मंगळवार, ३१ मार्च, २०२०

कोरोना हॉस्पीटल तातडीने कार्यान्वित करावे
                       - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर

                जालना, प्रतिनिधी- विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी आज दि. 31 मार्च रोजी सामान्य रुग्णालय, परिसरात तयार होत असलेल्या कोरोना हॉस्पीटल तयारीची पाहणी करत कोरोना हॉस्पीटल तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश देत कोरोना संदर्भातील प्रतिबंधात्मक उपयायोजनांचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला.
याप्रसंगी  जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे , मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अपर जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर  राठोड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर आदी उपस्थित होते.
    कोरोना विषाणुचा (कोव्हीड – 19) प्रादुर्भाव  रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि.13 मार्च 2020 पासुन लागु करण्यात आलेला असुन दि.1 मार्च 2020 नंतर परदेश प्रवासावरुन आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी व आवश्यकतेनुसार अलगीकरण किंवा विलगीकरण करणे अत्यावश्यक आहे.  जिल्ह्यातील नागरिकांनी  परदेशात प्रवास केल्याची माहिती प्रशासनास देऊन स्वत:ची व आपल्या कुटुंबियांची तपासणी सामान्य रुगणालय, जालना येथे करुन घ्यावी. यासाठी जिल्हास्तरावर मुख्य  कार्यकारी अधिकारी यांना समन्वय अधिकारी  म्हणुन नेमणुक केली असून त्यांच्या अधिनस्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांना त्यांचा सहाय्यक अधिकारी नेमणुक करण्यात आली आहे. मागील एक महिन्यात  आपण जर कोरोनाग्रस्त  अथवा इतर देशातुन, इतर राज्यातुन, इतर शहरातुन किंवा इतर जिल्ह्यातुन जालना जिल्ह्यात आला असला तरी आपली माहिती  जिल्हा नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्र. 02482-223132  या क्रमांकावर कळवावे. जे नागरीक अशी माहिती लपवितील त्यांच्या विरुध्द साथरोग प्रतिबंध कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल.
    जालना जिल्ह्यामध्ये दि. 31 मार्च, 2020  रोजी 2 रुग्ण नव्याने दाखल झाले आहे. एकुण 89 रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल होते. त्यापैकी 87 रुग्णांचे स्कॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 83 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आले  आहेत. आजरोजी 11 रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
     रुग्णालयातुन डिस्चार्ज झालेल्या तसेच परदेशी प्रवासाचे पुर्व इतिहास  असणा-या सर्व व्यक्तींचे घरी अलगीकरण करण्यात आलेले आहे. आजपर्यंत 113 परदेश प्रवास केलेल्या व्यक्तींपैकी 111 व्यक्तींचे  घरीच अलगीकरण करण्याल आलेले आहे.  तसेच इतर शहरे व राज्यातुन आपलेल्या 11 हाजर 31 व्यक्तींची  तपासणी करुन त्यांचे घरीच अलगीकरण करण्यात आले आहे. संस्थेत अलगीकरण केलेल्या सहवासितांची (Contact) संख्या 71 असुन  संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह येथे 49, मुलींचे शासकीय वसतीगृह 6 व अंजता ब्लॉक पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे 16जणांना दाखल करण्यात आलेले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.

सोमवार, ३० मार्च, २०२०

              श्रीहरी पाटील डोंगरे यांनी कोरोना बचाव साठी
              आपल्या कर्जत गावात केली औषध फवारणी.
 अंबड प्रतिनिधी: आज कर्जत येथे कोरोना
व्हायरस  गावात पसरू नये म्हणून गावातील कर्तव्यदक्ष सरपंच श्रीहरी पाटील डोंगरे यांनी स्वतःगावात सानिटायझर तसेच ब्लिचिंग पावडरची ट्रॅक्टरच्या ब्लोअरच्या साहाय्याने फवारणी केली.यावेळी शेतीनिष्ठ शेतकरी पांडुरंग तात्या डोंगरे तसेच ग्रामपंचायत सदस्य योगेश्वर मुंडे यांचे सहकार्य लाभले.कोरोना या संकटाला आपल्याला सर्वांना पळून लावायचे आहे त्यानिमित्ताने नागरिकांनी कुणीही घराबाहेर पडू नका.आत्याआवश्यकत वस्तूचे दुकानें वगळता इतर कोणतेही दुकानें उघडू नये,हात धुण्यासाठी डेटॉल ,सानिटायझर तसेच साबनाचा वापर करा आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी श्रीहरी पाटील डोंगरे यांनी केली.

बदनापूर येथील हलदोला येथे ग्रामपंचयतीमार्फत केले धूर फवारणी
बदनापूर प्रतिनिधी:- बदनापूर येथील हलदोला 
येथे ग्रामपंचयती मार्फत केले धूर फवारणी जगभर कोरोना विषाणूने हाहाकर झाला आहे. भारत सरकारने लोकड्डाऊन केले आहे .कोरोना विषाणू रोखण्यासाठी हलदोला येथे ग्रामपंचायत ने ट्रॅक्टर द्वारे गावामधे धुर फवारणी केली.यावेळी गावतील प्रगतशील शेतकरी भारत मात्रे यांनी त्यांच्या ट्रॅक्टर ने फवारणी केली. व सरपंच उध्दव मात्रे यांनी सर्व जनतेला घरातच राहण्याचे आव्हान केले आहे .जनेकरून आपले गाव कोरोनामुक्त राहील.

    परराज्यातील नागरिकांच्या अडचणी तसेच अत्यावश्यक वस्तु संदर्भातील                      अडचणी सोडविण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या.

जालना, प्रतिनिधी - लॉकडाऊन मुळे अडकलेले मजूर,
विस्थायपीत झालेले कामगार, परराज्याुतील अडकलेले कामगार यांच्यासाठी निवारागृह अन्ने, पाणी, वैद्यकीय देखभाल आदी व्यावस्थाअ जिल्हाा प्रशासन करणार आहे. सर्व संबंधीतांना त्या च ठिकाणी थांबुन प्रवासाचा प्रयत्नय न करता तालुका अथवा जिल्हाे प्रशासनास या बाबत माहिती द्यावी. तसेच बाहेर राज्याितील नागरीकांना काही अडचण असल्या स जिल्हा प्रशानाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
राज्याातील नागरीकांना काही अडचण असल्याास संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असुन यामध्ये  टी.ई.कराड, कामगार अधिकारी, जालना मो. नं. ९४२३१४१४२३ , ७२१८१६१६२७ तसेच अन्न्धान्यन, रेशन, दैनंदीन उपजिवीका भागविण्यानसाठी अत्यामवश्ययक वस्तूअसंदर्भात अडचणी आल्यास श्रीमती.रिना बसय्ये, जिल्हात पुरवठा अधिकारी, जालना, मो.  ९८२३७५९९९७ व संतोष बनकर, सहायक जिल्हाी पुरवठा अधिकारी  जालना, मो.९६८९००११४९ यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
  जालना जिल्या मध्येह दिनांक ३० मार्च, २०२० रोजी ०९ रुग्णच नव्या९ने दाखल झाले आहेत. आतापर्यंत एकूण ८७ रुग्ण  विलगीकरण कक्षात दाखल होते. त्या पैकी ८६ रुग्णांवचे स्वॅाब घेण्याबत आले असुन त्याणपैकी ७४ रुग्णांकचे अहवाल निगेटिव्ह९ प्राप्त झाले असुन त्या‍ रुग्णांझना डिस्चायर्ज देण्याुत आला आहे. आजरोजी ०९ रुग्णा विलगीकरण कक्षात दाखल असून त्यांाची प्रकृती स्थिर आहे.
  रुग्णा्लयातून डिस्चा्र्ज झालेल्या  तसेच परदेशी प्रवासाचे पुर्व इतिहास असणा-या सर्व व्यतक्तीं्चे घरी अलगीकरण करण्यालत आलेले आहे. आजपर्यंत एकुण ११२ परदेश प्रवास केलेले व्य्क्तींसपैकी १११ व्य क्तीाचे घरीच अलगीकरण करण्या त आले आहे. एका व्यलक्ती्स विलगीकरण कक्षात दाखल करण्यागत आले आहे. तसेच इतर शहरे व राज्याकतून आलेल्याह ९ हजार ७०३ व्यतक्तींकचे तपासणी अंती घरीच अलगीकरण करण्या त आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 
कोरोणा विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सिंधी कळेगाव येथे जंतुनाशक औषंधाची फवारणी
सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी) :- कोरोणा विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सिंधीकाळेगाव येथील ग्रामपंचायत
पातळीवर देखील उपाय योजना करण्यात येत आहे. या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने सोमवारी गावात जंतुनाशक औषंधाची फवारणी करण्यात आली. कोरोणा विषानुच्या पाशर्वभुमीवर शासनाच्या वतीने ग्रामपंचायत स्तरावर काही आवश्यक सुचना देण्यात आल्या त्यानुसार सिंधीकाळेगाव ग्रामपंचायतच्या वतीने गावातील सार्वजानिक ठिकाणी व रस्त्यावर जंतुनाशक फवारणी करण्यात आली यावेळी ग्रामसेवक कोरके साहेब, सरपंच वसंत जोगदंड, माजी सरपंच सुभाष गिराम (आबाजी), ग्रामपंचायत सदस्य सुभाष गिराम, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मन गिराम, अंकुश जोगदंड, मोकींदा गिराम, जगन्नाथ मुळे, बाबसाहेब वैद्य, सय्यद उस्मान, आदिंची उपस्थिती होती.
   रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल असलेला फॉर्म बनावट...
                  अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून खुलासा.
मुंबई, प्रतिनिधी  :-  रेशनवरील धान्य खरेदी
करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म हा अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून वितरीत करण्यात आलेला नाही. सद्या सोशल मिडिया व काही माध्यमावरून अशा प्रकारचा बनावट फॉर्म प्रसिद्ध केला जात आहे. त्यात काहीही तथ्य नसून असा कोणताही निर्णय अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आलेला नसल्याने नागरिकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी असा कुठलाही फॉर्म भरून देऊ नये असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून करण्यात आलेल्या खुलाश्यात म्हटले आहे की, सोशल मिडिया तसेच काही माध्यमातून रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांना मोफत धान्य मिळण्यासाठी फॉर्म  उपलब्ध करून देण्यात आल्याच्या बातम्या पसरविल्या जात आहे.  सरकारने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. सध्या राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन जाहीर करण्यात आल्याने राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहणार नाही यासाठी शिवभोजन तसेच विविध योजना राज्याच्या अन्न ,नागरी पुरवठा विभाग व इतर विभागाकडून सुरु करण्यात आलेल्या आहेत. मात्र सोशल मिडियाच्या माध्यमातून अर्ज व चुकीचे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. अशा खोट्या बातम्यांमधून जनतेची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी राज्यसरकारकडून कुठलीही अधिकृत माहिती आल्याशिवाय कुठलाही फॉर्म भरून देऊ नये असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

कोरोणा विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन मध्ये अवैद्य वाळूचा उपसा सुरू शासनाचे दुर्लक्ष.
वंचित बहुजन आघडीचे तालुका उपाध्यक्ष विनोद मगरे यांचा
 वतीने कार्यवाही करण्याची मागणी.
बदनापूर प्रतिनिधी :- कोरोना विषाणु मुळे 
भारता मध्ये लॉक डाऊन मुळे संपुर्ण भारतात काम काज बंद झाले. कोरोणा विषाणूच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन बंदोबस्तात गुंतले आहे.कारखाने बंद,आठवडी बाजार बंद, कलम 144 असल्याने काम बंद आहे .पण लोक काऊन बंद काळात या संधीचा फायदा उठवत देवगांव कुसळी येथील दुधना नदी चा काही उफसा थाबत नाही कोरोना व्ह्यारस्मुळे सर्व कामकाज बंद ठेण्यात आलेले आहे व अवैध काम चालू आहे तरी   तहसीलदार व महसुल अधिकारी यांनी थोड़ लक्ष्य देण्यात यावे.व योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघडीचे तालुका उपाध्यक्ष विनोद मगरे यांनी केले आहे.

छाया:श्याम गिराम

सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी) :-जालना तालुक्यातील रामनगर येथे  सांचार बंदीच्या काळात बंदोबस्तासाठी रस्त्यावर तैनात असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना चहा व पाणी देऊन रामनगर येथील हॉटेल व्यावसायिक शकील शेख यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले

        अंबड़ शहरात कोरोनामुळे नाहीतर भूकेपाई जीव जाईल.
                      हातमजूरी व गोरगरीबांच्या भावना?

अंबड/प्रतिनिधि : अरविंद शिरगोळे : पहिला जनता कर्फ्यू, संचारबंदी, लॉक डाऊनमुळे नागरिकांना घरा बाहेर
कामाला जाता येत नाही तसेच हातमजूरीकरांना हातावर पोट असणाऱ्या कामगार या घानेरड्या कोरोनामुळे नव्हे तर त्या भूकबळी जान्याची दाट शक्यता आढळून येत आहे.  संचार बंदी असल्यावर कामावर जाता येत नाही तर रस्त्यावर नागरिकांना फिरता येत नाही. ना पैसा पाणी घरात येत नाही. त्यामुळे कोरोनाच्या नाही तर या भूकेपाई जीव जातो की काय ? अशी भिती या अंबडवशियामधे दिसून येत आहे कारण 21 लॉक डाऊन चा इशारा तर आलाच पन कामगार एक एक दिवस आननार तरी काय?  आणि खानार तरी काय? अंबड़ मधील वस्ति, बेरोजगार, हातमंजूरी, या भूकेपाई बळी पडण्याची  शक्यता दिसून येत आहे. अंबड़ शहरातील या ग्रामीण भागातील हजारोच्या संखेने हातावर पोट  भरून जगनारे कामगारवर्ग व भिकारी वास्तव्यस आहेत. या लॉक डाऊन मुळे त्यांच्यावर आज उपसमारी ची वेळ आली आहे. परिसरातील काही दान शुर यक्ति, पोलिस, पत्रकार, व राजकारणी हे अशा हातावर पोट असणाऱ्या कामगारांना व भिकारी, या गरीबांना मदत मिळत आहे. परंतु काही ठिकाणी मदत मिळत नसल्याने उपाशिपोटी रहावे लागत असल्याचे चित्र या अंबड़ शहरात  दिसून येत आहे.
सामाजिक  आरोग्यासाठी, मानवी अस्तित्वासाठी नवतरुणांनी मोदी विचारधारेत सहभागी व्हावे:-बालाजी बच्चेवार
नांदेड (भगवान कांबळे ):- सामाजिक
 आरोग्यासाठी, मानवी अस्तित्वासाठी आधुनिक भारताच्या जडणघडणीत नवतरुनानी मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या प्रगल्भ विचारधारेत सहभागी व्हावे असे आव्हान भाजपाचे जेष्ठ नेते मा .बालाजी बच्चेवार यांनी केले आहे.
कोरोना व्हायरस चे गंभीर संकट सध्या आपल्या देशापुढे आहे. कोरोना व्हायरस मुळे अखिल मानव जात नष्ट होण्याचा महाभयंकर धोका आहे ?आणि ह्यातून सक्षम पणाने बाहेर पडायचे असेल तर मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विचार धारेत नवतरुणांनी स्वतःला झोकुन घेऊन पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपण सर्व नागरिकांनी घरात बसून कोरोना व्हायरस चे समूळ उच्चाटन करण्यासाठी नवतरुण यांनी पुढाकार घ्यावा असे आव्हान बच्चेवार यांनी केले आहे.
           
 बंधू-भगिनींनो विचार करा आपण एक किंवा दोन कुटुंब सांभाळतो तेव्हा आपली किती दमछाक होते ,तारा वरची कसरत करावी लागते .परंतु मा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आपल्या वयाच्या(70 )सत्तराव्या वर्षी 130 कोटी जनतेची जबाबदारी खांद्यावर घेऊन सांभाळत आहेत. आणि मी आपल्या कुटुंबापैकी एक आहे भारतीय जनतेला हात जोडून विनंती करतो  कोरोना व्हायरस समूळ उच्चाटन करण्यासाठी सहयोग करा, आपल्या घरात बसा ,असे नम्र आव्हान वारंवार करत आहेत. म्हणून आपण खूप गांभीर्याने विचार करा? हा आजार किती गंभीर आहे ?म्हणून अशावेळी आपण सर्वांनी नवतरुणांनी सामाजिक आरोग्यासाठी मानव अस्तित्वासाठी मोदी विचारधारेत सहभागी व्हावे.
      राजकीय द्वेष ,व्यक्ती विरोध बाजूला सारून अशावेळी पंतप्रधानांना साथ द्या ,बळ द्या कारण कोरोना व्हायरस देशासमोर 'वैऱ्याची काळरात्र "होऊन समोर उभा आहे .आणि देशाचं नेतृत्व करण्यासाठी पंतप्रधान मोदीजी उभे आहेत हे आपल्या भारत मातेचे सौभाग्य आहे.
   देशावर आजवर बाह्य बाजूने आणि अंतर्गत बाजूने अनेक संकटे आली .कधी जागतिक दहशतवाद ,तर कधी अस्मानी संकट .मोदीजी यांच्या समोर आले .परंतु या संकटांना मोदीजींनी चिरडून टाकले आहे.

  कोणत्याही संकटात, लढाईत आपल्यातील  फितूर ओळखले की समोरच्या संकटाशी आणि शत्रूशी दोन हात सहज करता येतात -असे छत्रपती शिवाजी महाराज नेहमी सांगत होते.
      म्हणून आपण ह्या कोरोना व्हायरस च्या नाजूक संकट समयी कोणीही फितूर होऊ नका ?मा पंतप्रधानांच्या आव्हानाला तडा देऊ नका .कोणीही घराच्या बाहेर पडू नका जेणेकरून आपल्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येईल मानवी जीवनाला, अस्तित्वाला धोका होईल असे कृत्य करू नका
    आपल्या देशाला अनेक सार्वजनिक आरोग्याच्या संकटाचा इतिहास आहे .कारण प्रत्येक शतकातलं विसावं  वर्ष धोक्याचं ठरला आहे.
1720 ला -प्लेग आला
1820 ला -कॉलरा आला
1920 ला  -फ्लू आला
2020 ला कोरोना व्हायरस
        म्हणून मानवी जातीच्या अस्तित्वासाठी ,सामाजिक आरोग्यासाठी नवतरुनानी मोदी विचारधारेत सहभागी व्हावे कोरोणाच्या समूळ उच्चाटनासाठी आपण सहकार्य करावे असे माझे नम्र आव्हान आहे.
            कोरोनाची साथ संपेपर्यंत बँकांनी सक्तीने वसुली
                            करू नये - दिपक डोके
जालना (प्रतीनिधी) :-कोरोना विषाणूची
साथ आटोक्यात येईपर्यंत जालना जिल्ह्यातील छोट्या व्यापाऱ्यांचे उद्योग-व्यवसाय सुरळीत होईपर्यंत बँकांनी छोट्या कर्जदारांकडून सक्तीने वसुली करू नये आणि या कालावधीसाठी व्याज आणि न भरलेल्या हप्त्यांवर दंड आकारू नयेत, असे आदेश सरकारने सर्व बँकांना द्यावेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी दिपक डोके यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ई-मेल व्दारे केली आहे.
कोरोनाची साथ पसरू नये म्हणून   २२ मार्च पासून १४ एप्रिल पर्यंत महाराष्ट्रसह देशभर लाँक डाऊनमुळे सामान्य नागरिकांसह सर्वांचाच रोजगार,व्यापार, उद्योग व्यवसाय व सर्वच बाजारपेठा बंद  आहेत,  मात्र यामुळे सामान्य नागरिकांची आर्थिक कोंडी होत आहे. छोटे व्यापारी, वाहन चालक, गृहिणी, यांच्यासह असंख्य छोट्या उद्योजकांची आर्थिक कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीत या छोट्या दुकानदारांनी, गृहिणींनी बँका,पतपेढ्या अथवा मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते कसे फेडावे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आम्ही केंद्र आणि राज्य शासनाकडे अशी मागणी करतो की, कोरोना विषाणूची साथ आटोक्यात येईपर्यंत आणि छोट्या व्यापाऱ्यांचे उद्योग-व्यवसाय सुरळीत होईपर्यंत बँकांनी छोट्या कर्जदारांकडून सक्तीने वसुली करू नये तसेच या कालावधीसाठी व्याज आणि न भरलेल्या हप्त्यांवर दंड आकारू नयेत, असे आदेश सरकारने सर्व बँकांना द्यावेत. तसेच खाजगी सावकारांना सुद्धा सक्तीने वसुली न करण्याचे आदेश द्यावेत जर खाजगी सावकारांकडून कर्जदारांना त्रास दिला जात असेल तर पोलिसांना कारवाईचे आदेश द्यावेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमध्ये आरोग्य व्यवस्थेसोबतच अर्थव्यवस्थेवरही विपरीत परिणाम होत आहेत.                                       कोरोनाचा सर्वाधिक फटका हा छोट्या व्यावसायिकांना बसला असून त्यांची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. अशा वेळी बँकांनी सक्तीची वसुली करु नये  असे आदेश द्यावेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी दिपक डोके यांनी केली आहे.

रविवार, २९ मार्च, २०२०


हिंगोली येथे पुन्हा एक घटना न्यूज18 लोकमत टीव्ही चॅनेल चे पत्रकार कन्हैया खंडेलवाल यांना पोलिसाकडून अमानुष मारहाण*
         महाराष्ट्रात होतोय पोलिसांकडून अतिरेक
महाराष्ट्र मध्ये पत्रकार यांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण?
हिंगोली प्रतिनिधी :- देशामध्ये कोराने थैमान 
माजले असून सर्व देशपातळीवर त्याला रोखण्यासाठी सदैव प्रयत्न चालू आहेत. तसेच  सरकार च्या वतीने सुद्धा प्रयत्न चालू आहेत.तसेच कोरोना विषयक जनजागृती करण्यासाठी पत्रकार बांधव आपल्या जिवाची पर्वा न करता समाज जागृतीचे काम करत आहेत. कोरोना संदर्भात माहिती शासनाकडून लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम व पत्रकार करत आहे, त्याच स्थितीत अशीच एक घटना हिंगोली येथे घडली आहे सविस्तर घटनेची माहिती अशी की, हिंगोली येथे न्यूज18 लोकमत'चे प्रतिनिधी श्री.खंडेलवाल यांना पोलिसाकडून अमानुष मारहाण करण्या ची घटना घडली आहे.श्री.खंडेलवाल हे रस्त्यावरून जात असताना पोलिस हे सामान्य जनतेला मारहाण करीत होते. राज्य सरकारने जनतेला मारू नका असा आदेश दिले आहेत तुम्ही अशी मारहाण का करता असा जाब खंडेलवाल यांनी पोलिसांना विचारला असता यावरून संतापलेल्या पोलिसांनी त्यांना अमानुष मारहाण केली. आणि मारहाण केल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रसारमंत्री श्री.जावडेकर यांनी दोन दिवसा खाली सांगितले होते की, पत्रकाराला अडवले तर कारवाई करण्यात येईल. असा सांगितले असता आज पुन्हा घटना घडली आहे कारण या अगोदर हिंगोलीमध्ये पोलीस जमदार साहेबराव राठोड  व त्यांची मुलगी प्रियांका राठोड आरोग्य सेवक यांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आली आहे. ती घटना ताजी असतानाच पुन्हा ही घटना घडली.हा पोलिसांचा अतिरेक दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे कारण या मारहाणीचा निषेध सर्व मीडिया व पत्रकार यांच्या वतीने करण्यात आला आहे.पोलीस जर आपल्या बळाचा गैरवापर करत असतील तर हे योग्य आहे का? लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेला पत्रकारांना सुद्धा महाराष्ट्रात असून असुरक्षितता निर्माण झाली आहे. दिवसान दिवस महाराष्ट्रात पत्रकारावर पोलिसांकडून होणारे मारहाणीचे प्रकार महाराष्ट्रात वाढत चालले आहेत .महाराष्ट्रात वाढत असलेल्या प्रकरणावर सरकारने याची दखल घ्यावी व पत्रकार च्या सुरक्षते सबंधित कडक कायदे तयार करण्यात यावे.अशी मागणी पत्रकार व मीडिया यांच्या वतीने करण्यात येत आहे.

      करोना  प्रतिबंध आणि गरजूंना सोयी सुविधा यासाठी राज्य,        जिल्हा आणि महानगरपालिकास्तरावर संनिंयत्रण समित्या

      मुंबई  प्रतिनिधी :  कोरोना  विषाणूचा
प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यासंदर्भात  तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी राज्य आणि जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत गरजूंना निवारागृह, पाणी, अन्नधान्य तसेच भोजन व्यवस्था आणि वैद्यकीय सेवा या सुविधा स्वायंसेवी संस्थाच्या साहाय्याने उपलब्ध करून देण्यासाठी या समित्या त्यांच्या स्तरावर नियंत्रणाचे काम करतील. राज्य शासनाने याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित केला.
राज्यस्तरीय समितीचे मुख्य सचिव हे अध्यक्ष आहेत. अपर मुख्यस सचिव (महसूल), अपर मुख्य सचिव (नगरविकास), प्रधानसचिव (अन्न व नागरी पुरवठा), प्रधानसचिव (सहकार), प्रधानसचिव (कामगार)  हे सदस्य असून  आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन हे सदस्य सचिव आहेत.​
​​जिल्ह्यातील महानगराचे क्षेत्र वगळता अन्य भागासाठी जिल्हाधिकारी स्तरावर तर शहरी भागासाठी महानगरपालिकास्तरावर समित्या असतील. करोना प्रतिबंध व लॉकडाऊन कालावधीत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व उपाययोजनांचे  नियोजन करणे व निर्णयांची अंमलबजावणी  करणे आणि संनियंत्रण ठेवणे यासाठी समित्या काम करतील.
​  लॉकडाऊनच्या  कालावधीत अडकलेल्या मजूर, विस्थापित व बेघर व्यक्तींना आवश्यकतेनुसार  निवारागृह व अन्न, पाणी व वैद्यकीय  देखभाल सुविधा देण्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हास्तरावर जिल्हायधिकारी यांची राहणार आहे. शहरी भागासाठी महानगरपालिका व जिल्हाधिकारी यांची संयुक्तरित्या  काम करतील. 'जिल्हाास्तरीय संनियंत्रण समिती' व 'महानगरपालिकास्तरीय संनियंत्रण समिती'  या दोन्हीही समित्या‍ राज्यिस्तरीय संनियंत्रण समितीच्याअंतर्गत काम करतील.
​जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीचे कामकाज पुढीलप्रमाणे राहील- जिल्ह्यातील विविध भागामध्ये विविध घटकातील जीवनावश्यक  सुविधा ज्यांना मिळालेली नाही असे मजूर, विस्थापित व बेघर यांची यादी निश्चित करणे, त्याप्रमाणात अन्न्धान्याची आवश्यकता व उपलब्धता याचा तपशील ठरविणे, मदत देण्यासाठी स्वयंसेवी संस्था, खाजगी संस्था, धर्मादाय संस्था, सहकारी संस्था, तसेच सीएसआरमधून निधी उपलब्ध करून देणा-या खाजगी कंपन्या यांची यादी तयार करणे, शिजवलेले अन्न वितरित करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करणे.
जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांच्या  जबाबदा-या पुढीलप्रमाणे आहेत – गरजूंना तात्पुरती निवारागृहे उपलब्ध करून देणे; शाळा, महाविद्यालये, समाजमंदिर, मंगल कार्यालय व इतर निवास योग्य सभागृहे अशी योग्य ती ठिकाणे निवडून प्राधान्याने जिल्हयाच्या मुख्यालयी व आवश्यकतेनुसार इतर सर्व ठिकाणी स्थानिक पातळीवर विशेषत: औद्योगिक वसाहतीनजिक तात्पुरत्या राहण्याची सोय करावी. ऊसतोड कामगारांकरिता संबंधित साखर कारखान्यांनी निवारागृहाची व्यवस्था करावी. त्यांना अडचणी आल्यास जिल्हाधिकारी अथवा महानगरपालिका आयुक्त सहाय्य करतील. सर्व महानगरपालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावर हेल्पलाईन तयार करुन ते जाहीर करावेत.
                        कम्युरनिटी किचनची सुविधा
       लॉकडाऊनच्या कालावधीत विस्थापित झालेले मजूर, बेघर व्यक्ती यांच्यासाठी नजिकच्या जिल्हापरिषद अथवा महानगरपालिका शाळा व  विद्यालये, सार्वजनिक मैदाने, समाज मंदिर, खाजगी मंगल कार्यालये, धार्मिक प्रार्थना स्थळे अथवा संस्था, कृषी उत्पंन्न बाजार समिती आवारातील लिलावगृहे, औद्योगिक वसाहती, इत्यादी ठिकाणी आवश्कतेनुसार  तात्पुरत्या स्वरूपात कम्युनिटी किचन सुरू करावीत. प्रत्येक कम्युनिटी किचनमध्ये आवश्यकतेप्रमाणे भांडी, स्वयंपाकासाठी आवश्क असणारे साहित्य  पाणी उपलब्ध करुन दयावे. कम्युनिटी किचनमार्फत अन्न तयार करणाऱ्या व्यक्तींना अथवा समुहाला अवश्यक अन्नधान्याचा पुरवठा  हा स्वयंसेवी संस्था व इतर संस्थामार्फत गोळा करण्यात आलेले अन्नधान्यातून वा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीव्दारे उपलब्ध झालेल्या निधीमधून भागविण्यात यावा. या सोयी सुविधांपासून कोणतीही गरजू व्यक्ती वंचित राहणार नाही याची खातरजमा करावी. महानगरपालिका क्षेत्रामध्ये उपरोक्त सर्व बाबींचे नियोजन वॉर्डनिहाय सहाय्यक आयुक्त यांच्यामार्फत करून घ्यावे.

शनिवार, २८ मार्च, २०२०

मजूर,कामगारांनी  स्थलांतर करू नये आरोग्य, जेवण व निवास व्यवस्था शासन करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई, प्रतिनिधी : 'करोना' प्रसाराच्या
पार्श्वभूमीवर मजूर, कामगार यांनी कामाचे ठिकाण सोडून जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या मजुरांच्या आरोग्याची काळजी, जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्यासाठी शासन सक्षम आहे, असे त्यांनी सांगितले.श्री. ठाकरे पुढे म्हणाले, मजूर, कामगारांचे आरोग्य, जेवण तसेच आहे त्याच ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश महसूल यंत्रणेला आणि स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे कोणीही कामाचे ठिकाण सोडून जाऊ नये. मदतीची आवश्यकता असल्यास तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा महानगरांच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग  कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तलवाडयात नाली - रस्ते साफसफाई व औषध फवारणी मोहिमेचा शुभारंभ, ग्रामपंचायतीचे मात्र याकडे दुर्लक्ष.
========================================================={======={======
तलवाडा दि.२८ ( प्रतिनिधी )  कोरोना व्हायरस या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लोकांना घराबाहेर पडू नये असे आवाहन केले असून घरात राहणाऱ्या लोकांना डासाने हैराण केले आहे.नाली व रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.याकडे तलवाडा ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्यामुळे हमजा प्रतिष्ठाण व गावातील तरुणांनी एकत्र येऊन गाव स्वच्छता मोहीम हाती घेतली असून हे काम पंधरा दिवस दररोज केले जाणार आहे असे माजी सरपंच विष्णू हात्ते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी गाव स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला असून यामध्ये रस्ते साफसफाई,नाली काढणे, औषधी फवारणी करणे व नालीमधून काढलेली घाण ट्रॅक्टरमध्ये भरून ती इतरत्र नेऊन टाकणे अशी कामे हाती घेण्यात आली आहेत.यामध्ये हमजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोबीन खतीब,सुनिल तुरूकमारे, नय्युम बागवान,जालिंदर डोंगरे,भागवत कलाल तसेच माजी सरपंच विष्णू हात्ते,शहेंशाहभाई सौदागर,अज्जूशेठ सौदागर,पत्रकार अतिक शेख, प्रत्रकार ईम्रान सौदागर हभप गणेश महाराज कचरे, शेख आफसर शेख जाफर, लक्ष्मण राऊत,बाळू शिनगारे यांच्यासह गावातील तरुणांनी सहभाग घेतला आहे.जे काम ग्रामपंचायत करू शकली नाही ते काम या तरुणांनी व हमजा प्रतिष्ठानने हाती घेतल्यामुळे त्यांचे ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे.सफाई कामगार महिलांचे अठरा महिन्याचे मानधन ग्रामपंचायतीने न दिल्याने रस्त्यावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याची चर्चा लोकांकडून ऐकावयास मिळत आहे.सध्या गावात सगळीकडे घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने व ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याने हमजा प्रतिष्ठान व गावातील तरुणांनी गाव स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. 
==========================================================================
(आपल्याला  'कोरोना'ला गो...करायचं असेल तर.....!)तब्बल दोन ते तीन महिन्यांच्या सुरूवातीला आपल्याला संकेत मिळाले होते की,कोरोना नावाचा महामारी सारखा संसर्गजन्य आजार  आला आहे. माञ, आम्हाला अति आत्मविश्वास असल्याने कुणी वेगवेगळ्या प्रमाणात तर्क आणि वितर्क काढून खाण्यापिण्याच्या बाबावर लादून मोकळे झाले.अन् निश्चितपणे असताना आला कुठून कसा कोरोना.....त्यासमोर 'कुणाचेही काहीही चालेना असे जर म्हणाले तर चुकीचे ठरणार नाही .......' या संसर्गजन्य आजारपणावर अनेकविध कसरत सुरू आहे .परंतु कमी होण्याऐवजी वाढच होत आहे.हे होतय काय,आपण करतोय काय? याचा ताळेबंद बसत नाही .कोणत्याही प्रकारची नियोजित व्यवस्था या संसर्गजन्य आजाराला निलबित करण्यात यशस्वी होतांना सदया तरी तसूभर सुध्दा दिसत नाही. केंद्र आणि राज्य शासन लोकांच्या हितासाठी तासन्तास धङपङ करीत आहे.परंतु पाहिजे तसे पटकन फरक व्हायला पाहिजे तर तसे काही होतच नाही.उलट वेगवेगळ्या स्थिरता आपल्याकडे निर्माण होत आहे .तर इथे वेळ आहे प्रत्येकाला स्वतःच्या जबाबदारीची .....आपण लोकशाही प्रणीत देशाचे नागरिक आहोत आणि प्रत्येकाची नैतिक जबाबदारीची जाणिव ठेऊन वागणे गरजेचे आहे.अङचण आपल्याला प्रत्येकाला निर्माण झालेली आहे, त्यामूळे इथं  पक्ष,जात,धर्म,रंग,पंथ,गोञ,देश,वाद- विवाद,राजकारण,समाजकारण,पोलिस,वैद्यकीय,पञकार,नट- नटी, शिक्षक,मतदार,नागरिक,शेतकरी,वकील,मंजूर,बेकार,लहानसा बाळ अशा सगळ्यांना 'कोरोना' ने भयभित केलेले असतांना देशातील कोरोना असणाऱ्याची संख्येत दिवसातून वाढ होतांना दिसत आहे .
महाराष्ट्रातील प्रमुख महानगरात कोरोनाचे दाट पङसाद बघायला मिळत आहेत .सुरूवातीला कमी वाटणाऱ्या या संसर्गजन्य आजारपण इतक्या टोकाला जावून बसेल असे कुणाच्या स्वप्नातही आठवले नव्हते .आता केंद्र आणि राज्य शासन खङबङून जागे झालेले आहेत .वेगवेगळ्या  यंत्रणा आणि नियोजित कार्यक्रमाचा सपाटा लावलेला आहे. माञ,पुढील काळात "कोरोना" आटोक्यात आणण्यासाठी शासनाला जशी काळजीपूर्वक मांङणी केल्याचे दिसते, तेवढे फक्त "सत्यता" देशातील नागरिकांना मिळणे गरजेचे ठरते.कारण गरीब,मध्यमवर्गीय,आणि श्रीमंत या तीन प्रकारच्या गटातील आपली व्यवस्था दैनंदिन गरजेत जगात वावरत असते.सहजासहजी अगोदरचयां दोनची गंभीरपणे अङचण आहे .तिसऱ्या गटातील संख्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून जरी कमी असली तरी आर्थिकदृष्ट्या प्रबळ असल्याने सगळ्या गोष्टी बसलेल्या जागी मिळू शकतात,तसे गरीब,मध्यमवर्गीय गटातील लोकांच्या बाबतीत होणार नाही .आज देशात संचारबंदी असतानाही लोक घराबाहेर दिसतात.त्याचे कारण फक्त उनाङपणे हिङणारे सगळेच पोरकट नसून बाहेर जाणाऱ्याला येणाऱ्या उदयाची सोय लावायची आहे.हे मानसिक दृष्ट्या समजणे गरजेचे आहे .काळ नुसत्या मोठ्या मोठ्या घोषणा देऊन धकणार नाही.त्यावरील लवकरच अमलबजावणी होणे आवश्यक आहे .
आपल्या धार्मिक शिवपुराणात कोरोना या संसर्गजन्य आजारपणा बददल अगोदरच लिहून ठेवलेले आहे. अशा अशयाची पोस्ट सदया व्हाँटसापवर गिरकयां घालते आहे .त्यासंबंधी ध्वनीफितीही येत आहेत. या सगळ्यात अङकून न बसता इथल्या देशातील नागरिकांना योग्यतेनूसार त्याच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी शासनाने आत्ताच कामाला लागले तर संचारबंदीला शंभर टक्के यश येईल आणि सगळ्या देशातील मंडळी घरात बसेल तुम्ही बाहेर या म्हणाले तरी कुणी येणार नाही. कारण,नागरिकांना ज्या मुलभूत गरजा शासकीय स्तरावर मिळतील तेव्हा घराबाहेर येण्याची गरजच भासणार नाही आणि पर्यायाने संचारबंदी शंभर टक्के यशस्वी होईल आणि हळुवारपणे 'कोरोना' आपल्या भारत देशाला सोडून जाईल.
"कोरोना" ला आळा बसविण्यासाठी-
* देशातील प्रत्येक नागरिकांच्या आधारावर आपल्याला कुंटूबाची माहिती शासनाच्या दरबारात आहे.त्यातील गरजेनुसार त्वरीत मुलभूत गरजा जसे- अन्न,धान्ये,किराणा,गँस, इत्यादींच्या संबंधित अमलबजावणी करून टाकणे.
*कोरोना रोखून ठेवण्यासाठी लोकांना घरातच कोङून ठेवणार असे कोणत्याही प्रकारचे तंञ आपल्याकडे नाही आणि कायदेशीर संचारबंदीत पाहिजे तेवढ्यात यश येत नाही लोक काही ना काही निमित्तानं घराबाहेर येताना दिसतात. तेव्हा लोकांच्या मानसिकतेचा विचार होऊन देशातील उद्योगजक,हाँटेलमालक,संस्थाचालक,कारखानदार, चिञपटातील कलावंत दिग्दर्शक,नट- नटी
,राजकिय(   ग्रामपंचायत सदस्य,पंचायत समिती सदस्य,जिल्हा परीषद सदस्य,स्थानिक संस्थाचे अध्यक्ष,सरपंच, उप सरपंच,  आमदार,खासदार,मंञी) निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या सगळ्या पक्षाचे अध्यक्ष- सचिव,
सगळ्या खेळातील नामवंत खेळाडू, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध समिती, महामंङळे,आयोगाचे प्रमुख,शासकीय न्यायाधीश,वकील, सरकारी खात्याचे प्रमुख यासह दरङोही ज्याचे उत्पन्न 'कोटी' च्या जवळजवळ आहे. या सगळ्यांना गाव,शहर,तालुका,जिल्हा,प्रदेश,राज्य,आणि देश अशी एक साखळी तयार  करून ज्यानी त्यांनी आपआपल्या गावातील लोकांच्या मुलभूत गरजांची व्यवस्था लावायची आणि त्यासंबंधी रेकाँङ शासनाला पाठवून देणे बंधनकारक असला पाहिजे( निवडणूक यादी,आधार,बँकलिंक,राशन यानूसार)
*कोरोनाच्या पाश्वभूमीवर आरबीआयने महत्त्वाचे निर्णय घेतले.ते जगातील मोठ्याना त्याचा जास्त फायदेशीर ठरेल,माञ गरीब आणि मध्यमवर्गीय याच्या संबंधित काय? ते तर अशा अवस्थेत जगतात त्यांना या निर्णायक भूमीकेबददल माहिती असून काहीच फायदा घेता येत नाही .
यात आपल्याकडे 'आयटीरिटन' नावाची संकल्पना आहे .त्या मोठ्या लोकांना त्यात राहवे लागते आणि करोङो रूपये इनकम टँकस भरावा लागतो.तोही यात महीनयांत( मार्च) आतापर्यंतची परिस्थिती पाहता इनकम तर बंद आहे.मग टँकस भरणार कसा तर शासनाने आपल्या शासकीय आर्थिक खात्यातून पैसे न घेता गाव पातळीपासून देशपातळीवर असणाऱ्या सगळ्या दिग्गज लोकांना जबाबदारी देऊन टाकावी आणि कोणत्याही प्रकारचा टँकस यंदाचया आर्थिक वर्षी घेऊ नये.म्हणजे पर्यायाने शासनाच्या माध्यमातून    नागरिकांना मदतही होईल आणि इनकम टँकसही घेतला जाईल.(फक्त इथ कायदेशीर तरतूद बघून आपल्याला आर्थिकदृष्ट्या बसवावे लागतील)
*तीन- तीन महीने केंद्र आणि राज्य शासन देशातील कुणालाही संचारबंदी पासून मुक्त करू इच्छित नाही .परंतु काही दिवसांनी झालेल्या शासकीय घोषणा नुसत्या घोषणाच असतील तर लोकांच्या मुलभूत गरजांची मानसिकता कुणी समजून घ्यावी.
*लोकांना भावनिक आणि आव्हानाने या परिस्थितीत जिंकणे थोडे कठीण आहे .लोकांच्या अङीअङचणी लगेच मार्गी लावलेल्या असतील तर तीन महीने काय त्याआधीच आपल्या भारतातून कोरोना पाय लावून पळून जाईन.....कारण परीसरात लोकच नसल्याने कोरोना थांबेल कसा....मग सगळं
म्हणतील .....गेला एकदाचा कोरोना......गेला कोरोना.....बरं झालं गेला कोरोना......
.......जयहिंद......जय भारत......!

[------ प्रा.संजय काळे,आर/एम.२९७ बजाजनगर,वाळुज,औरंगाबाद]

जिल्ह्यात 69 रुग्णांचे निगेटिव्ह अहवाल प्राप्त 73 रुग्णांना डिस्जार्च.
जालना, प्रतिनिधी:- जालना जिल्ह्यामध्ये दिनांक २८ मार्च, २०२० रोजी ०२ रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत, आतापर्यंत एकूण १०९ रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल होते. त्यापैकी ७६ रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी ६९ रुग्णांचे अहवाल प्राप्त  झाले असून ते निगेटिव्ह आले व त्या ७६रुग्णांपैकी ७३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज रोजी ०४ रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.रुग्णालयातुन डिस्चार्ज झालेल्या तसेच परदेशी प्रवासाचे पुर्व इतिहास असणा-या सर्व व्यक्तींचे घरी अलगीकरण करण्यात आलेले आहे. आजपर्यंत एकुण १०९ परदेश प्रवास केलेले व्यक्तींपैकी १०७ व्यक्तींचे घरीच अलगीकरण करण्यात आलेले आहे. तसेच इतर शहरे व राज्यातुन आलेल्या ७४९ व्यक्तींचे तपासणीअंती घरीच अलगीकरण करण्यात आले आहे. या सोबतच जालना जिल्ह्यामध्ये एकुण १५ संस्था अलगीकरणासाठी निवडल्या असून त्यामध्ये १५३९ खाटांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

कोरोना विषाणुच्या मुकाबल्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे शोध,तपासणी व उपचार या बाबींवर भर द्यावा नागरिकांनी घरामध्येच राहुन प्रशासनास सहकार्य करावे-पालकमंत्री राजेश टोपे
जालना, प्रतिनिधी – कोरोना विषाणुचा संपुर्ण जगात प्रादुर्भाव होत आहे. सद्यस्थितीत जालना जिल्ह्यामध्ये 
कोरोनाचा एकही पॉझिटीव्ह रुग्ण नाही. हा आजार संसर्गजन्य असल्याने जिल्ह्यामध्ये रुग्णांचा शोध, तपासणी व उपचार (Tracing,Testing,Treatment) या बाबींवर भर देण्याची गरज आहे.  या विषाणुचा मुकाबला करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देत नागरिकांनीही घराबाहेर न पडता घरात राहूनच प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य, कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.
कोरोना विषाणु प्रतिबंधात्मक उपाययोजने संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी पालकमंत्री  श्री टोपे बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, अपर जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, जिल्हा  शल्य चिकित्सक डॉ. एम.के.राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विवेक खतगावकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, जालना जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणुचा एकही पॉझिटीव्ह रुग्ण नसला तरी जे परदेशातुन व अथवा परराज्यातुन व परजिल्ह्यातुन आलेले नागरिक आहेत या सर्व नागरिकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी व त्यानंतर उपचार करण्यात यावेत. आरोग्य यंत्रणेने गतीने व अचुकतेने काम करण्याची गरज आहे.  ग्रामीण भागात आशा वर्कसना संपुर्ण प्रशिक्षण देण्यात यावे. जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये व शहरांमध्ये सोडीयम हायपोक्लोराईड या द्रव्याची फवारणी करुन निर्जंतुकीकरण करुन घेण्यात यावे. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णालयात एच२ओ२ या द्रव्याची फवारणी करण्यात यावी.
कोरोषा विषाणुचा मुकाबला करण्यासाठी पैसा, मनुष्यबळ तसेच साहित्यसामुग्रीची कमतरता भासु दिली जाणार नसल्याचे सांगत जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातुन 5 टक्के निधी राखीव ठेवला असुन यामधुन 12 कोटी १० लक्ष रुपये तर आपत्ती व्यवस्थापनच्या माध्यमातुन 60 लक्ष असे एकुण 12 कोटी 70 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध असुन या निधीतुन एन-95 मास्क, पीपी किट, ट्रिपल लेअर मास्क, सॅनिटायजर तसेच व्हँटीलेटरर्सच्या सुविधा पुरविण्यात येत आहेत.  तसेच या कामासाठी सीएसआर फंडातुनही निधी उपलब्ध करुन घेण्यात येत आहे. जालना जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणुचा एकही पॉझिटीव्ह रुग्ण नाही परंतू पॉझिटीव्ह रुग्णांची येत्या काळात संख्या वाढल्यास अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी जालना जिल्ह्यात स्वतंत्र अशा 100 खाटांच्या कोरोना रुग्णालयाची उभारणी करण्यात येत असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.
जालना जिल्ह्यामध्ये  परदेश, परराज्य, परजिल्ह्यातुन आलेल्या व सर्दी, खोकला व ताप आहे काय याबाबत आरोग्य यंत्रणेमार्फत 2 लाख 62 हजार कुटूंबांचा सर्व्हे करण्यात आला असुन कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत जनजागृती करण्यात आली आहे. गावनिहाय रॅपीड ॲक्शन टीमची स्थापनासुद्धा करण्यात आली असुन ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आवश्यक तज्ज्ञांची भरती करण्याचे निर्देश प्रशासनास देण्यात आले असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.जिल्ह्यात खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची दवाखाने बंद असल्याच्या अनेक तक्रारी येत असुन त्यामुळे नागरिकांना साध्या आजारवर उपचार घेण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांची दवाखाने सुरु करुन नागरिकांना आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.  जे व्यावसायिक सेवा देण्यास असमर्थ ठरतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना आवश्यक त्या जीवनावश्यक वस्तु मिळतील यासाठी दक्षता घेण्याच्या सुचना करत स्वस्त धान्य दुकानदारांनी पुढील सहा महिन्यांचे एका महिन्यात दोन महिने याप्रमाणे पुढील तीन महिने अन्नधान्य उपलब्ध करुन देण्यात यावे.  परंतु हे करत असताना त्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. त्याचबरोबर समाजातील जे गोरगरीब, भिकारी किंवा ज्यांना कोणीही नाही अशांना भोजन उपलब्ध करुन देण्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घेण्यात यावी.  केवळ दहा रुपयांमध्ये भोजन देणाऱ्या शिवभोजन योजनेची व्याप्ती वाढविण्यात यावी  राज्यातील रुग्णांसाठी रक्ताची आवश्यकता असुन प्रत्येक तालुकास्तरावर रक्तदान शिबीरांचे आयोजन रक्त संकलन करण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिल्या.देशासह राज्यावर कोसळलेल्या या राक्षसरुपी संकटाचा मुकाबला करण्यासाठी सर्वांच्या सामुहिक प्रयत्नांची गरज असुन नागरिकांनी आपल्या घरातच राहुन या आजारावर मात करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती मंत्री महोदयांना दिली.
डायलेसीस रूग्णाला लॉकडाऊनचा फटका; बैलगाडीतून ऐंशी किलोमिटरचा प्रवास करत गाठले रुग्णालय
रात्री दोन वाजता निघाले गावातून सकाळी 10 वाजता आले                                             रुग्णालयात
नांदेड (भगवान कांबळे) :- संचारबंदीच्या भितीने
कोणी वाहनधारक रूग्ण घेवून जाण्यास तयार नसल्याने एका डायलेसिसवरील रूग्णास चक्क एेंशी किलोमिटरहून बैलगाडीतून रूग्णालयात दाखल करण्यात आले़ हा धक्कादायक प्रकार केवळ अज्ञानातून घडला आहे.
नांदेड जिल्ह्यातील पळसगाव ता़ उमरी येथील रोहिदास भीमराव पवळे हे वयोवृद्ध सध्या डायलेसिसवर आहेत. त्यांना आठवड्यातून दोन वेळा, रक्त बदलावे लागते़ त्यांना गावाकडून रेल्वे अथवा खाजगी वाहनाने नांदेड शहरात आणले जात असे़ परंतु, २३ मार्चच्या मध्यरात्री संचारबंदी लागू करण्यातसआली आणि सदर रूग्णांच्या नातेवाईकांनी धास्ती घेतली़ लॉकडाऊनमुळे सर्वच वाहने बंद असल्याने रूग्णालयात पोहोचायचे कसे, असा प्रश्न त्यांना पडला़ कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून संचारबंदी लागू केल्याने नांदेडला येण्यास वाहनाची व्यवस्था होत नव्हती़ त्यामुळे भयभीत झालेल्या पवळे कुटुंबियांनी सदर रूग्णास बैलगाडीतून नांदेडात नेण्याचे ठरविले आणि रात्री दोन वाजता पळसगावातून बैलगाडी निघाली़ तब्बल ऐंशी किलोमिटरचा हा प्रवास करून पवळे हे दस-या दिवशी  सकाळी १० वाजता नांदेडात पोहोचले़
त्यांच्यावर उपचार करून रक्त चढविण्यात आले़ परंतु, त्यांच्यासारखी अवस्था इतर रूग्णाची होवू नये, याची काळजी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे़ दरम्यान, कोरोनाला फाईट देत  जुन्या रूग्णांना रूग्णसेवा, वेळेवर औषधी, रूग्णवाहिका, सरकारी १०८ गाडी वेळवर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी अतिरिक्त रूग्णवाहिका, १०८ गाड्यांची तयारी प्रशासनाने ठेवणे गरजेचे आहे़
   मराठवाड्यातील खासगी दवाखाने व हॉस्पिटल लॉक-डाऊन  करणाऱ्या खासगी डॉक्टरांचे परवाने रद्द करा-बाबासाहेब कोलते
जालना (प्रतिनिधी) : मराठवाड्यातील काही
खासगी डॉक्टरनी व हॉस्पिटलनी यांचे अस्थापना व दवाखाने बंद करून लॉक-डाऊन केले आहे अशा लॉक-डाऊन करणाऱ्या खासगी डॉक्टर व हॉस्पिटलचे परवाने शासनाने अधिकृत चौकशी करून नियमानुसार बंद करण्यात यावे अशी मागणी स्वातंत्र्य सैनिक पाल्य युवक समितीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील कोलते यांनी मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना दिलेल्या निवेदनात बाबासाहेब कोलते यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील काही खासगी दवाखाने (हॉस्पिटल) ला ताळेबंद दिसते त्यामुळे दवाखाना बंद ठेवणाऱ्या डॉक्टरवर महाराष्ट्र मेडिकल कोन्सल कडील त्यांची नोंदणी रद्द करावी, समाजासाठी जाणीव ठेवून अडचणीच्या वेळी लोकांच्या आरोग्य सेवेसाठी पुढाकार घेऊन कामे करणे डॉक्टरानी अपेक्षित आहे त्यामुळे डॉक्टर मंडळीने सामाजिकतेचे भान ठेवून दवाखान्यांना कुलूप न लावता ते जनतेच्या सेवेसाठी कायम चालू ठेवावेत जनतेला सर्दी खोकला पडशासह इतर रुग्णांना तपासण्याची व त्यांच्यावर उपचार करण्याची कर्तव्य डॉक्टर मंडळीची आहे परंतु संपूर्ण देश लॉक-डाऊन असताना जालना सह मराठवाड्यासह काही खासगी डॉक्टरनी दवाखाने लॉक-डाऊन केल्यामुळे सर्व सामान्य रुग्णांचे हाल होत आहे, मराठवाड्यातील जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणातील शहरात कोरोना आजाराचा पार्श्वभूमीवर अनेक खासगी डॉक्टरानी सर्दी, पडसे व खोकल्याचे रुग्ण तपासणी एकीकडे बंद केलेली असतानाच दुसरीकडे इतर आजाराच्या रुग्नानाही तपासण्यास डॉक्टर नकार देत असल्याचे चित्र आहे, नेत्र तज्ञा सह काही डॉक्टरानी ओपीडी बंद केल्यामुळे सामान्य आजाराच्या रुग्णांची अवस्था बिकट बनली आहे, जालना शहराच्या जवळपास १२५ च्या वर खासगी दवाखाने व रुग्णालये आहेत, दररोज अनेक पेशंट तपासणीसाठी येतात मात्र गेल्या काही दिवसापासून कोरोना आजारामुळे बोटावर मोजण्याएवडे हॉस्पिटल वगळता बहुसंख्य डॉक्टरांनी रुग्णालयात येणे बंद केले आहे अथवा रुग्णालयात आल्यास सर्दी पडसे व इतर आजाराच्या रुग्णांना तपासणी करणे बंद केले असल्याचे निदर्शनास येत आहे.
ग्रामीण भागात खासगी प्रसूती दवाखाने बंद असल्याने सर्व भार आता शासकीय रुग्णालयावर पडला आहे, तरी कोरोना सारख्या गंभीर आजाराची दखल घेऊन खासगी दवाखाने व हॉस्पिटलचे डॉक्टराणे दवाखाने बंद न करता पूर्ववत सुरु ठेवावे अशी मागणी बाबासाहेब कोलते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे
जगाच्या विनाशाला चीन जबाबदार आहे ? कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग चिंतेची बाब - चंद्रकांत कारके

      आणूबाम्ब हल्ल्याची भिती कमी होते न 
 होते तोच, किटाणू बाम्ब, बिषाणू, जैविक हल्ल्याची भिती जगासमोर आ करून उभी आहे. त्यातल्या त्यात आज कोरोना रोगा ची प्रचंड दहशत. जगात आज या कोरोना विषाणू मुळे 26 हजार निश्पाप मानसांचे बळी गेले आहेत. आणि दिवसेंदिवस यात वाढ होत  आहे. हा संसर्ग जन्य रोग असल्यामुळे रुग्नांची संख्या गुणाकाराप्रमाणे वाढत आहे. त्यातल्या त्यात कोरोना रोगांवर कोणतेही 
औषध/लस ही उपलब्ध नाही. दहशत निर्माण होऊन, जगात या भयंकर महामारीमुळे हाहाकार माजला आहे
       अशा संकट समयी मनात एक विचार आला, हा कोरोना रोग आला कोठून ? उत्तर शोधतांना पटकन तोंडावर नाव येते ते चीन या देशाचे. मागिल काही महिण्यात आपण म्हणायचो, हा रोग चीन या देशाचा आहे, तिथली मानस काहीपण खातात. साप,अजगर,इंचू, उंदीर, वटवाघूळ, वेगवेगळ्या प्रकारची किडे - मकोडे, यांच्यापुढे जाऊन डुक्कर, गाढव, कुत्री-मांजर, ज्यांचा आपण विचार देखील करून शकत नाही असे प्राणी ते खातात यामुळे त्यांना हा भयंकर रोग झाला असावा.
                 मात्र चित्र काही वेगळंच दिसायला लागलं, मागील नोव्हेंबर महिन्यचा काळ असेल, चीन मध्ये पहिला कोरोना विषाणूचा रुग्ण आढळला आणि इलाजादरम्यान तो मुत्यु हि पावला, दिवसेंदिवस हा संसर्ग एका व्यक्तीपासून दुस-या व्यक्तिला होत होता, आणि रूग्न वाढतच होते, ज्या डॉक्टराला या भयंकर रोगाची माहिती होती त्या डॉक्टराचे नाव लिव ओन लिबलान असे काही, या डॉक्टरालाही इलाजादरम्यान संसर्ग होऊन त्याचा यातच मृत्यू झाला असे सांगतात, त्या डॉक्टर ने काही सोसीयल मिडीयावर काही ट्विट केले होते, या नंतर एक दुसरी महिला डॉक्टर जिचे नाव आयफाईन हिला ही याची कल्पना आली होती, मात्र  तीलाही शांत बसवण्यात आले. कही आंतरराष्ट्रीय मीडिया व अमेरिकेच्या तर्कानुसर असा आरोप केला जात आहे की, या कोरोनांचा संसर्ग झालेल्या डॉक्टराला हे सर्व माहित होते, हे जगाला सांगण्या आधीच त्याची हत्या करण्यात आली, त्यानी केलेले ट्विट डिलीट करण्यात आले, हा भयंकर महामारीचा कोरोना विषाणू चा रोग माहित असतांना चीनने हे जगाला सांगितले नाही. हि माहिती लपवून ठेवली.चीन कडे दोन जागतीक आगळ्यावेगळ्या प्रयोग शाळा ल्याब आहेत. एक जमीनीच्या 2400 खोल आहे, जिथे सुर्यकिरणाचा आणि वातावरणाचा कोणताही परिणाम होत नाही. आणि दुसरी प्रयोगशाळा चीनच्या वुहान शहराच्या 20 ते 25 कि.मी. अंतरावर, याच प्रयोगशाळेतून हा कोरोना विषाणूचा संसर्ग लिकीज झाल्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहेत.
          लक्षात ठेवा, हा घटनाक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे,  जेव्हा नोव्हेंबरला चीनमध्ये कोरोना विषाणू रोग वाढत असतांना 30 डिसेंबर पर्यंत हे चीन ने कोरोनाची माहिती कुणालाच  सांगितले नाही. जेव्हा WHO या जगतीक आरोग्य संघटनेला याची माहिती मिळाली, तेव्हा चीनने उत्तर दिले, हा रोग बरा करण्यात आमचा देश सक्षम आहे, काळजी करण्याची गरज नाही. त्या नंतर पहिल्या डॉक्टराचा संशयास्पद मृत्यू. चीन मध्ये जवळपास 70 लाख विदेशी नागरीक कामानिमित्त रहात होते, नोव्हेंबर ते डिसेंबरच्या शेवट पर्यंत हा कोरोना संसर्ग जवळपास सर्व चिन मध्ये पसरला होता, यात त्या चीन मधील हे विदेशी 70 लाख नागरीकांचा समावेश होता.  ते विदेशी नागरीक मोठ्या प्रमाणात इटली, अमेरिका,स्पेन, टोकियो, बॅंकोक,भारत, पाकिस्तान, सह अनेक देशातले होते. हे सर्व नागरिक आप अपल्या देशात नविन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी जानेवारी महिन्यात पोहोचली होती. त्यानंतर चीन ने लॉकडावूनची घोषणा केली. व या कोरोना विषाणू बाबत WHO या जागतिक आरोग्य संघटनेला कळवले. हा विषय आरोग्य संघटनेने गंभीरतेने घेत, कोरोना रोग हा संसर्ग जन्य रोग असुन ही एक प्रकारे महामारीच आहे असे घोषित केले. या सर्व प्रक्रियेला खूप उशीर झाल्या होता. जर चीनने हि 70 लाख जनता चीनमध्ये असतांनाच लोकडाऊन केले असते, आणि हि  कोरोना विषाणू ची माहिती जागतीक आरोग्य संघटनेला कळवली असती तर हा कोरोनाचा जिवघेणा रोग जगात पसरला नसता त्यावर उपाय योजना करता आली असती. मात्र तसे झाले नाही.  70 लाख वेगवेगळ्या देशांतील नागरीकांच्या माध्यमातून हा जिवघेणा कोरोना विषाणू पसरला होता. चीन नंतर इटली, स्पेन,अमेरिका नंतर सर्व देशांत मृत्यू चा तांडव सुरू आहे. जगात आज पर्यंत 26 हजार नागरीकांचा बळी गेला   आहे व जात आहे. देश विदेशात लाखो लोकांना या कोरोना महाभयंकर संसर्ग रोगाचा आजार जडला आहे. हे या रोगामुळे त्रस्त आहेत. ते दवाखान्यात इलाज घेत आहेत, आज पावेतो या कोरोना रोगाची लस औषध निघाले नाही हि अत्यंत चिंताजनक बाब आहे.
या जगात दोनच महासत्ता देश म्हणून ओळखले जातात एक अमेरिका आणि दुसरा चीन. त्यात अमेरिका हा  चीनवर आरोप करत आहे की, चीननेच हे जैविक विषाणू हातीयार आपल्या प्रयोगशाळेत तयार करून सोडले तर दुसरीकडे चीन हा देश अमेरिकेवर प्रतिअरोप करतो की, अमेरिकन लष्कराच्या मदतीने चीन मध्ये अमेरिकेनेच हा कोरोना विषाणू सोडला आहे. आज आपल्या भारत देशाच्या प्रधानमंत्री मा.नरेंद्रजी मोदी म्हणाले की, WHO या आरोग्य संघटनेच्या पुनर्रचने बाबत फेर विचार करावा. म्हणजे नक्कीच दाल मे कुच काला है या उक्ती प्रमाणे. म्हणून 
      काय खरच जगाच्या विनाशाला चीन जबाबदार असेल ? या बाबत सत्य काय आहे ?  हे आज मात्र गुलदस्त्यात बंद आहे. हे आज ना उद्या सर्व जगासमोर येणार आहे.  म्हणतात ना, सत्य परेशान हो सकता है, पराजीत नही. सत्यमेव जयते.
                 म्हणून कोरोना विषाणू या  रोगाची कोणतेही औषधी उपलब्ध नसल्यामुळे या रोगा प्रती गंभिरतेने घ्या, घराबाहेर पडुच नका, पडले तर तोंडाला मास्क बांधा, उपाय योजना म्हणून हात स्वच्छ धुवा, सेनिटाईज करा,सोसीयल‌ टिस्टंसेस पाळा, सर्दी,खोकला,ताप, डोकेदुखी,गळा दुखने, हि लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क करा. आज आपल्या देशात ऐकून 20 जनांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 874 रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र 1 नंबर वर आहे. 160 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे, हि संख्या वाढण्यात जास्त वेळ लागणार नाही म्हणून वेळीच उपाययोजना करा.केंद्र व राज्य सरकारच्या सर्व सुचनांचे तंतोतंत पालन करा हि अपेक्षा व विनंती.


चंद्रकांत बापूराव कारके
सामाजिक कार्यकर्ता ( M.S.W ) तथा अध्यक्ष,
भारतीय सुशिक्षित बेरोजगार विकास व प्रशिक्षण संस्था जालना मो. 9921684586
Email :ckarke3@gmail.com

खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करावे
रुग्णालयात बाह्यरूग्ण व चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध करुन द्यावी
                                         - जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे
जालना,प्रतिनिधी:- जनतेस आरोग्यसेवा उपलब्ध 
होण्यासाठी सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांच्या रुग्णालयात आवश्यकतेनुसार बाह्यरूग्ण सेवा व 24 तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देण्याचे शासनाने आदेश दिले असुन या आदेशाचे खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी पालन करावे.  रुग्णांना आवश्यक ती सेवा न मिळाल्यास संबंधित खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांवर कायदेशिर करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले सध्या खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांनी आपल्या रुग्णालयातील बाह्यरूग्ण सेवा बंद असल्यामुळे जिल्हाभरातील रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.  या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक तसेच जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी, यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील खाजगी वैद्यकिय व्यवसायाबाबत तपासणी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत कोणत्याही स्वरूपाची तक्रार आल्यास व रुग्णांना जरुरी सेवा न मिळाल्यास संबंधित खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचे बॉम्बे नर्सिंग होम अंतर्गत करण्यात आलेली नोंदणी रद्द करण्यात येईल. तसेच उपरोक्त आदेशाची अवज्ञा करणाऱ्या व्यक्तीस भारतीय दंड संहिता १८६० चे कलम 188 नुसार दिवाणी व फौजदारी कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही श्री बिनवडे यांनी सांगितले.
लॉकऊन मुळे रोजगाराचे साधन नसलेले, गरीब, बेघर, भिकारी, जिह्याबाहेरील जी व्यक्ती बाहेर जाऊ शकत नाही अशा लोकांची जेवणाची भ्रांत आहे. या लोकांच्या जेवणाची व्यवस्था तसेच भटकी जनावरे, पक्षी, प्राणी यांना अन्न व चाऱ्यासाठी मदत करु इच्छिणाऱ्या सामाजिक संस्था, एन.जी.ओ., तसेच स्वयंसहाय्यता गट, दानशुर व्यक्ती यांनी जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे मनोज देशमुख, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प, मोबाईल नंबर ९४२२२१५०१५ यांच्याशी संपर्क साधावा.
            जालना जिल्ह्यामध्ये दिनांक २७ मार्च, २०२० रोजी ०७ रुग्ण नव्याने दाखल झाले आहे आतापर्यंत एकूण ७३ रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल होते. त्यापैकी ७१ रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी ५४ रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आले व त्या रुग्णांचे डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजरोजी १४ रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज झालेल्या तसेच परदेशी प्रवासाचे पुर्व इतिहास असणा-या सर्व व्यक्तींचे घरीच अलगीकरण करण्यात आलेले आहे. आजपर्यंत एकुण १०७ परदेश प्रवास केलेल्या व्यक्तीपैकी १०३ व्यक्तीचे घरीच अलगीकरण करण्यात आलेले आहे. तसेच इतर शहरे व राज्यातून आलेल्या ७४९ व्यक्तीचे तपासणीअंती घरीच अलगीकरण करण्यात आले आहे. या सोबतच जालना जिल्ह्यामध्ये एकुण १५ संस्था अलगीकरणासाठी निवडण्यात आल्या असून त्यामध्ये १५३९ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.
            मागील एक महिन्यात, आपण जर कोरोनाग्रस्त देशातून आलेला असाल किंवा इतर जिल्ह्यातून जालना जिल्ह्यात आला असला तर पुढील फॉर्मच्या लिंक मध्ये (http://ezee.app/covid19jalna) संपूर्णपणे खरी माहिती देऊन भरावा, जेणेकरून आम्ही आपल्याला योग्य ती मदत करु शकू, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी केले आहे.
***
                   गृह विलगीकरण म्हणजे काय ?
बुलडाणा, प्रतिनिधी - कोरोना विषाणू संदर्भात विलगीकरण (Quarantine )bहा शब्द सध्या वारंवार कानावर पडतो. गृह विलगिकरण म्हणजे कोरोना बाधित देशातून आलेले भारतीय प्रवासी , परदेशी नागरिक तसेच देशातील कोरोना बाधित भागातून आलेल्या सर्वांनाच  समाजापासून आणि कुटुंबियांपासून वेगळे ठेवणे होय.  यांनी किती दिवस वेगळे राहायचे असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारण्यात येतो. कोरोनाच्या विषाणूचा शरीरात प्रवेश झाल्यानंतर त्याची लक्षणे दिसण्याचा कालावधी हा 2 ते 14 दिवसांचा आहे. काहींमध्ये  ही लक्षणे लवकर दिसतात तर काहींमध्ये अगदी 14 व्या ,पंधराव्या दिवशी दिसायला लागतात. त्यामुळे अशा इतरांपासून  आणि कुटुंबीयांपासून 14 दिवस दूर ठेवणे आवश्यक असते . जेणे करून यांना लक्षण आढळलीच  तर ते इतरांच्या संपर्कात येऊन त्यांना  बाधित करणार नाहीत. त्यासाठी त्यांनी 14 दिवसांसाठी गृहविलगिकणात राहणे आवश्यक आहे.  त्यांचा संपर्क  कुंटूबियासोबतच इतरांशी होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने  गृहविलगीकरणातील व्यक्तीं, आणि कुटुबियांसाठी काही मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत.
गृह विलगीकरण कक्ष
गृहविलगीकरण  कक्ष म्हणजे   शौचालय व स्नानगृह जोडून असलेली  घरातील वेगळी  खोली.  ही खोली हवेशीर आणि सुर्यप्रकाश येणारी असावी.
गृह विलगीकरणातील व्यक्तींने काय करावे?
 गृहविलगीकरणातील  व्यक्तीने अल्कोहोलयुक्त  सॅनीटायझर किंवा साबण ‍ आणि पाण्याने हात वारंवार स्वच्छ धुवावे. स्वत:चे वापरलेले ताट, पाण्याचे ग्लास, कप, जेवणाची भांडी, टॉवेल, पांघरुन, गादी इत्यादी दैनंदिन वापरातील घरगुती वस्तू घरातील इतर व्यक्तींना वापरण्यास देऊ नये.
 पूर्णवेळ सर्जीकल मास्कचा वापर करावा. मास्क दर सहा ते आठ तासाने बदलावे.  वापरलेल्या मास्कची  योग्यप्रकारे विल्हेवाट लावावी, डिस्पोजेबल मास्कचा पुन्हा वापर करु नये.  अशा व्यक्तीने  आणि सुश्रृषा करणा-या व्यक्तीने वापरलेले मास्क 5 टक्के ब्लीच किंवा 1 टक्के सोडियम  हायपोक्लोराईट द्रावणामध्ये निर्जतुक करुन  त्याची जाळून विल्हेवाट लावावी. वापरलेला मास्क  हा जंतु संसर्गयुक्त असतो. अशा व्यक्तीनी खोकला, ताप, श्वसनाचा त्रास, अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत जवळच्या शासकीय आरोग्य केंद्राशी संपर्क करावा.
गृह विलगीकरणात असलेल्या  व्यक्तीने  14 दिवस खोलीच्या बाहेर पडू नये, घरातील वृदध, गर्भवती स्त्री, लहान मुले व प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये, सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ नये
घरातील सदस्यांनी घ्यावयाची काळजी
शक्यतो  घरातील एकाच व्यक्तीने गृहविलगीकरणातील व्यक्तीची सुश्रृषा करावी. अशा व्यक्तीच्या शरीराशी थेट संपर्क येणे टाळावे. विलगीकरण कक्षाची स्वच्छता करतांना किंवा अशा व्यक्तींचे वापरलेले कपडे हाताळतांना डिस्पोजेबल ग्लोव्ह्जचा वापर करावा. त्यांचे कपडे झटकू नये. डिस्पोजेबल ग्लोव्ह्ज काढल्यानंतर हात  हॅन्डवॉशने स्वच्छ धुवावे.  नातेवाईक आणि अभ्यागतांना  अशा व्यक्तींना  भेटू देऊ नये. विलगीकरणात ठेवलेल्या व्यक्तीला कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास किंवा त्यांची चाचणी पॉझिटीव्ह आल्यास घरातील त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी गृहविलगीकरणात  14 दिवस राहावे. 
विलगीकरण कक्षाची स्वच्छता
        विलगीकरण कक्षातील वारंवार हातळल्या जाणा-या वस्तूंचे,( फर्नीचर, बेड, टेबल, खुर्ची ईत्यादी ) निर्जंतुकीकरण करावे. शौचालयाची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण    फिनाईलने करावी. अशा व्यक्तीचे कपडे, आंथरुन, पांघरुन  डिर्टजंटमध्ये स्वच्छ धुऊन उन्हात वाळवावे.
     अशा पद्धतीने काळजी घेतल्यास गृह विलगिकरणातील व्यक्तीची चाचणी पॉझिटिव्ह आल्यावरही घरातील इतर कुणीही बाधित होणार नाही. त्यामुळे काळजी घेणे हाच संसर्ग टाळण्याचा उत्तम पर्याय आहे.       *दैनिक आम्ही चिखलीकर*
कोरोना विरोधी लढ्यामध्ये जालना जिल्हा करू शकतो विश्वविक्रम
अ.भ.लोकहीत संघटनेचे शब्बीर पठाण यांच्यावतीने आव्हान.
जालना प्रतिनिधी :-जालना जिल्हा प्रशासन कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यंत नियोजनबध्द
कामगिरी बजावत आहे.
जालन्याचे जिल्हाधिकारी मा.श्री रवीन्द्र बिनवडे यांच्या निर्देशास आणि वेळोवेळी करण्यात येणाऱ्या आवाहनास जिल्ह्याभरातून जनतेचा ऊत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे.पोलीस प्रशासन आपल्या पुर्ण ताकदीनीशी कोरोनाच्या लढ्यात यशस्वी लढा देत आहे.जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा.श्री एस,चैतन्य साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी, कर्मचारी  यांनी संचारबंदी दरम्यान स्वताःला अक्षरशः कोरोना विरोधी लढ्यात झोकून देऊन 100% योगदान देत आहेत.आरोग्य विभागाचे आधिकारी, कर्मचारी यांच्या कार्याला तर जनता जनार्धन सलाम करीत आहे.जिवाची पर्वा न करता कोरोना चा लढा आरोग्य विभागाच्या ह्या देवमाणसांनी एकहाती सांभाळला आहे.जिल्ह्यातील व शहरातील खाजगी रूग्णालतील डाॕक्टर्स मंडळी सुध्दा ह्या संकट समयी आपली OPD चालू ठेवून ईतर सामान्य रूग्णांची औषधोपचार अभावी हेळसांड होऊ नये म्हणून आपआपल्या परीने सेवा पुरवीत आहेत.मा.पंतप्रधान नरेन्द्र मोदी,मा.मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे,मा.आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या वेळोवेळी अवाहनास जालना जिल्ह्यातील जनतेने प्रत्येक वेळेस प्रतिसाद देऊन या संकट समयी कोरोनाशी लढा देण्यासाठी आपण देशाच्या, महाराष्ट्र शासनाच्या सोबत असल्याचे सिध्द करुन दाखवले.देशभरात लाॕक डाऊन झाल्यापासून रोजंदारीवर काम करणारे मजूर,कामगार छोटे छोटे व्यापारी ज्यांच्या रोजी-रोटी चा प्रश्न असताना देशासाठी घरी राहून देशसेवेसाठी आम्ही सरकार सोबत असल्याचे सिध्द करून दाखवले.मागील 50 वर्षाचा ईतिहास पाहता जालना MIDC चे सर्व कारखाने पहिल्यांदाच एवढे दिवस बंद ठेवून मोठ मोठ्या कारखानदार मालकांनी कोरोनो च्या लढ्यात आपली भागीदारी दर्शवून दिली.40 वर्षामध्ये जालन्याची बेअरिंग ऊत्पादन करणारी नामांकीत NRB कंपनी पहिल्यांदा बंद आहे.जागतीक स्तरावर जालन्याचे नावलौकीक करणाऱ्या बियाणे (सिडस)कंपन्या बंद ठेवून कोरोना विरोधी लढ्यात सहकार्य करत आहेत.
आता गरज आहे ती फक्त आपल्या संयमाची.कोरोना विषाणूच्या बाबतीत सरकार च्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने जनजागृती भरपूर झालेली आहे.गरज आहे फक्त आपण त्यास सिरियसली घेण्याची.
प्रशासनान वेळोवेळी देत असलेल्या सुचनांचे जर आपण काटेकोरपणे पालन केले, तर आपण जालन्या जिल्ह्यामध्ये कोरोनास नक्कीच हरवू शकतो. कारण आजघडीला जिल्ह्यामध्ये कोरोना चा एक ही पेशंट पाॕझीटीव्ह आढळला नाही.जालना विश्व विक्रम करू शकतो बस गरज आहे ती की आपण घरा बाहेर पडणार नाही याची दक्षता घेण्याची.आणि प्रशासनाने सुचित केलेल्या सोशल डिस्टेन्सिग ठेवण्याची.
जालना जिल्ह्यातील सर्व नागरीकांना कळकळीची विनंती की,संचारबंदी चे  पालन करावे कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये.चला तर मग,जालना जिल्हा भारतातील सर्वोत्कृष्ट जिल्हा बनवू या.फक्त आपला सर्वांचा शिस्तीसह निर्धार हवा की मी च माझा रक्षक आहे, मी सुरक्षीत तर माझा परिवार सुरक्षीत, माझं शहर, जिल्हा,राज्य आणि देश सुरक्षीत. असे आव्हान शब्बीर पठाण. अ.भा.लोकहित संघटना
यांच्यावतीने करण्यात आले.
                         शेतकर्यांचा उन्हाळी पिकांवर जोर
सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी) श्याम गिराम :-जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव परिसरात उन्हाळी
बाजरी बहरली. पाण्याअभावी शेतकर्यांना रब्बीसह उन्हाळी पिके घेणे शक्य नव्हते. परंतु परतीच्या पावसाने जलसाठे तुडुंब भरले असुन विहीरींना मुबलक पाणी आहे. त्यामुळे शेतकर्यांनी उन्हाळी पिकांवर जोर दिला आहे.

शुक्रवार, २७ मार्च, २०२०

          पोलिस मारहाणीनंतर रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू 
                     मुलाकडुन होत कार्यवाही ची मागणी.
माझ्या पप्पा च्या मृत्यूस पोलिस कारणीभूत आहे असा मुलाचा आरोप.
दिवसेंदिवस पोलिसांकडून होणारा बळाचा गैरवापर थांबेल का?
ठाणे प्रतिनिधी :- आरोग्य सेवक व पत्रकार यांच्यावर
 पोलिसाकडून मारहाणीच्या घटना महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत आहेत या घटना कुठे तरी थांबले पाहिजे कारण पत्रकार बांधव आपल्या जिवाची पर्वा न करता बातम्या प्रसार करत आहेत. समाजा मध्ये जागृती निर्माण करतात तसेच आरोग्य कर्मचारीदेखील हे आरोग्य संदर्भात आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करत आहेत.सेवा करणाऱ्या व समाज जागृती करणाऱ्या बांधवास जर पोलीस प्रशासन आपल्या बळाचा गैरवापर करीत करत असतील तर हे योग्य आहे का ? यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी व गृहमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे.कारण दिवसेंदिवस पोलीस प्रशासनाचा गैरवापर होताना दिसून येत आहे हा गैरवापर थांबायला पाहिजे अशी मागणी पत्रकार,आरोग्य सेवक व सर्वसामान्य नारिकाकडून होत आहे.
हिंगोली येथील आरोग्य सेविकेची घटना ताजी असताना पत्रकारावर झालेल्या हल्ल्याची घटना तर आज 27 मार्च 2020 रोजी रुग्णवाहिका चालक नरेश शिंदे वय.49 रा.ठाणे यांना पोलिकडून मारहाण झाल्यामुळे त्यांचा मृत्यूझाला आहे.ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात 24 तास उपलब्ध असणारे, गोर गरीब रुग्णांच्या मदतीस तातडीने धावणारे समाजसेवक नरेश शिंदे रुग्णवाहिकेतून जात असताना घडली. या घटनेची सविस्तर माहिती अशी की,बोरिवली येथून श्रीगोंदा होते एका रुग्णाला घरी सोडविण्यासाठी नरेश शिंदे व मुलगा बंटी हे स्वतःची रुग्णवाहिका घेऊन पेशंटला सोडण्यासाठी जात होते. यावेळी त्यांनी रुग्णवाहिका चालविण्यासाठी त्यांचा निलेश (बंटी) नावाचा मुलाला ही सोबत घेतले होते.नरेश शिंदे हे अंबुलान्स घेऊन जात असताना टोल नाका तळेगाव येथे पोलिसांनी टोलनाक्यावर  रुग्णवाहिका थांबवली.पोलिस जवळ आल्यानंतर नरेश शिंदे यांना विचारपूस केली.चेकिंग केली त्यानंतर नरेश शिंदे याचा मुलगा याला खाली उतरण्यास सांगितले त्यानंतर नरेश शिंदे हे पोलिसांना हात जोडून विनंती केली आणि ते म्हणाले की, साहेब त्याला मारू नका मारायचं असेल तर मला मारा त्यानंतर पोलिसांनी त्यांना सांगितले की संचारबंदी लागू आहे आणि तुमच्यावर गुन्हा दाखल होईल त्यामुळे तुम्ही आम्हाला पाच हजार रुपये द्या.आम्ही तुमच्या वर गुन्हा दाखल करत नाही त्यावेळेस नरेश शिंदे हे त्यांना म्हणाले की साहेब माझ्याकडे पाच हजार रुपये नाहीत मी तुम्हाला तीन हजार रुपये देतो पोलिसांनी rs.3000 घेतल्यानंतर त्यांना नरेश शिंदे यांना काठीने मारहाण करून पोलिसांनी पैशे घेऊन सोडून दिले.त्यानंतर रुग्णवाहिका सोडून दिली व काही अंतर कापल्या नंतर बंटी चे वडील नरेश शिंदे यांना त्रास सुरू झाला.त्यांना माराच्या भीतीने आपला जीव गमवा वा लागला आहे. या सर्व घटनेची जबाबदार पोलीस आहेत.
असा आरोप मयत पिता नरेश शिंदे यांचा मुलगा बंटी यांनी केला आहे.

परभणी शहरातील दलित वस्त्यांसह अनेक भागात जंतूनाशक फवारणी करा.- मा.राधाजी शेळके
लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे च्या वतीने म.न.पा. आयुक्तांना निवेदन.
परभणी प्रतिनिधी:- देशासह संपूर्ण जग 
महाभयानक कोरोना या आजाराशी सामना करत आहे त्यात या आजाराचा सामना करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने स्वछतेचे आव्हान करण्यात येत आहे परभणी  मनपा प्रशासन हि यात चांगल्या पद्धतीने काम करत आहे परंतु परभणी शहरात गोरगरीब, पिढीत, दलित राहत असलेल्या वस्त्या या मोठ्या प्रमाणात आहेत या वस्त्यामधील बहुतांश व्यक्ती हे मनपामध्ये सफाई कर्मचारी आहेत. या महामारीमध्ये परभणी स्वच्छ ठेवण्याचे काम हे कर्मचारी करतात परंतु हे राहत असलेल्या वस्त्यांमध्येच अद्याप कुठल्याही प्रकारची जंतूनाशक फवारणी  मनपाच्या वतीने केली गेली नाही म्हणून या दलित वस्त्यांसह शहरातील अनेक प्रभाग असे आहेत ज्या ठिकाणी जंतूनाशक फवारणी झाली नाही हि फवारणी मनपा प्रशासनाने लवकर सुरु करावी या बाबतचे निवेदन आज लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने परभणी मनपा आयुक्त रमेश पवार हे कार्यालयात नसल्या कारणाने  त्यांचे स्वीय सहाय्यक उमेश जाधव यांच्या मार्फत देण्यात आले या वेळी लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा राधाजी शेळके, युवा नेते शिवाजी शेळके यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

कोरोना सारखा इतर रोगाची लागणहोऊ नये म्हणून बदनापूर शहरातील मातोश्री हॉस्पिटलने राखले रुग्नांमध्ये अंतर
बदनापूर/प्रतिनिधी:कोरोना रोगाव फैलाव
होवू नये म्हणून शासन विविध उपाययोजना करीत असून नागरिकांना देखील दक्षता बाळगण्याचे आव्हान नगर पंचायत मार्फत करण्यात आलेले आहे,तर डॉक्टरांनी देखील शासनाच्या सूचनांचे पालन सुरु केले असून मातोश्री हॉस्पिटलमध्ये रुग्णांमध्ये अंतर राखले जात असून इतर दवाखाण्यात देखील अश्याच पद्धतीने रुग्णांमध्ये अंतर ठेवल्यास रोगराई पसरणार नाही असे मत व्यक्त केले जात आहे 
  सध्या कोरोना रोगामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले असून सदर रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून शासनाने गर्दी न करण्याचे आव्हान केलेले आहे तसेच तोंडाला मास्क,हात सिंटायझर ने धुणे आदी सूचना दिलेल्या आहेत, रोग एक दुसऱ्यांच्या संपर्कात आल्याने वाढत जातो अशी धारणा अनेकांची असल्याने बोलतांना देखील अंतर ठेऊन बोलावे असे सूचित करण्यात आले आहे त्यामुळे स्वतःचे  रक्षण स्वतः करावे असे म्हंटले जात आहे,बदनापूर तहसीलदार छ्या पवार,नगर पंचायतच्यावतीने मुख्य अधिकारी डॉ.पल्लवी अंभोरे,अभियंता गणेश ठुबे,पोलीस निरीक्षक एम.बी.खेडकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.योगेश सोळुंके आदींनी नागरिकांना आव्हान केले आहे
   जस एक दुसऱ्यांमध्ये अंतर राखणे गरजेचे आहे तसं सध्या दवाखाण्यात विविध रुग्ण येत आहे मात्र दवाखान्यात रुग्णांमध्ये कोणतेच अंतर राखले जात नाही बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी रुग्ण येऊन बसतात आणि नंतर एक एक करून डॉक्टर कक्षेमध्ये तपासणी केली जाते त्यामुळे दवाखान्यात रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांना देखील इतर रोगाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून बदनापूर येथील मातोश्री हॉस्पिटलचे डॉ.अरुण खैरे व डॉ.अस्मिता खैरे यांनी दवाखाण्यात येणाऱ्या रुग्नांमध्ये अंतर ठेवण्यासाठी व्यवस्था केली असून आलेले रुग्ण एक मेकापासून दोन फूट अंतर राखून बसविले जात आहे त्यामुळे रोगराई पसरण्यास आळा बसणार आहे अश्याच पद्धतीने इतर दवाखान्यात देखील अंतर उपक्रम राबवावा अशी इच्छा व्यक्त केली जात आहे  
  सिद्धेश्वर पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने जंतुनाशक फवारणी
सिद्धेश्वर पिंपळगाव/ प्रतिनिधी ज्ञानेश्वर खरात:- सिद्धेश्वर पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील
सर्व भागात जंतुनाशक फवारणी करण्यात आली व गावातील नागरिकांनी स्वतःचे रक्षण स्वतः करावे या उद्देशाने कामाशिवाय बाहेर निघू नये व रस्त्यावर गर्दी करू नये. कोरोनाव्हायरस या रोगाचा उद्रेक थांबवण्यासाठी गावातील नागरिक व प्रशासन सज्ज झाले असून या कोरोनाव्हायरस या रोगावर विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे सर्व गावातील या जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे व ग्रामपंचायतचा शिपाई शंकर खेडकर यांनीही फवारणी केली आहे

संवेदनशीलता दाखवत खासगी डॉक्टरांनी रुग्णालये सुरू करावेत
      ट्रेसिंग, टेस्टींग, ट्रीटमेंट त्रिसुत्रीनुसार कोरोनाचा प्रतिबंध
               कोरोनाबाधीत १९ रुग्णांना घरी सोडले

                आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती.
मुंबई, प्रतिनिधी : कोरोनाचे संकट असताना
राज्यातील खासगी डॉक्टरांनी भीती पोटी दवाखाने बंद ठेवू नयेत. असा परिस्थितीत संवेदनशीलता दाखवून डॉक्टरांनी रुग्णालये सुरू करून नागरीकांना सेवा द्यावी, अशी सूचना करतानाच संचारबंदी काळात राज्यात रक्तदान शिबीरे घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संस्थांना सहकार्य करावे. नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे केले. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासन सध्या ट्रेसिंग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसुत्रीनुसार काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यातील कोरोनाचे रुग्ण बरे होत असून १९ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आल्याचे सांगत राज्यात सध्या १३५ रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधताना दिली.
*आरोग्यमंत्र्यांच्या संवादातील महत्वाचे मुद्दे:*
राज्यात सधया १३५ बाधीत रुग्ण आहेत. आतपर्यंत ४२२८ जणांच्या कोरोनासाठी चाचण्या केल्या त्यापेकी ४०१७ चाचण्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. १३५ पॉझीटिव्ह आले.
शासकीय आरोग्य सेवेतील डॉक्टर्स, कर्माचारी वर्ग तसेच अन्य आपातकालीन सेवेतील कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. सेवा देत आहेत. त्यांचे अभिनंदन. अशी सेवा देणाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याबाबत राज्य शासन विचार करीत आहेत.
कोरोना व्यतीरिक्तही अन्य आजारांच्या उपाचारांसाठी खासगी रुग्णालये सुरू साहणे आवश्यक आहेत. गरोदर महिला, लहान मुलांचे आजार, हृदयविकाराचे रुग्ण यांना वेळीच उपचाराची गरज असते. त्यामुळे राज्यभरातील खासगी डॉकटरांनी दवाखाने सुरू ठेवावेत. कोरोनाच्या भीतीपोटी दवाखाने ठेवू नका. संचारबंदीच्या काळात पोलीस आवश्यक ते सहकार्य करतील.
राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्ताची साठवणूक दीर्घकाळ करता येत नाही. कोवळ कोरोनच्या रुग्णांसाठी नव्हे तर अनेक वैद्यकीय उपचारांमध्ये , हिमोफेलीयाच्या रुग्णांसाठी रक्ताची गरज असते. अशावेळी सामाजिक संस्थांनी संचारबंदीकाळातील सूचनांचे पालन करून रक्तदान शिबीरे घ्यावीत. जिल्हा प्रशासनाने त्यांना सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रक्तदान शिबीरे घेताना सोशल डिस्टसिंग पाळण्याचे आवाहान करण्यात येत आहे.
ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे आणि उपचाराचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केले जात आहे असे कोरोनाबधीत रुग्ण बरे होत आहेत.
बाधीत रुग्णांपासून जवळच्या व्यक्तींना संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेऊन राज्य शासन सध्या अशा व्यक्तींचे ट्रेसींग नंतर त्यांची टेस्टींग आणि ट्रीटमेंट म्हणजेच शोध, तपासणी आणि उपचार या त्रिसुत्रीप्रमाणे काम करण्यात येत आहे.
नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगचा नियम मोडू नये. सर्वपक्षीय कार्यकर्ते, सामाजिक संघटना, मंडळांच्या कार्यकर्त्यांनी हातात हात घालून गरजूंना घरपोच सेवा देण्यासाठी पुढाकार घ्यावा.


  सुधीर शेषवरे यांना  राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकरत्न पुरस्कार
औरंगाबाद/ प्रतिनिधी - औरंगाबाद जिल्ह्यातील
शैक्षणिक , सामाजिक, सांस्कृतिक, कला, अभिनय आदी क्षेत्रातील सम्राट अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक सुधीर गुलाब शेषवरे यांना  मुंबईच्या मनुष्यबळ विकास लोकसेवा संस्थेच्या वतीने राज्य स्तरीय गुणवंत शिक्षक गुरूगौरव शिक्षकरत्न पुरस्कार २०२० करीता निवङीबददलचे पञ अँङ कृष्णाजी जगदाळे यांनी एका पञकातून कळविले आहे .सदरील पुरस्कार महाराष्ट्र दिनी एका संमारंभात देण्यात येणार आहे.
या पुरस्कार  निवङीबददल ङाँ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठाचे अधिसभा सदस्य ङाँ.शंकर अंभोरे,ङाँ.अनिल पांङे,प्रा.सुनील पांङे, देवानंद वानखेङे, अवद चाऊस, प्रा.संजय काळे,ईश्वर उमाळे,प्रदीप आमले, एस.एन.ओहळ,राहुल म्हसके,अनिल जाभाङे,प्रकाश निकम,संजय निकम,अंजन साळवे, आदीनी अभिनंदन केले.या पूर्वी मुपटा आदर्श शिक्षक पुरस्कार,लोकमत आदर्श शिक्षक पुरस्कार,शालेय संस्थेचा आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार यासह अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
        पोलिस आयुक्तालयातर्फे औरंगाबाद जनतेस आवाहन
       औरंगाबाद/शहर प्रतिनिधी- गणेश आठवले :- आज संपूर्ण जगामध्ये थैमान घातलेल्या कोरणा विषाणूमुळे परिस्थिती अत्यंत गंभीर स्वरूपाची झाली आहे, म्हणून प्रशासनाला
कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय योजनेचा एक भाग म्हणून १४ एप्रिल २०२० पर्यंत देशात संचारबंदी /जमावबंदी घालण्यात आली आहे, देशात पुढील २१ दिवस लाॅक डाऊन आहे, त्या अनुषंगाने औरंगाबाद शहर पोलीस दलातर्फे शहरांमध्ये जागोजागी चौकाचौकात गल्लीबोळात संचारबंदी/जमावबंदी,चेक पॉईंट व पेट्रोलिंग लावण्यात आली आहे .
औरंगाबाद पोलिस आयुक्त. साहेब मार्फत जनतेला काही आव्हान करण्यात आली आहेत की,कोरोचा प्रसार होऊ नये ही जबाबदारी प्रत्येकावर आहे. नागरिकांनी एकत्र जमू नये सर्व धर्मगुरूंना सर्व धार्मिक स्थळांना विनंती करण्यात आली आहे, मंदिरे, मशिदी,बुद्ध विहारे ,गुरुद्वारा, चर्च इत्यादी ठिकाणी पूजा-अर्चा नमाज/अर्दाज हे फक्त धार्मिक स्थळावरील लोकांनीच करावी.नागरिकांनी पुजा  अर्चा, नमाज ही घरीच करावी . सध्याच्या परिस्थितीमध्ये जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा अफवा पसरू नये.अत्यावश्यक सेवा जसे दूध, भाजीपाला, कृषी विक्री केंद्र किराणामाल पुरवठा केंद्र, बँका, एटीएम, दवाखाने, औषधी दुकाने, पोस्ट ऑफिस, पाटबंधारे विभाग, पाणीपुरवठा विभाग इत्यादी आवश्यक सेवा 24 तास खुली राहणार आहेत. संबंधित दुकानदारांनी ग्राहकाच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.(दोन ग्राहकांमधील अंतर हे एक मीटर असावे)निर्जंतुकीकरण स्वच्छता याबाबत शासनाने घालून दिलेल्या सूचना पाळाव्यात.
तरी नागरिक शहरामध्ये विनाकारण फिरताना दिसले तर अशा नागरिकां  विरुद्ध उद्यापासून कडक कारवाई करण्यात येणार आहे .नागरिकांनी एका वेळी घरातुन एकाच व्यक्तीने बाहेर पडावे तेही जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी असतील तरच .
जे नागरिक होम क्वारंट्यान आहेत त्यांनी घरीच थांबावे घरांमध्ये देखील इतर लोकांशी संपर्क टाळावा. शहरांमधून आवश्यक नसल्यास प्रवास करू नये, औरंगाबाद शहरामध्ये संचारबंदी/जमावबंदी असताना देखील फिरणाऱ्या व्यक्तीवर साथरोग प्रतिबंध अधिनियम १८९६,आपत्ती प्रतिबंध अधिनियम २००५ व भारतीय दंडविधान संहितेच्या अंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये सहा महिने ते दोन वर्षापर्यंतचे शिक्षेची तरतूद आहे. या संबंधाने आज रोजी सिटीचौक येथे चार गुन्हे वाहतूक शाखेकडून तीन गुन्हे व उद्यापासून शहरांमध्ये फिरणाऱ्या फिरणार यांवर वाहनांवर ४४३ केसेस दाखल केल्या आहेत. तरी नागरिकांनी घरीच थांबावे व कोरणा विषाणूपासून स्वतःचे स्वरक्षण स्वतः करावे असे आवाहन पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी केले.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...