तालुक्याला देखील याचा लाभ मिळणार आसल्याने अप्पर  जिल्हाधिकारी  श्री. परळीकर  यांनी समाधान व्यक्त केले.या उपक्रमा अंतर्गत जिल्हातील शासकिय कार्यालयामध्ये ई-गव्हर्नस, आरोग्य सेवा, शिक्षण, ई-डेटा  उपक्रमांना गती देउन त्यांचा दर्जा सुधारणार आहे. नागरिकांना मिळणा-या दाखलांचे कामकाजही गतीशील होणार असल्याने समस्या निकाली निघणार आहे.इंटरनेट वापराचे महत्व वाढल्याने या शहरी महानेट प्रकल्पाचा लाभ शासकिय कार्यालयांना होणार आहे या प्रकल्पामुळे इंटरनेटची सेवेची गती वाढणार असुन यामुळे शासकिय कार्यालयातील कामकाजाला गती मिळणार आहे.
स्वा.सै.स्व.धाकलेश्वर करनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन
जालना/प्रतिनिधी :- येथील माजी आमदार दलितमित्र स्वातंत्र्य सैनिक स्व. धाकलेश्वर (दादा) मक्काजी करनाडे यांच्या १६ व्या पुण्यतिथी निमित्त रहेमान गंज वासीयांतर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी स्व. करनाडे यांच्या प्रतिमेस राहुल करनाडे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्या जीवन कार्याविषयी खलील पहेलवान यांनी विचार मांडले. तसेच उपस्थितांचे अकबर बादशाह व शे. सिद्दीक यांनी आभार मानले. या कार्यक्रमास चुन्नु रफीक, ईश्वर सिंग, राहुल करनाडे, शेख परवेज, शेख जफर यांच्यासह रहेमानगंजवासीयांची मोठ्या संख्येेने उपस्थिती होती.
माजी आमदार दलितमित्र स्वातंत्र्य सैनिक स्व. धाकलेश्वर (दादा) मक्काजी करनाडे यांच्या १६ व्या पुण्यतिथी निमित्त रहेमान गंज वासीयांतर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी खलील पहेलवान, अकबर बादशाह, शे. सिद्दीक, चुन्नु रफीक, ईश्वर सिंग, राहुल करनाडे, शेख परवेज, शेख जफर यांची उपस्थिती होती.

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०

   महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना टेंभुर्णी व                    तीर्थपुरी येथे आधार प्रामाणिकरणास प्रारंभ

जालना, दि. 24 - महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्याच्या टेंभुर्णी तर घनसावंगी तालुक्याच्या तीर्थपुरी या गावातील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून कर्जमुक्त प्रथम शेतकरी पंढरीनाथ महादू धारे यांना आधार प्रमाणित नोंद प्रमाणपत्र देऊन या योजनेचा शुभारंभ आज  दि. 24 फेब्रुवारी रोजी टेंभुर्णी येथील आपले सरकार सेवा केंद्र येथे करण्यात आला.यावेळी सहाय्यक निबंधक श्रीमती कल्पना शहा, चेअरमन रावसाहेब अंभोरे, जिल्हा सहकारी बँकेचे भागचौकसनिस देविदास दंदाले, गटसचिव गणेश चव्हाण, विष्णू डोईफोडे, भुंजगराव पिंपळे, शालिक बनकर, सरपंच गणेश धनवाई, भिकन खाँ पठाण, अंकुश देशमुख, हरिभाऊ सोनसाळे, गोरखनाथ राऊत आदींची उपस्थिती होती.
महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आज जिल्ह्यातील टेंभुर्णी व तीर्थपुरी येथील आधार प्रमाणिकरण कामाची पथदर्शी योजना हाती घेतली असून या दोन गावातील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या पूर्ण झाल्या असून त्यांच्या आधार प्रमाणिकरणाच्या कामाचा शुभारंभ आज झाला. टेंभुर्णी व तीर्थपुरी येथील प्रत्येकी 551 अशा एकुण 1 हजार 102 पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर असून त्यांचे आधार प्रमाणिकरण केले जाणार आहे. या दोन गावातील यादी प्रसिद्धीनंतर काही अडचणी  असतील तर त्याची माहिती शासनाला सादर करण्यात येणार आहे. यात शेतकऱ्यांनी ऑनलाईन माहितीची खातरजमा करुन कर्जमुक्तीसाठी सहमती दर्शवायची आहे.  जिल्ह्याभरातील सर्व गावांची अंतिम यादी येत्या 28 किंवा 29 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सांगितले. 
 जालना जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगेबाबा महाराजांना अभिवादन.
जालना,प्रतिनिधी:-दि.23-  रोजी संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंती  निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात
  अपर जिल्हाधिकारी रविंद्र परळीकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी तहसीलदार संतोष बनकर, श्री गिरी, श्रीमती संपदा कुलकर्णी, श्रीमती छाया कुलकर्णी, श्रीमती प्रतिभा इंगळे तसेच प्रशासकीय इमारतीमधील विविध कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थित होते.

 छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने उद्या दिनांक 25- 2 -2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन.
                            || आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान ||
बीड | उमेश वाटमोडे  छावा क्रांतिवीर सेना बीड जिल्हा च्या वतीने उद्या दिनांक 25- 2- 2020 रोजी सहाय्यक आयुक्त आणि औषध प्रशासन यांच्या विरोधात धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 ते 1 या वेळेत होणार आहे हे आंदोलन मा.श्री.करण (भाऊ) गायकर संस्थापक अध्यक्ष यांच्या आदेशावरून व अनिल (दादा) राऊत प्रदेश सरचिटणीस आणि रामेश्वर (अण्णा) बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन होणार आहे.
 प्रमुख्याने मागण्या पुढील प्रमाणे -
1)निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या  व्यावसायिकांवर कारवाई करण्यात यावी.
२)गेवराई शहरात व गावनिहाय होत असलेली भेसळ थांबवण्यासाठी व भेसळ करत असलेले दुकान चालकांच्या हॉटेल चालकांनी चौकशी करून कारवाई करणे.
३) जीवनावश्यक वस्तू रास्त दराने सहज उपलब्धतेची खात्री करणे.
४) सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी साठवण निर्मिती करणे.
५) ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 ची अंमलबजावणी करून ग्राहकाच्या हिताचे ग्राहकाच्या हिताचे संरक्षण व संवर्धन करणे व आपला लेखी अभिप्राय संघटनेचे तक्रार धारकास देणे.
-  अशा इत्यादी मागण्या घेऊन उद्या छावा क्रांतिवीर सेना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहे या आंदोलनासाठी जास्तीत जास्त संख्येने पदाधिकाऱ्यांसोबत नागरिकांनी उपस्थित राहावे.
 असे आव्हान छावा क्रांतिवीर सेना बीड जिल्ह्याच्या वतीने केले जात आहे.
राहुल चाळक -जिल्हाध्यक्ष, मुक्ताराम मामा मोटे-जिल्हा सरचिटणीस,अविनाश तांदळे- शे.आघाडी जिल्हाध्यक्ष, ऋषिकेश परदेशी -जिल्हा कार्याध्यक्ष, प्रल्हाद उजागरे- चित्रपट आघाडी जिल्हाध्यक्ष, संतोष राऊत -उपजिल्हाध्यक्ष, पंढरीनाथ शिंदे- तालुकाध्यक्ष बीड, संतोष शेळके- बीड दीलीप मोटे- तालुकाध्यक्ष गेवराई, जयराम काळे - युवा तालुकाध्यक्ष गेवराई, लक्ष्मण सटले-शे.आघाडी तालुकाध्यक्ष, बाबा खोत सोमनाथ मोटे नरसिंग पालेकर, विशाल मोटे,गणेश लोणके,
(SDM) उपविभागीय कार्यालयासमोर तीन दिवसापासून 
मुस्लिम बांधवांचे धरणे आंदोलन देशाची राजधानी दिल्ली येथे बीजेपी सरकारच्या विरोधात NRC/CAA व इतर
असंविधानिक कायदा रद्द करावा
अंबड/प्रतिनिधि : देशाची राजधानी दिल्ली येथे BJP सरकारच्या विरोधात  NRC/CAA व इतर असंवेधानिक कायदा रद्द करावा.
  या प्रमुख मागणीसाठी सर्व मुस्लिम बांधव धरने आंदोलन करीत असून त्या धरती वर अंबड येथील (SDM) उपविभागीय कार्यालया समोर तिन दिवसांपासून धरने आंदोलन सुरु आहे. या धरने आंदोलनाला बहुजन समाज पार्टीचा जाहिर पाठिबा देण्यात आला. व याकड़े सरकारने लक्ष न दिल्यास  BSP तीव्र आंदोलनाचा इशारा दिला उपस्थित चंद्रकांत कारके (BSP जिल्हाप्रभारी), रंजीत  कांबळे, शकील पठाण, वासिम तंबोळी, लालखा पठाण, राहुल कारके, सर्व मुस्लिम बांधव, है उपस्तित होते.

रविवार, २३ फेब्रुवारी, २०२०

           क्रांतिगुरूचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा
 बुलढाण्यात संपन्न नारायण माहोरे रामदास आमले व गंगाधर वानोळे पुरस्काराने सन्मानित.

सिंधीकाळेगाव,२१ ( प्रतिनिधी)  :- महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नामवंत व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्याची परंपरा गेल्या दहा वर्षापासून बुलडाण्यातील
क्रांतिगुरू संस्था करीत आहे. यावर्षी नारायण माहोरे,गंगाधर वानोळे व रामदास आमले यांची निवड करून त्यांच्या कार्याची दखल घेतलेली आहे.
      शैक्षणिक व सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर राहून विविध कार्य  केल्याबद्दल गंगाधर वानोळे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार, रामदास आमले यांना राज्यस्तरीय समाजसेवा गौरव पुरस्कार तर नारायण माहोरे राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
      बुलडाणा जिल्ह्यातील क्रांतिगुरू बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गुरुवार,दि.२० रोजी बुलडाण्यातील गुंधा येथे पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा प्राचार्य भाऊसाहेब झोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र बोरकर,ल.स.क.म.चे विदर्भ प्रमुख प्रा.ज्ञानदेव मानवतकर, वंजारी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम केंद्रे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सदानंद तेजनकर,लोणार बँकेचे कार्यकारी संचालक शिवप्रसाद सारडा,पंचायत समिती सदस्या हर्षदाताई डव्हळे, मनसेचे तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम पिसे, संचालक हनुमान इंगळे,सुधाकर राऊत,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस समाधान पोफळे, जिल्हा परिषद सदस्य तुळशीराम जाधव,आयोजक शंकरराव मानवतकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे. सोहळ्याचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव फुके यांनी केले.
 पुरस्कार सोहळ्यास महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील मान्यवरांची व श्रोत्यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक ज्ञानेश्वर गिलवरकर, संचलन अश्रू फुके तर आभार आयोजक शंकर मानवतकर यांनी मानले.ज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल माजी आमदार डॉ. संतोष टारपे, गटशिक्षणाधिकारी महेंद्र महामुनी,गुरुवर्य डी.एम.राठोड यांच्यासह पत्रकार, लेखक, साहित्यिक, अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संघटना यांच्यासह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
शेतकऱ्याची फसवणूक आणि महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ  बदनापूर तहसील कार्यालयावर 25 तारखेला धरणे आंदोलन बदनापूर भाजपाचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी घेतली पत्रकार परिषद केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन
बदनापूर (प्रतिनिधि):- बदनापूर येथील विद्यमान आमदार ना.रायण कुचे नारायण कुचे दिनांक 22 रोजी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की 25 फेब्रुवारी सकाळी11:ते 3:00 यावेळेस या सरकारच्या
  निशा अर्थ धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.ते म्हणाले की जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत त्यांचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे मंगळवारी दिनांक 25 फेब्रुवारी 2020 बदनापूर येथे तहसील कार्याल समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
अशी माहिती आमदार नारायण कुचे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 आमदार नारायण कुचे म्हणाले की भाजपाचा विश्वासघात करून राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने प्रमुखांनी आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीची प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळी  ग्रस्तांना.25000 आणि फळबागासाठी 50 हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती पण महा विकास आघाडी सरकारच्या प्रमुखांना आपल्या आश्वासनाला विसर पडला आहे.सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करू अशा घोषणा करणाऱ्या महाविकास नेत्यांनी या पैकी एकही आश्वासन पाळले नाही महाविकास आघाडी सरकारची कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांची सरसकट फसवणूक करणारी आहे महा विकास आघाडी सरकारे शेतकऱ्यांची फक्त अल्प मुदतीचे पीक कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही दोन लाखावर कर्ज असलेल्या तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांबाबत महा विकास आघाडीच्या कर्जमाफी योजनेत असल्याचा उल्लेख नाही भाजपा सरकारच्या कर्जमाफीत पीक कर्ज तसेच मध्यम मुदतीचे कर्ज समाविष्ट केल्याने पॉलिहाऊस ,शेडनेट, शेती उपकरण,पशुपालन, शेळीपालन,मधमाशीपालन अशा सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता भाजप सरकारच्या व्यापक कर्जमाफी मुळे 43 लाख खातेधारांना 19 हजार कोटीची लाभ देण्यात आला होता.तूर खरेदीची निकष महा विकास आघाडी सरकारने बदलल्यामुळे शेतकऱ्याकडून होणारा खरेदीची प्रमाण खूप कमी काम झाले आहे. शेतकर्‍यांची घोर फसवणूक करणाऱ्या महा विकास आघाडी सरकारचा भारतीय जनता पार्टी निषेध करीत आहे असे आमदार नारायण  कुचे म्हणाले त्यांनी सांगितले की गेल्या महिनाभरात राज्यातील महिला वरील अत्याचाराच्या घटनांमुळे मोठी वाढ झाली आहे.महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना धाक बसविण्याऐवजी महा आघाडी सरकारची मंत्री सत्कार घेण्यात गावोगावी मग्न आहे.हे सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे ॲसिड हल्ला अल्पवयीन मुलीवर अत्याचार बलात्कार महिलांना जाळून टाकणे अशा घटना घडू लागल्यामुळे महिला-तरुणी मुलीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या महा विकास आघाडी सरकारचा भाजप तीव्र निषेध करीत आहे  पुढे नारायण कुचे यांनी सांगितले की मंगळवारी होणाऱ्या धरणे आंदोलनात केंद्रीय मंत्री माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री बबनराव लोणीकर ,भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष दानवे, बदनापूर विधानसभा आमदार नारायण कुचे, तसेच भाजपा तालुकाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी ,आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, बाजार समितीच्या संचालक, सरपंच उपसरपंच, शक्ती केंद्रप्रमुख, बुथ प्रमुख ,भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थितीत  धरणे आंदोलन धरणे तहसील कार्यालय येथे  होणार आहेत.
या पत्रकार परिषदेत उपस्थित भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष भुजंग महाराज, तसेच शहराध्यक्ष महेशजी लड्डा, सत्यनारायण गिल्डा ,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष भगवान जी मात्रे ,नगरसेवक बाबासाहेब कऱ्हाळे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली.

महाराष्ट्रातील आरोग्यसेवकाच्या बळकटीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातून अधिकचा निधी मिळवा -आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्रीय आरोग्यमंत्री कडे मागणी.

मुंबई, (प्रतिनिधी):- दि.२३: महाराष्ट्रातील आरोग्यसेवेला बळकटी मिळण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून अधिकचा निधी मिळावा, अशी मागणी करतानाच मुंबईतील आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेतील विद्यार्थ्यांनी आरोग्य विभागात इंटर्नशीप करावी. जेणेकरून विविध राष्ट्रीय आरोग्य योजनांच्या सर्वेक्षणात त्यांना सहभागी होता येईल, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी सांगितले.देवनार येथील आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या शैक्षणीक आणि प्रशासकीय इमारतीचा भूमीपुजन सोहळा झाला. त्यावेळी आरोग्यमंत्री टोपे बोलत होते. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन. केंद्रीय सचिव प्रिती सुदान आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या संस्थेच्या इमारतीच्या कामाचे केंद्रीय आरोग्यमंत्री व राज्याचे आरोग्यमंत्री यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले.आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की,  एकमेव अशा या आंतरराष्ट्रीय संस्थेचे संशोधनाचे कार्य अभिनंदनीय आहे.  संस्थेतील विद्यार्थ्यांनी आरोग्य विभागात इंटर्नशीप करण्या करीता आले पाहिजे. आम्ही  त्यांचे स्वागतच करू. आरोग्य विषयक ज्या राष्ट्रीय योजना आहेत त्यांचा नेहमी सर्वे केला जात असतो त्यामध्ये या विद्यार्थ्यांचा सहभाग झाल्यास नक्कीच त्याचा फायदा या योजना चांगल्या पद्धतीने राबविण्यासाठी होऊ शकतो.या संस्थेच्या माध्यमातून राज्यातील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे. संस्थेने केलेल्या संशोधनाचा फायदा त्यांना मिळू शकेल.त्याचबरोबर आरोग्य विषयक योजनांच सामाजिकदृष्ट्या लेखापरिक्षणही करावे, अशी मागणी श्री. टोपे यांनी यावेळी केली.कोरोनाच्या संसर्गापासून देशाला सुरक्षीत ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रभावशाली-केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धनकेंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले, कोरोनाच्या संसर्गापासून देशाला सुरक्षीत ठेवण्यासाठी आपली आरोग्य यंत्रणा प्रभावीपणे काम करीत आहे. सर्वांसाठी आरोग्य या जागतिक आरोग्य संघटनेच्या लक्ष्यपूर्तीसाठी आपला देश प्रयत्नशील आहे. आरोग्य सेवेच्या आपल्या देशाचं हे मॉडेल अन्य देशांकडूनही राबविले जाईल, असेह त्यांनी यावेळी सांगितले. बाळंतपणा दरम्यान एकाही महिलेचा मृत्यू होऊ नये आणि देशातील अकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये याध्येयाने काम केले जात आहे. या आंतरराष्ट्रीय संस्तेतील तरूण विद्यार्थ्यांनी संशोधनातून नविन योजना आरोग्य क्षेत्रात पुढे आणाव्यात असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 
         सावता परिषदेच्या जालना युवक जिल्हाध्यक्षपदी 
          संदीप मगर पाटील यांची तिसऱ्यांदा फेरनिवड

सिंधीकाळेगाव/प्रतिनिधी:-दि २०/०२/२०२० रोजी सावता परिषदेची विभागीय,जिल्हा कार्यकारी जाहीर करण्यात आली,समाज कार्यासाठी समाज संघटन हे ब्रीद घेऊन सावता परिषद मागील तेरा वर्षांपासून महाराष्ट्रभरात मोठ्या ताकदीने सक्रिय आहे.
  सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मा.कल्याणराव आखाडे यांच्या नेतृत्वाखाली संदिप मगर पाटील हे मागील नऊ वर्षांपासून संघटनेत प्रभावीपणे एकनिष्ठ राहून कार्य करत आहेत,मागील काही दिवसांपूर्वी त्यांची संघटनेच्या प्रदेश संयोजन समितीच्या सदस्य पदी देखील निवड झालेली आहे,संदिप सुधाकर मगर पाटील हे राममूर्ती ता.जालना येथील रहिवासी असून ते शिवराय,फुले,शाहू,आंबेडकरांच्या विचारांचे पाईक आहेत.संघटनेमध्ये कार्य करत असताना अनेक युवकांना त्यांनी संघटनेत सामील करून घेतले,तसेच विविध उपक्रम असो,महापुरुषांचे जयंती उत्सव असो,अथवा समाजउपयोगी कामे अत्यंत प्रभावीपणे करत असतात,त्यांच्या या समाज कार्याची तळमळ व कार्याची दखल घेत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या आदेशानुसार सावता परिषदेचे प्रदेश महासचिव यांनी पत्रकाद्वारे सदरील नियुक्ती जाहीर केली.
या नियुक्ती बद्दल संदिप मगर पाटील यांचे जिल्हाभरातून सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२०

 तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा तलावात बुडून मृत्यू.

औरंगाबाद (प्रतिनिधी) :- औरंगाबाद येथील दिनांक 19 फेब्रुवारी वार बुधवार रोजी शिवजयंतीनिमित्त पाहण्यास गेलेल्या दोन मित्रांचा गाळात फसून मृत्यू झाला. बुधवारी दुपारी महालपिंप्री शिवारात तलावात
पोहण्यासाठी संदेश गंगाराम कापसे (वय 17 वर्ष) राहणार आंबेडकर नगर औरंगाबाद  व साहेब खान मुमताज खान (वय 16 वर्ष) रा. मिसारवाडी औंगाबाद. मृतांची नावे आहेत. अधिक माहिती अशी की शिवजयंती निमित्त सुट्टी असल्या कारणाने बुधवारी दुपारी महाल पिंप्री शिवारात साडेचारच्या सुमारास पाहण्यासाठी गेले होते त्यांना खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडायला लागले मित्राने आरडाओरड केली त्याचा काहीच उपयोग झाला नाही घटनेची माहिती कळताच चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश आंधळे, नगरसेवक कलीम कुरेशी, सुनील धोत्रे यांच्यासह नागरिक व अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. संदेश कापसे व साहेब खान मुमताज खान यांचे मृतदेह तालवाबाहेर काढून घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले. मृत संदेश सध्या बारावी शिकत होता तर साहेब खान हा आठवी शिकत होता. घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२०

                   जालना येथे शिवरायांना अभिवादन
जालना (प्रतिनिधी)- शहरातील अनुजा डिजिटल  येथे एकता शेतकरी कृषी विकास बहुउद्देशिय सेवाभावी संस्था सिंधी पिंपळगाव व शिवशाही प्रतिष्ठान जालना यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पाहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी मातंग मुक्ती सेनेचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक साबळे, एकता शेतकरी कृषी विकास बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष नवनाथ लोखंडे, शिवशाही प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुकाराम पिठोरे, सुशिल जगधने (बठाण बु.) अनिल चौरे, अनिकेत वैष्णव, लालचंद्र हणवते आदींची उपस्थिती होती.
महिलानी घातला शिवरायांणा दुग्धभिषेक मराठा क्रांती मोर्चा प्रणीत शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात, रँलीने वेधले नागरिकांचे लक्ष
जालना (प्रतिनिधी):- हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जालना शहरात सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चा प्रणित शिवजन्मोत्स सोहळ्यात शहरातील महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीस दुग्धाभिषेक घातला.
यावेळी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, मानिषा टोपे, सिमा खोतकर, विमल आगलावे, मनीषा भोसले यांच्यासह अनेक महिला व युवतींची उपस्थिती होती.
    यावेळी महिलांना फेटे बांधून त्यांचा सत्कार करण्यात आला. अनेक महिलांनी छत्रपती शिवाजी महारात जयंतीनिमित्त यावेळी उत्स्फुर्त भाषणे दिली. जगन्नाथ काकडे पाटील, योगेश भोरे, शाम शिरसाट, शेख इब्राहिम, अशोक पडोळ, संतोष कऱ्हाळे, मंगेश देशमुख, दत्ता पाटील, दिलीप पाटील, रमेश गजर, डॉ.नरसिंग पवार, गोपाल चित्राल, धैर्यशील चव्हाण, शुभम टेकाळे, योगेश पाटील, राम साळुंके, अंकुश पाचफुले, धनंजय पोहेकर, सचिन कचरे, गणेश भवर, गुरुमितसिंग सेना, प्रदीप गिरी, शुभम टेकाळे आदींची उपस्थिती होती.
चौकट बुधववारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधले. मोतीबाग येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक शोभायात्रा काढण्यात आली होती.
चौकट
पारंपारीक वेशभूषेने वेधले लक्ष
शिवजन्मोस्व सोहळ्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व राजमाता जिजाऊ यांच्या पारंपारीक वेशभूषेत ओलेल्या युवती व युवक तसेच बालकांनी नागरीकांचे लक्ष वेधले.
         अंबड येथे रमाई प्रतिष्ठान वतीने शिवजंयती मोठ्या 
                              उत्साहात साजरी
अंबड येथे रमाई प्रतिष्ठान वतीने शिवजंतीनिमित्त साजरी.
अंबड (प्रतिनिधी) :- अंबड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रमाई प्रतिष्ठान अभिवादन करण्यात आले.

 भगवे रुमाल वाटप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रमाई प्रतिष्ठान मार्फत अभिवादन करण्यात आले.यामध्ये आयु.सविताताई रमेश वाघमारे, प्रथम नागरीक आयु, संगिता ताई कुचे यांच्या गळ्यात रुमाल घालून रुमलांचे वाटप करण्यात आले, मा, आमदार आयु.नारायण कुचे यांना आयु.ज्योतिताई खरात, रुमाल देऊन 100,भगवे रुमलांचे वाटप करण्यात आले,या प्रसंगी रमाई प्रतिष्ठान,आयु. छायाताई खरात, गीताताई येटाळे, शीला मगरे,, सुजाता येडे, मंगल अनिल खरात, गंगुताई गाडेकर, आणि अर्चनाताई जोगदंड इ.जर आपणास रमाई प्रतिष्ठान सद्स्य नोंदणी करायची असेल तर, आयु, छायाताई खरात, सचिव, यांच्याशी संपर्क करावा असे आव्हन आयु, ज्योतिताई खरात यांनी केले.
शिवतारा प्रतीष्ठानचा उपक्रम लोककल्याणकारी÷मा.आमदार लक्ष्मण पवार
====================
गेवराई दि.16.2.2020 (ता.प्रतीनीधि ईम्रान सौदागर )गेवराई येथील शाहूनगरी  मैदानावर शिवतारा प्रतीष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सामूदाईक विवाह सोहळा अनेक मान्यवराच्या उपस्थितित थाटामाटात पार पडला.शिवतारा प्रतिष्ठानचा उपक्रम लोककल्यानकारी असून. या उपक्रमातून सामाजिक श्रणानूबंधन द्रढ होतील असे प्रतीपादन मा. आमदार लक्ष्मन  पवार यांनी येथे  केले आहे .मा.अमदार लक्ष्मन पवार व ते  बोलत होते. या वेळी ह भ प मसाननाथ महाराज. यूवा नेते शिवराज पवार. नगराध्यक्ष सूशील जवंजाळ. उप.नगर अध्यक्ष राजेंद्र
विवाह सोहळा प्रसंगी
राक्षसभूवनकर.लक्ष्मण सेना प्रमूख याहिया खाँन.पं स उप सभापती संदिप लगड. हबीब खाँन.सरवर खाँन.वैधकीय अधीकारी राजेश शिंदे.डाॅ. प्रवीन सराफ.भारत गायकवाड.जानमोहमंद बाजगान.प्रकाश काका सूरवसे.साजेद खाँन.शेख जावेद.शेर खाँन. जावेद खाँन. ईम्रान सौदागर. असेफ खाँन. राजेंद्र भंडारी. संजय इंगळे.सय्यद बद्दूदीन.मूना सेट.राहूल खंडागळे.  येळापूरे व अदिक पद आधीकारी व अधीकारी व शहरवासी उपस्थीती होती
                   शिवरायांनी दिलेली परस्त्री मातेसमान ही शिकवण
                            गरजेची : मीनाताई घाडगे

सिल्लोड (प्रतिनिधी) :- आजमितीला राज्यासह देशात महीला मुलीवर अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात  सुरू असुन महीला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी छञपती शिवाजी महाराज यानी दिलेली परस्ञी आम्हा माते समान या शिकवनीची समाजाला गरज आहे असे प्रतिपादन मिनाताई घाडगे यांनी केले आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छ. शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ते शहरातील दलितमिञ गयाबाई साबळे प्रतिष्ठाणच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साठे युवा मंचचे प्रवक्ते प्रा. अनिल साबळे हे होते तर प्रमुख पाहुने म्हणुन व्यापारी रमेश घाडगे, डाँ. सचिन साबळे, वैभव प्रसाद, भागिनाथ लंबे यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमास प्रतिष्ठाणच्या सौ. अंजली साबळे, कस्तूराबाई काकडे, माहेश्वरी साबळे, साक्षी लंबे, रांधा यंगड , स्नेहल साबळे, प्रिती साबळे,  श्रुती साबळे यांच्यासह इतराची उपस्थिती होती.
          संधिकाळेगाव येथे शिवाजी महाराज जयंती साजरी

सिंधीकाळेगाव(प्रतिनिधी) :- जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव येथील सावता चौक येथे  छञपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी माजी सरपंच सखाराम गिराम, माजी सरपंच  सुभाष(आबाजी) गिराम, सावता परिषद तालुका अध्यक्ष सुभाष गिराम, सावता परिषद कार्यअध्यक्ष रामभाऊ गिराम.सावता परिषद युवा तालुका संघटक दिलीप गिराम,,डाँ भगवान गिराम, डाँ. अमोल गिराम, विष्णुपंत गिराम, जनार्धन गिराम ,भागवत गिराम, शिवाजी गिराम, गणेश गिराम, दिनेश झाल्टे, जगन गिराम, बळीराम वाजे, गणेश राऊत, विशाल जोगदंड अंकुश जोगदंड,रामेश्वर कातकडे, अरुण गिराम, रामेश्वर गिराम,संजय गिराम,विजय धानुरे,राम बोरुडे, संजय गिराम, रामदास गिराम, आदी उपस्थित होते.
                   
जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन.
दि.19-  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी  यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
   यावेळी उपजिल्हाधिकारी रविंद्र परळीकर,निवासी उपजिल्हाधिकारी  निवृत्ती गायकवाड, तहसिलदार संतोष बनकर,श्रीमती आर.आर. महाजन,श्रीमती संपदा कुलकर्णी, छाया कुलकर्णी, तसेच प्रशासकीय इमारतीमधील विविध कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी यांची होते.

मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०

                       परीक्षा केंद्रावर 1973 लागू करा

  जालना (प्रतिनिधी): - जालना शहरात व  ग्रामीण भागात माध्यमिक शांलान्त व उच्च माध्यामिक प्रमाणापत्र परीक्षा दि.18 फेब्रुवारी 2020 ते 23 मार्च 2020 या कालावधीत होणार आहे. सदरील परिक्षाकेंद्रावर कोणाताही गैरप्रकार होऊ नये या करीता जालना जिल्हृयातील सर्व परिक्षा केंद्रा परिसरातील 100 मीटर हद्दीतील परिक्षा चालू असताना पालक,परिक्षा न देणारे विद्यार्थी उपद्रव करीत असताना  किंवा नकला पुरवताना, परिक्षा केंद्राच्या परिसरात घुटमळत असताना तसेच परिक्षाकेंद्राच्या जवळ सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी बुथ,फॅक्स,झेरॉक्स केंद्र असे बंद ठेवण्यात यावे. वरील परिक्षा केंद्राच्या कालावधीत कायदा  व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असलयाने फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 अंतर्गत वरील केंद्राच्या 100 मीटर  लागू करण्यात आली आहे. हा आदेश परिक्षा कालावधीत सकाळी 8.00 ते सायंकाळी 5.00 पर्यंत अंमलात येणार आहे.
                महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र जालना
     यांच्या कडून दिवसीय मोफत विकास कार्यक्रमाचे आयोजन.

जालना दि.18-  महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जालना व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जातीच्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी जालना जिल्हयातील युवक-युवती, महिला-पुरूषांसाठी मोफत 1 महिना उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन जालना येथे करण्यात आले आहे. सदरील कार्यक्रमांची सविस्तर माहिती मिळावी म्हणून एक दिवसीय मोफत उद्योजकता परिचय कार्यक्रम जालना सोमवार दि. 24 फेब्रुवारी 2020 रोजी हॉटेल फ्लोराईन अतिरिक्त औद्योगिक वसाहत, जालना येथे घेण्यात येणार आहे. सदर उद्योजकता परिचय कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रशिक्षणार्थी हा फक्त अनुसुचित जाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
         इच्छुकांनी सदरील कार्यक्रमांच्या अधिक माहिती करिता जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्डची झेराक्स व पासपोर्ट साईज फोटोसह भारती सोसे-पांढरकर, प्रकल्प अधिकारी,एमसीईडी,जालना मो. 9579264868, 9545258681, द्वारा-जिल्हा उद्योग केंद्र, अतिरिक्त औद्योगिक वसाहत, औरंगाबाद रोड,जालना फोन.नं.02482-220592,मो. येथे संपर्क साधावा असे आवाहन  सुदाम थेाटे विभागीय अधिकारी, एमसीईडी, औरंगाबाद यांनी केले आहे.
जालन्यात सकल मातंग समाजाच्या वतीने मोठ्या संख्येने विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा
जालना (प्रतिनिधी):- महाराष्ट्रामध्ये दिवसान दिवस मातंग समाजावर होत असलेल्या अन्याया बाबत मातंग समाजाच्या मुलीवर झालेल्या अत्याचार साठी आरोपीना कठोर शिक्षा देण्यासाठी जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
मातंग समाजावर होत असलेल्या अत्याचार व अन्याय विरुध्द जालना जिल्ह्यातील मातंग समाज जागृत झाला आहे. या अनुषंगाने जालना येथे अक्रोश मोर्चा काढण्यात आला.या मोर्चाचे झालेल्या खुन प्रकरण, बलात्कार व मातंग समाजाला आरक्षण मिळावे श्री साईबाबा विद्यालय, शंकर नगर, नांदेड येथील अल्पवयीन विद्यार्थीनीवर चार शिक्षकांनी केलेल्या अत्याचार प्रकरणी त्या शिक्षकांना फाशिची शिक्षा देण्यात यावी ,ग्राम मरोडा, ता.अकोट, जि.अकोला, येथे घडली मातंग समाजातील विद्यार्थीनीवर गावातील चार गादगुंड नराधमांनी केलेल्या अत्याचार प्रकरणी त्यांना अटक करुन तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी.पोलीस स्टेशन दहिहंडा येथील ठाणेदार प्रेमानंद कात्रे, बिट जमादार शाम बुंदीले, पो.कॉ.सुरेश ढोरे, यांना तात्काळ निलंबीत करण्यात यावे.मातंग समाजातील दिपाली रमेश शेंडगे, म्हाडा कॉलनी, टी.व्ही. सेंटर, जालना येथील तरुणीचा खुन केल्याप्रकरणी त्या आरोपीना तात्काळ फाशी देण्यात यावी..मातंग समाजातील राहुल कचरु उमप या तरुणाच्या खुनाची चौकशी सि. आय.डी.मार्फत करण्यात यावी.कळंब, जि.उस्मानाबाद येथील मुकेश झोंबाडे या मातंग युवकाचा खुन करुन त्यांचा मृतदेह, ढोकी रेल्वे फाटकावर फेकून आत्महत्या दाखवण्याचे प्रयत्न करणारे आरोपींना तात्काळ अटक करावे.जालना जिल्ह्यातील गायरान जमीन व सव्हे नं. ४८८, गायरान ज्मीन गायरणधारकाच्या कास्तक-्याच्या करण्यात यावे.मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात स्वंतत्र आरक्षण (अ.ब.क.ड) देण्यात यावे. क्रांतीगुरु लहुजी वस्ताद पुर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा. संजय ताकडेयांनी मातंग समाजाच्या आरक्षणासाठी आपले बलीदान दिले. त्यांचे बलिदान व्यर्थ न जाता मातंग समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे. माळीपुरा जुना जालना येथील सा.अण्णाभाऊ साठे शॉपी सेंटरची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. नगर परिषद जालना मार्फत गुत्तेदारी पध्दतीने मातंग समाजातील साफ सफाई करणाऱ्या कर्मचार्यांना नगर परिषद जालना येथे कायमस्वरूपी करण्यात यावे. दि. १८ फेब्रुवारी रोजी डोंगरगाव सिल्लोड येथील ३२ वर्षीय दलित महिलेसोबत सात वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन गवत आणायला गेली. शनिवारपासून ती गायब होती. त्यांच्या दोघीचे विहिरीत प्रेत आढळून आले. या गुन्हेगारांना तात्काळ अटक करुन गुन्हा दाखल करण्यात यावे व शिक्षा देण्यात यावी. वरिल मांगण्या तात्काळ मंजूर न झाल्यास यापूढे महाराष्ट्र राज्यभर जेलभरो आंदोलन करण्यात येईल. आंदोलनात कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास या घटनेची जवाबदारी प्रशासनावर राहील.. दाविद गायकवाड,संतोष तुपसौंदर,किसन लांडगे, संतोष निकाळजे, अर्जुने दाकतोडे, अनिल थोरात, विक्की हिवाळे, ललित कुचेकर, गंगाधर लाखे, ओंकार घोड़े,द्वारकाबाई लोंढे संगिता कांबळे ,विशाल लांडगे, आशाबाई साबळे सह आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.
 महाराष्ट्राला काळीमा फासणारी आणखी एक घटना अत्याचार करून आई आणि मुलीला फाशी देऊन त्यांचा खून करून मृतदेह  विहिरीत टाकला 
       महाराष्ट्र मध्ये महिलासुरक्षा विषयक प्रश्न चिन्ह निर्माण
सिल्लोड (प्रतिनिधी) :- महाराष्ट्रात काळीमा फासणारी आणखी घटना डोंगरगाव, ता.सिल्लोड जि. औरंगाबाद मधे आणखी एक दालित महिलांच्या अत्याचाराची व निघृण दुहेरी हत्येच घटना घडली आहे.
डोंगरगाव, ता.सिल्लोड जि.औरंगाबाद एका विहिरीत 2 प्रेत आढळले आहे.त्यामध्ये पीडित महिला (वय 28 वर्ष) व तीची लहान मुलगी (वय 7 वर्ष ) यांच्या वर बलात्कार व खुन करुन त्यांच्या गुप्तांगात काड्या खुपसलेल्या अवस्थेत व डोळे ,जीभ बाहेर निघालेले आहेत.त्यांची बाॅडी फाशी देवून खुन करुन तिन दिवसापूर्वी  विहिरित टाकले  व ती फुगून बाहेर आल्या नंतर हि गोष्ट उघडकीस आली आहे. सदर प्रकरणात मयतांच्या नातेवाईकांनी 3 दिवसापूर्वी मिसिंग  तक्रार केल्यावर पण पोलिस प्रशासनाने  निष्काळजी पणा केल्याचे दिसून येत आहे. अजुन आरोपींचा शोध लागला नाही, वंचित बहुजन आघाडीने मागणी केल्यानुसार सकाळी  ईन कॅमेरा शवविच्छेदन होणार आहेत. सिल्लोड तालुक्यात ही 8/15 दिवसातली दुसरा घटना आहे. जर अश्या नराधमांना कायद्याची जबर नसेल तर असे प्रकार वारंवार होतील. सिल्लोड तालुक्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली व मागासवर्गीय व दलितांवर अन्याय व अत्याचार वाढल्याचे दिसून येत आहे.दि.17 फेब्रुवारी  2020 रोजी  शहरातील घाटी वैद्यकीय  रुग्णालयात डोंगरगाव  ता. सिल्लोड .जि. औरंगाबाद  येथील मृतदेह  शवविच्छेदनासाठी  आणण्यात  आले.सदर दुदैर्वी घटना कळाली असता तिथे वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अमित भुईगळ, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष लता बामणे, शहराध्यक्ष वंदना नरवडे,  जयश्री घुगे, प्रज्ञा साळवे, जिल्हाध्यक्ष (पश्चिम) योगेश बन, शाम भारसाखळे महासचिव, खालेट पटेल महासचिव, शहराध्यक्ष (पश्चिम) संदिप शिरसाठ, शहराध्यक्ष (पुर्व) डाॅ. जमील देशमुख, ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार,  वंचित बहुजन आघाडीचे विलास भिसे, रवि दाभाडे, गौतम भिसे आदि सहीत अनेक कार्यकर्त्यां सोबत जावून त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.सदर प्रकरणात पोलिस प्रशासनाने लवकरात लवकर दोषी व्यक्तींना शोधुन अटक करण्यात यावी नसता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलिस प्रशासनाच्या विरूध्द आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अमित भुईगळ यांनी दिला आहे.
            

सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२०

             जिल्हा स्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत आंतरवाली राठी 
                                शाळेचे घवघवीत यश

सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी) :- दि.१५ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय प्रश्न मंजुषा कार्यक्रम जि.प.मुलांची शाळा जालना येथे संपन्न झाला.मुलांच्या बौद्धिक क्षमता अधिक प्रभावीपणे विकसित करण्यासाठी व संपादन कौशल्य कितपत प्रभावी पणे अंमलबजावणी होतात याची अचूक पडताळणी व स्पर्धात्मक परीक्षेसाठी ग्रामीण भागातील मुलांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध करण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या
मार्गदर्शनाखाली प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन जिल्हास्तरावर करण्यात आले.स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी प्राथमिक कैलास दातखीळ, उपशिक्षणाधिकारी मंगल धुपे,गटशिक्षणाधिकारी कडेलवार,विस्तार अधिकारी विनया वडजे,विस्तार अधिकारी सोळंके,केंद्रप्रमुख अण्णासाहेब खिल्लारे यांची उपस्थिती होती.या स्पर्धेत १ली ते ५ गटात घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली राठी केंद्र राणीउंचेगाव शाळेतील मुलांनी प्रथम क्रमांक पटकावला यामध्ये अमृता गायकवाड,वनराज गव्हाणे,अमृता कंक,सिद्धेश्वर कळकुंबे,पृथ्वीराज डवले मुलांचा सहभाग होता.६ वि ते ८ वि  गटात द्वितीय क्रमांक पटकावला यामध्ये अनुजा सांगळे,शितल डवले,हर्षद कंक,प्रणाली डवले,यांचा सहभाग होता.मुलांच्या बौद्धिक क्षमतेची कस या स्पर्धेच्या माध्यमातून प्रभावीपणे दिसून आली. तालुक्यातील स्पर्धेत मिळवलेल्या यशाच्या जोरावर जिल्हा स्तरीय स्पर्धेत मुलांनी अवांतर वाचनाचा पुरेपूर उपयोग केला,मुलांमध्ये असणारा प्रगल्भ विचार व स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आवश्यक असणारा सराव शाळेतील शिक्षक गोरखनाथ पवार,भाऊसाहेब बहिर,सुभाष इंगळे यांनी अथक परिश्रम घेतल्यामुळे मुलांना यश संपादन करण्यासाठी कामी आले.या वेळी यशस्वी विध्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांनी मुलांना प्रमाणपत्र व टॅब भेट देऊन सत्कार केला.या वेळी अंतरवाली राठी शाळेचे मुख्याध्यापक पटेकर,सहशिक्षक भाऊसाहेब बहिर,सुभाष इंगळे,प्रियंका तिरपुडे,गोरखनाथ पवार,विस्तार अधिकारी रमेश देशमुख,केंद्रप्रमुख राजेश सदावर्ते,उपस्थित होते.

रविवार, १६ फेब्रुवारी, २०२०

          यशवंत टेन सेंटरमधील कु.मैविश शेख यांंची निवड.

औरंगाबाद (प्रतिनिधी) :- यशवंत टेनिस सेंटर मधील कु.मैविश शेख यांची निवड ऑल इंडिया टेनिस असोसिएशन AITA TENNIS TALENT SERIES
सूरत येथे दि.08/02/2020 दि.14/02/2020 येथे सात दिवस झालेल्या टेनिस सीरीज मध्ये सोळा वर्षा खालील मुलींच्या सिंगल टेनिस प्रथम व डबल टेनिस मध्ये मान पटकवणारी पहिली कु.मैविश शेख ठरली.त्याबद्दल यशवंत कला महाविद्यालयाचे प्रचार्य व टेनिस चे रुपेश राँय यांनी मैविश चे अभिनंदन केले.
          मादळमोहित शिवजयंतीच्या अनुषंगाने पोलिस चौकीत
                         शांतता कमिटीची बैठक संपन्न.

मादळमोही (प्रतिनिधी) :- आज दि.16 फेब्रुवारी रविवारी मादळमोही च्या शिवजयंतीच्या उद्देशाने गेवराई पोलीसांनी यूवकाशी संपर्क साधत शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला पी.आय.चोभे साहेब गेवराई पोलीस. यांची प्रमुख उपस्थिती लाभली.या प्रसंगी ए.पी .आय.चोभे यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले कि या हद्दीत गुन्हेगारी वर
 नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणी पोलीस डिपार्टमेंट ला सहकार्य करावे .आणी मादळमोही गावात व हद्दीत जेस्ठ नागरिक व्रध महिला.शालेय विद्यार्थ्यांनी यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांना सहकर्य करावे. तर या गावात दक्षता समीती कार्यरत करावी पोलीस सदैव नागरिकांना सहकर्य करतील  ते पुढे म्हणाले कि या नंतर मी सातत्याने आपल्या सेवेत राहील. या बैठकीत गावकरी यांच्या वतीने दिपक वांरगे.बळीरामजी रसाळ बीड हँलो रिपोर्टर चे.संपादक चंद्रकांत हक्कदार यांच्या वतीने चोभे साहेब यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी चौकिचे जमादार सोनवणे  गुरखुदे आण्णा. बळवंते  साहेब. खटाने साहेब .नारायण सिरसट आणी  चौकीचे ईतर पोलीस कर्मचारी व ग्रामस्थ शांतता कमेटीच्या बैठकीत ऊपस्तीत होते.

शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२०

संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त
मंत्रालयात अभिवादन
मुंबई (प्रतिनिधी) :- संत सेवालाल महाराज यांच्या 281 व्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात  वने, भूकंप व पुनर्वसन मंत्री संजय राठोड यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश गोविंद राठोड, सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव (रवका) श्रीमती अन्शु सिन्हा, अवर सचिव म.की.वाव्हळ,ज.जी.वळवी,यांनी ही संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अभिवादन केल्यानंतर अरदास’ प्रार्थना म्हणण्यात आली.
                  जालना जिल्ह्यातील पाथरूड तांडा येथे
       संत सेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

सिंधी काळेगाव (प्रतिनिधी) :- बंजारा समाजाचे आराध्य दैवत राष्ट्रसंत सेवालाल महाराज जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथ्रूड तांडा केंद्र सावंगी 
 तलान येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी सहशिक्षक सतीश श्रीखंडे,मुख्याध्यापक नारायण माहोरे,अनिल राठोड,श्याम राठोड,बंडू राठोड व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जालना तालुक्यातील सांगितलं येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी.
सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी) :- जालना तालुक्यातील सावंगी तलान ग्रामपंचायत कार्यालय येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
  यावेळी विद्या विलास रंधवे सरपंच, शाम कळकुंबे ऊपसरपंच, कमलाकर कळकुंबे कृ. ऊ. बा. स. संचालक पि टी. चिंचोले साहेब ग्रामसेवक, तुकाराम राठेड, विनायक राठोड, रामराव खराडे, काशिनाथ राठोड, सखाराम मुळे, किशोर झोरे, प्रभाकर रंधवे, राजु राठोड, राजु बायस, कृष्ना राठोड, नामदेव राठोड, जमीर सय्यद. आदि उपस्थित होते.
     जिल्हाधिकारी जालना कार्यालयात संत.सेवालाल महाराज 
                   यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.
जालना (प्रतिनिधी) :- दि.15 फेब्रुवारी 2020 रोजी संत.सेवालालमहाराज यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अपर                                          जिल्हाधिकारी रविंद्र परळीकर यांनी प्रमिमेस
   पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, सर्व तहसीलदार याच्या सहप्रशासकीय इमारतीमधील विविध कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.
            संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम 
                शंकरराव पाटील तौर प्राथमिक शाळा 
          कुंभार पिंपळगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा.

कुंभारपिंपळगाव (प्रतिनिधी) :- आज दि.15 फेब्रुवारी 2020 वार शनिवार रोजी शंकरराव पाटील तौर प्राथमिक शाळा, कुंभार पिंपळगाव ता.घनसावंगी जि.जालना येथील शाळेत संत सेवालाल महाराज यांच्या जयंती चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे 
 अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप चव्हाण हे उपस्थित होते.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून निळकंठ खिस्ते हे उपस्थित होते. सर्व प्रथम अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी संत सेवालाल महाराज यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शाळेतील शिक्षक मोहन अवचार, विष्णु शिंदे, दिपक सांगळे, भगवान साबळे, विजयकुमार काळे, सहदेव वाघमारे,यांनी संत सेवालाल महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांनी संत सेवालाल महाराज यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून महत्त्व पटवून दिले. शेवटी अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुं. प्रतिक्षा जाधव व अमृता धुरट यांनी केले तर आभार कु.कोमल आढळकर यांनी मानले.
    प्रायव्हेट मोबाईल रिचार्ज कंपनीने केलेली भरमसाठ दरवाढ                संदर्भात ग्राहक संरक्षण समिती महाराष्ट्राच्या वतीने
                   जिल्हाधिकारी नाशिक यांना निवेदन
नाशिक (प्रतिनिधी) :- प्रायव्हेट मोबाईल रिचार्ज कंपनी केलेली 25 ते 30% भरमसाठ दरवाढ म्हणजे ग्राहकाचे खूप मोठे नुस्कान होत आहे.मोबाईल कंपनी जिओ आयडिया एअरटेल कंपनी वाढलेल्या रिचार्ज जवळपास 30 टक्के वाढ केली आहे या सर्व वाढीचा फटका ग्राहकांना सोसावा लागत आहे. 
 या दरवाढीमुळे ग्राहकांना आर्थिक सुरुवात मोठी मोबाईल कंपनीकडून लूटमार होत आहेत,तरी ग्राहकांची होणारी लूटमार थांबण्यासाठी प्रयत्न करावे.मल्टिप्लेक्स थिएटर याठिकाणी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूटमार होत असते या थेटरमध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू पिण्याची मिनरल वॉटर मनमानी दार लावून ग्राहकांची फसवणूक करत आहे थेटरच्या बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी मिळणेबाबत व तिथे मिळणारे खाद्यपदार्थ दर कमी करण्याबाबत. या मागण्यासंदर्भात श्री दादाभाऊ केदारे राज्य उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयावर नाशिक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनावर श्री. दादाभाऊ केदारे (वरिष्ठ उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य),मा.सौ.स्मिता मुठे(अध्यक्ष विभागीय), मा.प्रसादभाऊ बोडके (अध्यक्ष नाशिक शहर),मा.मोहिनी भगरे (अध्यक्षा नाशिक शहर),मा.कुंदनभाऊ खरे (जिल्हा उपाध्यक्ष) ,मा.श्रीकांत कार्ले(धुळे जिल्हा),मा.मंगला खोटरे (उपाध्यक्ष नाशिक शहर ) मा.वैशाली दराडे (महासचिव)नाशिक शहर आदि उपस्थित होते.
  अंबड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची धुळीच्या    साम्राज्याने अवहेलना
                   अनाधिकृत असल्याच्या कारणावरून 
    महाराजांच्या पुतळा साफसफाईला कायद्याची आडकाठी

अंबड / (प्रतिनिधि): स्वराज्य निर्माण व्हावे यासाठी छत्रपती शिवरायांनी रायरेश्वराला करंगळी कापून रक्ताभिषेक केला मावळ्यासोबत स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि स्वराज्य स्थापनेसाठी संघर्ष सुरू केला तो स्वकीय आणि परकियांसोबत.
छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य प्रेरणादायी असुन त्याचे प्रतिक म्हणून संबध देशभर छत्रपती शिवरायांचे अनेक ठिकाणी पुतळे उभे केलेले आहेत.मात्र याच पुतळ्यांचा राजकारणासाठी उपयोग होवु लागल्याने छत्रपती शिवरायांच्या कार्याची अज्ञातपणे अवहेलना सुरू झाल्याचा सुर शिवप्रेमी लोकांतुन समोर येत आहे.अंबड शहरातील पाचोड नाका म्हणजेच शहरात प्रवेश होणाऱ्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज पुर्णाकृती पुतळ्याची जागा होती तिथे अंबड नगर परिषदेने चौथारा निर्माण केला होता आणि याच चौथ-यावर विधानसभा निवडणुकीपुर्वी भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी दि.12 सप्टेंबर 2019 रोजी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला.पुतळा उभा करण्यास कोणतीही परवानगी नसल्याच्या कारणावरून आ.कुचे यांचेसह 43 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात येवून त्यांना अंबड पोलीसांनी अटक केली होती.(विनापरवानगी पुतळा उभारल्या प्रकरणी आ. नारायण कुचे यांच्यासह ४४ जणांविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात कलम
१४३,१४९,१४७,४४७ तसेच महाराष्ट्र राज्य पुतळ्याचा पावित्र्य भंग प्रतिबंध कलम ११ नुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत)
छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करुन मत मिळवणे हाच काय तो एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून मध्यरात्रीच्या अंधारात पुतळा उभा केला मात्र त्या पुतळ्याची अद्यापपर्यंत विधीवत पुजा आणि मानसन्मान अजुनही झाला नाही.अटकेतुन बाहेर आल्यानंतर सर्व 44 लोकांचा ठिकठिकाणी सत्कार झाले, सुटकेचा आनंद ही मोठमोठ्या तोफा वाजवून पुष्पहार आणि मिठाईने साजरा केला गेला.छत्रपतीचा पुतळा बसवल्यामुळे मतदार संघातील गावागावात सत्कार सोहळे झाले.
पुतळ्यामुळे आ.कुचे हे पुन्हा एकदा विधानसभेत पोहचले
मात्र छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी अद्यापपर्यंत कोणतेही ठोस पाऊल न उचलल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नियमित साफ सफाई होईना त्यात रस्ता कामामुळे पुतळ्यावर धुळ माती बसल्याने एक प्रकारची अवहेलना सुरू झाली.छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थान ची अस्मिता असतांना त्यांच्या पुतळ्याची साफसफाई करण्यासाठी कायद्याची आडकाठी आल्याने समस्त अंबडकरांतुन संताप व्यक्त केला जात आहे छत्रपती शिवरायांची जयंती काही दिवसांवर येवून ठेपली असुन अंबडचा पुतळा धुळीच्या थराने विद्रुप होत आहे.
बसवलेल्या पुतळ्याची नियमित साफ सफाई झाल्यास आणि त्यावर पाणी पडल्यास तो लवकर खराब होईल या भितीने पुतळ्याची साफसफाई होत नाही अशीही चर्चा दबक्या आवाजात येत असुन पोलीस निरीक्षक अंबड यांनी पुतळ्याबद्दलची खरी माहिती द्यावी अशी सर्वसामान्याकडुन अपेक्षा व्यक्त होत आहे.चार दिवसावर छत्रपती शिवरायांचा जन्मसोहळा येवून ठेपला असुन पुतळ्याच्या रंगरंगोटी तसेच स्वच्छता व विधीवत पुजेकरिता कोणताही निर्णय प्रशासनाकडून न झाल्याने मोठा संताप व्यक्त केल्या जात आहे पुतळा बसवुन पाच महिने झाले मात्र त्या पुतळ्याची विधीवत पुजा कायद्याच्या आडकाठी मुळे करता येवु नये हे अंबडकरांचे दुर्देव आहे. ज्यांनी पुतळा बसवण्यासाठी “रात्रीचा खेळ” केला त्यांनी किमान पुतळ्याच्या मान्यतेसाठी प्रशासकीय पाठपुरावा करावा.जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही मत्स्योदरी देवी मंदिरासमोर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा सूर्योदयानंतर एकाच दिवशी हजारो लोकांच्या साक्षीने तो पुतळा बसवला होता पुतळा बसवण्यापुर्वीच शासनाकडून सर्व मान्यता मिळवल्या होत्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा मंत्री राजेश टोपे यांच्या शुभहस्ते विधीवत पुजे सह स्थापन झाला होता पुढे शिवसेनेचे तत्कालीन आमदार संतोष सांबरे यांनी आपल्या आमदार फंडातून पाच लाख रुपयांचा निधी देवुन पुतळ्याची दगडी भिंत बांधलेली आहे तर मत्स्योदरी देवस्थान नियमितपणे या पुतळ्याची देखभाल आणि साफसफाई करीत असते.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...