गुरुवार, ३० एप्रिल, २०२०


नांदेड च्या पहिला कोरोना बाधीत रुग्णाचा अहवाल निगेटीव्ह तरीही मृत्यूने गाठलेच
नांदेडमधील ६४ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान अंत
नांदेड( भगवान कांबळे) :  जवळपास महिनाभर कोरोनामुक्त असलेल्या नांदेड शहरात  पिरबुऱ्हाणनगर येथील ६४ वर्षीय नागरिक कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. या बाधित नागरिकाला इतरही विविध आजार होते. या इतर गंभीर आजाराने या रुग्णाचा पिच्छा सोडला नाही. कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही गुरुवारी दुपारी दीड वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्च चिकित्सक डॉ़ निळकंठ भोसीकर यांनी सांगण्यात आले.
या ६४ वर्षीय रुग्णाच्या माध्यमातून कोरोनाने नांदेडमध्ये शिरकाव केला होता. त्यानंतर  पिरबु-हाणनगर परिसर प्रशासनाने पुर्णत: सील करीत तीन कि.मी. परिसर कंटेनमेन्ट झोन म्हणून घोषित केला होता. २०० आरोग्य कर्मचा-या मार्फत ३ कि.मी. परिसरातील ५० ते ६० हजार नागरिकांच्या आरोग्याची तपासणीही सुरु करण्यात आली.  

कोणताही प्रवास न केलेल्या या ६४ वर्षीय व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग नेमका कोणापासून झाला याचा शोध लावण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे होते. कोरोना बाधित व्यक्तीचे कुटुंबीय सदर व्यक्ती गेल्या दोन महिन्यापासून घरामध्येच असल्याचे सांगत होते. या बाधितास मधुमेह, अस्थमा आदी आजार होते. या आजाराचे उपचार  केले जात होते. मागील आठ दिवसात त्यांनी शहरातील पिरबु-हाणनगर येथे आणि सहयोग नगर येथील एका रुग्णालयात उपचारही घेतले होते.  त्यानंतर प्रकृती बिघडल्याने ते पुन्हा खाजगी रुग्णालयात गेले होते. मात्र, त्यांना सदर खाजगी रुग्णालयाने शासकिय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.
त्यानुसार २० एप्रिल रोजी ते नांदेड येथील शासकिय रुग्णालयात दाखल झाले. येथे त्यांचा तातडीने स्वॅब घेण्यात आला. याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर  सदर व्यक्ती   कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले होते.  त्यानंतर सदर पॉझिटिव्ह व्यक्तीच्या घरातील जवळपास १४ व्यक्तींना प्रशासनाच्या वतीने क्वारंटाईन करण्यात आले होते.  त्यानंतर या सर्वांचे स्वॅब तपासणी अहवालही निगेटीव्ह आले. पाठोपाठ या रुग्णाचाही पहिला अहवाल निगेटीव्ह आल्याने नांदेडकरांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र इतर आजाराशी झुंज देत असतानाच गुरुवारी दुपारी या ६४ वर्षीय व्यक्तीचे उपचारादरम्यान निधन झाले.


      कालावधी लॉकडाऊनचा… मासळी उत्पादनाचा…!
       लॉकडाऊन कालावधीत 85.64 क्विंटल उत्पादन
शारिरीक अंतराच्या नियमाचे पालन करीत केली मासेमारी
मत्स्यव्यवसाय विकास विभागाने दिल्या 72 पासेस

बुलडाणा,प्रतिनिधी :-दि. 30 : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. शारिरीक अंतर पाळण्याच्या नियमांची वैयक्तिक आयुष्यातही अंमलबजावणी होत आहे. कोरोनाला थोपविण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. यामुळे अनेक व्यवसाय बंद झाले. त्यामध्ये मासेमारी व्यवसायाचाही समावेश होता. मात्र मत्स्यव्यवसाय विभागाने लॉकडाऊनमधील नियमांचे पालन करीत मच्छिमार सहकारी संस्थांना मासेमारी करण्याची परवानगी दिली. या निर्णयाचा सकारात्मक परिणाम झाला असून कालावधी जरी लॉकडाऊनचा असला तरी मासळी उत्पादनाचा असल्याचा प्रत्यय त्यामुळे येत आहे.बुलडाणा जिल्ह्यात  27 मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी 30 एप्रिल 2020 पर्यंत  तलाव अथवा जलाशयांच्या ठिकाणी मासेमारी करून 85.46 क्विंटल मत्स्योत्पादन घेतले आहे. यावेळी मच्छिमारांनी लॉकडाऊनमधील पाळावयाच्या नियमांचे पालन केले आहे. उत्पादित केलेल्या मासळीची विक्रीही करण्यात आली आहे. तसेच मत्स्यव्यवसाय विभागाच्या जिल्हा कार्यालयाने मासळी पकडणे, मासळीची वाहतूक करणे व विक्री करण्यासाठी 72 पासेस दिल्या आहेत. त्यामुळे मासेमारी करताना मच्छिमार संस्थांना सहजता आली.  लॉकडाऊन कालावधीत 23 मार्च ते आज 30 एप्रिल 2020 पर्यंत जिल्ह्यातील एकूण 100 तलाव अथवा जलाशयांमध्ये मच्छीमार सहकारी संस्था ठेकेदारांपैकी 27 मच्छिमार सहकारी संस्थांनी मासळीचे उत्पादन केले आहे.लॉकडाऊनच्या कालावधीत मासेमारी उत्पादन, वाहतूक व विक्री सुरू असल्यामुळे रोजगाररही उपलब्ध झाले आहेत. मत्स्यव्यवसाय विभागाने केलेल्या कार्यवाहीमुळे रोजगार उपलब्ध होवून मासळीचे उत्पादनही घेण्यात आले. असा दुहेरी उद्देश यशस्वी  झाला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनानेही घेतलेले महत्वाचे निर्णयही कारणीभूत ठरले आहे. मासेमारी करताना तलाव, जलाशयांजवळ शारिरीक अंतर, तोंडाला मास्क किंवा रूमाल बांधण्यात आला. तसेच दाटीवाटीने गर्दी न करता मासे विक्री करण्यात आली.

असे झाले तलाव निहाय मासळीचे उत्पादन जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ते आज 30 एप्रिल पर्यंत विविध तलावांमधून मासळीचे सहकारी मच्छीमार संस्थांनी घेतलेले उत्पादन पुढीलप्रमाणे आहे : मांडवा ता. सिं.राजा : 2.20 क्विंटल, कोराडी ता. मेहकर :  2.53, धनवटपूर ता. मेहकर :  2.77, धानोरी ता. चिखली  :  1.10, लव्हाळा ता. मेहकर : 0.80 क्विं, नळगंगा ता. मोताळा : 12 , दहीद ता. बुलडाणा : 1, पलढग ता. मोताळा : 1.50, व्याघ्रा ता. मोताळा : 1,  धामणगांव बढे ता. मोताळा :  4, पिंप्री गवळी ता. खामगांव : 3.59, गारडगांव ता. खामगांव : 3.50, कंडारी  ता. नांदुरा : 4.50, लांजुड ता. खामगांव : 3.63, पिंपळगांव नाथ ता. मोताळा : 3, येळगांव ता. बुलडाणा : 10, धामणगांव देशमुख  ता. मोताळा : 3, गंधारी ता. लोणार : 1.17, शिवणी जाट ता. लोणार : 0.70, पिंपळनेर ता. लोणार 2.50, झरी ता. बुलडाणा : 3.50, टाकळी ता. खामगांव : 4.90, बोरजवळा ता. खामगांव : 4.10, ब्राम्हणवाडा ता. चिखली : 3, किन्ही मोहदरी ता. चिखली : 1, राजुरा ता. जळगांव जामोद :  3 आणि खळेगांव ता. लोणार : 1.65 क्विंटल उत्पादन घेण्यात आले आहे.  अशाप्रकारे एकूण 85.64 क्विंटल मासळी उत्पादन झाले आहे.
                                                            


  आमदार कैलास गोरंट्याल यांच्या वतीने अन्नछत्र सेवा सुरू.
                  गोर गरीबांसाठी कांग्रेस पार्टी सदैव 
            जनतेच्या सेवेसाठी उभी - कैलास गोरंट्याल


जालना,प्रतिनिधी:-कोरोना महा मारिने जगात थैमान घातल्यामुळे सर्वत्र लोक डाऊन सुरू आहे. अशा परिस्थितीत गरीब लोकांना  हातावरील मजुरांना घराच्या बाहेर पडणे मुश्कील झाले आहे हाताला काम नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे अशा परिस्थितीत आमदार कैलास गोरंट्याल यांनी पुढाकार घेऊन अन्नछत्रसेवा सुरू केली आहे.राज्यात कोरोना या संसंर्गजन्य आजाराच्या पार्श्‍वभुमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व उद्योग व्यवसायासह दैनंदिन कामकाज बंद पडलेले आहेत. त्यामुळे दररोज मोलमजुरी करून आपल्यासह कुटूंबाचा उदनिर्वाह चालविणार्‍या कामगार, मजुर, छोटे-छोटे व्यवसायीक अत्यंत अडचणीत सापडले आहेत. अशा सर्व गरजु लोकांना अन्नाचा पुरवठा करण्यासाठी जालन्याचे आ.कैलास गोरंट्याल आणि नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल यांनी पुढाकार घेत मातोश्री कै. भुदेवी किसनराव गोरंट्याल अन्नछत्रास  सोमवार पासून प्रारंभ केला आहे.मंगळबाजार भागातील मोतीबंगला परिसरात या उपक्रमाचा शुभारंभ आ. कैलास गोरंट्याल यांच्या प्रमुख उपस्थितीत जालन्याचे उद्योजक श्री. नरेंद्र अग्रवाल यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी जालना शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राम सावंत, नगरसेवक महाविर ढक्का, जगदिश भरतिया, रमेश गौरक्षक, संजय भगत, योगेश भोरे, डॉ. विशाल धानुरे, गणेश चौधरी, गोपाल चित्राल, किशोर गरदास,विनोद यादव , योगेश पाटील, दीपक जाधव , पांडुरंग शिंदे , आदी टीम अहोरात्र मेहनत घेऊन करत आहे.
याप्रसंगी बोलतांना आ. गोरंट्याल म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर प्रांरभी राज्यशासनाने लागू केलेली संचारबंदी आणि त्यानंतर केंद्र शासनाने लॉकडाऊनचे दिलेले आदेश यामुळे जालना शहरातील विविध उद्योग आणि कारखाने बंद पडले असून बांधकामासह छोटे व्यवसाय देखील बंद पडलेले आहे. त्यामुळे दररोज मोल मजुरी करून आपला आणि कुटूंबाचा उदनिर्वाह भागविणार्‍या गोर-गरीबांसमोर दररोजच्या अन्नपाण्याचा प्रश्‍न कठीण होऊन बसला आहे. मोबाईल व्हॅनची सुद्धा सुविधा देण्यात आली आहे यामुळे लागेल तेथे जेवण त्वरित पोहचण्याची सुविधा केली जाते.रोज 2 हजार ते अडीच हजार डब्बे देण्यात येणार असल्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांगितले.
आपण संचारबंदी, लॉकडाऊन कालावधीत शहरातील प्रत्येक भागात गोर-गरीब कुटूंबाना नगरसेवक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या माध्यमातून धान्य वाटपासह जालना शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे तयार अन्नाचे पाकीटे वाटप करून गरजुंची भुक भागविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतू येत्या 3 मे पर्यंत लॉकडाऊनचे आदेश असल्यामुळे गरीब कुटूंबासमोरील अन्नधान्याचे संकट अधिकच बिकट असल्याने आपल्या मातोश्री कै. श्रीमती भुदेवी किसनराव गोरंट्याल अन्नछत्राच्या माध्यमातून गरीबांच्या अन्नाची गरज भागविण्याचा प्रयत्न केला जात असून या अन्नछत्राच्या माध्यमातून दररोज अडीच हजार अन्नाचे पाकीट नगरसेवक व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शहरातील गरजुपर्यंत पोहचविले जाणार असल्याचे सांगून आ. गोरंट्याल म्हणाले की, जालना शहराच्या बायपास रस्त्यावरून पाई जाणार्‍या लोकांची अन्नपाण्याची व्यवस्था करण्याच्या lसुचना देखील आ. गोरंटयाल यांनी उपस्थित नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना केला आहेत.

एनएबीएल मान्यताप्राप्त प्रयोगशाळा असलेले स्वारातीम हे भारतातील पहिले विद्यापीठ - पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण

नांदेड (भगवान कांबळे):-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे नव्यानेच कोरोना नमुना स्वॅब तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आलेली आहे. या प्रयोगशाळेत एनएबीएल (नॅशनलअॅक्रेडीयशन बोर्ड ऑफ टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज) मूल्यांकन होऊन मिळवणारे हे भारतातील पहिलेच अकृषी विद्यापीठ आहे. या त्यांच्या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले आणि प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ.गजानन झोरे यांच्यासह त्यांच्या सर्व टीमचे मी अभिनंदन करतो, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले.
त्यांनी आज दि.२९ एप्रिल रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील कोरोना स्वॅब नमुना तपासणी प्रयोगशाळेस भेट देऊन प्रयोगशाळेची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत आ.अमरनाथ राजूरकर, आ.मोहनराव हंबर्डे, कुलगुरू डॉ.उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे, नवोपक्रम, नवसंशोधन आणि सहकार्य मंडळाचे संचालक डॉ.राजाराम माने, प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ.गजानन झोरे, डॉ.शैलेश वाढेर, डॉ.दीपक शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.कोणत्याही प्रयोगशाळेसाठी एनएबीएलची मान्यता असणे ही आवश्यक बाब आहे. हे मूल्यांकन आणि मान्यतेचा काळ हा कमीत कमी सहा महिन्याचा असतो, पण विद्यापीठाच्या या प्रयोगशाळेतील समितीतर्फे फक्त तीन आठवड्यात ही मान्यता मिळविली आहे. या समितीचे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले, प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ.गजानन झोरे, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ प्रो.संजय मोरे, डॉ.सुप्रिया यमेकर, डॉ.शैलेश वाढेर, डॉ.मनमोहन बजाज, संदीप काळे यांची प्रमुख भूमिका होती.दि.२५ आणि २६ एप्रिल रोजी ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या शाळेचे मूल्यांकन दिल्ली येथील समितीमार्फत करण्यात आले.त्यामुळे या दोन दिवसात या प्रयोगशाळेमध्ये कोरोना स्वॅब नमुने तपासण्यात आलेले नाहीत.नांदेड येथील कोरोना स्वॅबचे नमुने यापूर्वी पुणे आणि औरंगाबाद येथे तपासणीसाठी जात होते.त्यावेळी दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधी अहवाल येण्यासाठी लागत असे. ना.अशोकराव चव्हाण,विद्यापीठाचेकुलगुरू डॉ.उद्धव भोसले, डॉ.गजाननझोरे यांच्या संकल्पनेतून आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी अगदी तीन आठवड्यात या प्रयोगशाळेची उभारणी झाली. सद्या दररोज सरासरी १००च्यावर हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांमधून कोरोना स्वॅबचे नमुने येत आहेत. नमुने कमी असल्यामुळे सध्या मॅन्युअल पद्धतीने काम चालू आहे. एक शिफ्ट ही सहा ते सात तासांची असते. त्यामध्ये जास्तीत जास्त २५० नमुन्याची तपासणी करण्यात येते. दुपारी बारा वाजेपर्यंत आलेल्या नमुन्यांचा अहवाल संध्याकाळी सात वाजेपर्यंत देता येतो. दुपारनंतर आलेल्या नमुन्यांचा अहवाल हा दुसऱ्या दिवशी देण्यात येतो, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी या वेळी स्पष्ट केले आहे.
या प्रयोगशाळेमध्ये विद्यापीठातील जैवतंत्रशास्त्र संकुलातील पीएच.डी. आणि पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी सामाजिक बांधिलकी म्हणून आणि स्वच्छेने काम करीत आहेत. यामध्ये व्यंकटेश जाधव, डॉ.सुजाता इंगळे, मनोज रामपुरी, पियुष वालुकर, नेहा भुरे, काजल भोसले, आनंद पवार, दिशा बसवे यांचा समावेश आहे.

बुधवार, २९ एप्रिल, २०२०


          धर्माबाद तालुक्यात विविध कंपनीचा पंचवीस हजार                                रुपयांचा गुटखा साठा जप्त
धर्माबाद (भगवान कांबळे):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशासह धर्माबाद तालुक्यासह लॉकडाऊनची स्थिती असतांनाही एक व्यक्ती प्रतिबंधित केलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या साठा करून अनेक गावो  गावी विक्री करत असल्याच असल्याची माहिती सहाय्यक  पोलीस निरीक्षक अशोक उजगरे यांना मिळाली होती. 

याच माहितीच्या आधारे करखेली येथे दि.28.04.2020 रोजी धर्माबाद पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक श्री सोहन माछरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री  अशोक उजगरे, पोलीस हवालदार भावनगीकर, पोलिस हवालदार नागरगोजे, पोलीस नाईक गिरी, पोलीस कॉन्स्टेबल ढगे, महिला पोलीस कॉन्स्टेबल सोळंके अश्यांना शोध घेतला असता इसम नामे शेख वाजीत शेख अहमद,सय्यद अनिस सय्यद मुदीन दोघे ही राहणार करखेली चे असून आर के , आर जे, सागर,नजर नावाचा कंपन्यांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा अंदाजे  25000/- किमतीचा अवैद्य पणे हस्तगत केल्याची
अवैधपने कब्जात बाळगून विक्री करताना मिळून आले. वरील प्रमाणे  जप्त करून त्या दोघांना ही अटक करून  पुढील कार्यवाही साठी अन्न व प्रशासन अधिकारी नांदेड यांना कळविण्यात आले.  सहायक पोलीस निरीक्षक अशोक उजगरे साहेब याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.


          भोकर नगरपरिषदेकडून पत्रकारांचा सत्कार

नांदेड (भगवान कांबळे ) :- मागील सतत एक महिन्यापासून कोरोना सारख्या महामारी मध्ये कसलीही सुविधा नसताना ग्राउंड लेव्हल वर जाऊन वार्तांकन करणाऱ्या भोकर येथील सर्व पत्रकारांचा नगर परिषदेकडून प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

पत्रकार हा समाजाचा आरसा असतो समाजामध्ये घडणाऱ्या चांगल्या व वाईट घटनांच्या बातम्या तो प्रकर्षाने जगापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे त्यास अनेक संकटांना सामोरे जावे लागते, मागील एका महिन्यापासून संपूर्ण भारतामध्ये कोरोना कोवीड -19 हा आजार सर्वत्र पसरला आहे, त्यामुळे सर्व नागरिकांना सक्तीने घरी बसविण्यात आले असून, लॉक डाऊन करण्यात आले आहे, या आजाराविषयी माहिती, तसेच आपला जिल्हा, आपला तालुका यातील इत्यंभूत माहिती घरी बसलेल्या नागरिकांना पोहोचविण्याची मोठी जबाबदारी तेथील पत्रकार पारपाडत आहेत, तसेच या पत्रकारांकडे कसल्याही प्रकारची पी पी ई किट उपलब्ध नाही, त्यांच्याकडे कसल्याही प्रकारची सुविधा नाही, अशा परिस्थितीत येथील पत्रकार काम करत असल्याने त्यांची दखल घेऊन भोकर नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी प्रियंका टोंगे आणि माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर यांच्या हस्ते आज दिनांक 29 एप्रिल रोजी भोकर येथील नगर परिषदेमध्ये भोकर येथील पस्तीस पत्रकारांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले असल्याने सर्वत्र भोकर नगरपरिषदेचे कौतुक होत आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार  एल ए हिरे , बी आर पांचाळ, बाबुराव पाटील संपादक रमेश गंगासागरे, मनोज गिमेकर, मनोज चव्हाण, राजेेश वाघमारे, जय भीम पाटील, शंकर कदम व इतर पत्रकार यांच्यासह नगर परिषदेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.


ताड़हतगांव येथील 35 वर्षीय युवकास शेतीच्या वादातून मारहाण.
               अंबड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल

अंबड/राहुल कारके : अंबड़ तालुक्यातील ताड़हतगांव येथे असलेल्या अरुण सोनावणे वय 35 वर्ष शेती व्यवसाय करुण पोट भरत दिनांक 28/04/20202 रोजी दु.12.30 वाजेच्या दरम्यान अरुण सोनावणे हा आपल्या गायराण शेती मध्ये उभा असतांना आरोपी नामे
तुकाराम चांभार, अशोक चांभार, घन्शिराम चांभार हे आमच्या गायराण जमिनीच्या शेजारी असलेल्या व तसेच अरुण सोनवणे याला शेतात बोलावून हे गायराण आमचे आहे व तु इथे काय करतोस असे म्हणून शिविगाळ करुण तुकाराम चांभार याने काहीतरी बोथट वस्तुने अरुण सोनावणे च्या डाव्या हातावर मरल्याने डाव्या हताच्या मनगटा जवळ मार लागला आहे. तसेच अशोक व घन्शिराम याने थापडबुकीने मारहाण केली असून अशोक चांभार याने जीवे मरण्याची धमकी दिली. फिर्यादी अरुण सोनावणे याने पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार दाखल केली आहे.


            दुर्दम्य इच्छाशक्ती व उपचाराच्या जोरावर
   कोरोनावर मात करत शिरोडा येथील महिला परतली स्वगृही

जालना,प्रतिनिधी:-संपुर्ण जगात कोरोना विषाणुने दहशत माजवत संपुर्ण जगाला आपल्या कवेत घेत आहे.  मृत्यूचे भय काय असते हे मी जवळुन अनुभवले. परंतु दुर्दम्य इच्छाशक्ती व वैद्यकीय उपचाराच्या जोरावर मी आज कोरोनामुक्त होऊन मी माझ्या स्वगृही परतत असल्याचा आनंद गगनात मावत नसल्याची प्रतिक्रिया परतुर तालुक्यातील शिरोडा या गावातील कोरोनामुक्त महिलेने व्यक्त केली आहे. मी कोरोना बाधित झाल्याचे आढळून आले तेव्हा माझ्यातील आत्मविश्वास कमी झाला होता. मला चार मुली आणि एक मुलगा असुन त्यांच्या भविष्याचे काय होईल, ही चिंता माझ्यासमोर उभी राहीली.  परंतु  येथील आरोग्य यंत्रणेने माझ्या आजारावर उपचार करण्याबरोबर मला मानसिकरित्या देखील सक्षम केले. त्यामुळेचं मी आज कोरोनासोबतचे युध्द जिंकू शकले आहे. त्यामुळे आजच्या माझ्या आनंदाचे श्रेय हे संपुर्ण आरोग्य यंत्रणेला असल्याची भावनाही महिलेने व्यक्त केली. परतुर तालुक्यातील मौजे शिरोडा येथील महिलेस दि. 13 एप्रिल,2020 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे खोकला व ताप या आजाराचा उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. महिलेला 6 एप्रिलपासुन ताप व खोकला होता. 6 एप्रिल रोजी महिलेने परतुर व 10 ते 13 एप्रिल दरम्यान जालना येथील खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते. 

 जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे दाखल झाल्यास दि. 13 एप्रिल रोजी महिलेच्या स्वॅबचा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात  आला होता.दि. 14 एप्रिल रोजी त्याचा अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाला मात्र महिलेच्या स्वॅबचा  दुसऱ्यांदा पाठविण्यात आलेल्या नमुन्याचा अहवाल दि.21 एप्रिल, 2020 रोजी रात्री 10.00 वाजता पॉझिटीव्ह प्राप्त झाला होता.  महिलेला तातडीने आयसोलेशन कक्षामध्ये दाखल करत उपचार सुरु करण्यात आले.राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी तातडीने पाऊले उचलत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांच्या नेतृत्वाखाली शिरोडा गावातील व्यक्तींच्या तपासणीसाठी आरोग्यपथके गठित करुन 80 कुटूंबातील 560 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड व त्यांच्या अधिपत्याखाली सर्व डॉक्टर्स, नर्स, ब्रदर्स यांच्या अथक परिश्रमातुन महिलेवर उपचार केल्यामुळे शिरोडा गावातील महिलेचा अहवाल सलग दोनवेळेस निगेटीव्ह आल्याने आज दि. 29 एप्रिल रोजी जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून बरे झालेल्या महिला रूग्णांस स्वगृही पाठवले.कोरोनाच्या या जीवघेण्या आजारातून वाचलेल्या कोरोना निगेटीव्ह रुग्ण महिलेचा चेहरा आनंदीत होता. आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्सेस यांचे आभारही महिलेले यावेळी मानले. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी अजूनही लॉकडाऊनचे पालन करावे, घरातून विनाकारण बाहेर पडू नये. सर्वांनी मास्क किंवा स्वच्छ हात रूमाल चेहऱ्यावर ठेवावा. अनावश्यक बाहेर न पडता घरातच रहावे, असे आवाहन कोरोनामुक्त महिलेने यावेळी केले.

मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

परतूर नगर परिषदेने शहरात गर्दीच्या ठिकाणी हात धुण्यासाठी नळ आणि सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध करावी-प्रकाश सोळंके

परतूर /प्रतिनिधी-सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचा फैलाव जोमाने होत आहे.नागरिकांनी घरात बसावे, घराबाहेर पडू नये असे आवाहन वेळोवेळी करण्यात येत आहे.तरी पण आवश्यक कामासाठी नागरिक घराबाहेर पडत असल्याने रस्त्यावर गर्दी दिसून येत आहे त्यामुळे नगर पालिका प्रशासनाने शहरात नागरिकांना हात धुण्यासाठी नळ आणि सॅनिटायझर ची 
 उपलब्ध करून द्यावी याकरिता मनसे चे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी आज दि.२८ रोजी नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे. मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील आष्टी रेल्वे गेट,साईबाबा मंदिर चौक, पारडगाव रोड,आंबा रोड या रस्त्याने बाहेर गावची वाहने आणि लोक शहरात प्रवेश करतात.या ठिकाणी हात धुण्यासाठी पाण्याचे नळ आणि सॅनिटायझर ची सोय करण्यात आली तर येणारे नागरिक हात धुवूनच शहरात प्रवेश करतील.त्यामुळे स्वच्छता राहून कोरोना विषाणूचा संसर्ग टाळता येण्यास मदत होईल.तसेच महादेव मंदिर चौक,बाजार समिती मैदान (मोंढा) आणि इतर गर्दीच्या ठिकाणी अशी हात धुण्यासाठी सोय करण्यात यावी जेणे करून कोरोनाचा फैलाव होणार नाही.तरी,नगर पालिका प्रशासनाने तात्काळ परतूर शहरात गर्दीच्या ठिकाणी हात धुण्यासाठी पाणी, सॅनिटायझर उपलब्ध करून या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेगवेगळ्या उपाय योजना कराव्यात.
धर्माबाद तालुक्यात ब-याच दिवसांपासून वडाफोन/ आयडिया  कंपनी ची सेवा विस्कळीत असल्याने  नागरिकांचा जीव मेटाकुटीस

र्माबाद (भगवान कांबळे ) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण नागरिकांची स्थिती बंदिस्तसारखी झाल्यामुळे आधीच नागरिकांचा जीव मेटाकुटीस आला आहे.अशा परिस्थितीत नागरिकांना घरात सवडीचा वेळ असल्याने फोनवरून मित्र-मैत्रिणी नातेवाईक इष्टमित्रांसह संपर्क साधून सर्वांचे कुशलता विचारणे कोणी आजारी असल्यास त्याची विचारपूस करणे आणि आपण जवळ नसलो तरी एकमेकांच्या सुख,दुःखात सहभागी आहोत याची जाणीव करून देण्यासाठी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून वार्तालाप करणे महत्त्वाचे असते.एवढेच  नाही तर आता 4 G इंटरनेट सेवेद्वारे घरातील सर्व सदस्यांना मनोरंजनासाठी स्मार्टफोन हाच महत्वाचा दुवा आहे. स्मार्टफोन द्वारेच मनोरंजन सोबतच विद्यार्थ्यांना अनेक शाळांमधील शिक्षकगण ऑनलाइन पद्धतीने इंटरनेट द्वारे शिक्षण देत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सिमेवर आसले पोलिस कर्मचारी तेथे काम करीत आहेत व त्यांच्या कडील माहिती व इतर वरिष्ठांनी 

पाठवली माहिती लवकर समजत नसल्याने धर्माबाद चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सन्नगले हे आयडीया व वडाफोन कंपनी वर नाराजगी व्यक्त करित केली आहे.  राज्य सिमेच्या परिसरात वडाफोन /आयडिया कंपनी ची सेवा कधी सुरू कधी बंद कधी नेटवर्क कमी  जास्त होत आहे . दोन मिनिटांसाठी जरी लाईन गेली तरी बरेच तास मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद राहणे,  कधी पावर प्लांट बंद पडणे, वरून डिझेल मिळत नसल्याची तक्रार, इत्यादी शेकडो कारणांमुळे वारंवार येथील दोन्ही कंपनीची सेवा बंदच राहत आहे .
कोरोनाच्या आपत्तीमध्ये लॉकडाऊनच्या काळातही  वडाफोन आयडिया कंपनी च्या टॉवर्सची मोबाईल आणि 4G इंटरनेट सेवा सतत बंद चालू होत असल्यामुळे  ग्राहकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. वरिष्ठ  अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन वारंवार बीएसएनएलची सेवा बंद पडण्याचे प्रकार थांबवावे अशी मागणी त्रस्त ग्राहक करीत आहेत.

         लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीनंतर निघाला तोडगा
पेट्रोल पंपावर पोलीस नियुक्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

जालना (प्रतिनिधी):- लाॅकडाऊन काळात प्रशासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या नियमावलीमुळे पेट्रोलपंप चालकांची मात्र इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली आहे. त्यातच प्रशासनाकडून वेगवेगळ्या ठिकाणी वाहनधारकांना पास दिल्या जात असल्याने तसेच प्रशासन व पोलीस यांच्यात
योग्य समन्वय नसल्याने अनेक पेट्रोलपंप चालकांचा गोंधळ उडाला होता. मात्र लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीनंतर अखेर जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी प्रत्येक पेट्रोल पंपावर एक पोलीस नियुक्त करण्याचे आश्वासन दिल्याने पंपचालकांना दिलासा मिळेला आहे.लाॅक डाऊन काळात प्रशासनाने पेट्रोलपंप चालकांसाठी वेळोवेळी नियमावली जाहीर केली आहे. यात अत्यावश्यक सेवेत येणारी वाहने, पास दिलेली वाहने व शेतकरी यांना वेळोवेळी इंधन पुरवठा करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यात पेट्रोल पंप सुरु ठेवण्याची वेळही प्रशासनाने ठरवून दिली आहे. परंतु अनेक ठिकाणी कमी कामगारावर पेट्रोल पंपाचे कामकाज सुरु असुन इंधन भरण्यासाठी येणाऱ्या वाहनाधारकांचे पास बघुन इंधन देणे शक्य नसल्याचे बोलले जात आहे. तर काही ठिकाणी पोलीसांकडून नाहक त्रास होत असल्याच्या तक्रारी देखील पेट्रोलपंप चालकांनी केल्या आहेत.हाच तक्रारींचा पाढा घेऊन पेट्रोल पंप असोसिएशनचे प्रतिनिधी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, आमदार कैलास गोरंट्याल व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे गेले होते. त्यांच्या सर्व समस्या त्यांनी या लोक प्रतिनिधींना सांगीतल्यानंतर अखेर पेट्रोल पंप चालक व प्रशासन यांच्यात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, आमदार कैलास गोरंट्याल व माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी मध्यस्ती करुन सुवर्ण मध्य काढण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांना दिल्या. यानंतर जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी सोमवारी (ता.27) पंपावर पास तपासणीसाठी पोलीस नियुक्त करण्याचे आश्वासन दिले अशी माहिती विरेन पटेल यांनी दिली. त्यामुळे सत्यनारायण तोतला, बंडुभाऊ मिश्रीकोटकर, इंद्रसेठ तवरावाला, विरेन पटेल, दिलीप मोरे या शिष्टमंडळाच्या मागणीला अखेर यश आले आहे.

रविवार, २६ एप्रिल, २०२०


घनसांवगी तालुक्यातील ढाकेफळ येथील भूमिहीन मजूर विधवा अपंग  70 गरजूंना राशन किट वाटप

सामाजिक कार्यकर्ते संदीप येडे व कपिल सरोदे यांचा पुढाकार

घनसांवगी,प्रतिनिधी :- जगामध्ये कोरोना ने थैमान माजल्यामुळे  सध्या जगात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण भारतात लॉक
डाऊन सुरू आहे .अशा परिस्थितीत संपूर्ण भारत बंद आहे.अशा परिस्थितीमध्ये हातावरील मजुरांना बाहेर निघणे शक्य नाही त्यांच्या हाताला काम नाही त्यांची उपासमार होत असल्यामुळे घनसां वगी तालुक्यातील ढाकेफळ येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप येडे व कपिल सरोदे या दानशूरांनी पुढाकार करून भूमिहीन मजूर विधवा अपंग अशा कुटुंबांना राशन किट वाटप केली.


    अन्नधान्याच्या तक्रारींच्या निरसनासाठी भरारी पथक गठित

जालना,प्रतिनिधी:- स्वस्तधान्य दुकानदारांबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. त्याअनुषंगाने अन्नधान्याबाबत होणाऱ्य गैरव्यवहाराबाबतच्या 
या पथकाचे प्रमुख म्हणुन संतोष बनकर, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी यांची नियुक्ती केली असुन त्यांचा भ्रमणध्वनी क्र. 9689001149, सदस्य म्हणून तपासणी अधिकारी  पी.सी. उघडे-9422226748, पुरवठा निरीक्षक जी.एस. मोरे-9763740430, पुरवठा निरीक्षक आर.एम. निहाळ-9422721526 यांचा समावेश असल्याचे आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहेत क्रारींचे निरसन करण्यासाठी जिल्हास्तरावर भरारी पथक गठित करण्यात आले असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसैय्ये यांनी एका आदेशान्वये कळविले आहे.


दु:खीनगर व शिरोडा येथील महिलांच्या स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह

  जालना,प्रतिनिधी:- जालना शहरातील दु:खी नगर येथील 65 वर्षीय महिला व शिरोडा ता. परतुर येथील 39 वर्षीय महिलांचे शेवटचे दोन स्वॅब (24 तास अंतराचे) निगेटीव्ह आले असुन दु:खीनगर येथील कोरोनाग्रस्त महिलेची 
प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहे.जिल्ह्यात एकुण 916  व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 93 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 595 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 25 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 793 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने -00 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 02 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 757, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 104, एकुण प्रलंबित नमुने-27 तर एकुण 502 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 02, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 317 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या 02, सध्या अलगीकरण  केलेल्या व्यक्ती -273, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-24, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या 93, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या 24, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 151 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 273 एवढी झाली असुन यामध्ये संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह, जालना – 48, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह-41, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-18, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-14, पोलीस प्रशिक्षण केंद्र-101, मंठा येथे 13 तर गुरुगणेश भवन, जालना येथे 38 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 386 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 62 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 461 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 59 हजार 400 असा एकुण 2 लाख 86 हजार 208 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे परजिल्ह्यात अडकुन पडलेल्या ऊसतोड कामगारांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात येत असुन दि. 25 एप्रिल, 2020 रोजी बदनापुर तालुक्यामध्ये बीड येथुन 11 व पुणे येथुन 28 एकुण 39 कामगार, परतुर तालुक्यात सांगली येथुन 51 व कोल्हापुर 37 एकुण 88 कामगार, मंठा तालुक्यात सांगली-72 कोल्हापुर 19, व सातारा येथुन 6 असे एकुण 97 कामगार, घनसावंगी तालुक्यात सांगली-63, कोल्हापुर-43 व सातारा-85 असे एकुण 191 कामगार, तर अंबड तालुक्यात बीड-25, पुणे-17,  सांगली 113, कोल्हापुर-83, सातारा-133, सोलापुर-49 व लातुर येथुन 02 असे एकुण 422 कामगार दाखल झाले आहेत.


महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन.


जालना,प्रतिनिधी :- महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात तहसिलदार संतोष बनकर यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी माहिती सहाय्यक अमोल महाजन, श्रीमती आर.आर. महाजन,श्रीमती संपदा कुलकर्णी, श्रीमती छाया कुलकर्णी आदींनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.


धामनगांव प्रकरणी तात्काळ गुन्हे दाखल करून आरोपींना तात्काळ अटक करा- दीपक डोके
                                                  
जालना (प्रतिनिधी) :- बदनापूर तालुक्यातील धामणगाव येथे लॉकडाउन चा फायदा घेऊन जमीनीवर अतिक्रमण करुन बौद्ध तरुणांना गावातील गावगुंडांनी  बेदम मारहाण केली, ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न केला, 
धामणगाव शिवारात शासनाने मागासवर्गीयांना महारहडुळ 12 एकर जमीन पोट भरण्यासाठी दिलेली आहे. त्यावर गावातल्या  जातीयवादि गावगुंडांनी अतिक्रमण  केले आहे. जमीन कसत असलेले  तरुण जाब विचारायला गेले असता त्यांना बेदम मारहाण  करून अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला आहे. सदरिल प्रकरणी पिडीतांनी तक्रार देऊन 10 दिवस झाले तरी कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, तरी पोलिस प्रशासनाने  तात्काळ संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हा पदाधिकारी दीपक डोके, अशोक खरात,अकबर इनामदार, विष्णु खरात, दिपक घोरपडे, अँड.कैलास रत्नपारखे,प्रकाश मगरे, संतोष शेळके, रविराज वाहुळ, सुरेंद्र तुपे,न्यानेश्वर बोबडे, राहुल तुपे,हरिष बोर्डे, सचिन पट्टेकर यांनी केले आहे.



वाहेगाव सातारा ग्रामपंचायतच्या वतीने पंधराशे मास्क व पाचशे सेनिटायजर वाटप
परतुर,प्रतिनिधी/प्रशांत वाकळे :- वाहेगाव सातारा येथील ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामविकास अधिकारी दडमल साहेब यांच्या हस्ते पंधराशे मास्क व पाचशे सेनिटायजर चे वाटप  करण्यात आले.परतुर तालुक्यातील वाहेगाव 
सातारा गावातील नागरिकांना मास्क व सेनिटायजर वापरा विषयी माहीती देण्यात आली.व तसेच गावातील तरुणांनी कोरोना विषयी जनजागृती करण्यासाठी एक टिम तयार करण्यात आली व ती टीम दिवस रात्र गावास पाहारा देण्याचे काम करत आहे. कोरोना विरुध्दच्या लढाईमध्ये मोलाची भुमीका बजावत आहे.कोरोणा पासुन स्वताच्या संरक्षणासाठी ग्रामपंचायतच्या वतीने सोसल डिस्टिंगचे पालन करत मास्क व सेनिटायजर चे वाटप करण्यात आले.यावेळी ग्रामविकास अधिकारी दडमल,सरपंच अमोल काटे,उपसरपंच रोहन वाघमारे,मा.सरपंच औंकार काटे,सुनिल काटे,सुहाष वाघमारे,विनोद वाघमारे,अगणवाडी सेवीका,आशा कार्यकर्ते आणि गावातील नागरिक ऊपस्तीत होते.

शहरातील 25 हजार पेक्षा अधिक कुटूंबापर्यंत धान्य पुरवठा करून           गोरंट्याल दाम्पत्याने जोपासली सामाजिक बांधीलकी
धान्याची गरज असलेल्या कुटूंबांसाठी मोबाईल पथक नियुक्त; गरजुंनी संपर्क साधल्यास पथक करणार मदत -- आ. कैलास गोरंट्याल

जालना,(प्रतिनिधी):-कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन कालावधीत जालना शहरातील 25 हजार पेक्षा अधिक गोर-गरीब आणि गरजु कुटूंबापर्यंत अन्न धान्याच्या माध्यमातून मदतीचा हात देत जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल आणि नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंटयाल यांनी गोरंट्याल परिवाराच्या सामाजिक कार्याची बांधिलकी जोपासण्याची परंपरा कायम राखली आहे. दरम्यान अन्नधान्या संदर्भात गरजु कुटूंबापर्यंत मदत पोहचविण्यासाठी आमदार गोरंट्याल यांनी मोबाईल पथक नियुक्त केले असून या पथकातील सदस्य गरजु कुटूंबांना धान्यासह शिजवलेले अन्न पोहचवून त्यांची भुक भागविण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.
महाराष्ट्रासह संपुर्ण देशभरात कोरोना या संसंर्गजन्य आजाराने गेल्या दोन महिण्यापासून थैमान घातले असून या पार्श्‍वभुमीवर प्रथम राज्यशासनाने राज्यात 24 ते 31 मार्च या कालावधीत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. राज्यशासनाच्या या निर्णया पाठोपाठ केंद्र शासनाने देखील दि. 25 मार्च पासून देशभरात लॉकडाऊनचे आदेश दिलेले असून या आदेशात पुढे वाढ करून दि. 3 मे पर्यंत लॉकडाऊनचे आदेश कायम ठेवले आहे. त्यामुळे दररोज मोलमजुरी करून आपला आणि कुटूंबीयांचा उदरनिर्वाह भागवणार्‍या कामगारांसह मजुरांची मोठी कुचंबना झाली असून काम नसल्यामुळे रोजंदारी बुडत असतांना दुसरीकडे अन्नधान्याचा देखील प्रश्‍न निर्माण झाल्यामुळे जालना शहरातील हजारो कुटूंब आणि या कुटूंबातील सदस्यांवर उपासमारीची वेळ येवून ठेपली होती. कै. किसनराव गोरंट्याल यांच्या प्रेरणेतून सामाजिक कार्याचा वारसा लाभलेले जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल आणि नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल या दाम्पत्याने गोरंट्याल परिवाराच्या सामाजिक कार्याची ही परंपरा लॉकडाऊन कालावधीत कायम राखत जालना शहरातील गोर-गरीब व गरजु असलेल्या 25 हजार पेक्षा अधिक कुटूंबांना अन्नधान्यासह शिजवलेल्या अन्नाचा पुरवठा करून संकटकाळी मदतीचा हात पुढे केला आहे. दि. 09 एप्रिल रोजी आ. कैलास गोरंट्याल यांचा वाढदिवस असल्याने सर्व कार्यक्रमांना फाटा देत आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधुन आ. गोरंट्याल यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी शहरातील गरजु कुटूंबापर्यंत जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. जालना शहर व जिल्हा काँग्रेस तर्फे जालना शहरातील गरजु कुटूंबांना पुरीभाजी, पुलाव आदी शिजवलेले अन्न पुरवुन त्यांची भुक भागविण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय जालना नगर पालिकेतील स्वच्छता विभागाचे कर्मचारी कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर आपल्या जीवाची पर्वा न करता दररोज साफ-सफाईच्या कामासाठी कार्यरत असल्यामुळे या कार्याची दखल घेवून गोरंट्याल परिवाराच्या वतीने सर्व स्वच्छता कर्मचार्‍यांना दररोज नाष्टा पुरविण्याचे काम केले जात आहे. शहरातील गरजु कुटूंबांची धान्याची गरज लक्षात घेवून आ. गोरंट्याल यांनी एक मोबाईल पथक नियुक्त केले असून शहरातील कोणत्याही भागातून आ. गोरंट्याल यांना अन्नधान्याबाबत मागणी झाल्यास या मोबाईल पथकातील सदस्यांच्या माध्यमातून गरजु कुटूंबापर्यंत धान्य पुरवठा करून त्यांची अडचण दुर करण्याचा प्रयत्न प्राधान्य क्रमाने केली जात आहे.शहरातील ज्या भागातील गरजु कुटूंबांना अन्नधान्याची अडचण असेल अशा कुटूंबातील सदस्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांशी संपर्क साधून त्यांच्यापर्यंत आपल्या अडचणी मांडल्यास या बाबत निश्‍चीतपणे दखल घेवून गरजवंतापर्यंत धान्य पुरवठा करण्याचे काम करण्यात येईल अशी ग्वाही आ. कैलास गोरंट्याल व नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल यांनी दिली आहे.
आजपासून कै. भुदेवी गोरंट्याल अन्नछत्रास प्रारंभ
जालना शहरातील सामाजिक चळवळीत आपले वडील कै. किसनराव गोरंट्याल आणि मातोश्री कै. भुदेवी गोरंट्याल यांनी सातत्याने सहभाग नोंदवून अडचणीच्या काळात गोर-गरीब कुटूंबीयांना मदत करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याचा वारसा गोरंट्याल परिवाराने अखंडपणे सुरूच ठेवला असून कोरोना या संसंर्गजन्य आजाराच्या पार्श्‍वभुमीवर देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जालना शहरातील हजारो कुटूंब आणि या कुटूंबातील सदस्यांना अन्नधान्यासह शिजविलेल्या अन्नाचा पुरवठा करण्यासाठी गोरंट्याल दाम्पत्याने पुढाकार घेतला आहे. गरीब लोकांची भुक भागविण्यासाठी मातोश्री कै. भुदेवी किसनराव गोरंट्याल अन्नछत्रास उद्या दि. 27 एप्रिल सोमवार पासून शहरात प्रारंभ करण्यात येत असून या अन्नछत्राच्या माध्यमातून दररोज किमान 2500 हजार लोकांपर्यंत शिजविलेले अन्न पुरविण्यात येणार असल्याची माहिती आ. गोरंट्याल यांनी दिली आहे. चपाती-भाजी, पुरी-भाजी, पुलाव अशा पद्धतीने दररोज वेगवेगळे शिजविलेले अन्न पुरवून गरजु लोकांच्या पोटाची भुक भागविण्याचा प्रयत्न सर्व नगरसेवक आणि पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
          पोलीसांना शरबत पाजून साजरा केला वाढदिवस
               ग्रीष्मा नखाते हिचा कौतुकास्पद ऊपक्रम


 जालना,प्रतिनिधी :- लाॕक डाऊनच्या  काळात पोलिस कर्मचाऱ्यांना रणरणत्या उन्हात कर्तव्य बजावणे लागत आहे. जेथे आहे तेथेच दिवस दिवसभर लोकांची काळजी
घेण्यासाठी उभे राहावे लागत आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे अंगरक्षक श्री वर्मा साहेब यांची भासी ग्रीष्मा नखाते हिने आपल्या वाढदिवसानिमित्त गांधीचमन येथे पोलिस कर्मचार्‍यांना शरबत वाटप केले. सध्या पोलिस प्रशासनातील कर्मचारी नागरिकांचे अहोरात्र काळजी घेण्याचे काम करीत आहेत. अशातच आपण सुद्धा छोटीशी मदत किंवा काळजी घेतली पाहिजे, या हेतूने ग्रीष्मा नखाते हिने पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या वाढदिवसानिमित्त सरबत वाटप केले.या वेळी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भाले यांच्यासोबत शेळके साहेब, पाटोळे साहेब, ढिलपे साहेब, इत्यादी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
               गरजूंना फळ फ्रूट आणि भाजीपाला वाटप

जालना (प्रतिनिधी):-जालना येथे कोरोणाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातील नागरिकांनी नियमांचे पालन करून शासनाला सहकार्य करत आहे . परंतु 
यामध्ये शेतकऱ्याच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने त्यांचा माल विकत घेऊन तो गरीब लोकांना वाटप करण्यात येत आहे. भोकरदन नाका येथील दगडी मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांना मराठवाडा पाणी परिषद आणि जनविकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, क्रांतिसिंह बहुउद्देशिय सेवाभावी संस्था आणि नवजीवन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या तर्फे फळ फ्रूट आणि भाजीपाला वाटण्यात आले असून हा उपक्रम मराठवाडा पाणी परिषदे तर्फे संपूर्ण मराठवाड्यात हा उपक्रम घेण्यात आला असून
यावेळी मराठवाडा पाणी परिषदेचे जिल्हा अध्यक्ष एम. डी. सरोदे,संस्थेचे अध्यक्ष विष्णू पिवळ संस्थेचे अध्यक्ष गणेश गव्हाणे,सचिव ज्योती आडेकर मॅडम व सहसचिव विद्या जाधव यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

जालना जिल्ह्यातील सर्व धंदे टप्प्याटप्प्याने सुरू करावे - प्रकाश सोळंके

प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदना मार्फत मागणी.

जालना,प्रतिनिधी :- महाराष्ट्रात येणारे आर्थिक संकट लक्षात घेऊन महाराष्ट्रातील ग्रीन झोन,ऑरेंज झोन,मध्यद्योगधंदे टप्प्याटप्प्यानं चालू करा अशी मुख्यमंत्री कार्यालयास सूचना, मनसे अध्यक्ष मा श्री राज साहेब ठाकरे यांनी 
केलेली आहे.व तसेच जालना जिल्ह्यात जालना शहरात औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) मध्ये मोठ्या प्रमाणात, स्टील उद्योग कारखाने आहेत, तसेच जालना जिल्ह्यातील,वाईन शॉप बिर शॉप, खानावळ व सर्वच धंदे टप्प्याटप्प्याने चालू करा अशी मागणी मनसे जालना जिल्हा अध्यक्ष प्रकाश सोळंके माननीय मुख्यमंत्री महोदय यांना निवेदनाद्वारे केली आहे.
जालना जिल्ह्यातील जालना शहरात औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) मध्ये स्टील उद्योग मोठ्याप्रमाणात कारखाने आहेत,व जालना जिल्ह्यातील वाईन शॉप बिर शॉप व इतर सर्वच धंदे टप्प्याटप्प्याने चालवण्यासाठी परवानगी द्यावी, कारण जालना जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असल्यामुळे जिल्ह्यात,दोन कोरोना बाधित पेशंट आहेत, एक महिला पेशंट दुखी नगर जालना,तर दुसरा महिला पेशंट शिरोडा ता, परतुर येथील आहे, थोडे चिंतेची गोष्ट आहे शिरोडा ता परतुर येथील महिला पेशंटची प्रवास पार्श्वभूमी ( हिस्ट्री ) लोकांना स्पष्ट माहिती न मिळाल्यामुळे थोडी चिंता आहे, कारण शिरोडा ता परतुर येथील या महिला पेशंटला कोरोना लागन कशी झाली, कोठे झाले, हि अध्याप अधिकृत माहिती जाहीर न झाल्यामुळे प्रत्येकाच्या मनात चिंता आहे, शिरोडा ता परतुर येथील या महिला पेशंट सोबत संपर्कात आलेल्या बऱ्याच लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे काळजी करण्याची गरज वाटत नाही, परंतु ट्रॅव्हल हिस्ट्री नाही मग लागन कशी झाली हे समोर आल्यास जनता चिंतामुक्त होईल, हिच गोष्टी सोडली तर जालना जिल्ह्यात आठ हि  तालुक्यात अनेक उद्योगधंदे, वाईन शॉप,बिर शॉप, खानावळ हळू हळू टप्प्याटप्प्याने सगळेच छोटे मोठे धंदे चालू करण्यास हरकत नाही, कारण येणारे आर्थिक संकट बघता काही गोष्टी कोरणा सारख्या साथीच्या रोगाचे नियम बंधन सोशल डिस्टन्स पाळून व्यवहार चालू करण्यास हरकत नाहीत, तसेच येणारे आर्थिक संकट कोणालाही परवडणार नाही, म्हणून सर्वच उद्योगधंदे हळू हळू टप्प्याटप्प्याने जालना जिल्ह्यात चालू केल्यास आर्थिक संकटाला तोंड देण्याचे संकट निर्माण होणार नाही याची काळजी घेऊन पुढील व्यवहार चालू करावे जालना शहरात स्टील उद्योग मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्याठिकाणी सर्व नियमाचे पालन करेल सोशल डिस्टन्स या कारखाने चालू करण्यास हरकत नाही याठिकाणी स्टील उद्योगातील स्टील असोशियन यांच्यासोबत चर्चा करून हा उद्योग चालू करण्यास हरकत नाही कारण या उद्योग चालू करण्यासाठी कामगार सुद्धा जालना शहरात थांबून आहेत.मनसे अध्यक्ष मा श्री राज साहेब ठाकरे यांनी येणारे आर्थिक संकट लक्षात घेऊन सर्वच उद्योगधंदे टप्प्याटप्प्याने,वाईन शॉप,बियर शॉप, खानावळ चालू करण्यास आपणास मुख्यमंत्री कार्यालयास पत्र देऊन सूचना केलेली आहे, आपण लवकरात लवकर हे सर्व उद्योगधंदे टप्प्याटप्प्याने चालू करण्यासाठी परवानगी द्यावी हीच जनतेची अपेक्षा आहे.तरी- मुख्यमंत्री साहेबांनी येणारे आर्थिक संकट लक्षात घेऊन, जालना जिल्ह्या ऑरेंज झोन मध्ये, असल्यामुळे, जालना शहरात औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) स्टील उद्योग, मोठ्याप्रमाणात कारखाने आहेत, व वाईन शॉप,बिअर शॉप,खानावळ, सोशल डिस्टन ठेवून व नेमाचे पालन, करून हे सर्व उद्योग चालू केल्यास मोठ्या प्रमाणात राज्य सरकारला महसूल उपलब्ध होईल, येणारे आर्थिक संकट टळले,म्हणून उद्योगधंदे करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी प्रकाश
सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष यांनी निवेदनात केेली आहे.
                 

शनिवार, २५ एप्रिल, २०२०

नांदेडमध्ये 'कोरोना व्हायरस' आला कोठून ? पहिल्या रुग्णाच्या 'सोर्स'चा शोध लागेना

आरोग्य  यंत्रणेसह प्रशासनही चक्रावले,पोलिसी पद्धतीने होणार तपास

नांदेड (भगवान कांबळे):- नांदेडमध्ये सापडलेल्या पहिल्या  कोरोनाच्या  रुग्णाला  हा  संसर्ग  नेमका  कुठून  झाला  याचा  शोध 72  तासानंतरही  लागला  नाही. परिणामी  आरोग्य  यंत्रणेसह प्रशासनही चक्रावले  आहे.नांदेडमध्ये  बुधवारी  पीरबुरहाननगर भागात एक 64 वर्षीय  व्यक्तीला  कोरोना झाल्याचे उघड़ झाले.  ही  बाब  समजताच महीनाभरापासून 
कोरोनाची  तटबंदी  करणाऱ्या  प्रशासनाला मोठा  धक्का  बसला. पीरबुरहाननगर परिसराला  कन्टेनमेंट झोन  म्हणून  घोषीत केल्यानंतर  पोलीस व  आरोग्य  विभागाने 3 किमी चा  परिसर आपल्या  ताब्यात  घेतला. कोरोना रुग्णाचे  जवळपास 14 कुटुंबीय आणि  संपर्कातील इतर 30 ते 35 जणांना विलगीकरण केले. त्यांचे  स्वॅबही  घेण्यात  आले. व 'त्या' कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील 38 नातेवाईकांचे अहवाल निगेटिव्ह ही आला आहे . सदर रुग्णाला  कोरोनाची  लागण  नेमकी  कुठून  झाली  हा प्रश्न  मात्र  अद्यापही  अनुत्तरीतच आहे. कोरोना बाधित व्यक्ति हा  दोन महिन्यांपासून घरातच असल्याचे सांगत आहेत. सदर रुग्णावर  2 खाजगी रुग्णालयात 8 दिवसांपूर्वी उपचार करण्यात  आले  होते. ते  दोन्ही  रुग्णालय  सील  करण्यात आले आहेत. त्या  रुग्णालयाच्या  डॉक्टरलाही क्वारंटाइन केले आहे. एकूणच नांदेडच्या त्या  पहिल्या कोरोना  रुग्णाला लागण नेमकी  कुठून  झाली  याचा शोध घेण्याचे आव्हान उभे राहिले आहे. विशेष म्हणजे  पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनीही आता पोलिसी पद्धतीने माहिती  घेतली जाईल  असे ते स्पष्ट  केले आहे  .शहरातील  इतर भागात कोरोना पसरु नये यासाठी महापालिका युद्धपातळीवर उपाययोजना करत असल्याचेही  स्पष्ट केले. दरम्यान, शहरातील भाग्यनगर भागही सील करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.
परजिल्ह्यात अडकुन पडलेल्या ऊसतोड कामगारांना जिल्ह्यात प्रवेश सुरु



आजपर्यंत 862 ऊसतोड कामगार जालना जिल्ह्यात दाखल

जालना, प्रतिनिधी:-  लॉकडाऊनमुळे परजिल्ह्यात अडकुन पडलेल्या ऊसतोड कामगारांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात येत असुन दि. 25 एप्रिल, 2020 पर्यंत एकुण 862 ऊसतोड कामागारांना जिल्ह्यामध्ये आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.बदनापुर तालुक्यामध्ये बीड येथुन 11 व पुणे येथुन 28 एकुण 39 कामगार, परतुर तालुक्यात सांगली येथुन 51 व कोल्हापुर 37 एकुण 88 कामगार, मंठा तालुक्यात सांगली-72 कोल्हापुर 19, व सातारा येथुन 6 असे एकुण 97 कामगार, घनसावंगी तालुक्यात सांगली-63, कोल्हापुर-43 व सातारा-85 असे एकुण 191 कामगार, तर अंबड तालुक्यात बीड-25,पुणे-17,  सांगली 113, कोल्हापुर-83, सातारा-133, सोलापुर-49 व लातुर येथुन 02 असे एकुण 422 कामगार दाखल झाले आहेत.सध्या सामान रुग्णालय, जालनायेथे दु:खीनगर येथील कोरोनाग्रस्त 65 वर्षीय महिलेची प्रकृती गंभीर आहे.  तसेच  जिल्ह्यात कोरोनाच्या एकुण 892 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 95 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 571 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 22 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 768 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने -00 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 02 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 730, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 103, एकुण प्रलंबित नमुने-29 तर एकुण 476 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 10, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 315 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या 08, सध्या अलगीकरण  केलेल्या व्यक्ती -271, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-17, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या 00, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या 95, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 149 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 271 एवढी झाली असुन यामध्ये संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह, जालना – 48, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह-41, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-18, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-14, पोलीस प्रशिक्षण केंद्र-99, मंठा येथे 13 तर गुरुगणेश भवन, जालना येथे 38 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 367 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 62 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 455 वाहने जप्त मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 59 हजार असा एकुण 2 लाख 85 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 


आनंदवार्ता : बुलडाणा जिल्ह्याचे कोरोनामुक्तीकडे ‘चवथे पाऊल..’!
चिखली, दे.राजा व मलकापूर येथील रूग्ण झाले बरे
टाळ्यांच्या निनादात रुग्णांना सोडले घरी
बुलडाणा, प्रतिनिधी:-कोरोनाचा संसर्ग जगभर वेगाने वाढत आहे. भारतातही काही हॉट स्पॉट क्षेत्रात विषाणूने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. जिल्ह्यातही विषाणूने आपला संसर्ग दाखवित 21 रूग्ण आपल्या कवेत घेतले. मात्र जिल्ह्यातील परिस्थिती प्रशासनाच्या अथक प्रयत्नाने नियंत्रणात येत आहे. 
कोरोनाला मर्यादेत ठेवण्यात प्रशासन विविध उपाययोजना अंमलात आणत आहे. जिल्ह्याचे कोरोनामुक्तीकडे आता चवथे यशस्वी पाऊल पडले आहे.  ठणठणीत बरे झाल्याने व कोरोना निगेटीव्ह अहवाल इाल्यामुळे जिल्ह्यातील तीन रूग्णांना आज कोविड रूग्णालयातून सुटी देण्यात आली.जिल्ह्यात चिखली येथे तीन,  चितोडा ता. खामगांव येथे दोन, शेगांव येथे तीन, देऊळगांव राजा येथे दोन,  सिंदखेड राजा येथे एक, मलकापूर येथे चार आणि बुलडाणा येथे सहा कोरोनाबाधीत रूग्ण आढळले होते. त्यापैकी आतापर्यंत बुलडाणा येथील चार, शेगांव येथील तीन, चितोडा ता. खामगांव येथील दोन, चिखली येथील एक आणि दे.राजा येथील एक कोरोनाबाधीत रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. त्यामध्ये आज तीन रूग्णांची भर पडली आहे. आज चिखली येथील एक,  दे.राजा येथील एक आणि मलकापूर येथील एक अशाप्रकारे तीन रूग्ण बरे होवून स्वगृही परतले आहेत. अशाप्रकारे एकूण 14 रूग्ण बरे झालेले आहे.प्रशासनाने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या. कन्टेन्टमेंट झोन, अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई, गर्दी कमी करण्यासाठी योजलेले उपाय यामुळे जिल्हा कोरोनामुक्तीकडे अग्रेसर आहे.  आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजनांमुळे आज तीन रूग्णांचे दुसरे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहे. त्यांना आनंदाने जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील – भुजबळ,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून बरे झालेल्या रूग्णांचे स्वागत केले.  शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उपचारादरम्यान संबंधित रुग्णांचे दाखल केल्यापासून 14 व 15 दिवसानंतरचे दोन्ही अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दोन्ही तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने सदर रुग्णांना डिस्जार्ज देण्यात आला आहे.  त्यांच्यावर उपचार करणारे सिस्टर्स व ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवित त्यांना प्रोत्साहित केले. कोरोना बाधीत रूग्णांनी आपण कोरोनामुक्त्‍ झाल्याबद्दल प्रशासनाने आभार मानेल. खरच.. आमच्यासाठी सर्व प्रशासनाने खूप मेहनत घेतली, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत.कोरोना निगेटीव्ह रूग्णांना जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी डिस्जार्ज पेपर दिला. त्यानंतर रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णांना त्यांच्या  घरी सोडण्यात आले. या तीन रूग्णांमुळे जिल्ह्यात कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 14 झाली आहे. जिल्ह्यात कोविड -19 आजाराने 21 रूग्ण बाधीत होते. त्यापैकी एकाचा 28 मार्च रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर 17 एप्रिल रोजी तीन, 20 एप्रिल रोजी पाच, 23 एप्रिल रोजी तीन व आज 25 एप्रिल रोजी पुन्हा 3 रूग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. आता 6 रूग्णांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या कोरोनाबाधीत रूग्णांना तपासणी अहवालानंतर कोरोना संसर्ग वार्डात दाखल करुन या सर्वांवर उपचार करण्यात आले.  तसेच शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार या रुग्णांवर तसेच जिल्ह्यात संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांवर शासकीय रूग्णालयातील आयसोलेशन कक्षात तपासणी, उपचार करण्यात आले. कोरोना बाधित आढळलेल्या या व्यक्तींचे दोन्ही स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पहिला व दुसरा तपासणी रिपोर्ट निगेटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. दोन्ही अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाल्याने शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सदर बाधीत रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले.कोरोनाच्या या जीवघेण्या आजारातून वाचलेल्या सर्व कोरोना निगेटीव्ह रूग्णांचे चेहरे आनंदीत होते. सर्व मनोमन आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्सेस यांचे आभार मानत होते. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी अजूनही लॉकडाऊनचे पालन करावे, घरातून विनाकारण बाहेर पडू नये. सर्वांनी मास्क किंवा स्वच्छ हात रूमाल चेहऱ्यावर ठेवावा. अनावश्यक बाहेर  न पडता घरातच रहावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने  करण्यात आले आहे.                                                                                                                                                       

अंबड़ तालुक्यातील किंनगांव येथे २८ वर्षीय युवकाचा विहिरीत पडूंन मृत्यु

       जनवरांना पाणी पाजत असता विहिरीत गेला तोल

अंबड़ /अरविंद शिरगोळे : अंबड़ तालुक्यातील किंनगांव येथील २८ वर्षीय युवकाचा विहिरीत पडूंन मृत्यु झाल्याची घटना काल दिनांक 24 एप्रिल रोजी घडली. 
या बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंबड तालुक्यातील  किनगाव  येथील युवक कृष्णा भाऊसाहेब तारडे वय २८ वर्ष हा शुक्रवार रोजी दुपारी १२.४५ वाजेच्यां सुमारास जनवरांना पाणी पाजण्यासाठी विहरीवर गेला असता त्याचा तोल जाऊन विहिरीत पडला यावेळी जवळपास कोनी नसल्याने पाण्यात बुड़ुन त्याचा दुर्दैवी  मुत्यु झाला असून त्यांचेकडे दुधाचे ८ ते ९ जनावरे असल्याने तो  दुधाचा व्यवसाय करत होता. याबाबत अंबड पोलिसात त्याचे नातेवाईक रावसाहेब तारडे यांच्या तक्रारीवरून ई .डी.दाखल करण्यात आली असून मयताचे पी.एम. उपजिल्हारुग्णालय अंबड येथे करून सदर बॉडी पो. कॉ . वनवे यांनी त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात दिली असून सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल रंगनाथ सोनुने यांच्याकडे देण्यात आला आहे .मयत हा कुटुंबप्रमुख असल्याने त्याच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याच्या पश्र्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ, बहिन असा मोठा परिवार आहे. सदर घटनेमुळे गावत हळचळ व्यक्त केली जात आहे.
        अंबड़ शहरात दुर्दैवी घटना 22 वर्षीय युवकाचा मृत्यू
सय्यद जावेद सय्यद बशीर याच्या परिवरावर दुःखाचा डोंगर कोसळला
अंबड़ / अरविंद शिरगोळे : विहिरीत पडूंन 22 वर्षीय युवकाचा मृत्यू परिवरावर उभे राहिले मोठे संगट याबत अशी माहिती की सय्यद जावेद सय्यद  बशीर वय 22 रा. 
सिरसळा ता परळी जिल्हा बिड हल्ली मुक्काम जालना-बिड रोडवरील फेडरेशन, मोसंबी मार्केट जवळील विहिरीत पाणी शेंदित असता युवकाचा तोल जाऊन दुर्दैवी अंत झाला. सय्यद जावेद सय्यद  बशीर हा मागील दोन महिन्यापासुन  तो व त्याचे कुटुंब फेडरेशन जवळ वस्तवेये होते. सय्यद हा आपल्या कुटुंब सह जीवन जगण्यासाठी गावोगावी जाऊन सर्कशिचा खेळ करुण आपले पोट भरत असत जावेद हा कुटुंबातील एकमेव कमावता व्यक्ति मोठा मुलगा गेल्याने सय्यद च्या  कुटुंबांनवर दुःखा चा डोंगर कोसला मागील बऱ्याच महिन्यापासुन लॉकडाऊन असल्यामुळे असल्याने सय्यद त्याच्या कुटुंबासह झोपडीत राहून  आपले जीवन चरित्र चलावत असे जावेद यांच्या पश्र्चात आई, दोन भाऊ व दोन बहिनी असा परिवार आहे

             अल्पभूधारक शेतकऱ्यांना खते व बी-बियाणे 
                    मोफत द्या – बाबासाहेब कोलते

स्वातंत्र्य सैनिक पाल्य समितीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब कोलते यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी


जालना,(प्रतिनिधी):- कोरोना व्हायरस चा फटका हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जास्तीचा बसला असून त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी व दिलासा देण्यासाठी 
महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना खते व बी-बियाणे मोफत देण्याची मागणी स्वातंत्र्य सैनिक पाल्य समितीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब कोलते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात बाबासाहेब कोलते यांनी म्हटले आहे की संपूर्ण भारतात कोरोना व्हायरसचा फटका सर्वानाच बसत असला तरी ग्रामीण भागातील अल्पभूधारक व मोठ्या शेतकरी वर्गाचे फार मोठे नुकसान झाले आहे, त्यामध्ये ग्रामीण भागातील काही शेतकरी कष्टकरी कुटुंब हातावर पोट भरून जगणारे आहेत. कोविड-१९ या महामारी विरोधात लॉकडाऊन मध्ये शेतकऱ्यांनी सक्रीय सहभाग घेतला आहे परंतु गेल्या काही दिवसापासून लॉकडाऊन असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची यंत्रणा ठप्प झाली आहे.आज रोजी काही शेतकऱ्यांकडे कापूस, मका, तूर हरभरा गहू घरामध्ये पडलेला आहे, लॉकडाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांचा मालाला शेतकऱ्यांच्या मनासारखा भाव मिळत नाही त्यामुळे आता जून जुले मध्ये खरीपाची पेरणी सुरु होणार आहे आगामी खरिपाच्या पेरणीसाठी तयारी कशी करावी हा बिकट प्रश्न ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांसमोर पडला आहे त्यामुळे प्रशासनाने तात्काळ मजुरांना काम मिळावे म्हणून रोजगार हमी योजनेची कामे मजुरांमार्फत करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह मजुरांना दिलासा देणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी गावागावात प्रशासनाने रोजगार हमीची कामे सुरु करावी शेतकऱ्यांचा शेतीमाल हा लॉकडाऊन मुळे घरातच पडून असल्यामुळे शेतकऱ्यांना मदत म्हणून व शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढणेसाठी महाराष्ट्र शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना व अन्य शेती धारकांना शेतकऱ्यांना शासनाने मोफत खते व बियाणे कृषी कार्यालयाकडून वाटप करावे व आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी बाबासाहेब कोलते यांनी केली आहे

शुक्रवार, २४ एप्रिल, २०२०


मुस्लीम बांधवांनी पवित्र रमजान महिन्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या सूचनांचे पालन करावे. 

उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील व निरीक्षक सोहन माच्छरे यांचे आवाहन.

धर्माबाद,प्रतिनिधी (भगवान  कांबळे):- महाराष्ट्र राज्यात मोठया प्रमाणात कोरोना विषाणूचा (कोविड-19) प्रसार होत आहे. त्यासाठी शासनामार्फत विविध प्रतिबंधात्मक वरील दिलेल्या सुचनांचे जनतेने काटेकोरपणे 
पालन करुन आपले कर्तव्य पार पाडून समाजातील लोकांचे व आपल्या कुटूंबियांच्या आरोग्य व सुरक्षिततेला प्राधान्य देणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे समाजाच्या सुरक्षिततेसाठी नेमून दिलेली कर्तव्य पार पाडून समाजापुढे आदर्श घडवू या. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांची सर्वांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करुन कोरोना विषाणूविरुध्दचा आपला लढा जिंकण्याची मनीषा आपण सर्वजण मिळून बाळगू या...! असे आवाहन धर्माबाद उपविभागीय पोलिस अधिकारी सूनील पाटील व धर्माबाद ठाण्याचे  पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी नांदेड तालुक्यातील  जनतेला केले आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रम रद्द करण्याबाबत 14 मार्चच्या अधिसूचनेन्वये सूचना देण्यात आल्या आहेत.शासनाने दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना शनिवार 25 एप्रिल 2020 रोजी पासून सुरु होत आहे. या रमजान महिन्यामध्ये मुस्लीम समाजामध्ये मोठया संख्येने मस्जीदमध्ये जाऊन तसेच सार्वजनिकरीत्या नमाज पठण करण्याची प्रथा आहे. त्यामुळे मुस्लीम समाजातील नमाज, तरावीह व इफ्तार पार्टीसाठी एकत्र येतात. सद्य:स्थिती विचारात घेता, अधिक संख्येने लोक एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग / संक्रमण मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता असते व त्यामधून मोठ्या प्रमाणावर जिवित हानी होऊ शकते. त्यामुळे पवित्र रमजान महिन्यामध्ये मुस्लीम बांधवांनी पुढीलप्रमाणे सुचनांचे पालन करावे.कोणत्याही परिस्थितीत मुस्लीम बांधव मस्जीदीमध्ये नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तार पार्टीसाठी एकत्र येवू नये. घराच्या / इमारतीच्या छतावर एकत्र येवून नियमित नमाज पठण अथवा इफ्तार पार्टी करण्यात येवू नये. मोकळ्या  मैदानावर एकत्र जमून नियमित नमाज पठण, इफ्तार पार्टी करण्यात येवू नये. लोकांकडून कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा कौटूंबिक कार्यक्रम एकत्रित येवून साजरे होणार करु नयेत. सर्व मुस्लीम बांधवानी त्यांच्या घरातच नियमित नमाज पठण, तरावीह व इफ्तार पार्टी इत्यादी धार्मिक कार्य पार पाडावे. इतर कोणत्याही लोकांना धार्मिक कार्यक्रमात समाविष्ठ करु नये.
उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूचा (कोविड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 14 मार्च, 2020 पासून साथरोग प्रतिबंध अधिनियम 1897 लागू करण्यात आला आहे. 14 मार्चच्या अधिसूचनेन्वये यासंदर्भातील नियमावली प्रसिध्द करण्यात आली असून 17 एप्रिल 2020 च्या आदेशान्वये एकत्रित सुधारीत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.


            150 खाटांच्या कोरोना हॉस्पीटलचा पालकमंत्री 
                    राजेश टोपे यांच्या हस्ते शुभारंभ
कोरोनाच्या मुकाबल्यासाठी जालना जिल्हा सज्ज - पालकमंत्री राजेश टोपे                              
जालना,प्रतिनिधी:- कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांसाठी सुसज्ज व सर्व सोईनीयुक्त अशा 150 खाटांची क्षमता असलेल्या व केवळ 29 दिवसांमध्ये उभारणी केलेल्या सुसज्ज रुग्णालयाच्या, सर्व प्रतिबंधात्मक उपायोजनांच्या व सर्वांच्या सहकार्याने जालना जिल्हा कोरोनाच्या मुकाबल्यासाठी 
सुरक्षिततेच्यादृष्टीकोनातुन जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये व शहरांमध्ये सोडीयम हायपोक्लोराईड या द्रव्याची फवारणी करुन निर्जंतुकीकरण करुन घेण्यात आले आहे. प्रत्येक ग्रामपंचायतींना सॅनिटायजर, मास्क तसेच कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीची माहिती पुस्तिका यांचा समावेश असलेल्या किटचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या प्रमाणात देण्यासाठी राज्यस्तरीय प्लॅनच्या माध्यमातुन जिल्हा रुग्णालयासाठी 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असुन अंबड येथील रुग्णालयाच्या बळकटीकरणासाठी टाटा ट्रस्टच्या माध्यमातुनही निधी मिळण्यात येत असल्याची माहितीही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिली.   हॉस्पीटलच्या उद्घाटनानंतर श्री. टोपे यांनी संपूर्ण कोरोना हॉस्पीटलची पाहणी केली.सज्ज असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.जालना येथील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या कोरोना हॉस्पीटलचा शुभारंभ फित कापुन पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, उपाध्यक्ष महेंद्र पवार, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, जालना जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे बाधित झालेले दोन रुग्ण आहेत. या विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये यादृष्टीकोनातुन प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.  परंतु जिल्ह्यात या विषाणुमुळे बाधित झालेल्यांची संख्या वाढल्यास त्यांना तातडीने उपचार मिळावेत या दृष्टीकोनातुन या दवाखान्याची उभारणी करण्यात आली आहे.  या ठिकाणी 100 खाटा व 50 खाटांचा अतिदक्षता कक्ष असुन या ठिकाणी 50 व्हेंटीलेटर्सची व्यवस्था करण्यात आली आहे.  या ठिकाणी अनुभवी व पुरेशा प्रमाणात डॉक्टरांची नियुक्तीही करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दानशुर व्यक्ती तसेच विविध संस्थेच्या सहकार्याने जिल्ह्यासाठी पीपी किट तसेच ट्रीपल मास्क, एन-95 मास्कही उपलब्ध करुन देण्यात आले असुन गरजुंना उपचारासाठी प्रभावी ठरणाऱ्या टेलिमेडीसनची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येत आली असल्याची माहितीही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिली.
          कोरोना उपचारासाठी पुल टेस्टींग आणि प्लाझ्मा 
                          थेरपी उपचाराला मंजुरी
            कोरोना उपचारासाठी महाराष्ट्रात पुल टेस्टींग आणि प्लाझ्मा थेरपी उपचाराला केंद्रीय आरोग्यमंत्र्याकडून आज मान्यता मिळाली असल्याची माहितीही पालकमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
            कोरोना प्रतिबंधाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज दुपारी देशातले सर्व आरोग्यमंत्री व सचिवांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. राज्य शासनाकडून मागणी करण्यात आलेल्या पूल टेस्टींग व प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीला मान्यता देण्यात आली. याबैठकीत महाराष्ट्राकडून मांडण्यात आलेल्या पोर्टेबल पल्स ऑक्सीमीटर व एक्सरे चाचणीच्या मदतीने कोरोना रुग्णाचे लवकर निदान करणे शक्य होईल आणि त्यातून मृत्यूदर कमी करता येऊ शकेल, असा मुद्दा मांडण्यात आला. त्याचबरोबर पीपीई कीटचे निर्जंतुकीकरण करून त्याचे पुर्नवापर करण्यासाठी मुद्दे सुचविण्यात आले. त्याचे विशेष कौतुक यावेळी करण्यात आल्याची माहिती देत  ज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोना चाचणी सुरू करण्याच्या मागणीला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहितीही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी दिली.

गुरुवार, २३ एप्रिल, २०२०


कोविड -19 विषाणूच्या पार्श्वभूमीवर नोंदणीकृत बांधकाम कामगारांना
            शासनाकडून दोन हजार रुपये अर्थसहाय्य

  जालना, प्रतिनिधी :- महाराष्ट्रात सुरु असलेल्या कोविड -१९ विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाकडून दोन हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.लॉक डाऊन परिस्थितीमुळे सर्व प्रकारची बांधकामे बंद पडले आहेत. बांधकाम कामगारावर बेकारीचे संकट ओढवले असल्यामुळे या संकट काळात त्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अर्थात डी.बी. टी.पद्धतीने मंडळाकडील नोंदीत व सक्रीय (जिवीत) असलेल्या बांधकाम कामगारांच्या खात्यात दोन हजार रुपये अर्थसहाय्य जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
कामगारांनी कुठलाही अर्ज भरण्याची किंवा चौकशीसाठी कार्यालयात गर्दी करू नये तसेच कुठल्याही व्यक्तीच्या भूलथापांना बळी पडू नये. अशा व्यक्तीची तक्रार संबंधित पोलिस स्टेशनला करावी. असे जिल्हा सरकारी कामगार अधिकारी टी.ई. कराड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.


     कोरोनावर मात करीत तीन रूग्ण बरे होवून परतले घरी..!
शेगांव येथील दोन व चितोडा ता. खामगांव येथील रूग्णांचा समावेश
                   टाळ्यांच्या गजरात रुग्णांचे स्वागत

                आतापर्यंत 11 कोरोना बाधीत झाले बर

बुलडाणा, प्रतिनिधी:-कोरेाना विषाणू संपूर्ण जग आपल्या कवेत घेतले आहे. जिल्ह्यातही हळूहळू पाय पसरविणाऱ्या कोरोनाने चांगलीच खळबळ उडवून दिली होती. जिल्ह्यात सात तालुक्यांमध्ये आपली उपस्थिती दर्शवित कोरोनाने प्रशासनाला गंभीर केले.  कन्टेटमेंट प्लॅन, लॉकडाऊन, गर्दी कमी करण्यासाठी विविध योजलेले उपाय यामुळे कोरोना नियंत्रणात येत आहे. 
जिल्ह्यात आज 23 एप्रिल रोजी कोरोनावर मात करीत तीन रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. 
     जिल्ह्यात चिखली येथे तीन,  चितोडा ता. खामगांव येथे दोन, शेगांव येथे तीन, देऊळगांव राजा येथे दोन,  सिंदखेड राजा येथे एक, मलकापूर येथे चार आणि बुलडाणा येथे सहा कोरोनाबाधीत रूग्ण आढळले होते. त्यापैकी आतापर्यंत बुलडाणा येथील चार, शेगांव येथील एक, चितोडा ता. खामगांव येथील एक, चिखली येथील एक आणि दे.राजा येथील एक कोरोनाबाधीत रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. त्यामध्ये आज तीन रूग्णांची भर पडली आहे. आज शेगांव येथील दोन आणि चितोडा ता. खामगांव येथील एक अशाप्रकारे तीन रूग्ण बरे होवून स्वगृही परतले आहेत. अशाप्रकारे एकूण 11 रूग्ण बरे झालेले आहे.
     प्रशासनाने आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजनांमुळे आज तीन रूग्णांचे दुसरे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहे. त्यांना आनंदाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून बरे झालेल्या रूग्णांचे स्वागत केले.  शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उपचारादरम्यान संबंधित रुग्णांचे दाखल केल्यापासून 14 व 15 दिवसानंतरचे दोन्ही अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दोन्ही तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने चितोडा ता. खामगांव व शेगांव येथील रुग्णांना डिस्जार्ज देण्यात आला आहे.  त्यांच्यावर उपचार करणारे सिस्टर्स व ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवित त्यांना प्रोत्साहित केले. कोरोनावर मात केल्याने रूग्णांचे चेहरेही आनंदाने फुलले होते. समाधानाचे हास्य रूग्णांच्या चेहऱ्यावर होते.
   जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पंडीत यांनी डिस्चार्ज पेपर दिला. त्यानंतर रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णांना त्यांच्या  घरी सोडण्यात आले. या तीन रूग्णांमुळे जिल्ह्यात कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 11 झाली आहे. जिल्ह्यात कोविड -19 आजाराने 21 रूग्ण बाधीत होते. त्यापैकी एकाचा 28 मार्च रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर 17 एप्रिल रोजी तीन, 20 एप्रिल रोजी पाच आणि आज 3 रूग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. आता 9 रूग्णांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या कोरोनाबाधीत रूगांना तपासणी अहवालानंतर कोरोना संसर्ग वार्डात दाखल करुन या सर्वांवर उपचार करण्यात आले.  तसेच शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार या रुग्णांवर तसेच जिल्ह्यात संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांवर शासकीय रूग्णालयातील आयसोलेशन कक्षात तपासणी, उपचार करण्यात आले. कोरोना बाधित आढळलेल्या या व्यक्तींचे दोन्ही स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पहिला व दुसरा तपासणी रिपोर्ट निगेटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. दोन्ही अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाल्याने शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सदर बाधीत रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले.
   कोरोनाच्या या जीवघेण्या आजारातून वाचलेल्या सर्व कोरोना निगेटीव्ह रूग्णांचे चेहरे आनंदीत होते. सर्व मनोमन आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्सेस यांचे आभार मानत होते. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी अजूनही लॉकडाऊनचे पालन करावे, घरातून विनाकारण बाहेर पडू नये. सर्वांनी मास्क किंवा स्वच्छ हात रूमाल चेहऱ्यावर ठेवावा. अनावश्यक बाहेर  न पडता घरातच रहावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने  करण्यात आले आहे.                                                                                                                                                 

मादळमोहित सार्वजनिक रक्तदान शिबीरास उत्षपुर्त प्रतीसाद.45 युवकांचे दानत्व

मादळमोहि (हँलो रिपोर्टर .न्युज )दि.24. :- महाराष्ट्रात कोरोना आजाराने सर्वानाच हैराण केले आसुन केंद्र व राज्य सरकार आणि प्रशासकीय आधिकारी .हे ऊदभवलेल्या माहामारीला आटोक्यात आनण्यासाठि कामाला लागले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्र्यी श्री राजेश टोपे यांनी राज्यातील नागरीकाना केलेले आव्हान. मादळमोहि करानी त्याला साद दिली देत. सार्वजनिक रित्या रक्तदान शिबीराचे 23 एप्रिल गुरुवार रोजी सरकारी दवाखना मादळमोहित आयोजित करण्यात आले होते. महिलासह तब्बल पंचेचाळीस युवकांनी या सामाजिक ऊपक्रमात आपला सहभाग नोंदवत गावकर्यानी दाखवून दिले कि "संकट काळी" आम्ही काही मदत मागण्या ऐवजी येथील  युवक मदत करणारे आहोत .आणी तो रक्तदानाचा ऊपक्रम येथील वैद्यकीय अधिकारी डाँ. लांजेवार. डाँ. लोकरे. यांच्या उपस्थित तर बीड.जी.प.चे.माजी .आरोग्य सभापती. पंढरीनाथ लगड.संपादक चंद्रकांत हक्कदार. गेवराई. प.स.स.जयसिंग जाधव  यांच्या ऊपस्थित सोशल डिस्टंट मध्ये पार पडला.

गेवराई तालुक्यात मादळमोहि येथे काल गुरुवारी गावकर्यानी सार्वजनिक रित्या रक्तदान शिबीर आयोजीत केले.आसताना .मादळमोहि भंडगवाडी.जवाहरवाडी. येथील सर्वपक्षीय युवक या वेळी राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी केलेल्या आव्हानाला व  सामाजिक ऊपक्रमाला साद दिली.आणी रक्तदानाच्या माध्यमातून  गरजु व गरीब रुग्णाच्या कामी याव.नाही तरीही सध्या महाराष्ट्रात कोरोना सारख्या आजाराने थैमान घातले आसुन आनेकांना रक्ताचा तुटवडा जान ऊ नये गरजुवंताना मदत म्हणून येथील नागरीकांनी रक्तदान शिबीर आयोजीत केले होते.या शिबिरात महिलाचेहि योगदान लाभले. येथील सामाजिक कर्यकर्ते श्री पंढरीनाथ लगड .पत्रकार चंद्रकांत हक्कदार. कैलास भुजबळ.रमेश जीजा तळेकर.आदिनाथ गावडे.आजीत वर्मा. आमर जगताप. ईत्यादी सह सर्व पक्षिय कार्यकर्त्यांनी या वेळी पुढाकार घेतला.याप्रसंगी. माऊली तळेकर.विनोद भोपळे. प्रमोद घाटे.सुरज लगड.विशाल दुधाळ.सुरेश भोपळे. शोहेबभाई.आक्षय तळेकर.जयसिंग जाधव .परमेश्वर केकरे.आमोल जवरे. गंगाधर जवरे. आजय बांगर .राज बांगर.आमर काशिद.संदिप मेंडके.शरद पवार. भरत पवार. नितीन आखाडे. आमर काशिद.कैलास भुजबळ. पारस तळेकर.सौ.दिव्या आजित वर्मा. श्वेता बळीराम लगड.सुदाम दुधाळ.आशोक सरपते.शरद धूरंधरे.ईत्यादी सह पंचेचाळीस रक्तदात्यानी सहकर्यकरत सदरील शिबीर पार पाडले या वेळी मादळमोहि येथील सरकारी दवाखन्यातील डाँ.नर्स सेवक सुपरवायझर. तर विशेष बीड येथून आलेले जिल्हा आरोग्य विभागात कामरणारे ब्लड डोनेशन टिम या सर्वानी मादळमोहि रक्तदान शिबीरास सहकार्य केल्या बद्ल गावकर्यानी सर्वाचे आभार मानले.
अंबड़ तालुक्यातील वाड़ी शिराढोंन येथे पिण्याच्या पाण्याची सुवेवस्था प्रशासनाचे दुर्लक्ष

एक हंडा पाणी भरण्यासाठी जीव धोक्यात घालून शर्यतीचे प्रयत्न करावे लागत


अंबड़/अरविंद शिरगोळे: कोरोना विषाणु ने तर जगभरात खळबळ झाली आहे. त्यातली त्यात लॉक डाऊन संचारबंदी  अंबड़ तालुक्यातील वाडी शिरढोण येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असून पानीचे प्रश्न होत आहे  ग्रामपंचयत
निश्काळजीपनाचे कळस,प्रशासन ही गंभीर नाही व  सरपंच शफीक पटेल याची दखल न घेता दुर्लक्ष केले आहे. यात गावकारी बांधव एक हंडा पाणी भरण्यासाठी जीव धोक्यात घालून शर्यतीचे प्रयत्न करावे लागत आहेत. तरी गावकारी व भारतीय विद्यार्थी मोर्चा अध्यक्ष बाबू  घुले,अनिल जमधडे,संदीप उघडे,  यांनी प्रशासनाला वेळो वेळी कल्पना, नवेदन दिलेले असून तरी ही यावर अद्याप कुठलीही निर्णय घेतला गेलेला नाही.याची दखल लवकर लवकर घेण्यात यावी अशी मागणी भारतीय विद्यार्थी मोर्चा अध्यक्ष बाबू घुले व इतर कार्यकर्ते यांच्याकडून होत आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...